ADVERTISEMENT
home / भविष्य
healthy food

जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कोणते पदार्थ ठरतात फायदेशीर आणि घातक

निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला खाणंंपिणं चांगलं असण्याचीही गरज असते. पण आपल्या शरीराला नुकसान पोहचवेल अशा अनेक पदार्थांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठी तुमची रासही तितकीच जबाबदार आहे. तुम्ही तुमच्या राशीनुसार खातापिता का? हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना? असं कसं होऊ शकतं. पण राशीचा अभ्यास असतो. त्यानुसार काही पदार्थ हे तुमच्यासाठी खाणं फायदेशीर असतात तर काही पदार्थ हे घातक ठरतात. आपण या लेखातून हेच पाहणार आहोत. तुम्हालाही जाणून घ्यायची उत्सुकता असेल ना? आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. 

मेष (21 मार्च – 19 एप्रिल)

या राशीच्या व्यक्तींनी जास्त तिखट, लाल मिरची खाणं योग्य नाही. तसंच गरम पदार्थांपेक्षा थंड पदार्थ खाणं या व्यक्तींसाठी जास्त चांगलं राहील. तसंच जेवण जेवताना अन्न व्यवस्थित चावून खाणं गरजेचं आहे. कधीही घाई करणं योग्य नाही. तुम्हाला गोड पदार्थांमध्ये मेव्याची खीर, गाजर हलवा, शिरा हे खाणं जास्त फायदेशीर ठरेल. या राशीच्या व्यक्तींनी आपल्या जेवणात कार्बोहायड्रेटपेक्षा प्रोटीनचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. 

वृषभ ( 20 एप्रिल – 20 मे)

तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासह एकत्र बसून जेवणं शुभ ठरेल. तसंच तुम्ही शिळं अन्न खाऊ नये. कच्च्या भाज्या आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करा. कधीतरी मखाण्याची खरी बनवून खा अथवा इतरांनाही खाऊ घाला. यामुळे तुमची होत नसलेली कामं मार्गी लागतील. रात्री लवकरात लवकर जेवा. तसंच तुम्ही तुमच्या आहारात पालक, हिरवं सलाड, क्रॅनबेरीज, फरसबी, दूध या पदार्थांचा जास्त समावेश करून घ्यायला हवा.

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

ADVERTISEMENT

मिथुन (21 मे – 21 जून)

तुम्ही जास्त बाहेर खाणं योग्य नाही. घरचं जेवण तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आणि भविष्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्हाला फास्ट फूडपासून थोडं दूरच राहायला हवं. कारण या राशीच्या व्यक्तींची नर्व्हस सिस्टिम ही बऱ्यापैकी कमी ताकदीची असते. बऱ्याचदा या व्यक्ती धावपळीत, चालत फिरत खातात त्यामुळे यांना पचनशक्तीची समस्या बऱ्याचदा उद्भवते. त्यामुळे नेहमी व्यवस्थित जमिनीवर बसून जेवण्याच प्रयत्न या व्यक्तींनी करावा. तसंच या व्यक्तींनी ताक, पनीर, दूध आणि फळांचं अधिक सेवन करायला हवं. 

कर्क (22 जून – 22 जुलै)

तुम्ही नेहमी तुमच्या जोडीदाराबरोबर एकाच ताटात जेवाल तर फायदेशीर ठरेल. जेवणामध्ये सतत कुरबुरी करू नका. जे मिळेत ते प्रेमाने खा. तसंच तुम्ही तुमच्या बिछान्यावर अथवा बेडवर बसून जेऊ नये. तसं तर या राशीच्या व्यक्ती या मूडी असतात. आनंदी असतील तर भरपूर खातात आणि आनंदी नसतील तर अजिबातच खात नाहीत. पण हे योग्य नाही. या राशीच्या व्यक्ती ओव्हरइटिंगच्या बाबतीतही पुढे असतात. तुम्हाला जास्तीत जास्त फळांचं सेवन करायला हवं. तसंच रोज योग्य जेवण जेवायला हवं.

सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)

या राशीच्या व्यक्तींंनी शनीसंबंधित जेवणाचे पदार्थ अर्थात शनीच्या पूजेसाठी वापरण्यात येणारे पदार्थ खाऊ नयेत. तसंच तुम्ही तुमच्या आहारातून कार्बोहाइड्रेट दूर ठेऊन भाज्यांना जास्त महत्त्व द्यायला हवं. या व्यक्ती खूपच लवकर जाडेपणाची शिकार होतात. त्यासाठी या व्यक्तींनी नेहमी चणे, कुरमुरे असे पदार्थ  खावे. तसंच घरी अथवा ऑफिसमध्ये काही कुरकुरीत पदार्थ ठेऊन द्या जे तुम्ही भूक लागल्यावर येताजाता खाऊ शकाल. 

कन्या (23 ऑगस्ट – 22 सप्टेंबर)

या राशीच्या व्यक्तींना त्वचेच्या समस्या असतात त्यामुळे या व्यक्तींना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. शिळं खाणं शक्यतो टाळा. तांब्याच्या ताटात जेवा. अशा व्यक्तींना अलर्जीचा जास्त त्रास होतो. त्यापासून वाचण्यासाठी या व्यक्तींना जैविक आहार घ्यायला हवा. तुम्हाला हवं तर तुम्ही ओट्स, व्हिट ब्रेड, भात, फळं आणि डेअरी प्रॉडक्ट्सचा वापर करू शकता. लक्षात ठेवा की, जेवताना तुम्ही नेहमी मौन बाळगा आणि जेवण व्यवस्थित चावून खा. 

ADVERTISEMENT

तूळ (23 सप्टेंबर – 22 ऑक्टोबर)

या राशीच्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम घ्यायला हवं. दही, केळं, पालेभाज्या यांचाही समावेश करून घ्यावा. या राशीच्या व्यक्तींवा लिव्हरशी निगडीत समस्या उद्भवत राहतात. त्यामुळे प्रोसेस्ड फूडपासून दूर राहा. तुम्हाला कधीतरी एकट्याने बसून जेवायची गरज आहे. तसंच सूर्य, चंद्र आणि मंगळाशी निगडीत असणाऱ्या पदार्थांपासून तुम्हाला दूर राहायला हवं. 

वृश्चिक (23 ऑक्टोबर – 21 नोव्हेंबर)

या राशीच्या व्यक्तींनी गरमागरम चहा, कॉफी अथवा सूप पिऊ नये. या व्यक्तींनी थंड पेय पिणं जास्त हितकारक आहे. या व्यक्तींना जंत आणि बद्धकोष्ठाची समस्या उद्भवते. त्यामुळे या व्यक्तींनी जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ खायला हवेत. तसंच या राशीच्या व्यक्तींनी भात, पेठा, केळं, आंबट फळं यासारखे पदार्थ खायला हवेत.  

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

धनु (22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)

या राशीच्या व्यक्तींना अल्कोहोल, फॅट आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहायला हवं. कारण या व्यक्तींचं लिव्हर सशक्त नसतं. तसंच या व्यक्तींनी मीठ आणि साखरेचं प्रमाणही पदार्थांमध्ये कमी ठेवायला हवं. कच्च्या भाज्या सलाड स्वरूपात खाल्ल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहील. तसंच रोज सकाळी उठून तुम्ही बदाम चावून खायला हवेत. 

ADVERTISEMENT

मकर (22 डिसेंबर – 19 जानेवारी)

या राशीच्या व्यक्तींना कॅल्शियमची कमतरता भासते त्यामुळे या व्यक्तींनी दूध, अंड इत्यादी पदार्थ आपल्या नेहमीच्या आहारात समाविष्ट करायला हवेत. तसंच तेलकट पदार्थ यांनी खाल्ले तरी चालतील. शरीरामध्ये अॅसिडिटी निर्माण करणारे पदार्थ खाऊ नयेत. तसंच कोणताही पदार्थ ताटामध्ये उरणार नाही याचा प्रयत्न या व्यक्तींनी करायला हवा. भाजीमध्ये यांनी ब्रोकोली, पालक, बटाटा, कोबी आणि वाटाणा याचा जास्त विचार करावा आणि खाव्या. 

कुंभ (20 जानेवारी – 18 फेब्रुवारी)

या राशीच्या व्यक्ती थोड्या संकोची स्वभावाच्या असतात. त्यामुळे त्यांना जे खायला हवं असतं ते मागून घ्यायला अथवा कोणाही समोर खाण्यासाठी या व्यक्ती लाजतात. या राशीच्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या जास्त प्रमाणात असते. त्यामुळे या व्यक्तींनी मीठ खाण्यावर ताबा ठेवावा. तसंच रोजच्या आहारात कोबी, मका, जिरं, मिरची, मुळा, टॉमेटो, डाळ आणि फळांचा समावेश करून घ्यावा.

मीन ( 19 फेब्रुवारी – 20 मार्च)

या राशीच्या व्यक्तींनी सालीच्या डाळींचा समावेश करून घेतला आहारात तर त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल. या व्यक्तींना पिट्यूटरी ग्रंथीचा धोका जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे कमी तिखट गोष्टी खाणं यांच्यासाठी चांगलं आहे. तसंच काळी मिरी, लसूण, आलं इत्यादी पदार्थांचा वापर सांभाळून करावा. तुमच्या जेवणामध्ये नेहमी बीट, कांदा, काकडी या पदार्थांचं सलाड असू द्यावं.

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

ADVERTISEMENT
20 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT