डोळे हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात. डोळ्यातून माणसाच्या मनातील भावना प्रकट होतात म्हणूनच काही न बोलता ही डोळ्यातून समोरच्या व्यक्तीला सारं काही समजू शकतं. डोळे अधिक प्रभावी करतो तो तुमच्या डोळ्यांचा मेकअप (Eye Makeup). डोळ्यांचा मेकअप कसा करायचा हे एकदा समजलं की तुमच्या सौंदर्यात नकळत भरच पडते. कारण असा मेकअप केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या प्रिय व्यक्तीची नजर मुळीच हलू शकत नाही. वास्तविक नजर आणि डोळे दिलखेचक असतील तर ते कोणालाही आकर्षित करू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला डोळ्यांचा मेकअपविषयी माहीत असायलाच हवं. डोळ्यावर मेकअप करण्यापूर्वी तुमच्या डोळयांचा आकार, तुमचा स्कीन टोन, तुम्ही केलेला पेहराव या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. यासाठीच या आय मेकअप टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.
आय मेकअप किट – Eye Makeup Kit
मेकअप करणं ही एक कला आहे. मेकअप करण्यासाठी तुमच्याकडे मेकअप किट असणं गरजेचं आहे. डोळ्यांचा मेकअप कसा करायचा असा प्रश्न पडला असेल तर या काही मेकअप प्रॉडक्टचा वापर तुमच्या मेकअप किटमध्ये जरूर करा
आयलायनर (Eyeliner)
आय मेकअपमुळे तुमचे डोळे अधिक आकर्षक दिसू लागतात. जर तुम्हाला विविध प्रकारचे लुक ट्राय करायचे असतील तर आयलायनर स्टाईलने लावा. लिक्वीड अथवा ड्राय फॉर्ममध्ये आयलायनर उपलब्ध असतं. तसंच विविध रंगांमध्ये तुम्ही आयलायनर लावू शकता. काळा, निळा, हिरवा, लाल अशा विविध रंगातील आयलायनरमुळे तुमच्या चेहऱ्याचा लुकच बदलु शकतो.
मस्कारा (Mascara)
सुंदर आणि दाट पापण्यांमुळे डोळ्यांच्या सौंदर्यांत अधिक भर पडते. जर तुम्हाला तुमचे डोळे अधिक सुंदर दिसावे असं वाटत असेल तर मस्कारा लावण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. कारण जर मस्कारा योग्य पद्धतीने लावला तर तुमच्या पापण्या अधिक आकर्षक आणि कर्ली वाटू शकतात.
आयशॅडो ब्रश सेट (Eyeshadow Brushes Set)
चेहऱ्यामधील सर्वात लक्षवेधक गोष्ट म्हणजे तुमचे डोळे. डोळ्यांच्या मेकअप मुळे तुमचे डोळे अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना अधिक सुंदर करायचं असेल तर त्यासाठी आयशॅडो लावणं फार गरजेचं आहे. विविध लुकसाठी विविध प्रकारच्या आणि शेडच्या आय शॅडो बाजारात उपलब्ध असतात. मात्र त्या उत्तमरित्या लावण्यसाठी तुमच्याकडे योग्य पद्धतीचा आय शॅडो ब्रश असणं गरजेचं आहे. आयमेकअपसाठी लागणाऱ्या ब्रशचा सेट विकत घ्या.
आयशॅडो पॅलेट (Eye Shadow Palette)
डोळे उठावदार दिसण्यासाठी आयशॅडोचा वापर केला जातो. त्वचेच्या रंगसंगतीप्रमाणे आयशॅडोची शेड निवडायला हवी. जर तुम्ही सावळ्या असाल तर गोल्ड, कॉपर, मॅक्स ब्राऊन, ब्रॉंझ, मॅक्स बर्गंडी यासारख्या शेड्स वापरा. जर तुम्ही गोऱ्या असाल तर रेड, ब्लू, ग्रीन, पिंक, पर्पल, गोल्ड असे कलर डोळ्यांवर फार सुंदर दिसतात. यासाठी विविध रंगाच्या आयशॅडो पॅलेट तुमच्या मेकअप किटमध्ये जरूर ठेवा.
डोळ्यांच्या शेपनुसार मेकअप – Eye Makeup According To Eye Shape
एखाद्या अभिनेत्रीचे स्मोकी आईज पाहिले की तुम्हालादेखील अगदी तसाच डोळ्यांचा मेकअप करावासा वाटत असतो. कधी कधी आयमेक अप करण्याची टेकनिक तुम्हाला माहीत नसते. तर कधी कधी तो मेकअप आपल्याला सुट होईल का? ही शंका मनात येत असते. यासाठीच आम्ही तुम्हाला निरनिराळ्या डोळ्यांच्या आकारानुसार आयमेकअप सुचवत आहोत. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचा आकार आणि त्यानुसार नेमका कोणता मेकअप करावा हे नक्कीच समजू शकेल.
वाईड सेट आईज (Wide Set Eyes)
बऱ्याचदा काही जणींच्या डोळ्यातील आतला कोपरा म्हणजेच इनर कॉर्नर नाकाच्या उंचवट्यापासून फार लांब असतो. अशा प्रकारच्या डोळ्यांना वाईड सेट आईज असं म्हटलं जातं. अनेर मॉडेल्सच्या डोळ्यांचा शेप या पद्धतीचा असतो. आलिया भटचा आयशेपदेखील अशाच प्रकारचा आहे.
वाईड सेट आईजसाठी आय मेकअप टिप्स
जर तुमचा चेहऱ्याची ठेवण आणि आयशेप या प्रकारचा असेल तर तुम्हाला तुम्हाला डोळे आणि नाकातील अंतर कमी दाखवणारा मेकअप करावा लागेल. यासाठी डोळ्याच्या इनर कॉर्नरला डार्क रंगाची आणि आऊटर कॉर्नरला हलक्या रंगाची आयशॅडो लावा. इनर कॉर्नरपासून डार्क रंगाच्या आयशॅडोला सुरूवात करून तुम्ही ती आऊटर कॉर्नरपर्यंत हलक्या रंगाने ब्लेंड करू शकता. आयलायनर लावताना ते काळ्या गडद रंगाचं निवडा आणि ते जास्तीत जास्त टिअर टक्ट (Tear Duct) पर्यंत लावा. हेच टेकनीक मस्कारा लावण्यासाठीदेखील वापरा. अशा चेहऱ्याच्या मुलींनी आयलायनरचे विंग फार लांब ठेवू नयेत. कारण यामुळे तुमचा नाकापासून डोळे आणि लांब दिसतील ज्यामुळे लुक जास्तच बिघडण्याची शक्यता आहे.
क्लोज सेट आईज (Close Set Eyes)
जेव्हा तुमच्या डोळ्याचा इनर कॉर्नर नाकाच्या उंचवट्यापासून जवळ असतो तेव्हा अशा आयशेपला क्लोज सेट आईज असं म्हणतात. करिना कपूरच्या डोळ्यांचा आकार अशा प्रकारचा आहे.
क्लोज सेट आईजसाठी आय मेकअप टिप्स
अशा प्रकारच्या डोळ्यांचा मेकअप करताना आऊटर कॉर्नरवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. यासाठी मेकअप करताना इनर कॉर्नरला हलक्या रंगाच्या अथवा हायलाईट करणाऱ्या आणि आऊटर कॉर्नरला डार्क रंगाच्या आय शॅडो लावा. शिवाय तुमच्या टिअर डक्टवर पांढऱ्या रंगाचं आयशॅडो अथवा हाईटलायनर लावायला मुळीच विसरू नका. कारण या टिप्स मुळे तुमचे डोळे नाकापासून लांब दिसतील. मस्कारा लावताना तुमच्या पापण्यांच्या आऊटर कॉर्नरवर एक्स्ट्रा कोट लावा ज्यामळे तुमच्या डोळ्यांचा आऊटर भाग फोकस होईल.
डीप सेट आईज (Deep Set Eyes)
ज्यांचे डोळेबारीक आणि खोलवर आत रुतलेले असतात त्यांच्या आय ब्रो लाईन फारच उठून दिसतात. अशा डोळ्यांच्या आकाराला डीप सेट आईज असं म्हणतात. अभिनेत्री श्रेया सरनचे डोळे या आयशेपचे आहेत.
डीप सेट आईजसाठी मेकअप टिप्स
अशा आयशेपच्या मुलींनी त्यांचे डोळे मोठे दिसतील असा मेकअप करणं गरजेचं आहे. अशा डोळ्यांवर हलके आणि शिमर आय शॅडो खुलून दिसतात. अशा डोळ्यांच्या संपूर्ण आललीडवर शिमर आयशॅडोचा वापर करणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचे डोळे आत रुततेले दिसणार नाहीत. शिवाय असा आयशेप असेल तर स्मोकी आईज मुळीच ट्राय करू नका. कारण ज्यामुळे तुमचे डोळे आणखी खोलवर रूतलेले दिसतील. शिवाय या शेपच्या मुलींनी मस्कारा वापरताना तो वॉटरप्रूफच वापरावा.
हुडेड आईज (Hooded Eyes)
जर डोळे उघडल्यावर तुमच्या पापण्या दिसत नसतील तर अशा डोळ्यांच्या आकाराला हुडेड आईज असं म्हणतात. त्यात जर तुमच्या अर्धा पापण्या दिसत असतील आणि अर्धा पापण्या झाकलेल्या असतील तर त्या आयशेपला सेमी हुडेड आईज असं म्हणतात. या शेपच्या डोळ्यांचा पापण्या झाकल्या जातात कारण त्यावर तुमच्या पापण्यांवरील त्वचेचा लेअर येत असतो. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे डोळे या आकाराचे आहेत.
हुडेड आईजसाठी आय मेकअप टिप्स
अशा डोळ्यांच्या आकाराच्या मुलींनी असा मेकअप करावा ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांवरील भाग जास्तीत जास्त दिसू शकेल. डोळ्यांच्या पापण्यांवरील भाग उठून दिसण्यासाठी त्यावर डार्क शेडच्या आयशॅडोचा वापर करावा. आयशॅडोचा वापर अगदी आयब्रोलाईनपर्यंत करावा. टिअर डक्टला हायलाईट करण्यासाठी हाटलाईटर वापरावे. लॅश लाईन दिसेल अशा पद्धतीने तिला फोकस करावे. मस्काराचा एक मस्त कोट देऊन तुम्ही लॅश लाईनला हायलाईट करू शकता.
डाऊन टर्न अथवा ड्रूपी आईज (Droopy Eyes)
जेव्हा तुमच्या डोळ्यांचा बाहेरील कोन खालच्या दिशेने झुकलेला असतो तेव्हा त्या डोळ्यांच्या आकाराला डाऊन टर्न आईज अथवा ड्रूपी आईज असं म्हणतात. कधी कधी असा शेप नैसर्गिक असतो तर कधी कधी वयोमानानुसार डोळ्यांना असा आकार प्राप्त होतो. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या डोळ्यांचा आकार अशा प्रकारचा आहे.
डाऊन टर्न अथवा ड्रूपी आईजसाठी मेकअप टिप्स
अशा प्रकारच्या डोळ्यांचा मेकअपमुळे तुमचे डोळे खालच्या दिशेने झुकलेले दिसू लागतात. मात्र तुम्ही सेक्सी कॅट आय लायनर अथवा सेक्सी कॅट आयलायनर विंग शेपने तुमच्या डोळ्यांना आकर्षक करू शकता. यासाठी डोश्यांच्या बाहेरील एंगलवरून 45 अंशाचा कट वरच्या दिशेने देऊन तुम्ही सेक्सी अपवर्ड फ्लिक देऊ शकता. ज्यामुळे तुमचे डोळे वरच्या दिशेने लिफ्ट होतील.
बदाम शेप आईज (Almond Shaped Eyes)
बदामाच्या आकाराचे डोळे अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. ज्यामुळे अशा आयशेपला आऊटर कॉर्नरला नैसर्गिक लिफ्ट टर्न असतो. ज्यामुळे खालची पापणी वरच्या पापणीपेक्षा किंचित मोठी दिसते. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे डोळे या आकाराचे आहेत.
बदाम शेप आईजसाठी मेकअप टिप्स
अशा प्रकारच्या डोळ्यांचा आकार मुळातच सुंदर असतो. ज्यामुळे या आयशेपवर कोणताही मेकअप चांगलाच दिसतो. फक्त खालच्या पापणीला वरच्या पापणीच्या तुलनेचं करण्यासाठी एखाद्या डार्क आयपेन्सिलने बोल्ड करा. तुम्ही या आयशेपवर स्मोकी आईज, बोल्ड रंग, बोल्ड लाईन्स, ग्राफिक्स लाईन्स असा कोणताही मेकअप करू शकता.
प्रॉमिनंट आईज (Prominent Eyes)
या आकाराचे डोळे फारच बोल्ड आणि दिलखेचक असतात. कारण अशा डोळ्यांचा आकार असलेल्या मुलींच्या डोळ्याच्या पापण्या फारच दाट आणि मोठ्या असतात. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोनचा आयशेप अशा प्रकारचा आहे. यासोबतच वाचा डोळे लहान असतील तर कसा करावा डोळ्यांचा मेकअप | Makeup Tips For Small Eyes In Marathi
प्रॉमिनंट आईजसाठी आय मेकअप टिप्स
अशा डोळ्यांचा मेकअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मेकअपमुळे तुमचे डोळे ओव्हर पॉवर होणार नाहीत. यासाठी पुर्ण डोळयांवर डार्क रंगाची आयशॅडो लावा ज्यामुळे तुमच्या पापण्यांमधील अंतर कमी दिसेल. स्मोकी आईजसाठी या डोळ्यांचा आकार अगदी चांगला आहे. दीपिका पदूकोनने लग्नातील विविध कार्यक्रमात असे स्मोकी आईजचा मेकअप केला होता. तुमच्या स्कीन टोनला मॅच होणारे रंग तु्म्ही वापरू शकता. लॅश लाईनवर थिक लायनरदेखील लावू शकता ज्यामुळे तुमची लीड स्पेस कमी दिसेल.
डोळ्यांना मेकअप करण्यासाठी सोप्या टिप्स – Eye Makeup Tips In Marathi
डोळ्यांचा मेकअप करणं हे एक कौशल्य आहे. कारण मेकअप करताना जर चूक झाली तर तुमचा लुक बिघडण्याची दाट शक्यता असते. यासाठी या डोळ्यांचा मेकअप करण्याच्या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.
कंसीलर मेकअप टिप्स (Concealer Makeup Tips)
मेकअपवर वातावरणाचा लवकर परिणाम होत असतो. त्यामुळे मेकअप लगेच आक्सिडाईज होतो. जेव्हा तुमचा मेकअप हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो लगेच सुकण्यास सुरुवात होते. तुम्ही निवडलेली शेड कदाचित नंतर गडद होऊ शकते. यासाठी कोणतेही मेकअप उत्पादन खरेदी करण्यापूर्वी आधी ते लावून तर बघाच शिवाय ते लावल्यावर पाच ते दहा मिनीटे वाट बघा. कन्सिलर लावून तुम्ही तुमचे डार्क सर्कल्स लपवू शकता. मात्र ते फार पॅची दिसू नये यासाठी तुमच्या रंगसंगतीला मॅच होणारे निवडा.
आयलायनर मेकअप टिप्स (Eyeliner Makeup Tips)
बाजारात विविध रंगांचे आयलायनर उपलब्ध असतात. त्यातून आपल्या त्वचेला आणि डोळ्यांना कोणता रंग सुंदर दिसेल याचा विचार करूनच आयलायनर वापरावं. शिवाय ते निवडताना आपल्या डोळ्यांच्या आकार आणि रंग याचाही नीट विचार करावा. तुम्ही आयलानर कॅट स्टाईल, विंग स्टाईल, डबल विंग स्टाईल, ग्लिटरी स्टाईल, व्हाईट अॅन्ड हायलाईटर स्टाईल, शिमर स्टाईल अशा विविध पद्धतीने लावू शकता.
मस्कारा मेकअप टिप्स (Mascara Makeup Tips)
मस्कारा निवडताना विशेष काळजी घ्या. कारण मस्कारा आपण डोळ्यांच्या पापण्यांना लावतो. जर तो निकृष्ठ दर्जाचा असेल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या डोळ्यांवर होऊ शकतो. आजकाल मार्केटमध्ये काळ्या, ट्रान्सफरंट आणि व्हाईट, कलरफुल रंगाचे मस्कारा उपलब्ध असतात. मस्कारा लावण्याआधी पापण्या कर्ल करा आणि मगच मस्कारा लावा. ज्यामुळे तुमच्या पापण्या अधिक आकर्षक दिसतील. जर तुम्हाला आर्टिफिशियल आयलॅशेस लावायचे असतील तर ते लावल्यावर तुमच्या पापण्या आणि आर्टिफिशियल आयलॅशेस दोन्ही कर्ल करा आणि मग त्यावर मस्कारा लावा. मस्कारा लावताना तो पापण्यांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा. ज्यामुळे पापण्या जास्त लांब दिसतील. वरच्या पापण्यांसाठी अपवर्ड स्ट्रोक आणि खालील पापण्यांसाठी डाऊनवर्ड स्ट्रोक्स लावा. आय लॅश ब्रशवर थोडा थोडा मस्कारा घ्या. जास्त मस्कारा ब्रशवर लागला असेल टिश्यू पेपरने तो काढून टाका. तसेच जर पापण्यांवर जास्त मस्कारा लागला तर तो आय लॅश ब्रशच्या मदतीने साफ करा.जर मस्कारा लावताना तो डोळ्यांच्या आजूबाजूला पसरला तर तो सुकल्यावर स्वच्छ करा. तुम्ही हा मस्कारा काढून टाकण्याकरता टिश्यू पेपर अथवा कापसावर पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेंसेस वापरत असाल तर डोळयांचा मेकअप करण्याआधी त्या लावा. जर तुम्हाला मस्काराचे दोन कोट लावायचे असतील तर एक कोट सुकल्यावरच दुसरा कोट पापण्यांवर लावा.
आयशॅडो मेकअप टिप्स (Eyeshadow Makeup Tips)
आयशॅडोचा रंग जर गडद असेल तर तो खूप जास्त लावू नका कारण त्यामुळे तुमच्या सगळ्या मेकअपचा लूक बदलू शकतो. त्यामुळे खूप जास्त आयशॅडो लावू नका. डोळ्यांसाठी चांगले आयशॅडो पॅलेट निवडा. डोळ्यांना आयशॅडो लावताना तुमच्या स्किनटोनवर जास्त उठून दिसणार नाही असा रंग निवडा. शिवाय आयशॅडो आणि लिपस्टीक जर सारख्या कलरचं असेल तर तेही तुमचा लूक बिगडवू शकतं. जर तुम्ही तुमच्या डोळ्यांना डार्क शेड्स लावत असाल तर ओठांना नेहमी लाइट शेड्सच्या लिपस्टीक वापरा. स्मोकी आईज मेकअप करताना लिपस्टीकची शेड न्यूड किंवा पीच ठेवा.
आयशॅडो आधी प्राइमर वापरा (Use Primer Before Eyeshadow)
आयशॅडो लावण्यापूर्वी डोळ्यांच्या पापण्यांना आयशॅडो प्रायमर लावणं गरजेचं असतं. कारण त्यामुळे तुमच्या आयशॅडोचा रंग ब्राईट आणि उठावदार दिसतो. प्रायमर लावल्यामुळे डोळ्यांवरील क्रीज लाईन्स कमी प्रमाणात दिसतात. मात्र यासाठी तुमच्या त्वचेच्या रंगसंगतीचं प्रायमर निवडा. ज्यामुळे चेहरा आणि डोळे यामध्ये वेगळेपण दिसणार नाही.
आयशॅडो ट्रेंड – Eye Shadow Trend In Marathi
फॅशनचा ट्रेंड हा सतत बदलत असतो. सध्या बोल्ड आणि ग्लिटरी आयशॅडोचा ट्रेंड आहे. यासाठी डार्क आणि शिमर लुकच्या आयशॅडोची निवड करा. तसंच जाणून घ्या हे निरनिराळे आयशॅड ट्रेंड
- ब्राईट आणि काळपट रंगाच्या शेड्स जास्त ट्रेंडमध्ये नाहीत. मात्र स्मोकी आईज करण्यासाठी करड्या शेडसोबत तुम्ही डार्क रंगाच्या शेड वापरू शकता.
- बॉलीवूड अभिनेत्रीदेखील जास्तीत जास्त बोल्ड आयमेक अप करण्यावर भर देतात. यासाठी पिवळ्या, एक्वाग्रीन, मरीन, ऑरेंज, स्काय ब्लू असे रंग डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी वापरा.
- तुम्हाला जे रंग खुलून दिसतील ते वापरून तुम्ही स्वतःचा फॅशन ट्रेंड सेट तयार करू शकता. त्यामुळे नेहमीच फॅशन ट्रेंड फॉलो करायला हवेत असं नाही.
- जांभळ्या- वाईन रंगाची आयशॅडो तुम्ही एखाद्या रोमॅंटिक डेटला जाताना वापरू शकता. जांभळ्या अथवा वाईन रंगाच्या ड्रेससोबत फॉलो केलेला हा आयशॅडो ट्रेंड तुमच्यावर नक्कीच खुलून दिसेल.
- सनसेट थीमसाठी तुम्ही ऑरेंज आणि पिवळ्या रंगाच्या आयशॅडो वापरू शकता. असा लुक खूप फ्रेश दिसतो आणि समर लुकसाठी परफेक्ट ठरतो.
- रात्रीच्या वेळी पार्टीसाठी तयार होताना तुम्ही मॅटालिक आयशॅडोचा ट्रेंड फॉलो करू शकता. असा लुक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतो. ज्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही असा शिमर लुक नक्कीच करू शकता. यासोबतच जाणून घ्या डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी भारतातील उत्तम (Best Eyeshadow Palette In Marathi)
डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी सोप्या टिप्स – Tips To Remove Eye Makeup
मेकअप केल्यावर त्वचा चांगली राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मेकअप व्यवस्थित काढणे. कारण जर तुमचा मेकअप योग्य पद्धतीने काढला गेला नाही तर त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी फॉलो करा या टिप्स
- काहीजणींना रात्री मेकअप न काढताच झोपण्याची सवय असते. असं केल्यामुळे तुमचा बेड तर खराब होतोच शिवाय तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम दिसू लागतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्ह करा.
- मेकअप काढण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या मेकअप रिमूव्हरचा वापर करू शकता.
- मेकअप नैसर्गिक पद्धतीने काढण्यासाठी तुम्ही नारळाच्या अथवा बदामाच्या तेलानेही वापर करू शकता.
- यासाठी मेकअप काढण्यासाठी तुम्ही जे साहित्य वापरणार आहात ते टिश्यू पेपर अथवा कॉटन पॅडवर घ्या आणि हळूवार मेकअप काढा.
- मेकअप कधीच त्वचा घासून अथवा रगडून काढू नका.
- आय मेकअप व्यवस्थित नीट मेकअप काढल्यास तुमच्या पापण्यांचे नुकसान होत नाही.
- मेकअप काढल्यावर सौम्य क्लिंझरने चेहरा स्वच्छ करा आणि टोनर लावून त्वचेवर मॉईस्चराईझर लावा.
- त्वचा सकाळी टवटवीत दिसण्यासाठी चांगला स्लिपिंग मास्क अथवा साधं नारळाचं तेलही त्वचेवर लावून तुम्ही झोपू शकता. तसंच वाचा सुंदर डोळ्यांसाठी कशी घ्यावी ‘पापण्यांची’ काळजी (How To Take Care Of Eyelashes In Marathi)
डोळ्यांचा मेकअपबाबत मनात असलेले निवडक प्रश्न – FAQ’s
डोळ्यांचा मेकअप करताना काय काळजी घ्यावी ?
जर तुम्हाला डोळ्यांचा मेकअप येत नसेल तर तज्ञ्ज व्यक्तीकडून तो आधी शिकून घ्या आणि त्याचा सराव करा. कारण आयमेक जर चुकला तर तुमच्या संपूर्ण लुकवर त्याचा परिणाम होऊ शकतो. लुक चांगला दिसण्यासाठी आय मेकअप येणं गरजेचं आहे.
आय मेकअपसाठी मेकअप साहित्य घेताना काय काळजी घ्यावी ?
डोळ्यांचा मेकअपच्या साहित्याचा वापर थेट डोळ्यांवर केला जात असल्यामुळे आयमेकअप करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मुळातच सर्वच सौंदर्योत्पादने ही चांगल्या दर्जाचीच वापरावीत. मात्र डोळ्यांचा मेकअप करताना ती नेहमी तपासून घ्यावीत कारण चुकून त्यातील एखादा भाग डोळ्याच्या आत गेल्यास तुमचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
आय मेकअप स्वतः करण्यासाठी एखादी सोपी टिप सांगाल का ?
डोळ्यांचा मेकअप वर आधारीत विविध युट्यूब व्हिडिओज असतात. ते पाहून अथवा तज्ञ्ज व्यक्तीकडून शिकून मगच आयमेकअप करावा. अथवा सिंपल बेसिक आयमेक करण्याचा घरीच सराव करावा.