ADVERTISEMENT
home / Sex Advice
‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स

‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स

प्राचीन काळात सेक्सबद्दल लोकांचे विचार हे आजच्या लोकांपेक्षा जास्त प्रगत होते असं म्हणावं लागतं. सेक्सबद्दल वाटणारी लाज अथवा न बोलणं हे गेल्या काही दशकांपासून आहे. पण सेक्सबद्दल भारतामध्ये असे विचार पूर्वीपासून नक्कीच नाहीत. प्राचीन भारतातमध्ये सेक्सबद्दल अतिशय खुलेपणाने चर्चा होत होती आणि याचं उदाहरण म्हणजे सेक्सविषयीचा भारतातील पहिला ग्रंथ ‘कामसूत्र’. दुसऱ्या शतकात हा ग्रंथ लिहिण्यात आला असून सेक्स हे शरीरासाठी उत्तम आहे हीच शिकवण नेहमी देण्यात आली आहे. प्राचीन नियमांनुसार सेक्स (सहवास) हा दीर्घायु, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुख प्राप्ती करण्यासह साहचर्य सुख आणि वंशवृद्धि प्राप्तीसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्ती नियमित सेक्स करतात त्या व्यक्ती अनेक आजार आणि त्रासापासून मुक्त राहतात. आजकाल तुम्हाला अशा अनेक व्यक्ती दिसतील ज्यांची सेक्स लाईफ चांगली नसल्यामुळे त्या व्यक्ती त्रस्त आहेत. प्राचीन सेक्सच्या नियमानुसार पती आणि पत्नीमधील सेक्स हा त्यांच्यातील संबंध मजबूत बनवण्यासाठी मोठा आधार होता. अर्थात त्यामध्ये प्रेमाची भावना असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामध्ये कोणतीही काम वासना नसून प्रेमाच्या आधारावरच सेक्स करणं जास्त योग्य ठरतं. आपणही जाणून घेऊया प्राचीन काळात कोणते सेक्सचे नियम फॉलो करण्यात येत होते. एक्स्पर्ट्सनुसार सेक्स करताना तुम्ही या प्राचीन गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही मोठ्या नुकसानापासून वाचू शकता. त्यामुळे जाणून घेऊया नक्की या बाबी काय आहेत. 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

पुरातन काळात नक्की काय होते नियम

Shutterstock

ADVERTISEMENT

1- कोणत्याही महिलेची मासिक पाळी सुरू असताना 4 दिवस पुरूषाने सेक्स केल्यास, पुरूषाला कोणत्या ना कोणत्यातरी आजाराला सामोरं जावं लागतं. त्यामुळे प्राचीन नियमानुसार मासिक पाळी सुरु असताना सेक्स करून नये. तसंच मासिक पाळी संपल्यानंतर पाचव्या, सहाव्या, बाराव्या, चौदाव्या आणि सोळव्या दिवशी सेक्स करणं हे उत्तम मानलं जातं. त्यामुळे गर्भधारणा व्यवस्थित होते असंही समजलं जातं. 

2- बह्म वैवर्त पुराणानुसार सकाळ- संध्याकाळ पूजेच्या वेळी कोणत्याही स्त्री आणि पुरुषांनी सेक्स करू नये. या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी की, ग्रहण, सूर्योदय, सूर्यास्त, निधन, श्रावण महिना, नक्षत्र, दिवाकाल, भद्रा, श्राद्ध, अमावस्या या दिवशीसुद्धा सेक्स करणं टाळावं. हे पूर्वीचे समज आहेत. 

3- प्राचीन काळी कोणत्याही पुरुषाने अथवा महिलेने आपल्या पती अथवा पत्नीव्यतिरिक्त इतर कोणाशीही सेक्स करण्यास सक्त मनाई होती. या संबंधांना अनैतिक समजण्यात येत होतं अर्थात आताही अनैतिकच समजण्यात येतं. पण त्यावेळी असं केल्यास, आयुष्यभर त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप करावा लागत होता. 

4- गर्भवती महिलांनी गर्भारपणात सेक्स करू नये. असं केल्याने होणारं मूल हे अपंग होण्याचीही शक्यता असते असं समजलं जात होतं. आताही डॉक्टर गर्भारपणात सेक्स न करण्याचा सल्ला देतात. 

ADVERTISEMENT

5- पवित्र वृक्ष, स्मशानभूमी, पवित्र स्थळ, गुरुकुल, हॉस्पिटल अशा ठिकाणी सेक्स करण्यासाठीही परवानगी नव्हती. कोणतीही व्यक्ती असं करत असेल तर त्यांना आजाराला सामोरं जावं लागतं असं म्हटलं जातं. वास्तविक हॉस्पिटल, स्मशानभूमी अशा ठिकाणी अनेक जंतू असल्याने जंतूसंसर्ग होऊन आजारी पडणं स्वाभाविक आहे. त्यामुळे पूर्वीपासून या गोष्टींची काळजी घेतली जात होती. 

तुमचा ‘सेक्स मूड’ तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!

Shutterstock

ADVERTISEMENT

6- तुमचा जोडीदार उदास असेल अथवा त्याची सेक्स करण्याची इच्छा नसेल तेव्हा त्याच्याबरोबर सेक्स करू नये. असा सेक्स केल्याने होणारी संतती चांगली होत नाही. 

7- सेक्सच्या वेळी स्त्री आणि पुरुष दोघांचेही जननांग (प्रायव्हेट पार्ट) हे व्यवस्थित साफ असायला हवेत. म्हणूनच पूर्वीच्या काळी सेक्स करण्यापूर्वी आंघोळ करण्याला महत्त्व होतं. 

8- पूर्वीच्या काळी संपूर्ण नग्न अवस्थेत सेक्स करू नये असं सांगितलं जात होतं. महिला आणि पुरूष या दोघांनीही आपल्या शरीरावर चादर अथवा कोणत्याही कपड्याने थोडं झाकून घ्यायला हवं. जर सेक्स करताना एखाद्याचा मृत्यू झाला तर ती व्यक्ती पूर्ण नग्न अवस्थेत राहणार नाही यासाठी असं म्हटलं जायचं. पण आताच्या युगात असं नक्कीच कोणी फॉलो करू शकणार नाही. त्यावेळी तशा परिस्थितीमध्ये असं करणं त्यांना योग्य वाटत असावं. 

9- कामसूत्रचे रचनाकार आचार्य वात्सयायन यांच्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामशास्त्राचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे सेक्स लाईफ अधिक मनोरंजक होण्यास मदत होते. कारण ज्या दाम्पत्याची सेक्स लाईफ चांगली असते त्यांच्या घरात नेहमी सुख शांती राहाते. 

ADVERTISEMENT

10- प्राचीन नियमांनुसार रात्रीच्या पहिल्या प्रहरी सेक्स करणं चांगलं असतं. मध्यरात्रीचा प्रहर हा योग्य समजण्यात येत नाही. या काळात सेक्स केल्याने जन्माला येणारं मूल हे राक्षसी स्वभावाचं असतं असं पुराणकालापासून समजण्यात येत आहे.

जगभरातील अशी शहरं जिथे सेक्स लपून नाही तर केला जातो खुलेआम

 

11 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT