ADVERTISEMENT
home / Mental Health
हॉर्मोन्सचे’मूड स्विंग्सचा’ ला कसं नियंत्रणात आणाल (How To Control Mood Swings In Marathi)

हॉर्मोन्सचे’मूड स्विंग्सचा’ ला कसं नियंत्रणात आणाल (How To Control Mood Swings In Marathi)

कधीकधी तुम्ही अतिशय आनंदी असता मात्र अचानक तुमचा मूड बदलतो आणि तुमची चिडचिड होऊ लागते. खरंतर अचानक असा भावनिक उद्रेक अथवा मूड बदलण्यामागे कोणतीच घटना कारणीभूत नसते. मात्र तुमच्या शरीरात होणारे बदलच यासाठी कारणीभूत असू शकतात. आजकाल अचानक मूड स्विंगचा त्रास जाणवत असतो. ताणतणाव आणि शरीरात होणाऱ्या बदलांमुळे तुमच्या मूडमध्ये बदल होत असतो. यासाठीच मूड स्विंगची कारणं जरूर जाणून घ्या. वास्तविक मूड स्विंग ही एक नैसर्गिक गोष्ट असून तुम्ही या गोष्टीला कसं हाताळता यावर तुमचं आरोग्य अवलबूंन असतं. 

Shatterstock

ADVERTISEMENT

मूड स्विंगमागची काही कारणे (Causes Mood Swings)

मूड स्विंग होण्यामागे अनेक कारणे कारणीभूत असू शकतात. कधीकधी मूड स्विंग होणं हे स्वाभाविक असू शकतं तर कधी कधी यामागे तुमची मानसिक अवस्थादेखील कारणीभूत असू शकते.यासाठी मूड स्विंग नेमका कशामुळे होऊ शकतो हे अवश्य पाहा. 

ताण- तणाव (Stress)

आजकाल कामाचा वाढता  ताण-तणाव तुमच्या मानसिक स्वास्थासाठी हानिकारक ठरू शकतो. जेव्हा तुम्ही मानसिक ताणात असता ज्यामुळे तुमच्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्सची निर्मिती होते. याचा परिणाम नकळत तुमच्या शारीरिक स्वास्थावर होऊ लागतो. ताणामुळे तुमच्या श्वास, ह्रदयाचे ठोके आणि मेंदूच्या कार्यात बदल होतात. कधीकधी कामाचा ताण  हा सहन करण्यासारखा असतो मात्र कधी कधी ताण अधिकच वाढला तर त्यामुळे तुमच्या मनावर याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या भावनिक पातळीत पटकन बदल होतात आणि तुमची चिडचिड होते. 

हॉर्मोनल असतुंलन (Hormonal Imbalances)

आजकाल अनेक महिलांना हॉर्मोन्स असंतुलनची समस्या दिसून येते. निरोगी आरोग्यासाठी होर्मोन्स नियंत्रित राहणे फार गरजेचे आहे. हॉर्मोन्सचे असंतुलन ही एक सायलेंट किलर समस्या आहे. कारण याचे परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर जाणवू लागतात. महिलांमध्ये या समस्येची अनेक लक्षणे दिसून येतात. मूड स्विंग, चिडचिडा स्वभाव, चेहऱ्यावर केस येणं, पिंपल्स येणं, अंग दुखणं, काम करण्याचा कंटाळा येणं, आळस येणं, दिवसभर निराश वाटणं, सेक्सची इच्छा नसणं ही या समस्येची लक्षणे असू शकता. वास्तविक महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्यांना हॉर्मोन्समधील बदलांना सामोरं जावंच लागतं. 

हॉर्मोनल असंतुलनाची लक्षणे, कारणे आणि उपाय (Hormonal Imbalance In marathi)

ADVERTISEMENT

Shatterstock

पौगंडावस्था (Puberty)

प्रत्येकाच्या आयुष्यात ही अवस्था येतेच. बालपण संपून किशोरवय सुरू होताना मुले आणि मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या अकराव्या वर्षांपासून मुलामुलींमध्ये हे बदल होण्यास सुरूवात होते. वयाच्या अठराव्या ते एकोणीस वर्षापर्यंत हे बदल होत असतात.  याच काळात मुलींना मासिक पाळी सुरू होते. मुलामुलींच्या शरीरात आणि आवाजात बदल होतात. शरीरात होणारे या बदलांसोबतच मनात होणारे भावनिक बदलदेखील या काळात मुलांना समजून घ्यावे लागतात. या अवस्थेमुळे मूड स्विंगला सामोरं जावं लागतं. 

गरोदरपण (Pregnancy)

स्त्रीच्या आयुष्यात येणारी गरोदरपण ही एक महत्त्वाची आणि आव्हानात्मक अवस्था आहे. नऊ महिने गर्भात बाळाची वाढ करताना शरीरात अनेक बदल होतात. गर्भारपणात पहिली तिमाही, दुसरी तिमाही आणि तिसरी तिमाही असे महत्त्वाचे तीन टप्पे असतात. गर्भधारणा झाल्यापासून ते अगदी बाळंतपणापर्यंत शरीरात होणाऱ्या या बदलांचा परिणाम तुमच्या मनावरही होत असतो ज्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीतही बदल होत असतात. याचाच एक परिणाम म्हणजे तुमचे होणारे मूड स्विंग. ज्यामुळे तुम्हाला  अगदी क्षणात आनंदी आणि क्षणात निराश वाटतं. 

ADVERTISEMENT

Shatterstock

मॅनोपॉज (Menopause)

स्त्रीच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्यावर अनेक बदल होत असतात. त्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मॅनोपॉज. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना अनेक लक्षणांना सामोरं जावं लागतं. ज्यात स्त्रीच्या मानसिक पातळीत काही बदल होतात. मूड स्विंग हादेखील त्याचाच एक भाग आहे. शरीरातील हॉर्मोन्सच्या पातळीत होणाऱ्या बदलांचा परिणाम तुमच्या मनावर होतो. 

मासिक पाळीबाबत आजार (Menstrual Disorders)

मासिक पाळीमुळे महिलांच्या शरीरात दर महिन्यात जे बदल होतात. त्यामुळेदेखील तुमच्या मनावर परिणाम होत असतो. काही जणींना मासिक पाळी येण्याआधी पोटात दुखणं, क्रॅंम्प येणं, थकवा, भूक न लागणं, डिप्रेशन, मूड स्विंग अशी लक्षणे जाणवतात. कधी कधी मासिक पाळीसंबधित आजारांमुळेदेखील तुमच्या मानसिक अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

मानसिक अवस्था (Psychiatric causes)

जर तुमची मानसिक अवस्था ठिक नसेल तर याचा परिणाम तुमच्या वागण्याबोलण्यावर नक्कीच होतो. बऱ्याचदा घरातील ताणतणाव अथवा इतर कोणत्याही कारणामुळे तुमचे मानसिक स्वास्थ बिघडले तर ही लक्षणे जाणवू शकतात. 

चिंता-काळजी (Anxiety)

काही लोकांना विनाकारण  एखाद्या गोष्टीची काळजी अथवा चिंता करण्याची सवय असते. गरज नसलेल्या गोष्टींचा अती विचार करणे, दिवसभर निगेटिव्ह चिंतन करणे यामुळे तुमच्या मनात सतत एक अज्ञात भिती निर्माण होते. तुमच्या मानसिक अवस्थेचा परिणाम नकळत तुमच्या शरीरावर होत असतो. ज्यामुळे तुम्हाला मूड स्विंगला सामोरं जावं लागू शकतं. क्षणात तुम्ही आनंदी असता मात्र चिंतेचे विचार मनात आल्यामुळे तुमचं मन दुःखी होतं.

मूड स्विंगचा त्रास कमी करण्यासाठी उपाय (How to treat mood swings)

मूड स्विंग हा तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे होणारा एक त्रास आहे. तुम्ही वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीत काही बदल करून मूड स्विंग कमी करू शकता. यासाठी खालील हे उपाय नक्की करा. 

ADVERTISEMENT

तुमच्या मानसिक भावनांचे नियोजन करा (Track Your Mood)

जर तुम्हाला सतत मूड स्विंगचा त्रास होत असेल तर यातून लवकर बाहेर पडणं गरजेचं  आहे. कारण या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं. यासाठी तुमच्या भावनांचा विचार करा. तुमचा मूड नेमका कोणत्या गोष्टींमुळे खराब होतो आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी  करायला आवडतं याचा विचार करा. ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटतात शक्य असल्यास त्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला मूड स्विंगचा त्रास कमी करणे शक्य होईल. 

नियमित हेल्थ चेकअप करा (Regular health check-Up)

वाढते वय, आजारपण, हॉर्मोनल बदल, महिलांच्या शरीरात वयाच्या विविध टप्प्यावर होणारे बदल या सर्वांचा मूड स्विंगशी संबंध असू शकतो. यासाठी वयाच्या तीस वर्षांनंतर वर्षातून एकदा नियमित हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या आरोग्य आणि मानसिक स्वास्थाविषयी तुम्हाला वेळीच माहिती मिळू शकते. जर वेळीच आजारपण लक्षात आलं तर त्यावर उपचार करणं सोपं जातं. शिवाय नंतर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. 

Shatterstock

ADVERTISEMENT

उत्तेजकं घेणं टाळा (Avoid Stimulants)

कामाचा ताण अथवा चिंता काळजी दूर  करण्यासाठी अनेकांना उत्तेजक पेय घेण्याची सवय असते. चहा, कॉफी, कॅफेनयुक्त पेय अथवा मद्यपान या सर्वांचा यामध्ये समावेश असू शकतो. मात्र वारंवार अशा पेयांचा  आधार घेणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. जर तुम्ही देखील फ्रेश होण्यासाठी अशा पेयांचा आधार घेत असाल तर वेळीच सावध व्हा आणि त्यापासून दूर राहा. 

आहारात योग्य बदल करा (Change your diet)

शरीरातील हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे. यासाठी सेंद्रिय धान्य, फळे, ताज्या भाज्या यांचा आहारात समावेश करा. आहारातून मीठ आणि साखर कमी करा. जेवणात वरून मीठ टाकल्यामुळे अथवा चिप्स अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ अतीप्रमाणात खाल्यामुळे शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो. आहारात व्हिटॅमिन Ca,B12, D3 या सप्लीमेंटचे प्रमाण वाढवा.

स्ट्रेस मॅनेजमेंट (Stress management)

ऑफिस आणि घरातील कामाचा ताण यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही. सतत काम केल्यामुळे कुटुंबियांना वेळ देता येत नाही. ज्यामुळे नातेसंबध दुरावले जातात. निरोगी आणि आनंदी जीवनसाठी घर आणि कामाच्या ताणाचे योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.  असे न केल्यास त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. यासाठी कामाच्या वेळेत ऑफिसचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ऑफिसचे काम घरी न नेता घरी असताना घरातील कामे आणि कुटुंबिय यांना पुरेसा वेळ द्या. ज्यामुळे तुमच्या जीवनातील कामाचा समतोल राहील. अधिक कामाचा ताण न आल्यामुळे तुमचे मन आणि मेंदू स्वस्थ राहील. घर आणि ऑफिसप्रमाणेच सामाजिक कार्यात सहभाग घ्या. ज्यामुळे तुमचा मूड स्विंगचा त्रास आपोआप कमी होईल. 

पुरेशी झोप (Better sleep)

कामाचा ताण आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे सर्वांच्या संपूर्ण जीवनशैलीतच सध्या बदल झाला आहे. रात्री उशीरापर्यंत काम करणं, सतत कंप्युटरवर काम करणं यामुळे  पुरेशी झोप मिळत नाही. निरोगी आरोग्यासाठी कमीतकमी रात्री आठ तास झोप घेणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर त्याचा विपरित परिणाम तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीवर होतो. सहाजिकच त्यामुळे तुम्हाला मूड स्विंगचा त्रास होऊ शकतो. यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ तासांची पूरेशी झोप घेणं गरजेचं आहे. 

ADVERTISEMENT

नियमित व्यायाम करा (Regular exercise)

शरीराला पुरेशा आहार आणि झोपेसोबत योग्य शारीरिक हालचालीची गरज असते. जर तुमची जीवनशैली बैठी असेल तर त्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. यासाठी निरोगी राहण्यासाठी आणि  मूड स्विंगचा त्रास नैसर्गिक पद्धतीने कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही यासाठी आठवडाभरात चालणे, धावणे, सायकला चालवणे आणि इतर काही व्यायाम करू शकता. दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम शरीराराठी गरजेचा आहे.  

योगासने आणि ध्यानधारणा (Yaga and meditation)

नियमित योगासने  आणि मेडिटेशन तुमच्या निरोगी जीवनासाठी फार महत्त्वाचे आहे. कारण योगासने आणि मेडिटेशनमुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ सुधारते. दिवसभर फ्रेश वाटतं. कामाचा ताण आणि चिंतेला तोंड देण्यासाठी तुम्ही तयार होता. ज्यामुळे तुमचा मूड स्विंगचा त्रास कमी होतो.

थोड्या थोड्यावेळाने खा आणि दिवसभर पाणी प्या (Eat Frequently and Drink more Water)

एकाचवेळी भरपूर खाणं आणि दिवसभर उपाशी राहणं ही जीवनशैली सध्या मोठ्या प्रमाणावर आचरणात आणली जात आहे. दिवसभर कामातून खाण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून बऱ्याचदा एकाच वेळी भरपूर अन्न खाल्लं जातं. मात्र असं केल्यामुळे त्याचा विपरित परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. यासाठी दिवसभरात थोड्या थोड्यावेळाने थोडंसं काहीतरी खा आणि सतत पाणी प्या ज्यामुळे तुम्ही हायड्रेट राहाल.

स्वतःची काळजी घ्या (Regular Self-Care)

महिला बऱ्याचदा कुटुंबातील लोकांची काळजी घेता  घेता स्वतःकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष करतात. तुमचे तुमच्या कुटुंब आणि मुलांवर कितीही प्रेम असलं तरी त्यांची काळजी घेण्यासाठी तरी तुम्ही निरोगी आणि आनंदी असायला हवं. यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तुमच्या आवडीनिवडी जपा ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. कामाचा ताण वाढत असेल तर कामे  घरातील लोकांसोबत वाटून घ्या ज्यामुळे तुम्हाला मूड स्विंगपासून नक्कीच आराम मिळेल. 

ADVERTISEMENT

मूड स्विंगबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न – FAQs

मूड स्वींगचा त्रास फक्त महिलांनाच होतो का ?

मूड स्विंग हा फक्त महिलांनाच होणारा त्रास मुळीच नाही. कारण वर दिल्याप्रमाणे मूड स्विंगची कारणे निरनिराळी असू शकतात. मात्र जगभरात सध्या महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येत आहे. 

मूड स्विंग कोणत्या महिलांनामध्ये जास्त प्रमाणात जाणवतं ?

मूड स्विंगचा सबंध हॉर्मोनल असतुंलनाशी असतो. ज्यामुळे मासिक पाळीच्या काळात, मॅनोपॉजच्या काळात, गरोदरपण आणि बाळंतपणानंतर महिलांना मूड स्विंगचा त्रास जाणवू शकतो.

मूड स्वींगपासून मुक्ती मिळणं शक्य आहे का ?

वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही मूड स्विंगपासून आराम नक्कीच मिळवू शकता.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

Hormonal Imbalance : महिलांमधील हॉर्मोन्स असंतुलनाची कारणे

ADVERTISEMENT

सुदृढ शरीरप्रकृतीसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स

मानसिक आजार म्हणजे काय आणि त्याचे काय आहेत प्रकार

 

09 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT