काजोलंच पुस्तकांवरील प्रेम तर सर्वांना माहीतच असेल. बऱ्याचदा सेटवर ती पुस्तक वाचताना दिसत असते. पण काजोल लेखिका झाली आहे हे तुम्हाला माहीत आहे का? काजोलने नुकतंच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. ज्यामध्ये तिने तिचं श्रीदेवीच्याबाबत असलेलं तिचं मनोगत व्यक्त केलं आहे. लवकरच श्रीदेवींच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी : दी इर्टनल स्क्रीन गॉडेस’ हे आत्मचरित्र प्रदर्शित होणार आहे. या आत्मचरित्रासाठी काजोलने प्रस्तावना लिहिली आहे.
पुस्तकवेडी काजोल झाली लेखिका
दिवसेंदिवस लोकांचं पुस्तकांचं वाचन कमी होत चाललं असलं तरी एक अभिनेत्री मात्र नेहमी पुस्तकांमध्ये गुंतलेली दिसून येते. काजोलला लहानपणापासूनच पुस्तक वाचनाचं वेड आहे. तिच्या घरी तिचं स्वतःच्या पुस्तकांचं संग्रहालय आहे. आता श्रीदेवीच्या बायोग्राफीसाठी प्रस्तावना लिहिल्यामुळे काजोलकडून लेखनाची अपेक्षादेखील वाढू लागली आहे. कदाचित भविष्यात ती लेखनाचा विचार नक्कीच करू शकते.
श्रीदेवीच्या बायोग्राफी लवकरच प्रदर्शित
श्रीदेवीच्या या बायोग्राफीचे लेखक सत्यार्थ नायक आहेत. श्रीदेवीच्या बायोग्राफीसाठी दिग्दर्शक बोनी कपूर यांनी परवानगी दिलेली आहे. सत्यार्थ नायक यांच्या मते काजोल या प्रस्तावनेसाठी एक उत्तम अभिनेत्री आहे. कारण तिने श्रीदेवीचा काळ जवळून पाहिलेला आहे. फिल्म इंडस्ट्रीशी पूर्वीपासून जोडलेली असल्यामुळे तिला श्रीदेवींच्या स्टारडमबाबत नक्कीच माहीत होतं. शिवाय तिला श्रीदेवी फार आवडत होती. त्यामुळे तिने तिच्या या भावना तिच्या प्रस्तावनेतून मुक्तपणे मांडलेल्या आहेत. काजोल लहानपणापासून श्रीदेवीची मोठी फॅन आहे. त्यामुळे या बायोग्राफीसाठी प्रस्तावना लिहिणं काजोलसाठी एका सन्मानाप्रमाणेच होतं असं तिचं म्हणणं आहे. लवकरच हे आत्मचरित्र सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. शिवाय या आत्मचरित्राला बोनी कपूर यांची परवानगी मिळाल्यामुळे चाहते या आत्मचरित्राची वाट पाहत आहेत.
श्रीदेवींच्या जीवनावर आधारित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
या आधी ‘श्रीदेवी बंगलो’ हा चित्रपटदेखील श्रीदेवीच्या जीवनावर आधारित करण्यात येणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझरमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला.या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे बोनी कपूर चिडले होते. ज्यामुळे त्यांनी सिनेमाच्या निर्मात्याला नोटीस पाठवली आहे. सोशल मीडिया सेन्सेशन झालेली प्रिया वारियर या सिनेमात मुख्य भूमिका करणार होती. आता बोनी कपूर यांच्या नोटीसनंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्रीदेवीच्या अकाली जाण्याने तिच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला होता. श्रीदेवीचा मृत्यू नेमका कसा झाला असावा? याचे समाधानकारक उत्तर अजूनही अनेकांना मिळालेले नाही. पण आता या धक्क्यातून सावरत श्रीदेवीचे फॅन्स तिच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियातून उजाळा देत असतात. शिवाय आता तिची बायोग्राफी लवकरच प्रदर्शित होत असल्यामुळे ही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी नक्कीच आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
अबब! हुबेहूब शाहरुख खान…सोशल मीडियावर या शाहरुखची चर्चा
‘ड्रीम गर्ल’ नंतर आयुषमान खुराणा घेतोय चित्रपटांपासून ‘ब्रेक’
फूड डिलीव्हरी करणारा विशाल ठरला ‘डान्स दिवाने 2’ चा विजेता