घनदाट आणि लांब केस कोणाला आवडत नाहीत? प्रत्येकालाच आपले केस मऊ, मुलायम आणि चमकदार असावेत असं वाटतं. पण त्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या केसांना नियमित हेअर ऑईल्सने मसाज करणं आणि त्यांचं पोषण करणंही आवश्यक आहे. कारण तुमच्या केसांमध्ये धूळ आणि प्रदूषणामुळे केसगळती, केसांमध्ये कोंडा होणं अथवा केस कोरडे होणं यासारख्या अनेक समस्या काळजी न केल्याने उद्भवू शकतात. त्यामुळे यासारख्या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही चांगल्या हेअर ऑईल्सचा वापर करण्याची गरज आहे. पण नक्की चांगलं हेअर ऑईल कोणतं? त्याचा वापर कसा करायचा असेही प्रश्न आपल्याला सतावतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी चांगल्या हेअर ऑईल्सचे पर्याय सुचवत आहोत. या हेअर ऑईल्सच्या नियमित वापराने तुम्हाला तुमचे केस नक्कीच चमकदार आणि घनदाट लाभतील. फक्त याचा वापर योग्यरित्या करता यायला हवा. तसंच नियमित तुमच्या केसांना या हेअर ऑईल्सने मसाज मिळेल याची तुम्ही काळजी घ्यायला हवी.
आपल्यातल्या प्रत्येकाने या तेलाचा नक्कीच वापर केला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे हेअर ऑईल आपल्याला घराघरात दिसून येतं. कारण बऱ्याच जणांना या तेलाना केसांना व्यवस्थित पोषण मिळत असल्याचा विश्वास आहे. पॅराशूट तेल हे आपल्या केसांना घनदाट आणि मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसंच आपल्या केसांच्या फॉलिकल्सना या तेलामुळे मजबूती मिळते आणि केसांना मुळापासून हे तेल योग्य पोषण देतं. तसंच पॅराशूट हेअर ऑईलमध्ये एक प्रकारचा हलकासा सुगंध आहे. यामध्ये चंपा या फुलाचा सुगंध दरवळतो. जो तुमच्या केसांसाठी लाभदायक ठरतो.
किंंमत रू. 95
बदाम पौष्टिक मूल्याबद्दल देखील वाचा
बऱ्याच जणांना केसांमध्ये कोंडा होतो आणि त्यामुळे अतिशय त्रस्त असतात. अशा व्यक्तींसाठी हिमालयाचं हे तेल उत्तम पर्याय आहे. हे हेअर ऑईल तुमच्या केसांना मजबूती मिळवून तर देतंच पण तुमच्या केसांमधून कोंडा घालवून टाकतं. तसंच निरोगी स्काल्पसाठीदेखील तुम्ही हिमालया हर्बल्स अँटी डँड्रफ हेअर ऑईलचा वापर करून शकता. यातील घटकांमुळे तुम्हाला लवकरात लवकर कोंंड्यापासून सुटका मिळते. शिवाय तुमचा स्काल्प निरोगी राखण्यास मदत होते.
किंमत रू. 166
डाबर हे नावदेखील खूपच जुनं आहे. डाबरचं तेल हे आयुर्वेदिक तेल म्हटलं जातं. या तेलामधील आयुर्वेदिक गुणांमुळे केस घनदाट, मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होते. तसंच हे हेअर ऑईल तुम्ही मुळांपासून लावल्यास, तुमचा स्काल्प निरोगी राखण्यास आणि केसातील कोंडा जाण्यास मदत होते. या तेलाने तुम्ही नियमित मसाज करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे केस लवकर पांढरे होत नाहीत.
किंमत रू. 141
या हेअर ऑईलची बाटली जितकी बाहेरून सुंदर आहे तितकेच त्याचा वापर केल्यानंतर गुणही चांगले आहेत. यामध्ये गुलाब आणि बदामाचे गुणधर्म आहेत. त्यामुळे याचा वापर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये बदल दिसून येतो. बदामामुळे केसांना चांगलं पोषण मिळून तुमची केसगळती रोखली जाते. तसंच याच्या नियमित वापराने तुम्हाला चमकदार केस मिळतात. काही जणांना केस तुटण्याची समस्या असते. या तेलाच्या वापराने ती समस्यादेखील निघून जाते.
किंमत रू. 185
हे सामान्य हेअर ऑईल नक्कीच नाही. या हेअर ऑईलमध्ये 6 तेलांचे extracts असतात. यामध्ये जोजोबा, कॅमेलिना, नारळ, ऑर्गन, ऑलिव्ह आणि बदाम यांचं मिश्रण असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतील गुणधर्म यामध्ये समाविष्ट असतात. या तेलाच्या नियमित वापराने तुमच्या केसांना योग्य मजबूती मिळून तुमचे केस अधिक मऊ आणि मुलायम होतात. तसंच केसगळती थांबण्यासाठीही याचा फायदा होतो.
किंमत रू. 199
जेव्हा तुम्ही तुमच्या केसांसाठी उत्तम पर्याय शोधत असतात तेव्हा तुम्हाला या तेलाचं नाव तर नक्कीच माहीत असायला हवं. तुमच्या केसांची काळजी घेण्यासह हे तेल मायग्रेन होण्याच्या त्रासापासूनही तुम्हाला सुटका मिळवून देतं. तुम्ही या तेलाचा वापर केल्यास तुम्हाला चांगली झोप लागते. तसंच तुमच्या केसांचा मसाज या तेलाने तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा नक्की करून पाहा. त्यामुळे तुम्हाला चांगला फरक दिसून येईल.
किंमत रू. 319
हे तेल केवळ तुमच्या हेअर फायबरची सुरक्षा करत नाही तर तुमच्या केसांना डॅमेज होण्यापासूनही वाचवतं. तसंच तुमच्या केसांना पोषण मिळवून देतं आणि तुमचा रक्तप्रवाह वाढवण्यासह मदत करतं. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसंच तुमच्या केसांचा कोरडेपणा हे ऑईल की करतं आणि दुहेरी केसांची समस्या असल्यास तीदेखील मिटवण्यास फायदेशीर ठरतं.
किंमत रू. 427
या हेअर ऑईलने तुमचे केस अधिक निरोगी आणि ग्लॉसी होतात. यामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन ई हे घटक आहेत जे तुमच्या केसांना तणावापासून दूर राहण्यासाठी मदत करतात. तसंच यामध्ये समाविष्ट असलेले अव्हाकॅडो हे केसांना हायड्रेट करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
किंमत रू. 957