रोज रोज तेच तेच खाऊन कधीतरी खरचं खूप कंटाळा येतो. विशेषत: जर तुमचं रुटीन एकच झालं असेल तर मग तेच तेच खाण्याचा कंटाळा येणं अगदी स्वाभाविक आहे. आज आम्ही तुम्हाला मस्त 5 चटकदार रेसिपी सांगणार आहोत या रेसिपी तुमच्या तोंडाची चव नक्कीच बदलतील. मग पाहुया अशा चटकदार रेसिपी
या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी
ब्रेड पिझ्झा
जर तुम्हाला पिझ्झा आवडत असेल तर मग पिझ्झ्यासारखीच ही रेसिपी आहे. पण पिझ्झाच्या तुलनेत ही रेसिपी करायला फारच सोपी आहे.
साहित्य: तुमच्या आवडीच्या ब्राऊन किंवा व्हाईट ब्रेडच्या स्लाईस, 1 चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, चीझ ( आवडीनुसार कोणतेही), मिक्स हर्ब्स, मीठ, बटर, टोमॅटो केचअप
कृती: कच्ची ढोबळी मिरची आवडत नसेल तर अगदी काही मिनिटांसाठी चिरलेली ढोबळी मिरची परतून घ्या. एका भांड्यात ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो एकत्र करुन त्यात मीठ घाला. ब्रेडच्या स्लाईसना बटर आणि टोमॅटो केचअप (आवडत असल्यास) लावून त्यावर मिक्स केलेली भाजी पसरा. चीझ किसून किंवा चीझ स्लाईस घालून तव्यावर तयार पिझ्झा शिजण्यासाठी ठेवून द्या. मंद आचेवर तुम्हाला हा पिझ्झा क्रिस्पी करायचा आहे. पिझ्झावरील चीझ वितळवण्यासाठी तुम्हाला त्यावर एखादे भांडे उलट ठेवायचे आहे. साधरण दोन मिनिटं हा पिझ्झा तयार होण्यासाठी लागते. आता तुम्हाला सर्व्ह करताना त्याचे दोन तुकडे करता येतील. तुम्ही त्यावर मिक्स हर्ब्स घालू शकता. तुमचा ब्रेड पिझ्झा तयार
समोसा चाट
समोसा चाट हा प्रकार हल्ली सहज बाजारात मिळतो. अशा पद्धतीचा एक समोसा खाल्ला तरी पोट भरुन जातं पण मन अजिबात भरत नाही. घरी देखील तुम्ही ही रेसिपी करु शकता. म्हणजे एखाद्या वीकेंडला तुम्ही हे बनवण्याचा प्लॅन नक्की केला पाहिजे.
साहित्य: समोसा, चिंच- खजूरची चटणी, हिरव्या मिरचीची चटणी, रगडा, बारीक चिरलेला कांदा, धणे-जिरे पूड,आमचूर पावडर, लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती: पांढऱ्या चणे भिजत घालून त्याचा रगडा तयार करुन घ्या. प्लेटमध्ये समोसा घेऊन तो दाबून त्यावर गरम गरम रगडा घाला. तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार त्यामध्ये चिंच खजूरची चटणी हिरव्या मिरचीची चटणी घालून धणे-जिरे पूड आमचूर पावडर घाला बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो घालून मस्त लिंबाचा रस आणि कोथिंबीर भुरभुरुन तुम्ही तुमचा समोसा चाट एन्जॉय करा.
हनी चिली पोटॅटो
जर तुम्ही फ्राईड lover असाल तर तुम्हाला हनी चिली पोटॅटो करुन पाहायलाच हवे. तिखट- गोड अशी ही रेसिपी असून करायला थोडा वेळ नक्कीच लागतो. पण रेसिपी तुमच्या तोंडाची चव हमखास बदलेल
साहित्य: 4 ते 5 बटाटा, आरारुट पावडर, मीठ
हनी चिली सॉसचे साहित्य: तेल, तीळ, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, रेड चिली फ्लेक्स,मीठ,व्हिनेगर, दोन मोठे चमचे मध,
कृती: सगळ्यात आधी तुम्हाला फ्राईजची तयारी करायची आहे. त्यासाठी बटाटे तुम्हाला फ्राईजच्या आकारात चिरुन घ्यायचे आहे. त्याला आरआररुट पावडर लावून तुम्हाला ते फ्राईज तळून घ्यायचे आहेत.
हनी चिली सॉससाठी एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात पांढरे तीळ परतून त्यात ढोबळी मिरची, हिरवी मिरची आलं, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, रेड चिली फ्लेक्स, मीठ, व्हिनेगर घालून परतायचे आहे. सगळ्यात शेवटी त्यात मध घालून सगळे एकजीव करुन तुम्हाला त्यात फ्राईज घालायचे आहे. तयार झाले हनी चिली पोटॅटो
उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज
दाबेली
गोल गरगरीत पाव त्यात भरलेली बटाट्याची भाजी मस्त तव्यावर परतून क्रिस्पी केलेला पाव आणि त्यावर भुरभुरलेली बारीक शेव. दाबेलीची बातच काही और असते. घरच्या घरी दाबेली बनवणे सोपे आहे.
साहित्य: दाबेलीचा गोल पाव, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, शेव, मसाला शेंगदाणे,
मसाल्यासाठी साहित्य: उकडलेला बटाटा, जीर, हिंग, दाबेलीचा तयार मसाला, मिरची, आलं-लसूण, तेल,कोथिंबीर
कृती: सगळ्यात आधी तुम्हाला दाबेलीची भाजी तयार करावी लागेल त्यासाठी तुम्हाला सगळे साहित्य एकत्र करायचे आहे. आता तुम्हाला प्रमाण ठरवता यायला हवे. एका भांड्यात तुम्हाला थोडेसे तेल गरम करुन जीरं तडतडू द्यायचे आहे. त्यात हिंग, मिरची,आलं-लसूण घालायचे आहे. फोडणी जळू देऊ नका. त्यात दाबेलीचा मसाला घालून स्मॅश बटाटा घालायचा आहे. बटाटा चांगला परतून घ्या.लिंबाचा रस आणि मिश्रण एकजीव करण्यासाठी थोडे पाणी घाला. पाणी ही जपून घाला.कोथिंबीर भुरुभुरा. तुमचा दाबेली मसाला तयार. दाबेलीचा गोल पाव घेऊन त्याला तुम्ही चिंच-खजूराची चटणी हवी असल्यास लावू शकता. त्यात दाबेलीची तयार भाजी भरुन त्यात डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे आणि शेव भुरभुरा. तव्यावर बटर टाकून तुम्ही दाबेली मस्त तव्यावर भाजून घ्या. कुरकुरीत झालेली दाबेली खायला मस्त क्रिस्पी लागते.
मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज
ब्रेड पकोडा
वडापावच्या दुकानात अगदी हमखास मिळणारा पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा. वडापावसारखाच पण थोडा वेगळा प्रकार अनेकांना आवडतो. तुम्हाला मस्त चमचमीत खाण्याचा मूड झाला असेल तर मग तुम्ही ब्रेड पकोडा करुन खाऊ शकता.
साहित्य: पिवळ्या बटाट्याची भाजी, ब्रेड स्लाईस, बेसन, हळद, तिखट, मीठ, तेल
कृती: ब्रेड स्लाईस त्रिकोणी कापून घ्या. दोन पावाच्या मध्ये बटाट्याची भाजी भरुन तयार पकोडा बेसनच्या घोळात घोळवून तळून घ्या. ब्रेड पकोडा करणे अगदीच सोपे असते. आता जर तुम्हला याल थोडा ट्विस्ट द्यायचा असेल तर मात्र तुम्ही एक गोष्ट करायला हवी ती म्हणजे मस्त हा ब्रेड पकोडामधून कापून त्यात बारीक चिरलेला कांदा, आवडीची चटणी घालून तुम्हाला ते खाता येईल अशा प्रकारे खाल तरी तुम्हाला ब्रेड पकोडा मस्त चटपटीत लागेल.
आता एक दिवस डाएट बाजूला ठेवून या रेसिपी नक्की करुन पाहा. तुमच्या तोंडाची चव नक्की बदलेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.