ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क

DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क

सणासुदीला सुंदर आणि आकर्षक दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं. चमकदार आणि तेसज्वी कांती  मिळवण्यासाठी मोठमोठ्या ब्युटी ट्रिटमेंट अथवा खर्चिक उपाययोजना करायला हव्या असं मुळीच नाही. घरातच तयार केलेले काही नैसर्गिक फेसपॅक किंवा फेसमास्क तुम्हाला अगदी छान इफेक्ट देऊ शकतात. सध्या गाजराचा सिझन सुरू होत आहे. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन,  व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के असे अनेक गुणधर्म असतात. गाजर जितकं तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं तितकंच ते तुमच्या त्वचेसाठीदेखील पोषक ठरतं. गाजरामधील पोषक घटकांमुळे त्वचेवरील धुळ, प्रदूषण, डेड स्कीन निघून जाते आणि त्वचा नैसर्गिक पद्धतीने ग्लो करू लागते. तेव्हा घरातील गाजराचा वापरून हे फेसमास्क तयार करा आणि चेहऱ्यावर इन्संट ग्लो मिळवा. 

shutterstock

गाजराचा वापर करून तयार करा हे होममेड फेसपॅक

गाजराचा फेसपॅक प्रकार 1

दोन मध्यम आकारच्या गाजराचा कीस अथवा पल्प, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे मध, एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. सर्व साहित्य एकत्र करा. सर्व साहित्य मिक्स करून एक फेसपॅक तयार करा. मिश्रण एकसमान होईल याची काळजी घ्या. हा फेसपॅक चेहऱ्यावर एकसमान लावून घ्या. वीस मिनीटांनी फेसपॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. 

ADVERTISEMENT

गाजराचा फेसपॅक प्रकार 2

दोन चमचे गाजराचा रस, एक चमचा काकडीचा रस आणि काही थेंब ग्लिसरीन घ्या. सर्व मिश्रण एकत्र करा आणि फेसपॅक तयार करा. या फेसपॅकमुळे तुमच्या कोरड्या त्वचेचं चांगलं रक्षण होईल. त्वचेतील कोरडेपणा जाऊन त्वचा मऊ  आणि मुलायम होईल. हिवाळ्यासाठी हा फेसपॅक अगदी बेस्ट आहे. 

गाजराचा फेसपॅक प्रकार 3

एका गाजराचा  कीस, एक उकडलेला बटाटा आणि एक चमचा ओटमील घ्या. ते एकत्र करून त्याचा एक फेसपॅक तयार करा. मिश्रण एकजीव करून घ्या. चेहरा आणि मानेवर हे मिश्रण एकसमान लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. ज्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ करा. चेहरा कोमट पाण्याने धुवा. 

गाजराचा फेसपॅक प्रकार 3 –

दोन चमचे गाजराचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर एकसमान लावा. वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा यामुळे कमी होतात. चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स, सुरकुत्या  कमी करण्यासाठी हा एक बेस्ट फेसपॅक आहे. 

ADVERTISEMENT

shutterstock

गाजराचा वापर केल्यामुळे होतील हे फायदे –

  • गाजराच्या वापर चेहऱ्यावर केल्यामुळे तुमच्या त्चचेतील काळे डाग, चट्टे कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसतो.
  • गाजराच्या रसामुळे त्वचेवरील डेडस्कीन निघून जाते. ज्यामुळे त्वचा फ्रेश आणि उजळ दिसू लागते.
  • चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जातं. ज्यामुळे तेलकट त्वचेच्या लोकांसाठी हा एक उत्तम उपाय आहे.
  • त्वचेवरील धुळ, माती, जंतू निघून जातात आणि त्वचा  निर्जंतूक झाल्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा त्रास कमी होतो. 
  • त्वचा हायड्रेट होते ज्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम राहतो आणि तुमची त्वचा अधिक तरूण दिसते.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

चांगल्या डिओड्रंटच्या शोधात,मग हे डिओड्रंट आहेत तुमच्यासाठी बेस्ट

सणासुदीसाठी असे करा झटपट फेशियल आणि मिळवा ग्लो

सणासुदीला मिळवायचा असेल चमकदार चेहरा तर करा वाफेचा उपयोग

ADVERTISEMENT

 

29 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT