ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
वयस्कर दिसत असाल, तर सोडा ‘या’ सवयी

वयस्कर दिसत असाल, तर सोडा ‘या’ सवयी

तरूण दिसायला तर तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आवडतं. त्यासाठी नेहमी चेहऱ्यावर वेगवेगळी उत्पादनं लावणं, मेकअप करणं या गोष्टी मुली करतातच. पण तुम्हाला काही सवयी अशाही असतात ज्यामुळे तुम्ही वयापेक्षा आधीच वयस्कर दिसू शकता. त्यामुळे वेळीच या सवयी सोडणं गरजेचं आहे. अशा सवयी तुम्हाला वयाच्या आधीच वयस्कर भासवतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही सवयी बदलायला हव्यात. तसंच सध्या वाढत असलेला प्रदूषणाचा अभाव. आपली बदललेली लाईफस्टाईल, आपलं राहणीमान या गोष्टीदेखील कारणीभूत ठरतात. तुमची त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी आणि त्यावर सुरकुत्या येऊन तुम्ही वयस्कर न दिसण्यासाठी नक्की अशा कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वेळीच तुम्ही या सवयी सोडा आणि जपा तुमचं सौंदर्य! जाणून घेऊया या नक्की कोणत्या सवयी आहेत, ज्यामुळे तुम्ही वयस्कर दिसू शकता.

कमी प्रमाणात पाणी पिणं

Shutterstock

काही जणांना पाणी पिण्याची सवयच नसते. तुमच्या शरीराला दिवसभरात किमान 8 ग्लास पाण्याची गरज असते. पाणी पित राहिल्याने आपली त्वचा तुकतुकीत राहाते आणि पाणी पित राहिल्याने तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स निघून जातात. त्यामुळे चेहऱ्यावर कायम ताजेपणा राहून तुम्ही वयस्कर दिसत नाही. पाणी कमी पित राहिल्याने मात्र याचा उलटा परिणाम होतो आणि तुमचा चेहरा हायड्रेट न राहिल्याने तुम्हाला चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचा अथवा वयाआधीच तुम्ही वयस्कर दिसण्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो. यापासून सुटका हवी असेल तर शक्यतो कमी पाणी पिण्याची ही सवय टाळा. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पित राहा. 

ADVERTISEMENT

खाण्यात गोडाचं प्रमाण अधिक असणं

Shutterstock

तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये रोज गोड पदार्थ लागतात का? असं असेल तर तुमची ही सवय बदलण्याची गरज आहे. कारण या सवयीने तुम्ही वेळेपूर्वीच वयस्कर दिसू शकता. अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने तुम्हाला मधुमेह, लठ्ठपणा, चेहऱ्यावर पिंपल्स येणं, सुरकुत्या या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळीच ही सवय बदला. या सवयीने तुमच्या शरीराचं नुकसानच अधिक प्रमाणात होतं. कधीतरी गोड खाणं हे योग्य असतं. तसंच गोड खाण्यालाही एक प्रमाण असायला हवं हेदेखील लक्षात ठेवा. चांगलं लागत आहे म्हणून एका वयात तुम्ही भरपूर गोड खाऊ शकता. पण काही काळानंतर याचे सगळे परिणाम हे शरीरामध्ये त्रासदायक ठरतात हे लक्षात घ्या. त्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर वयस्करपणा दिसण्यात होतो. 

घरच्या घरी कसं करावं फेशियल, जाणून घ्या फेशियलबाबत सर्व माहिती

ADVERTISEMENT

उशीवर चेहरा ठेऊन झोपणे

Shutterstock

काही जणांना आपला चेहरा उशीवर दाबून ठेऊन अर्थात उपडी झोपण्याची सवय असते. पण ही सवय नक्कीच चांगली नाही. त्यामुळे तुमच्या शरीराला योग्य रक्तप्रवाह मिळत नाही आणि त्याचा परिणाम तुम्ही लवकर वयस्कर दिसण्यामध्ये होतो. पोटावर झोपल्याने आणि आपला चेहरा उशीवर असल्याने दिवसभर उशीवर असलेले सर्व किटाणू, धूळ ही आपल्या चेहऱ्यावर लागते. जी रात्रभर तशीच चेहऱ्याला चिकटून राहाते आणि त्यामुळे चेहरा लवकर खराब होतो. त्यामुळे ही सवय वेळीच बदला. 

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय

ADVERTISEMENT

सनस्क्रिन लोशनचा वापर न करणं

Shutterstock

सनस्क्रिन लोशन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बववून घेणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, घरातून बाहेर पडताना तुम्ही तुमच्या त्वचेवर सनस्क्रिन लोशन लावूनच जायला हवं. याचा वापर करणं गरजेचं आहे. सतत उन्हाला सामोरं जाणाऱ्यांनी जर सनस्क्रिन वापरलं नाही तर चेहरा रापतो आणि त्वचेवर वाढत्या वयाचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे कोणत्याही हंगामात तुम्ही तुमच्या त्वचेवर सनस्क्रिनचा वापर करणं गरजेचं आहे. 

व्यसन करणं

ADVERTISEMENT

Shutterstock

तुम्हाला सिगारेट अथवा दारू यापैकी कोणतंही व्यसन असेल तर तुम्ही हमखास वयापूर्वीच वयस्कर दिसू लागता. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी चांगल्या नाहीत. तुम्हाला यामुळे आरोग्याला तर त्रास होतोच पण त्याशिवाय त्याचे वाईट परिणाम तुमच्या त्वचेवरही होतात. तुम्ही वयापेक्षा अधिक मोठे दिसता. 

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान

14 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT