पावसाळा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात मस्त हिरवीगार झाडं, पावसाळी पिकनिक, गरमागरम भजी आणि भुट्टा अशा विविध गोष्टी. पावसाचा पहिला थेंब, मातीचा सुगंध आणि उन्हाळ्यातल्या उकाड्यापासून सुटकेमुळे आपल्याला मस्त वाटू लागतं. पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तसंच काहीसं पावसाच्याबाबतीतही आहे. एकीकडे पावसाच्या आगमनाने काहींना आनंद होतो तर काहींना याच पावसाने त्रासही होतो. खरंच पावसासोबतच बऱ्याच जणांना अनेक Skin Problems ना सामोरं जावं लागतं आणि त्याची काळजीही घ्यावी लागते. हाच मुद्दा लक्षात घेऊन या लेखात आम्ही तुम्हाला Monsoon मध्ये सामोरं जावं लागणाऱ्या स्किन प्रॉब्लेम्सबद्दल सांगणार आहोत आणि त्यावरील उपायही.
पावसाळ्यात होणारे स्कीन प्रोब्लेम्स (Common Skin Problems During Monsoon)
आपल्यापैकी बऱ्याच जणांना पावसाच्या पाण्यात भिजल्यावर लगेच त्रास होतो. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे फंगल इन्फेक्शन्स, स्कीन रॅशेस आणि खाज येणे यासारख्या समस्या टाळणे काहींना शक्य होत नाही. एका सर्वेक्षणानुसार या दिवसांमध्ये डायबेटीक पेशंट्सनी अधिक काळजी घेण्याची गरज असते. कारण अशा पेशंट्सना लगेच स्कीन इंफेक्शन्स आणि इतर त्वचेसंबंधी समस्या पावसाळ्यात होण्याची भीती असते. पायाची काळजी घेण्यासाठी उत्पादने बाजारामध्ये आहेत. पण त्याचा कसा वापर करायचा, ते सुरक्षित आहेत की नाही याची खातरजमा करणेही गरजेचे असते.
Shutterstock
जास्त प्रमाणात खाज येणं (Itching)
पावसाळ्यात खूप प्रमाणात खाज येऊ लागल्यास त्याला एक्झीमा असं म्हणतात. ज्यामध्ये त्वचेला खूप खाज येते, जळजळ होणे आणि त्वचा लाल होणे ही लक्षणं दिसून येतात. पावसाळ्यात बरेचदा एखाद्या ठिकाणी साचलेलं पाणी किंवा कपड्यातील एखाद्या अलर्जीमुळे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्यांची त्वचा सेन्सिटीव्ह आहे त्यांनी पावसाळ्यात खासकरून काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
रिंगवर्म (Ringworm )
रिंगवर्म हे एक फंगल इन्फेक्शन असून पावसाळ्यात हमखास होतं. हे इन्फेक्शन झाल्यावर त्वचेवर लाल आणि गोलाकार पॅचेस दिसू लागतात. खासकरून हात, दंड, छाती, मान आणि स्कॅल्पवर हे दिसून येतात. यावर वेळीच औषध घेतल्यास ते बरं होतं. पण हे झाल्यावर कोणताही उपाय स्वतः करू नका. नाहीतर याचे वाईट डाग तुमच्या त्वचेवर राहतील.
फॉलिक्युलाईटीस (Folliculitis)
हे केसांच्या फॉलिकल्सना बॅक्टेरिया किंवा फंगसमुळे होणार इन्फेक्शन आहे. केसाचं फॉलिकल इन्फेक्टेड झाल्यावर ते सूजतं आणि पिंपलसारखं लालसर दिसू लागतं. कधी कधी यात पू सुद्धा होऊ शकतो. शरीराला जास्त घाम किंवा जास्त वेळ ओलसर राहिल्याने हा त्रास होऊ शकतो. खासकरून तुमच्या हातांवर, पाठीला आणि जांघेच्या ठिकाणी हा त्रास होतो. पण यावरही बरेच उपाय उपलब्ध आहेत.
स्कॅबीज (Scabies)
स्कॅबीज म्हणजे आपल्या डोळ्यांनाही न दिसणारे अगदी लहान कीटक आपल्या त्वचेवर वाढू लागतात. ज्यांच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात खाज किंवा रॅशेस येऊ शकतात. हा स्कीन प्रोब्लेम संसर्गजन्य असून अस्वच्छ कपडे किंवा बेडींगमुळे होऊ शकतो. पण घाबरू नका यावर उपाय आहे. अँटी बायोटीक्स आणि मेडिकेटेड लोशन लावून हे बरं करता येतं.
कोरडी त्वचा होणे (Dry Skin)
ड्राय स्कीन असणाऱ्यांना फक्त हिवाळ्यातच त्रास होतो असं नाही. तर पावसाळ्यातही ड्राय स्कीनची समस्या जास्त जाणवते. कारण सतत पाण्यात राहिल्याने पावसाळ्याच्या दिवसात त्वचा जास्त कोरडी होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात जास्त वेळ ओलं राहिल्यास ड्राय स्कीन असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.
हे कसं टाळता येईल (How To Prevent It)
Canva
वरील स्कीन प्रोब्लेम्स आणि इंफेक्शन तुम्हाला टाळण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता.
- स्वच्छता : पावसाळ्यात होणारे स्कीन प्रोब्लेम्स टाळण्यासाठी स्वच्छता राखणं सर्वात महत्त्वाचं आहे. खासकरून तुमचे कपडे आणि अंडरगारमेंट्स हे स्वच्छ असलेच पाहिजेत. तसंच घरात जास्तीतजास्त स्वच्छता ठेवा.
- कपडे : पावसाळ्यात बरेचदा बाहेर गेल्यावर भिजायला होतं त्यामुळे आपले कपडे बराच काळ ओले राहतात. जास्त वेळ ओल्या कपड्यात राहिल्यामुळे त्वचेला अलर्जी आणि इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात बाहेर पडताना पाऊस असो वा नसो रेनकोट किंवा छत्री आवर्जून सोबत न्या. तसंच बाहेर जाणार असाल तर स्वतःचे कपडे सोबत कॅरी करा. कारण इतरांचे कपडे घातल्यामुळेही त्वचेची समस्या होऊ शकते. सैलसर कपडे घाला.
- योग्य डाएट : पावसाळ्याच्या ऋृतूत आपला जठराग्नी मंदावलेला असल्याने पचनाची क्रिया लवकर होत नाही. तसंच या दिवसांमध्ये मांसाहार केल्यास त्वचेच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त तिखट किंवा मसालेदार खाण्याऐवजी मौसमी फळ, भाज्या, दही, बदाम, लसूण, ब्राऊन राईस, ओट्स असे पदार्थ तुम्ही आहारात समाविष्ट करावे. पाऊस असला तरी वेळोवेळी पाणी पिणंही आवश्यक आहे.
- फूटवेअर : या हवामानात जसे कपडे सुकलेले असले पाहिजेत तसंच तुमचं फूटवेअरही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही या दिवसांमध्ये लेदर शूज, सॉक्स किंवा कापडी चपला घालणं टाळलं पाहिजे. त्याऐवजी लवकर सुकणाऱ्या आणि ओपन चपला किंवा सँडल्स वापरावेत. ज्यामुळे पाय ओला राहत नाही. कारण बरेचदा पाय ओला राहिल्यामुळे अनेक प्रकारची इन्फेक्शन झाल्याचं दिसून येतं.
पावसाळ्यात घ्या त्वचेची योग्य काळजी (Skin Care In Monsoon)
Shutterstock
आपण वर पाहिल्याप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात त्वचा ओली राहिल्यामुळे अनेक त्वचा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. जाणून घ्या काही सोप्या टीप्स –
- त्वचेसाठी सोप फ्री क्लिन्जर्स आणि स्क्रब्स वापरून त्वचा आर्द्र (Moist) ठेवा.
- पावसाळा असला तरी त्वचेसाठी टोनिंग करणं महत्त्वाचं आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर अल्कोहोल फ्री टोनर वापरा. ज्यामुळे त्वचा जास्त कोरडी होणार नाही.
- आपल्याला वाटतं की, फक्त उन्हाळ्यातच सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे. पण असं नाहीयं, पावसाळ्यात सूर्य जास्त वेळ दिसला नाही तरी सनस्क्रीन लावणं महत्त्वाचं आहे.
- फेशियल आणि ब्लीचमुळे पावसाळ्यात त्वचा रफ होते. त्यामुळे या गोष्टी पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो टाळा किंवा कमी करा.
- लक्षात ठेवा पावसात बाहेर जाताना नेहमी कमीत कमी आणि वॉटरप्रूफ मेकअप करा.
- फुटलेले ओठ टाळण्यासाठी मिल्क क्रिम नियमितपणे वापरा आणि जास्त डार्क रंगाच्या लिपस्टीक वापरणं टाळा.
- त्वचेच्या प्रत्येक भागाची स्वच्छता महत्त्वाची असल्याने मॅनीक्युअर, पेडीक्युअर आणि वॅक्सिंग नक्की करा.
- बाहेरून आल्यावर चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा.
वाचा – नागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत
पावसाळ्यातील केसांची काळजी (Hair Care In Monsoon)
Shutterstock
पावसाळ्यातील दमटपणामुळे (humidity) ज्यामुळे स्कॅल्पला खाज सुटते. त्यामुळे केसांची गळती वाढू शकते. पावसाळ्यातील केसांच्या समस्या टाळण्यासाठी फॉलो करा पुढील गोष्टी –
- मॉन्सूनमध्ये बाहेर पडणारा पाऊस आणि आईकडून डोक्याची मालीश करून घेणे यासारखं सुख नाही. खरंच या दिवसात केसांना येणारी खाज टाळण्यासाठी नारळाच्या किंवा कोंडा टाळण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाने स्कॅल्पला नक्की मसाज करा.
- जर तुमचे केस पावसात भिजल्यास घरी आल्यावर योग्य शँपूने ते लगेच धुवा आणि केस लवकरात लवकर वाळवा.
मान्सूनमध्ये केसांना कंडीशनरची गरज असते. त्यामुळे माईल्ड शँपूने केस धुतल्यावर केसांना कंडीशन करायला विसरू नका. - जर तुम्ही केसांना कलर करत असाल तर पावसाळ्याच्या दिवसात हे टाळा.
- पावसाळ्याच्या दिवसात केमिकल शँपूऐवजी नैसर्गिक हर्बल प्रोडक्ट्स वापरण्यावर भर द्या. ज्यामुळे तुमच्या केसांची चमक आणि नैसर्गिक सौंदर्य कायम राहील.
- पावसाळ्यात केस घट्ट बांधण टाळा. तसंच ब्लो ड्रायने केस न सुकवता. ते नैसर्गिकरित्या टॉवेलने सुकवून वाळवा.
पायांची काळजी पावसाळ्याच्या दिवसात (Foot Care)
Shutterstock
आपल्या पायांकडे आपलं नेहमीच दुर्लक्ष होतं पण पावसाळ्यात असं करता कामा नये. कारण पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कात सर्वात जास्त येणार अवयव म्हणजे पाय. जाणून घ्या मान्सूनमध्ये कशी घ्यावी पायांची काळजी –
- प्रत्येकवेळी बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा. यामुळे पायांची त्वचा फंगल इन्फेक्शनपासून सुरक्षित राहील. कारण डायबिटीस पेशंट्सना पायांना इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते.
- शक्यतो पावसाळ्यात पाय ओले राहू देऊ नका. सॉक्स आणि चामड्याचे शूज घालू नका. कारण यामुळे पायाशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात. पाय कोरडे आणि स्वच्छ ठेवा.बरेचदा पावसाळ्यात पायांना घाणेरडा वास येतो. तो टाळण्यासाठी तुमच्या पायांना गरम पाण्यात बुडवून ठेवा. किमान दहा मिनिटं तरी ही कृती करावी. या पाण्यात तुम्ही लेमन ड्रॉप्सही घालू शकता.
- पायांसाठीही चांगल्या फूट स्क्रबर आणि मॉईश्चराईजरचा वापर करा. ज्यामुळे तुमच्या पायांची त्वचा मऊ आणि मुलायम राहील.
- तसंच नियमितपणे नखं कापायला विसरू नका. कारण बरेचदा पावसाळ्यात नखांमध्ये माती आणि घाण अडकून राहते. ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
- पावसाळ्याच्या दिवसात योग्य मापाचं फूटवेअर घालणंही आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला पावसाच्या पाण्यात नीट चालता येईल आणि पायही स्वच्छ राहतील. त्यामुळे हाय हील्स, स्लीपर्स पावसात घालणं टाळा.
पावसात त्वचेच्या काळजीसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Skin During Monsoon)
घरगुती उपाय हे प्रत्येक ऋृतूत उपयोगी पडतातच आणि बरेचदा ते सोपेही असतात. मुख्य म्हणजे या उपायांचे काही साईड ईफेक्ट्सही नसतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात खालील घरगुती सोपे उपाय नक्की करून पाहा.
नारळाचं तेल (Coconut Oil)
Shutterstock
तुमचे ओठ हेही तुमच्या त्वचेचा भाग आहेत. त्यामुळे त्यांची नियमितपणे काळजी घेणं आवश्यक आहे. पावसाळ्यात हिवाळ्याप्रमाणेच ओठे कोरडे आणि सुकलेले दिसतात. यावर नैसर्गिक आणि चांगला उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी त्यांना नारळाचं तेल लावणे. तसंच पावसात भिजून आल्यावर हातपाय कोरडे झाले असल्यास त्यालाही तुम्ही नारळाच्या तेलाने मसाज करू शकता. केसांसाठीही नारळाचं तेल मान्सूनमध्ये वरदान आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसातील सर्वोत्तम उपायांपैकी हा एक आहे.
ओटमील स्क्रब (Oatmeal Scrub)
Shutterstock
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पावसाळ्याच्या दिवसात अतिरिक्त तेलकटपणा टाळण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे ओटमील स्क्रब. कारण पावसात तुमच्या त्वचेतून जास्त तेल बाहेर उत्सर्जित होतं.
असा बनवा ओटमील स्क्रब –
थोडासा मध आणि ओटमील घेऊन ते मिक्स करा. संपूर्ण चेहऱ्यावर लावा. स्क्रबरसारखा त्याचा चेहऱ्यासाठी वापर करा आणि नंतर धुवून टाका.
बदाम आणि मध (Almond And Honey)
Shutterstock
ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांच्यासाठी बदाम आणि मध हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. बदाम वाटून घ्या आणि त्यात मध मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने बोटांच्या साहाय्याने मसाज करा. चेहऱ्यावरील डेड स्कीन आरामात निघून जाईल. ही पावसाळ्यासाठी उत्तम स्कीन केअर ट्रीटमेंट आहे.
वॉटर थेरपी (Water Therapy)
Shutterstock
तुकतुकीत त्वचेमागील खरं रहस्य असतं व्यवस्थित पाणी पिणं. संपूर्ण वर्षाप्रमाणेच पावसाळ्याच्या दिवसातही किमान 8 ग्लास पाणी रोज पिणं सर्व स्कीन प्रोब्लेम्सवरील उत्तम उपाय आहे. पावसाळ्यातील त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी हायड्रेट राहणं महत्त्वाचं आहे. तसंच यामुळे तुमच्या शरीरातील विषारी द्रव्यंही बाहेर टाकली जातात. त्यामुळे पावसाळा असला तरी पाणी पिणं कमी करू नका.
पावसाळ्यातील Skin Problems बाबतचे FAQs
Shutterstock
पावसाचं पाणी त्वचेसाठी अयोग्य असतं का Is rain bad for your skin?
याबाबत अनेकांनी वेगवेगळी मत मांडली आहेत. त्यामुळे पावसाचं पाणी त्वचेसाठी चांगलं आहे की नाही याबाबत नक्की माहिती आढळत नाही. खरंतर पावसाचं पाणी सर्वात शुद्ध पाणी असं म्हटलं जातं. लहानपणी आम्हाला आजी सांगायची की, पहिल्या पावसात भिजल्यावर त्वचेच्या सर्व समस्या दूर होतील. पण तुम्हाला काही अलर्जी असल्यास हे पाणी तुम्ही उकळून आंघोळीसाठी वापरू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला काही अपाय होणार नाही.
पावसाळ्यात नेमकी काय काळजी घ्यावी How can we take care of rainy season?
पावसाळ्यात मुख्यतः स्वच्छता आणि तीही हाताची स्वच्छता बाळगणं महत्त्वाचं आहे. खासकरून जेवण बनवताना, तसंच तुमच्या सोबत नेहमी मॉस्किटो रिप्लंट कॅरी करा. कारण पावसाळ्यात डासांचा त्रास वाढतो. नियमितपणे आंघो करा. खासकरून पावसातून भिजून आल्यावर. भरपूर पाणी प्या आणि बाहेर खाणं टाळा.
पावसाचं पाणी पिणं योग्य की अयोग्य Is rain water dangerous?
खरंतर वरं सांगितल्याप्रमाणे पावसांचं पाणी शुद्ध आणि पिण्यासाठीही चांगलं असतं. कारण आपल्याला होणारा पाणीपुरवठा याच पाण्यापासून केला जातो. या पाण्यात प्रदूषण, पॉलेन आणि इतर विषारी घटकाचं प्रमाण कमी असतं.
पावसाळ्यात जास्त केस गळतात का Does monsoon cause hair fall?
पावसाळ्यात बहुतांश वेळा त्वचेप्रमाणेच केसांची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. केस जास्त वेळ ओले राहिल्याने ते गळण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात भिजून आल्यावर केसावरून आंघोळ करणे आणि केस घट्ट न बांधता सुकवणे बंधनकारक आहे. कारण ओले केस घट्ट बांधल्याने डँड्रफ होण्याचीही भीती असते.
पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी (Skin Care Tips For Monsoon In Marathi)पावसाळ्यात हे घरगुती उपाय करून आजारपण ठेवा दूरपावसाळ्यातील त्वचेच्या समस्या, अलर्जी आणि त्याची काळजी