स्ट्रेटनिंग करण्याची हौस अनेकांना असते. इतरांचे सरळ केस पाहिले की, आपले केस स्ट्रेट करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग काय लगेचच केस स्ट्रेट करण्यासाठी सलून गाठलं जातं. केस स्ट्रेट केल्यानंतर मात्र जर त्याचा त्रास होऊ लागला की, मात्र महिलांना यावर काय उपचार करावा असा प्रश्न पडतो.तुम्हीही केस स्ट्रेट करुन झाला असाल आणि तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही काय करायला हवे ते माहीत करुन घेऊ.
कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस
केसांवर प्रयोग करु नका
shutterstock
महिलांसाठी केस हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. केस स्ट्रेट करताना त्यावर उष्णतेचा प्रयोग करण्यात येतो. तुम्हाला जर केसगळतीचा त्रास सुरु झाला असेल तर तुम्ही तुमच्या केसांना कोणत्याही प्रकारे मशीन लावू नका. हेअर ड्रायर, टाँग किंवा स्ट्रेटरनरचा वापर त्यानंतर टाळा. म्हणजे तुमचे केस गळत असतील किंवा त्यांना फाटे फुटत असतील तर तसे काही होणार नाही.
केमिकल्स नको
तुम्ही केसांचे स्मुथिंग किंवा स्ट्रेटनिंग केले असेल तर तुम्हाला माहीत असेलच ते करताना तुम्ही किती केमिकल्स लावण्यात आले ते. तुम्हाला जर पुन्हा केमिकल्सचा त्रास नको असेल तर केसांवर कोणतेही केमिकल्स लावू नका. शॅम्पू किंवा कंडीशनर निवडताना तो माईल्ड आहे की नाही तपासणी करुन घ्या.
तेलाची मालिश
shutterstock
कोणत्याही प्रकारची मालिश तुमच्या नसा रिलॅक्स करण्याचे काम करत असते. त्यामुळे जर तुम्ही केसाला दर आठवड्याला तेलाने मालिश केली तर तुमच्या नसा रिलॅक्स होतील. केसांच्या वाढीला त्यामुळे प्रेरणा मिळेल. तुमच्या केसांची छिद्र मोकळी होतील. त्यामुळे केसांच्या वाढीसंदर्भातील तक्रारी दूर होतील.
सतत शँम्पू टाळा
स्ट्रेटनिंग किंवा स्मुथिंग केल्यानंतर तुम्हाला एक ठराविक शँम्पू आणि कंडिशनर दिला जातो. पण त्याचा सतत वापर करणे चांगले नाही. जर तुम्ही त्याचा सतत वापर केला तर तुमचे केस त्यामुळे अधिक कोरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत शँम्पू टाळा. शक्य असल्यास माईल्ड शँम्पूची निवड करा.
केसांवरुन गरम पाण्याची आंघोळ घातक
shutterstock
काहींना कडकडीत गरम पाण्याची आंघोळ करण्याची सवय असते. पण ही सवय तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. विशेषत: तुमच्या ट्रिटमेंटेड केसांच्या आरोग्यासाठी तर ती मुळीच चांगली नाही. त्यामुळे तुमचे केस अधिक कोरडे होतात. त्यामुळे केसांवरुन फार तर कोमट पाण्याची आंघोळ करा.
हेअर स्ट्रेटनिंग करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी
- स्वस्तात स्ट्रेटनिंग करुन मिळत आहे म्हणून कुठेही स्ट्रेटनिंग करु नका. विशेषत: ब्युटी पार्लरमध्ये अनेकदा प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना हे काम दिले जाते. पण त्यांना त्याचे योग्य ज्ञान नसते.
- तुमच्या केसांसाठी कोणते क्रिम योग्य आहे त्यामध्ये केमिकल्सचे प्रमाण किती आहे ते जाणून घ्या.
- प्रोडक्टवरील एक्सपायरी डेट, त्याचे प्रमाण ते कितीवेळ केसांवर ठेवणार याची योग्य माहिती करुन घ्या.
- हेअर स्ट्रेटनिंगसाठी वापरली जाणारी मशीन त्याची हिट किती आहे ते पाहून घ्या.
- स्ट्रेटनिंग केल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यायची ते देखील जाणून घ्या.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.