मोरोक्कोच्या नैऋत्य दिशेला आर्गनची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच ऑर्गनच्या फळाला मोरक्को असंही म्हणतात. मोरोक्कोमधील बकऱ्यांचं आर्गनची फळं हे एक प्रमुख खाद्य आहे. आर्गनच्या झाडाला ‘लाईफ ऑफ ट्री’ असंही म्हटलं जातं. ऑर्गन ऑईल (Argan oil) हे ऑर्गन झाडाच्या फळातील बियांपासून तयार केलं जातं. या बियांमधील गरापासून हे तेल काढतात. कमी प्रमाणात केल्या जाणाऱ्या उत्पादनामुळे हे तेल महागडे आहे शिवाय सर्वत्र सहज उपलब्ध होत नाही. वास्तविक मोरोक्कोमध्ये ऑर्गनची झाडं भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत मात्र त्याची फळं ज्यापासून हे तेल काढलं जातं ती मात्र नक्कीच दुर्मिळ आहेत. कारण ही फळं हंगामी असतात शिवाय झाडावर फार उंचावर लागतात. मोरोक्कोमध्ये बकऱ्या ही फळं खातात आणि त्याच्या बिया मात्र तशाच टाकून देतात. स्थानिक गावकरी या बिया गोळा करतात आणि त्यापासून कोल्ड प्रेस ऑर्गन ऑईल काढतात. बऱ्याचदा ऑर्गन ऑईलचा वापर एखाद्या जखम अथवा दुखणं कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. शिवाय अनेक आरोग्य समस्यांसाठी ऑर्गन ऑईलचा वापर केला जातो. आजकाल ऑर्गन ऑईलच्या कॅप्सुल्सही बाजारात मिळतात. ऑर्गन ऑईल तुमच्या त्वचा आणि केसांसाठीदेखील गुणकारी आहे. यासाठीच जाणून घ्या आर्गन ऑईलचे फायदे आणि त्याचा उपयोग कसा करावा.
Shatter stock
आर्गन ऑईलचे आरोग्यदायी फायदे (Health benefits of Argan oil)
आर्गनऑईलचा वापर तुम्ही तुमच्या आरोग्यसमस्या दूर करण्यासाठी करू शकता. कारण आर्गन आईलमध्ये अनेक पोषक घटक असतात.
त्वचेसाठी तीळ तेलाचे फायदे देखील वाचा
ह्रदयाचे आरोग्य सुधारते (Improves Heart Health)
आर्गन ऑईलमध्ये Oleic acid असतं ज्यामुळे तुमच्या शरीराला ओमेगा 9 फॅट मिळतं. Oleic acid आर्गन ऑईलप्रमाणेच अॅवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑईलमध्येदेखील असतं. या अॅसिडमुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारतं. एका संशोधनानुसार ऑलिव्ह ऑईल आणि आर्गन ऑईलचे तुमच्या ह्रदयावर समान फायदे होतात. तर काही संशोधनानुसार तुम्ही जितकं आर्गन ऑईल स्वयंपाकात वापराल तितकाच शरीराला रक्तातील अॅंटिऑक्सिडंचा जास्त पूरवठा होतो आणि तुमचं बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे हदयविकाराचा त्रास असणाऱ्या लोकांनी आर्गन ऑईलचा वापर स्वयंपाकात करण्यास काहीच हरकत नाही.
मधुमेहींसाठी उपयुक्त (Useful For Diabetes)
काही संशोधनानुसार मधुमेंहींनी आर्गन ऑईलचा वापर आहारात करणं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील फास्टिंग शुगर आणि इन्सुलिन रेसिस्टंन्स कमी होण्यास मदत होते. आर्गन ऑईलमध्ये असलेले अॅंटिऑक्सिडंट मधुमेंहीच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
कर्करोगापासून बचाव होतो (Prevent Cancer)
आर्गन ऑईल कर्करोगाच्या रूग्णांसाठीदेखील वरदान ठरू शकतं. कारण आर्गन ऑईलमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि पुर्ननिर्मिती कमी होण्यास मदत होते. एका संशोधात असं आढळून आलं आहे की आर्गन ऑईलमध्ये कर्करोगाच्या पेशींना विरोध करण्याचे घटक असतात.
जखम बरी होते (Helps In Healing Wounds)
आर्गन ऑईलमध्ये जखम बरी करण्याचे गुणधर्म आहेत. काही प्राण्यांवर याचा प्रयोग केल्यानंतर असं आढळून आलं आहे आर्गन ऑईलमुळे जखमा जलद गतीने बऱ्या होतात. जळलेल्या त्वचेवर आर्गन ऑईल लावणं फायदेशीर ठरू शकतं.
गरोदरपणी फायद्याचे (Beneficial During Pregnancy)
आर्गन ऑईलचा वापर तुम्ही चेहऱ्याप्रमाणेच शरीराच्या इतर अवयवांवर करू शकता. एका संशोधनानुसार गरोदरपणानंतर निर्माण होणाऱ्या स्ट्रेचमार्क्संना दूर करण्यासाठी आर्गन ऑईल अत्यंत प्रभावी आहे. यासाठी तुम्ही गरोदरपणापासून आर्गन ऑईलचा वापर करू शकता. प्रेगन्सीमध्ये पोट,ब्रेस्ट, कंबर आणि मांड्यांना आर्गन ऑईल लावल्यामुळे तुम्हाला प्रसूतीनंतर दिसणारे स्ट्रेच मार्क्स कमी प्रमाणात दिसतात.
क्युटिकल्सवर उपचार करण्यासाठी (Treating Cuticles)
हात मऊ आणि मुलायम असावे असं तुम्हाला नेहमीच वाटत असतं. मात्र कोरडी हवा अथवा इतर वातावरण याचा परिणाम तुमच्या नखांच्या क्युटिकल्स खराब होतात. वेळच्या वेळी या क्युटिकल्सचे पोषण नाही झालं तर ती तुटतात आणि तुमचे हात खराब दिसू लागतात. नखं जितकी सुंदर तितकीच निरोगीदेखील असायला हवी. यासाठीच आर्गन आईलने तुम्ही तुमचे क्युटिकल्स नीट करू शकता.
ऑईल पुलिंगसाठी (Oil Pulling)
Oil pulling हा ओरल क्लिनिंगचा एक आयुर्वेदिक प्रकार आहे. दात आणि तोंडाचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. ज्यामध्ये तोंडात खाद्यतेल घेऊन त्याने चुळ भरली जाते. ज्यामुळे दातातील अस्वच्छता आणि जीवजंतू कमी होण्यास मदत होते. Oil pulling मुळे केवळ तुमचे दात स्वच्छ होतात असं नाही तर हे टेकनिक तुमच्या आरोग्यासाठीदेखील अतिशय उत्तम असते. आर्गन ऑईल आईल पुलिंगसाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता.
Shatter stock
त्वचेवर आर्गन ऑईलचा असा होतो फायदा (Benefits of Argan Oil For Skin)
आर्गन ऑईल तुम्ही तुमच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी आणि सौंदर्य वाढवण्यासाठी वापरू शकता. यासाठीच जाणून घेऊया ऑर्गन ऑईलचा तुमच्या आरोग्यावर आणि सौंदर्यावर काय परिणाम होतो
एजिंगच्या खुणा कमी होतात (Decrease Ageing Signs)
आर्गन ऑईलमुउळे तुमची त्वचा फक्त मऊ आणि मुलायम होते असं नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणादेखील कमी होतात. आर्गन ऑईलमुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, पफी आईज, डार्क सर्कल्स कमी होतात. ज्यामुळे तुम्ही अधिक तरूण आणि फ्रेश दिसू लागता. यासाठी दररोज झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि चेहऱ्याला आर्गन ऑईल जरूर लावा.
वाचा – निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’
कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी (Nourish Dry Skin)
ज्या लोकांची त्वचा कोरडी असते अथवा जे लोक थंड प्रदेशात राहतात त्यांना नेहमीच त्वचा कोरडी होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. कोरडी त्वचा लवकर खराब होते. अशा त्वचेवर सुरकुत्या, रॅशेस, व्रण लवकर पडतात. यासाठीच तुमची त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी आर्मन ऑईलचा वापर करता येऊ शकतो.
अॅक्ने कमी करण्यासाठी (Reduces Acne)
ज्यांना सतत अॅक्नेचा त्रास होतो त्यांच्यासाठीतर आर्गन ऑईल वरदानच आहे. कारण ऑर्गन ऑईलमुळे तुमच्या त्चचेचं पोषण होतं शिवाय ती तेलकट होत नाही. तेलकट त्वचेसाठी असणाऱ्या क्रीम अथवा मॉश्चराईझर बराच काळ टिकत नाही. मात्र आर्गन ऑईल तुमच्या त्वचेला बराच काळ मॉश्चराईझ करतं. यासाठी तेलकट त्वचेच्या लोकांनी चेहऱ्यावर आर्गन ऑईल लावण्यास काहीच हरकत नाही.
त्वचेचं संरक्षण आणि उपचार करण्यासाठी (Protects Skin)
आर्गन आईलमध्ये जखमा भरून काढण्याचं सामर्थ्यं असतं. यासाठी तुम्ही जखम बरी करण्यासाठी आर्गन ऑईल वापरू शकता. जळलेली त्वचा, कापण्यामुळे होणारी जखम अशा जखमा आर्गन ऑईलमुळे भरून निघू शकतात. रोजच्या वापरात जर एखाद्या बर्नालप्रमाणे अथवा मलमाप्रमाणे तुम्ही आर्गन ऑईल वापरू शकता.
पाय, हात आणि नखांची काळजी घेण्यासाठी (Take Care of Nails, Feet & Hands)
आर्गन ऑईलमध्ये त्वचा मऊ आणि मुलायम करण्याची क्षमता असते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या नखे, हात आणि पाय सुंदर करण्यासाठी आर्गन ऑईल वापरू शकता. यासाठी आर्गन ऑईलचे काही थेंब आर्गन ऑईल घ्या आणि हात, पाय आणि नखांच्या क्युटिकल्सवर हलक्या हाताने मसाज करा. झोपण्यापूर्वी जर तुम्ही अशा पद्धतीने आर्गन ऑईल तुमच्या हात आणि पायांना लावलं तर तुमचे हात पाय नक्कीच मुलायम होतील.
ओठ मुलायम करण्यासाठी (Soften Lips)
आर्गन ऑईलमुळे त्वचेचं पोषण होतं आणि त्वचा मऊ आणि मुलायम होते. थंडीच्या दिवसात अथवा थंड प्रदेशात जाताना तुम्हाला लिप बामची गरज लागते. ज्यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहतात. यासाठी तुम्ही आर्गन ऑईल एखाद्या लीप बामप्रमाणे वापरू शकता.
सनटॅनपासून सरंक्षण करण्यासाठी (Protect From Sun Tan)
उन्हात अथवा प्रखर सुर्यप्रकाशात फिरल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. कारण सुर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा काळवंडते आणि काळसर दिसू लागते. सुर्याच्या या युव्ही किरणांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही आर्गन ऑईलचा वापर करू शकता. आर्गन ऑईल तुम्हाला एखाद्या सनस्क्रीनप्रमाणे वापरता येऊ शकतं.
Shatter stock
आर्गन ऑईलचा उपयोग कसा कराल (Uses Of Argan Oil)
आर्गन ऑईलचे अनेक आरोग्य आणि सौंदर्य फायदे आहेत. मात्र यासाठी त्याचा वापर नेमका कसा करावा हे माहीत असायला हवं. आर्गन ऑईलचा वापर करण्यापूर्वी ही माहिती तुमच्या फायेद्याची ठरू शकेल.
स्कीन मॉश्चराईझर (Skin Moisturizer)
आर्गन ऑईल त्वचेत पटकन मुरतं आणि त्यामुळे त्वचा फार तेलकट दिसत नाही. यासाठीच तुम्ही त्वचा स्वच्छ केल्यावर त्याचा वापर एखादं मॉश्चराईझर म्हणून करू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही ऑर्गन ऑईल त्वचेवर लावलं तर तुमची त्वचा कोरडी राहणार नाही. शिवाय हिवाळ्यात तुम्हाला थोड्या जास्त प्रमाणात हे तेल त्वचेवर लावावं लागेल. कारण कोरड्या त्वचेवर ते अधिक प्रमाणात मुरू शकतं. यासाठी थोडं थोडं तेल त्वचेवर लावा. या तेलात व्हिटमिन ई आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण होतं आणि त्वचा मऊ आणि मुलायम होते.
कसे वापराल-
ऑर्गन ऑईलचे काही थेंब तळहातावर घ्या आणि सर्क्युलर मोशनमध्ये चेहरा आणि मानेवर हलकासा मसाज करा.
हेअर कंडिश्नर (Hair Conditioner)
आर्गन ऑईलमुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. शिवाय केसांवर एक प्रकारची नैसर्गिक चमकदेखील येते. जर तुमचे केस निस्तेज झाले असतील अथवा फ्रिझी असतील तर आर्गन ऑईल केसांना लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्गन ऑईलमुळे केस योग्य पद्धतीने कंडिश्नर होतात.
कसे वापराल –
आर्गन ऑईल कोमट करून वाटीमध्ये घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांवर त्याने हलक्या हाताने मसाज करा. ज्यामुळे तुमच्या केसांचे योग्य पोषण नक्कीच होईल.
हेअर स्टाईल करण्यासाठी (Hairstyles)
आर्गन ऑईलमुळे केस मऊ आणि चमकदार होतात. ज्यामुळे तुमच्या केसांवर विविझ प्रकारच्या हेअरस्टाईल तुम्हाला करता येतात. हेअर स्टाईल करण्यासाठी केसांचा पोत चांगला असणं गरजेचं असतं तसं नसेल तर हेअरस्टाईलनंतर केस जेल अथवा स्रे लावून सेट करावे लागतात. मात्र आर्गन ऑईलमुळे तुमचे केस कोणत्याही हेअर स्टाईलमध्ये सुंदर दिसतात.
कसे वापराल –
केसांवर कोणतेही हेअर स्टाईल करण्यापूर्वी तुम्ही केसांवर एखाद्या सिरमप्रमाणे दोन ते चार थेंब आर्गन ऑईल लावू शकता. कारण आर्गन ऑईल तेलकट नसतं ज्यामुळे तुमचे केस तेलकट दिसत नाहीत. शिवाय हेअर स्टाईल करताना ते योग्य पद्धतीने सेटदेखील होतात.
लीप मॉश्चराईझर (Lips Moisturizer)
ओठांची काळजी घेण्यासाठी त्यांचे योग्य पोषण कसे होईल हे पाहिलं पाहिजे. विशेषतः हिवाळ्यात अथवा थंड प्रदेशात जाताना ओठांची नियमित काळजी घ्यावी लागते. कोरड्या हवामानामुळे तुमचे ओठ कोरडे होतात आणि त्यावर भेगा दिसू लागतात. फुटलेल्या ओठांमुळे तुमचे सौंदर्य तर बिघडतेच शिवाय खाताना आणि बोलताना त्रासही होतो. तुम्हालाही फुटलेल्या ओठांवर उपचार करायचे असतील तर तुम्ही आर्गन ऑईलचा वापर करू शकता.
कसे वापराल –
दोन ते तीन थेंब आर्गन ऑईल बोटांवर घ्या आणि हलक्या हाताने ते एखाद्या लीप बामप्रमाणे लावा. जर जास्तीचं तेल लागलं तर ते टिश्यू पेपरने काढून टाका.
मेकअर रिमूव्हर (Makeover Remover)
आर्गन ऑईलचा वापर तुम्ही तुमचा मेकअप काढून टाकण्यासाठी नक्कीच करू शकता. बऱ्याचदा मेकअप काढण्यासाठी महागड्या मेकअप रिम्हूवरचा वापर केला जातो. मात्र त्याने तुमचा मेकअप व्यवस्थित निघेलच असं नाही. याउलट जर तुम्ही आर्गन ऑईलने मेकअप काढला तर तुमचा मेकअप तर निघतोच. शिवाय तुमच्या त्वचेचं पोषणही होतं.
कसे वापराल –
मेकअप काढण्यासाठी दोन ते तीन थेंब आर्नग ऑईल तळहातावर घ्या. तेलाने चेहऱ्यावर मेकअप लावलेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर टीश्यू पेपर अथवा कॉटन पॅडने मेकअप काढून टाका.
पावडर टू क्रीम ब्लशर (Powder To Cream Blusher)
आर्गन ऑईल शुद्ध स्वरूपात असतं ज्यामुळे ते कोणत्याही सौंदर्य उत्पादनात पटकन मिसळलं जातं. यासाठी तुम्ही तुमच्या एखाद्या मेकअप साहित्यात ते सहज मिसळू शकता. बऱ्याचदा तुमच्याकडे पावडर ब्लशर असतं आणि तुम्हाला एखादा खास लुक करण्यासाठी क्रीम ब्लशरची गरज असते. अशावेळी तुम्ही तुमच्या पावडर फॉर्ममधील ब्लशरला क्रीम स्वरूपात करण्यासाठी आर्गन ऑईलचा वापर करू शकता.
कसे वापराल –
तुमच्याकडील पावडर स्वरूपातील ब्लशर असेल तर ड्रॉपरच्या मदतीने आर्गन ऑईलचे काही थेंब त्यामध्ये टाका. ज्यामुळे तुमचे ब्लशर क्रीम स्वरूपात तयार होईल. आयत्यावेळी क्रीम ब्लशर तयार करण्यासाठी ही एक छान कल्पना आहे.
स्क्रब बेससाठी (Scrub Base)
वातावरणातील धुळ, माती, प्रदूषण कमी करण्यासाठी चेहरा स्वच्छ करण्याची गरज असते. त्वचेची छिद्रे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आर्गन ऑईलच्या मदतीने एखादा छान स्क्रबदेखील तयार करू शकता.
कसे वापराल –
कॉफी पावडर आणि आर्गन ऑईलचा फेस स्क्रब तयार करा. एक चमचा कॉफी पावडर घ्या त्यात दोन ते चार थेंब अथवा मिश्रण भिजेपर्यंत आर्गन ऑईल टाका. तयार मिक्षण चेहऱ्यावर लावा आणि सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. अर्धा ते पाऊण तासाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
Shatter stock
आर्गन ऑईलचे दुष्परिणाम (Side effects of Argan oil)
आर्गन ऑईल तुमच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी जितकं योग्य आहे तितकेच त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. यासाठी आर्गन ऑईल वापरण्यापूर्वी त्याच्या साईड इफेक्ट्सविषयी जरूर जाणून घ्या.
- आर्गन ऑईल खूप उग्र वासाचं असतं ज्यामुळे तुम्हाला त्याची अॅलर्जी होऊ शकते. जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तपृर आर्गन ऑईल वापरताना काळजी घ्या.
- आर्गन ऑईल हे आर्गनच्या फळांच्या बियांपासून तयार केलेलं असलं तरी तुम्हाला या फळांची अॅलर्जी असल्यास या तेलाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. यासाठी तेल वापरण्यापूर्वी त्याची टेस्ट घ्या मग ते त्वचेवर लावा.
- आर्गन ऑईल पचायला जड असल्यामुळे काही लोकांना आर्गन ऑईलच्या वापरामुळे पोटदुखी, डायरिया, भुक मंदावणे अशा समस्या होऊ शकतात.
Shatter stock
आर्गन ऑईलबाबत असलेले काही निवडक प्रश्न (FAQs )
आर्गन ऑईल खाद्यतेलाप्रमाणे वापरता येतं का ?
होय, नक्कीच आर्गन ऑईलचा वापर तुम्ही खाद्यतेलाप्रमाणे करू शकता. कारण ते आरोग्यासाठी चांगले असते.
आर्गन ऑईल कुठे खरेदी करावं ?
आर्गन ऑईल खरेदी करताना ते कोल्ड प्रेस म्हणजेच लाकडी घाण्यावर तयार केलेलं आणि शुद्ध स्वरूपात असेल याची काळजी घ्या.
ऑर्गन ऑईल कसं तयार करतात ?
आर्गन ऑईल मोरोक्कोमध्ये उपलब्ध असणाऱ्या आर्गन या झाडाच्या फळांच्या बियांपासून तयार केलं जातं. ही फळं हंगामी असल्यामुळे आर्गन तेलाचे उत्पादन कमी प्रमाणात केलं जातं.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
वजन कमी करण्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे त्रिफळा चूर्ण
त्वचा आणि केसांचे आरोग्यासाठी फायदेशीर आहे सिताफळ