पार्लरमधून जेव्हा तुम्ही थ्रेडिंग करून घरी येता तेव्हा तुमचा मूड बऱ्याचदा खराब होतो कारण तुमच्या ब्युटिशियनने तुमच्या eyebrows चा शेप बिघडवलेला असतो. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा या गोष्टीचा त्रास होतो की, आयब्रोजचा शेप नीट का झाला नाही. त्यामुळे तुमचे eyebrows लवकर वाढण्याची शक्यता असते. अर्थात हे प्रत्येकाबरोबर होतं. परफेक्ट eyebrow शेप तुमच्या चेहऱ्याच्या फिचर्स संतुलित राखण्यासाठी मदत करतो आणि तुमचे सुंदर डोळेदेखील यामुळे व्यवस्थित फ्रेम होतात. तुम्ही पार्लरमध्ये जाऊन तुमच्या eyebrows ना शेप द्या अथवा घरच्या घरी करा आम्ही तुम्हाला काही बेसिक मार्गदर्शन इथे करत आहोत, ज्यामुळे तुमच्या eyebrows योग्य शेप मध्ये येण्यासाठी मदत होईल.
सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या eyebrows कुठून सुरु होतात हे नीट निश्चित करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला eyebrows पेन्सिलची गरज भासेल. ही पेन्सिल घेऊन तुम्ही तुमच्या डोळ्याच्या सर्वात आतील कोपरापासून ते नाकाच्या सर्वात बाहेरच्या भागापर्यंत उभी करा. ही पेन्सिल तुमच्या ब्रो च्या ठिकाणी येते तिथेच तुमच्या eyebrows सुरु होतात. या जागी पेन्सिलच्या मदतीने तुम्ही निशाण बनवून घ्या. तसंच दुसऱ्या बाजूच्या eyebrows ला देखील करा. दोन्ही बाजूने निशाण करून झाले की, दोन्ही जागांवर व्यवस्थित झालं आहे की नाही ते तपासून घ्या. ही पद्धत नेहमी वापरण्यात येते. तुमचं नाक जर थोडं मोठं असेल आणि तुम्हाला ही ट्रिक वापरायची असेल तर तुम्हाला तुमच्या eyebrows खूप मागून सुरु कराव्या लागतील जे खूपच विचित्र दिसेल. त्यामुळे हे लक्षात ठेवा की, तुम्ही जितक्या लांबून eyebrows सुरु करणार तितकं तुमचं नाक मोठं दिसणार. या प्रकारे तुम्ही पेन्सिलने नीट मार्क करून तुमच्या आयब्रोजचा सुरुवातीचा पॉईन्ट मार्क करून घ्या.
पेन्सिल तुमच्या नाकाच्या बाहेरच्या बाजूने आणि डोळ्याच्या सर्वात बाहेरच्या कोपऱ्याकडून वाकडी करून घ्या. या अँगलने पेन्सिल ब्रो जवळ मॅच होत असेल तिथे क्रॉस करा तिथेच तुमच्या आयब्रोज संपायल्या हव्यात. त्या ठिकाणी लहानसा डॉट बनवून घ्या आणि तिथले केस प्लक करून घ्या. दुसऱ्या बाजूच्या eyebrow ला देखील असंच करा.
ही सर्वात महत्त्वाची आणि critical स्टेप आहे कारण तुमच्या eyebrows ची arch चुकीच्या ठिकाणी अथवा चुकीच्या आकारात झाली तर पूर्ण eyebrow खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा चेहरा खराब दिसेल. Eyebrows arch ठीक तुमच्या ब्रो च्या वर असायला हवी. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पेन्सिल घ्या आणि नाकाच्या बाहेरच्या बाजूने पापण्यांच्या बाहेरच्या बाजूपर्यंत अँगल घ्या. या अँगलवर पेन्सिल ठेऊन जिथे eyebrow क्रॉस करणार तिथेच तुमचा arch असायला हवा. ही जागा तुम्ही पेन्सिलने मार्क करा आणि eyebrows चा योग्य शेप काढून घ्या. तसंच दुसऱ्या बाजूलाही करा. Arch कमी वा जास्त तुमच्या चेहऱ्याच्या शेप आणि तुमच्या आवडीनुसार असू शकतो. पण जास्त arch करू नका कारण ते दिसायला बनावट आणि विचित्र दिसतं.
1. Eyebrows शेप करताना नेहमी थोडे थोडे केस काढा. जास्त केस काढल्यास, तुमच्या आयब्रोजचा शेप बिघडतो. ब्रो च्या आजूबाजची त्वचा मुलायम करूनच ब्रो ला शेप द्या जेणेकरून केस लवकर निघतील. आंघोळीनंतर लगेच अथवा त्या ठिकाणी गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल 2 मिनिट्स ठेवा आणि मग शेप द्या. असं केल्याने पोअर्स ओपन होतात आणि केस लवकर निघतात आणि त्रासही होत नाही. तसंच आयब्रो करण्यासाठी तुम्ही पावडरचा वापरही करू शकता.
2. तुम्हाला घरच्या घरीच आयब्रो करायचे असतील तर चांगल्या दर्जाचे tweezers (plucker) अथवा दोऱ्याचा वापर करा. शेप देण्यापूर्वी eyebrow ब्रशच्या मदतीने त्याच्या वाढीच्या दिशेने करून घ्या. असं केल्याने एक्स्ट्रा वाढलेले केस लगेच दिसतात. त्यामुळे असे केस तुम्ही कात्रीच्या मदतीने कापून शकता. केसांना त्यांच्या वाढीच्या दिशेनेच प्लक करा.
3. शेप देताना त्या भागावर ice क्यूब लावा अथवा कोरफड जेल वा कोणतंही soothing क्रिम लावा. त्यामुळे ती जागा लाल होणार नाही, तसंच तिथे सूज येणार नाही आणि इन्फेक्शनही होणार नाही. त्याचबरोबर पोअर्सदेखील बंद होतील.
या टिप्स वापरून तुम्ही आपल्या आपण eyebrows करा अथवा दुसऱ्याकडून करून घ्या. पण तुम्हाला नक्की कसा शेप हवा आहे हे तुम्हाला परफेक्ट माहीत असायला हवं. तसंच आयब्रोजचा शेप बिघडू देऊ नका. तुम्ही नियमित अशी काळजी घेतल्यास, तुमच्या आयब्रोज नेहमीच परफेक्ट राहतील.
सुंदर लुक हवा असल्यास, आयब्रोजचा आकार ठेवा योग्य, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी