ADVERTISEMENT
home / Long Hair
केस वाढवण्यासाठी प्रभावी तेल | Best Hair Growth Oil In Marathi

केस वाढवण्यासाठी प्रभावी तेल | Best Hair Growth Oil In Marathi

तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळतात का? असं असेल तर ही सावध होण्याची वेळ आहे. कारण वेळीच योग्य उपचार करून तुम्ही तुमच्या केसांची वाढ पूर्ववत करू शकता. तज्ञ्ज सांगतात की, दिवसातून शंभर केस गळणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. त्यामुळे अशा केस गळण्याबाबत फार काळजी करण्याची गरज नाही. केस गळणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण जेवढे केस गळतात तेवढ्याच प्रमाणात ते पुन्हा नैसर्गिक पद्धतीने उगवतही असतात. पण जर तुमचे केस या प्रमाणापेक्षा अधिक गळत असतील तर तुम्ही केस केस वाढवण्यासाठी तेल वापर करू शकता. आता तुम्हाला केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे हा प्रश्न पडेल. केस वाढवण्यासाठी असलेल्या घरगुती उपायांमध्ये तेलांचाही समावेश होतो. त्यामुळे घनदाट केस हवे असतील तर जाणून घ्या केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावं.

नारळाचे तेल – Coconut Oil

Best Oil For Hair Growth In Marathi

नारळाचे तेल अनेक ठिकाणी वापरलं जातं. नारळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. स्वयंपाकासाठी, त्वचेची काळजी घेण्यासाठी नारळाचे तेल वापरलं जातं. मात्र केसांच्या वाढीसाठी नारळाचे तेल सर्वात जास्त फायदेशीर ठरू शकतं. यासाठी केसांना नारळाच्या कोमट तेलाने मसाज करा. नारळाच्या तेलात अॅंटि फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचा स्कॅल्प निरोगी आणि निर्जंतूक राहण्यास मदत होते. सहाजिकच यामुळे केसांच्या वाढीवर त्याचा चांगला परिणाम होतो. यासाठी जाणून घ्या केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे

वाचा – दाट केस हवे असतील तर फॉलो करा हे डाएट

कांदा आणि मोरिंगा ऑईल –  ONION & MORINGA HAIR OIL

केस वाढण्यासाठी तुम्ही एखादं बेस्ट तेल शोधत असाल तर मायग्लॅमचं कांदा आणि मोरिंगाचं अर्क असलेलं हे तेल जरूर वापरा. यात कांद्याच्या बिया, मोरिंगा ऑईल, भृंगराज तेल, तीळाचे तेल, एरंडेल तेल आणि बदामाचे तेल आहे. केसांच्या वाढीसाठी आणि केस गळणे थांबण्यासाठी या सर्व तेलांचे मिश्रण असलेलं तेल खूपच प्रभावी ठरू शकतं. शिवाय यात कोंडा कमी करण्यासाठी अॅंटि बॅक्टेरिअल फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या केसांसाठी बेस्ट असलेलं तेल तुम्ही नक्कीच नियमित वापरू शकता.

ADVERTISEMENT

एरंडेल तेल – Castor Oil

एरंडेल तेल केसांच्या वाढीसाठी फारच उत्तम असतं. एरंडेल तेलामुळे केसांची मुळं मजबूत होतात ज्यामुळे केसांची वाढ उत्तम होते. अनेक जण डोक्यावरील केसांप्रमाणेच पापण्या, भुवया वाढवण्यासाठी एरंडेलचा वापर करतात. एरंडेल तेल फार चिकट असल्यामुळे कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरतं. एरंडेल तेलामुळे केसांच्या मुळांमधील पोषण चांगले होते. शिवाय यामुळे स्कॅल्पला होणारी जळजळ आणि दाह कमी होतो. कोंड्यावर उपाय करण्यासाठी एरंडेल तेल वापरण्यात येतं. एरंडेल तेल केसांसाठी बरेच फायदे आहेत यासाठीच सतत केस गळत असतील तर वापरा हे केस उगवण्यासाठी तेल.

आर्गन तेल – Argan Oil

आर्गन ऑईलमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आणि केसांचं संरक्षण होतं. मोरोक्कोमध्ये सापडणाऱ्या आर्गन फळापासून हे तेल काढलं जातं. ज्यामध्ये भरपूर फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई असतं. या तेलामुळे तुमच्या स्कॅल्प मऊ आणि मुलायम होतो. जर तुमचे केस फ्रिझी असतील अथवा केसांना फाटे फुटत असतील तर त्यावर आर्गन ऑईल लावणं नक्कीच फायदेशीर ठरतं. बऱ्याचदा केस आणि केसांना खोलवर पोषण मिळावं यासाठी हेअर ट्रिटमेंटमध्ये आर्गन ऑईलचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांची वाढ लवकर होते आणि केसांचा कोरडेपणा कमी होतो. यासाठी केस वाढवण्यासाठी तेल कोणतं वापरावं हे माहीत असणं फारच गरजेचं आहे. 

जोजोबा ऑईल – Jojoba Oil

जोजोबा ऑईल (jojoba oil in marathi) मुळे तुमचे केस बराच काळ हायड्रेट राहतात. जोजोबा तेलात केसांमधील नैसर्गिक तेल टिकवण्याचे गुणधर्म असतात. ज्यामुळे केस हे तेल पटकन शोषून घेतात. ज्याचा परिणाम केस तेलकट न दिसता चमकदार दिसू लागतात. शिवाय या तेलातील फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई, ओमेगा 3, 6 आणि 9 फॅटीमुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळते. नियमित जोजोबा ऑईलचा वापर केल्यास केसांचा पी.एच. बॅलंस टिकवून ठेवणं सोपं जातं. ज्यामुळे कोंडा अथवा केसांच्या इतर समस्या होत नाहीत. जोजोबा तेल हलकं आणि पटकन मुरणारं असल्यामुळे ते नियमित लावल्यास केस तेलकट दिसत नाहीत. 

ऑलिव्ह ऑईल – Olive Oil

स्वयंपाकात वापरलं जाणाऱ्या ऑलिव्ह ऑईलचे फायदे अनेक आहेत. मात्र याचा वापर तुम्ही तुमच्या केस आणि त्वचेसाठीदेखील करू शकता. कारण ते तुमच्या केसांचं खोलवर जाऊन पोषण करते. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा, कोंडा आणि रफ एंड्स कमी होतात. हे तेल तुमच्या केसांची वाढ जलद करतं आणि स्काल्पही हेल्दी ठेवतं. जर तुम्हाला केस लांब आणि घनदाट हवे असल्यास तुम्ही आठवड्यातून किमान एकदा ऑलिव्ह ऑईलने मसाज करायला हवा.  

ADVERTISEMENT

तिळाचे तेल – Sesame Oil

आरोग्याच्या दृष्टीने तिळाचं तेल फायदेशीर आहे. यासाठी भारतात धार्मिक किंवा मंगल कार्यात तिळाचं तेल वापरलं जातं. हवन, पूजा-अर्चना आणि लग्नाच्या विधींमध्येही याचा वापर अनिवार्य मानला जातो. तिळाच्या तेलाचा वापर अनेक अन्नपदार्थात तर केला जातोच पण यातील औषधीय गुणांमुळे तिळाच्या तेलाचा वापर हा त्वचेला उजळवण्यासाठी आणि केसांचं पोषण करण्यासाठीही केला जातो. म्हणूनच तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमीन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि प्रोटीन आढळतं. केसांच्या संपूर्ण पोषणासाठी तिळाचं तेल हे खूपच फायदेशीर मानलं जातं. केसांना तिळाचं तेल लावल्याने त्यांचा कोरडेपणा दूर होतो आणि त्यांची हरवलेली चमक पुन्हा येते. म्हणूनच केसांच्या वाढीसाठी तिळाचे तेल फायदेशीर आहे.

वाचा – मोहरीच्या तेलाचे फायदे

रोजमेरी तेल – Rosemary Oil

रोजमेरीच्या तेलाचा आरोग्य आणि सौंदर्यावर चांगला परिणाम दिसून येतो. केसांवर या तेलाचा वापर केल्यास रोजमेरीमधील औषधी घटकांमुळे त्वचा समस्या कमी होतात. काही संशोधनानुसार रोजमेरीचे तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरलं आहे. हे तेल अॅंटि इन्फ्लैमटरी असून केसांच्या वाढीवर त्यांचा योग्य परिणाम होतो. जर तुमचे केस मोठ्याप्रमाणावर गळत असतील तर केस उगवण्यासाठी तेल खूपच चांगले आहे. 

द्राक्षांच्या बियांचे तेल – Grapeseed Oil

जोजोबा ऑईल प्रमाणेच ग्रेप्ससीड ऑईलदेखील हलकं आणि केसांमध्ये लवकर मुरणारं आहे. इतर अनेक हेअऱ ऑईलप्रमाणे तुम्ही त्याचा केसांच्या वाढीसाठी वापर करू शकता. द्राक्षांमधून वाईन काढताना बाहेर पडलेल्या बियांच्या अर्कापासून हे तेल काढले जाते. ग्रेप्ससीड तेल त्वचेसाठीदेखील अगदी उत्तम आहे. या तेलात व्हिटॅमीन सी असल्यामुळे त्याचा केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. कारण हे तेल अॅंटि ऑक्सिडंट, फॅटी अॅसिड, ओमेगा 3, 6 ने युक्त आहे. ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. 

ADVERTISEMENT

बदाम तेल – Almond Oil

बदामामध्ये व्हिटॅमीन ई आणि डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यासारखे मिनरल्स असतात. जे आपल्या त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. म्हणूनच केसांसाठी बदामाचे तेल एखाद्या वरदानाप्रमाणे काम करतं. बदाम तेलाने केसांना मालीश केल्यास केस गळणे थांबते आणि केस मजबूत होतात. या तेलातील मॅग्नेशिअम हे केसांसाठी फार आवश्यक असते. आजकालच्या लाईफस्टाईल आणि प्रदूषणामुळे केसांना फार नुकसान होतं असतं. मात्र बदामाच्या तेलामुळे तुमची अगदी स्प्लीट एंड्सपासूनही सुटका होऊ शकते.

जास्मिन ऑईल – Jasmine Oil

जास्मिन ऑईल हे जास्मिनच्या फुलांच्या अर्कापासून काढले जाते. त्यामुळे या तेलाला हलका सुगंध असतो. ज्यामुळे तुमच्या केसांना एक छान अरोमा थेरपी मिळते. आजकाल केस गळण्याचे महत्त्वाचे कारण काम अथवा नातेसंबधामध्ये असलेला ताणतणाव असतो. मात्र या तेलाच्या वापरामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो. ज्याचा परिणाम तुमच्या केसांच्या वाढीवर दिसू लागतो. शांत झोप येण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी, डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा जास्मिन तेलाचा मसाज तुमच्या केसांवर करायला हवा.  

केस उगवण्यासाठी तेलाबाबत मनात असलेले प्रश्न – FAQ’s

प्रश्न. केस उगवण्यासाठी तेल मी आठवड्यातून मी किती वेळा लावायला हवं ? 

उत्तर. जर तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील अथवा तुम्हाला जवळजवळ टक्कल पडू लागलं असेल तर नवे केस उगवण्यासाठी तेल तुम्ही दररोज लावणं गरजेचं आहे. पण तसं शक्य नसेल तर एक दिवस आड तेल लावा. 

ADVERTISEMENT

प्रश्न. हेअर ऑईलमुळे केस नैसर्गिक पद्धतीने चमकदार होतील का ?

उत्तर. नक्कीच. कारण प्रत्येक हेअर ऑईलमध्ये केसांना नैसर्गिक चमक आणण्याचे घटक असतात. मात्र तुमच्या केसांना अशी नैसर्गिक चमक येण्यासाठी तुम्हाला नियमित हेअर ऑईल मसाज करण्याची गरज आहे. 

प्रश्न. केस वाढवण्यासाठी तेल  बेस्ट आहे ?

उत्तर. खरंतर सर्वच हेअर ऑईल हे बेस्टच असतात. कारण प्रत्येक तेलाचे गुणधर्म निरनिराळे आहेत. यासाठीच तुमच्या केसांच्या समस्येप्रमाणे तेलाची निवड करा. 

ADVERTISEMENT

प्रश्न. कोंड्यावर उपाय करण्यासाठी कोणते तेल केसांसाठी वापरावे ?

उत्तर. जर तुम्हाला वारंवार कोंडा होत असेल तर तुमच्या केसांसाठी बदामाचे तेल लावणे फायद्याचे ठरेल. कारण या तेलामुळे तुमच्या केसांमधील कोंडा नक्कीच कमी होईल.

प्रश्न. तेलकट स्कॅल्पसाठी कोणते हेअर ऑईल वापरावे ?

उत्तर. काही हेअर ऑईलमुळे तुमचा स्कॅल्प आणखी तेलकट होऊ शकतो. म्हणूनच तेलकटपणा कमी होईल असं रोजमेरी, लव्हेंडर ऑईल तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरू शकता. 

ADVERTISEMENT

आम्ही तुम्हाला केस वाढवण्यासाठी तेल सांगितले आहेत यापैकी तुम्हाला कोणत्या तेलाचा फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

अधिक वाचा –

कडूलिंबाच्या तेलाचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे

24 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT