बऱ्याचदा बाहेरगावी जाताना तिकिट्स बुकिंग झाल्यानंतर ट्रेनचा स्टेटस काय आहे हे घरबसल्या जाणून घेता येत नव्हतं. पण आता तशी सुविधा आहे. तरीही बऱ्याच जणांना याची प्रक्रिया माहीत नाही. भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर ट्रेनचा अपडेट यायला कधी कधी बराच उशीर होतो. त्यामुळे रेल्वेने एक मोबाईल क्रमांक दिला आहे. ज्या क्रमांकावरून तुम्हाला Whats app वरून ट्रेनचा स्टेटस जाणून घेता येतो.
ट्रेनचं तिकिट काढल्यानंतर आपण ज्या ट्रेनने प्रवास करणार असतो त्याबद्दल पुरेपूर माहिती असणं आवश्यक आहे. अर्थात ट्रेन किती वाजताची आहे? ट्रेनची वेळ बदलली तर नाही ना? ट्रेनला उशीर तर होणार नाहीये ना? या सगळ्याची माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की, स्टेशनवर जाऊन ट्रेनची तासनतास वाट पाहावी लागते. हे सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवून केवळ 10 सेकंदात तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. त्यासाठी सतत तुम्हाला IRCTC च्या संकेतस्थळावरही अवलंबून राहायची आणि वाट पाहायची गरज भासणार नाही. आम्ही तुम्हाला इथे ही माहिती कशी मिळवायची आहे याची स्टेप बाय स्टेप माहिती देत आहोत. ती फॉलो करून तुम्ही तुमचा प्रवास सुखकर करू शकता.
#StrengthOfAWoman : प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये असल्याच पाहिजेत ‘या’ अॅप्स
ट्रेनची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
स्टेप 1
Screenshot
तुम्हाला या सेवेचा लाभ मिळवायचा असेल तर सर्वात पहिले आपल्या मोबाईलमध्ये मोबाईल क्रमांक 7349389104 सेव्ह करून ठेवा. हा क्रमांक तुम्हाला योग्य माहिती मिळवून देतो. तसंच तुम्ही कोणत्याही वेळी या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला विशिष्ट वेळेतच मेसेज करायची गरज आहे असं नाही.
स्टेप 2
Screenshot
यानंतर तुम्हाला कोणत्याही ट्रेनची माहिती काढायची असल्यास, आपलं व्हॉट्सअप उघडा आणि मग वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ज्या ट्रेनची माहिती हवी असेल त्या ट्रेनचा क्रमांक पाठवून द्या.
स्टेप 3
Screenshot
मेसेज पाठवल्यावर तुम्हाला यावरून सर्व माहिती उपलब्ध होईल. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं शेड्युल आखू शकता. तसंच ट्रेन उशीरा येणार असल्यास, त्यानुसार तुम्ही स्टेशनवर पोहचू शकता.
तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय
मेसेजचं उत्तर आलं नाही तर…
Screenshot
कधी कधी सर्व्हरवर जास्त ट्रॅफिक असल्यास रेल्वेपर्यंत मेसेज पोहचू शकत नाही. मग अशावेळी काय करायचं असाही प्रश्न पडतो. जर तुम्ही केलेल्या मेसेजवर डबल क्लिक आलं नाही तर पुन्हा मेसेज पाठवा आणि वाट बघा. तुम्ही पाठवलेल्या मेसेजवर जर निळा टिकमार्क आला तर समजा की, तुमचा मेसेज पोहचला आहे. यानंतर तुम्हाला रेल्वे व्हॉट्सअपवर योग्य माहिती पाठवेल. रेल्वे स्टेशनवर फेऱ्या मारण्यापेक्षा अथवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील माहितीची वाट बघण्यापेक्षा तुम्हाला हा अगदी सोपा पर्याय आहे. तसंच यासाठी तुम्हाला काही विशिष्ट वेळची गरज पाळावी लागते असंही नाही. रेल्वेने सध्या ही गोष्ट प्रवाशांना अतिशय सोपी करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या स्टेप्स फॉलो केल्या तर त्यांना योग्य ती माहिती घरबसल्या मिळू शकते. तसंच या माहितीमध्ये कोणत्याही प्रकराची अफवा वा खोटेपणा नसतो. हा मेसेज मेक माय ट्रीपबरोबर रेल्वेने सहयोग केल्याने रेल्वेकडूनच डायरेक्ट तुम्हाला मिळतो. त्यामुळे मनात वेगळी शंका घेण्याची प्रवाशांना गरज नाही. तुम्ही कोणत्याही वेळी तुम्हाला हव्या असणाऱ्या ट्रेनची माहिती झटक्यात मिळवू शकता.