ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
मोबाईलची Battery संपली तर पटकन Charge करण्याच्या टिप्स

मोबाईलची Battery संपली तर पटकन Charge करण्याच्या टिप्स

आजकाल प्रत्येकासाठी मोबाईल ही काळाची गरज बनला आहे. मोबाईल नसेल तर आयुष्य अपूर्ण वाटायला लागलं आहे. प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल दिसतो. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन मोबाईल कंपन्यादेखील वेगवेगळे फिचर्स असलेले नवनवीन मोबाईल बाजारात आणत आहेत. पण मोबाईलचा वापर इतका अधिक केला जातो की, प्रत्येकाला नेहमीच मोबाईलच्या बॅटरीचा (Battery) प्रॉब्लेम होत असतो. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे बॅटरी चार्जिंगचा. खरं तर तुम्हाला मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. पण आपलं आयुष्य इतकं धावपळीचं आहे की, ते शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा हातात पॉवरबँक आणि मोबाईल असं दिसून येतं. पण असं सतत केल्याने मोबाईलची बॅटरी खराब होण्याचे अथवा व्हायरस यायची शक्यता असते. पण तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. कारण आम्ही मोबाईल पटकन चार्ज करण्यासाठी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. यासाठी तुमचा जास्त वेळही जाणार नाही आणि तुमचं नुकसानही होणार नाही. 

1 – फ्लाईट अथवा एअरोप्लेन मोड

तुम्ही फोन वापरणार नसाल तर फोन चार्ज करताना एअरोप्लेन मोडवर ठेवा. वास्तविक जेव्हा तुम्ही फोन फ्लाईट मोडवर ठेवता तेव्हा त्यावर कॉल करणं, इंटरनेट ब्राऊजिंग अथवा जीपीएस असे फिचर काम करणं बंद करतात. त्यामुळे तुमच्या चार्जिंग स्पीड दुप्पट होतो आणि तुमचा फोन नेहमीपेक्षा दुपटीने जलद चार्ज होतो. तसंच नेहमी हे लक्षात ठेवा की,  अर्धा तासासाठी तुमचा फोन बाजूला राहिला तर त्याने तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही. तुमच्या महत्त्वाच्या व्यक्तींना चार्जिंग करण्याआधी हवं असल्यास आधी मेसेज पाठवून कळवून ठेवा आणि मग फ्लाईट मोडवर फोन ठेवा. 

तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय

2 – स्क्रिन लॉक

तुम्हाला फोन लवकर चार्ज करून हवा असेल तर तुम्ही फोनची स्क्रिन लॉक करून ठेवा आणि फोन वापरू नका. टेक एक्स्पर्टच्या सांगण्यानुसार, मोबाईल चार्ज होत असताना त्याचा वापर करणं योग्य नाही. मोबाईल बंद असतो तेव्हा तो लवकर चार्ज होतो हे तुम्हालाही माहीत आहे. पण ही गोष्ट तुम्ही अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. कारण मोबाईललादेखील काही काळ विश्रांतीची गरज असते. त्याचप्रमाणे तुमच्या हाताला आणि डोळ्यालाही विश्रांतीची गरज भासते.

ADVERTISEMENT

3- मूळ चार्जर

Shutterstock

आजकाल युनिव्हर्सल अर्थात मल्टिटाईप चार्जरची चलती आहे. पण सर्व चार्जर हे तुमच्या फोनसाठी असतातच असं नाही. फोनबरोबर मिळालेला मूळ अर्थात ओरिजनल चार्जर असतो त्याने फोन लवकर चार्ज होतो. तुम्ही जर दुसऱ्या कोणाच्या चार्जरने तुमचा फोन चार्ज करत असाल तर हे करणं बंद करा. कारण असं केल्यास, तुमचा चांगला फोन खराब होण्याची आणि त्याची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. तसंच तुमचा फोन जलद चार्ज होणं बंद होऊ शकतं. जर तुम्ही ओरिजनल चार्जर वापरत नसाल तो खराब झाला असेल तर किमान क्वालिटी चार्जरचा उपयोग करा.

या पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या मोबाईलची काळजी

ADVERTISEMENT

4 – स्वीच ऑफ करून करा चार्ज

ही सर्वात सोपी आणि परफेक्ट टिप आहे. फोन बंद करून चार्ज केल्याने तो पटकन चार्ज होतो. तसंच तुम्हालाही मोकळा वेळ मिळतो. फोन चालू ठेऊन चार्ज केल्यास, बऱ्याचदा तो गरम होतो. पण बंद करून चार्ज केल्यास, त्याची बॅटरी सेव्ह होते आणि फोनही थंड राहातो. त्याचं मशीन गरम होत नाही. त्यामुळे हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा. तसंच असं केल्याने तुमची बॅटरी बराच काळ चांगली राहाते. 

5 – फिचर्स अथवा अॅप्स बंद करा

Shutterstock

फोन लवकर चार्ज व्हायला हवा असेल तर तुम्ही जे अॅप्स उघडले असतील ते लगेच बंद करायचे लक्षात ठेवा. तसंच तुमच्या फोनमधील वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि गुगल प्ले असे फिचर ऑटोमॅटिक अपडेटवर असतील तर चार्ज करताना हे फिचर्स बंद करा. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते. बंद ठेवल्यास, चार्ज होण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

टेक्नोलॉजीचे साईड ईफेक्ट्स टाळण्यासाठी घ्या ही काळजी

09 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT