मित्रमंडळी एकत्र आल्यावर गप्पा, मौजमस्ती, दंगा आणि मनोरंजनासाठी गेम्स हा प्लॅन तर असतोच. समजा तुम्ही एखाद्या विकऐंला मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला गेला आहात अथवा घरातच नाईट आऊटचा प्लॅन असेल तर मनोरंजनासाठी काय काय करावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो. अशा वेळी Dumb charades खेळ तुमच्या कधीही नक्कीच उपयोगी पडू शकतो. कारण हा खेळ तुम्ही अगदी लहानपणापासून खेळत आलेला आहात आणि या खेळामुळे तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं बालपण जगता येईल. शिवाय या खेळामुळे तुमचं मनोरंजन क्षेत्रातील ज्ञान आणि माणसांचे हावभाव यांचा अभ्यासही वाढेल. या खेळात तुम्हाला हावभाव आणि हाताच्या मुद्रांच्या मदतीने तुमच्या टीमला चित्रपटाचे नाव ओळखण्यास सांगायचं असतं. अशावेळी हावभाव करताना आणि ते नाव ओळखताना तुमच्या सर्वांचं मनोरंजन होतं आणि वेळ मस्त मजेत जातो. यासाठी आम्ही तुम्हाला डम शराज खेळण्यासाठी काही मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांची यादी देत आहोत. ज्या लिस्टचा तुम्हाला यासाठी नक्कीच काही फायदा होईल.
मराठीत असे अनेक चित्रपट आहेत. ज्यांची नावं तुम्हाला डमशराज खेळात ओळखणं नक्कीच कठीण जाऊ शकतं.
सैराट हा नागराज मंजुळे दिग्दर्शित एक लोकप्रिय चित्रपट आहे. ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे कलाकार जगासमोर आले. हा चित्रपट तुम्ही Dumb Charades साठी निवडू शकता कारण त्याची अॅक्टिंग करणं थोडंस मजेशीर होऊ शकतं. शिवाय जर एखाद्या टीमला ते नाही करता आलं तर उपस्थित लोकांचं मस्त मनोरंजन होईल.
रितेश देशमुख आणि जेनेलियाची निर्मिती असलेला माऊली चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील संवाद आणि गाणी यामुळे चित्रपट प्रचंड गाजला होतात. तुम्ही Dumb Charades साठी या चित्रपटाची निवड कराल तर समोरच्याला तुम्हाला पटकन तो समजणं थोडंसं कठीण जाईल. कारण कदाचित जर तुम्ही माऊलीचे हावभाव करण्यासाठी आई अथवा विठ्ठलाचा अभिनय केला तर त्यातून पटकन याचा अर्थ माऊली आहे असा निघणं थोडं कठीण आहे.
सैराट चित्रपटानंतर मिळालेल्या यशानंतर रिंकू राजगुरूची लोकप्रियता प्रंचड वाढली. त्यामुळे तिला लगेचच कागर हा चित्रपट मिळाला. या चित्रपटात तिच्यासोबत शुभंकर तावडे, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, भारती पाटील, विठ्ठल काळे असे अनेक कलाकार होते. सैराटच्या मानाने कागरला हवं तसं यश मिळालं नाही. मात्र Dumb Charades खेळण्यासाठी जर तुम्ही हा चित्रपट निवडला तर नावावरून तो अभिनयात समोरच्या व्यक्तीला समजावणं मजेशीर असेल.
काही वर्षांपूर्वी काळुबाईच्या नावानं चांगभलं हा पौराणिक चित्रपट आला होता. ज्यामध्ये अलका कुबल यांची प्रमुख भूमिका होती. काळुबाई या देवीवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाला त्या काळात अभूतपूर्व यश मिळालं होतं. तुम्ही जर हा चित्रपट Dumb Charades साठी निवडला तर मुळातच हे नाव समोरच्याला सांगणं थोडं कठीण आहे. शिवाय चित्रपट जुना असल्याने तो पटकन ओळखता येणार नाही.
फॅन्ड्री आणि सैराजसारखे जबरदस्त चित्रपटांचं दिग्दर्शन केल्यानंतर नागराज मंजुळे यांनी स्वतः निर्माण केलेला चित्रपट म्हणजे नाळ. नाळ चित्रपटातील चैत्या नावाच्या छोट्या मुलाची भूमिका आणि ‘जाऊ दे नं व’ हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. तुम्ही या चित्रपटाची निवड जर Dumb Charades खेळण्यासाठी केली तर ते नाव इतरांना समजावून सांगताना तुमची थोडीशी गंंमत नक्कीच उडेल.
स्वप्नील जोशी आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला फुगे हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपट दोन मित्रांची अनोखी मैत्री दाखवण्यात आली होती. चित्रपट जितका मजेशीर आहे तितकंच या चित्रपटाचं नाव आहे. विनोदाची हवा भरलेला हा फुगा जर तुम्ही तुमच्या या खेळासाठी वापरला तर याचा अंदाज बांधणं तुमच्या मित्रमंडळींना नक्कीच कठीण जाईल.
गश्मीर महाजनी आणि कश्मिरा कुलकर्णी यांचा रोमॅंटिक चित्रपट कॅरी ऑन मराठा तुम्ही या खेळासाठी नक्कीच निवडू शकता. हे नाव अर्धे इंग्रजी आणि अर्धे मराठी आहे. शिवाय हे शीर्षक अभिनयातून समजावणं थोडंसं कठीण असल्यामुळे तुम्ही या चित्रपटाच्या नावामुळे गेममध्ये थोडीशी मजा नक्कीच करू शकता.
स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका मितवा या चित्रपटात होत्या. 2015 साली प्रदर्शित करण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. अनेकांना या चित्रपटाचं पूर्ण नाव नक्कीच माहीत असेल. मितवा, मित्र...तत्त्वज्ञ...वाटाड्या अशी या चित्रपटाची व्याख्या सांगायला अनेकांना नक्कीच कठीण जाऊ शकतं.
टाईमपास चित्रपट मराठीतील एक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या भागात प्रथमेश परब, केतकी माटेगावकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर दुसऱ्या भागात प्रियदर्शन जाधव, प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. Dumb Charades खेळासाठी या चित्रपटाचं नाव समजणं जरी सोपं असलं तरी यासाठी अभिनय करणं नक्कीच मजेशीर असेल.
नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅंन्ड्री चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. या चित्रपटासाठी नागराजने एका वास्तववादी विषयाची निवड केली होती. या चित्रपटातील तुझ्या पिरतीची इंचू मला चावला हे गाणं प्रचंड गाजलं होतं. नाव अभिनयातून मांडणं थोडं कठीण असल्यामुळे तुम्ही या खेळासाठी या चित्रपटाचील निवड नक्कीच करू शकता.
दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांचा मोगरा फुलला चित्रपट 2018 प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा ह्रदयस्पर्शी होती. स्वप्निल जोशी, नीना कुलकर्णी, सई देवधर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची निवड जर तुम्ही या खेळासाठी केली तर अभिनय करून तो इतरांना सांगणं तुम्हाला सोपं जाईल.
विक्रम फडणीस स्माईल प्लीज चित्रपटात ललित प्रभाकर आणि मुक्ता बर्वे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचे कथानक डिमेन्शिया या आजारावर आधारित होते. या चित्रपटाला भावनिक आणि वास्तववादी अशी दुहेरी किनार होती. या चित्रपटाचा शेवट हळवा आणि सुखद असा होता. चित्रपटाच्या नावावरून तुम्हाला हे नाव ओळखण्यासाठी थोडासा अभिनय करता येईल.
प्रविण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न या चित्रपटातूनदेखील वास्तवावादाचे दर्शन करण्यात आले होते. पुण्यातील गुन्हेगारी आणि विकासाच्या नावाखाली हातातून निसटत जाणारी शेतकऱ्याची जमिन या विषयीचे वास्तव यात दाखवण्यात आलं होतं. चित्रपटाचं कथानक जरी वास्तववादी असलं तरी तुम्हाला Dumb Charades खेळताना हा चित्रपट ओळखणं थोडं कठीण नक्कीच आहे. त्यामुळे नेमकी काय मजा येते हे पाहण्यासाठी हे नाव तुम्ही नक्कीच निवडू शकता.
लय भारीमधून बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखचा मराठी अभिनय प्रेक्षकांना पाहता आला. या चित्रपटाची गाणी, संवाद लोकांच्या अगदी तोंडपाठ झाले आहेत. अगदी लहान लहान मुलं ही आजकाल “आपला हात भारी, आपली लाथ भारी… च्या मायला आपलं सर्वच लय भारी” असं म्हणतात. विषेश म्हणजे या चित्रपटात रितेशची पत्नी जेनेलिया आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांच्यादेखील प्रमुख भूमिका होत्या. लयभारी तुम्ही इतरांना नेमकं कसं पटवून द्याल हे पाहण्यासाठी Dumb Charades खेळासाठी हा चित्रपट जरूर निवडा.
बकेट लिस्टमधून बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिने मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. ज्यामुळे माधुरीला मराठी चित्रपटात पाहण्याचं चाहत्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. बकेट लिस्ट चित्रपट हा चित्रपट Dumb Charades मध्ये अभिनय स्वरूपात ओळखण्यासाठी तुम्हाला नक्कीच थोडी मेहनत करावी लागेल.
खारी बिस्किट हीएका लहान भाऊ-बहीणीची कथा आहे. सप्टेबर 2019 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा म्हणजे या दोन भावंडांचं असाध्य स्वप्न साध्य करण्यासाठी केलेला प्रवास आहे. तुम्ही या चित्रपटाचे नाव तुमच्या या खेळासाठी निवडू शकता. कारण त्यासाठी तुम्हाला खारी बिस्किट अभिनय करून दाखवावं लागेल.
गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते दिग्दर्शित एक तारा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर, तेजस्विनी पंडीत आणि ऊर्मिला निंबाळकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं नाव ओळखणं सोपं आणि कठीण दोन्ही आहे. एक तारा हे एक वाद्य आहे शिवाय आकाशातील चमकणारा एक तारा असाही त्याचा अर्थ होतो.
मराठीत अनेक प्रेमपट झालेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रेमाय नमः हा चित्रपट होय. फक्त ही कथा इतर लव्ह स्टोरीजपेक्षा थोडी वेगळी आहे. देवेंद्र चौगुले आणि रूपाली कृष्णराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. तुम्ही जर या चित्रपटाची निवड तुमच्या या खेळासाठी केली तर उत्तर सोपं असूनही ते समजणं समोरच्या टीमला कठीण जाईल.
हॅपी जर्नी हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेला एक अप्रतिम चित्रपट होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केलं होतं. तर अतुल कुलकर्णी, प्रिया बापट आणि पल्लवी सुभाष यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. बहीण भावाचं प्रेम आणि नातं यातून दाखवण्यात आलं होतं. या खेळासाठी या चित्रपटाचं नाव समोरच्या व्यक्तीला समजवण्यााठी खूप मेहनत आणि अभिनय करावा लागेल. ज्यामुळे सर्वांचं नक्कीच निखळ मनोरंजन होईल.
सतीश राजवाडे निर्मित आणि दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटाने 2017 साली अनेकांना त्यांच्या जुन्या प्रेमाची आठवण करून दिली होती. या चित्रपटात अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, अकुंश चौधरी, तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं नाव मोठं आणि थोडं गमतीशीर असल्यामुळे ते या खेळासाठी अगदी परफेक्ट आहे.
ये रे ये रे पैसा या चित्रपटाचे दोन भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भागही प्रदर्शित होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही भागांमुळे प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन झालं. या चित्रपटाचं नाव समोरच्या टीमला सांगण्यासाठी मजेशीर आणि मेहनतीचं असं दोन्हीही असू शकतं.
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही एके काळची हीट जोडी आहे. या दोघांना एकत्र पाहणं प्रेक्षकांना फार आवडतं. समीर जोशी दिग्दर्शित या चित्रपटात या दोघांचं लग्न आणि लग्नानंतरचं नवं आयुष्य दाखवण्यात आलं होतं.
नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर या जोडीने धमाल केली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत अशोक सराफ, निवेदिता जोशी, संजय जोग, आशालता बांबगावकर, दया डोंगरे असे प्रमुख कलाकार होते. चित्रपटाचं नाव मजेशीर असल्यामुळे तुम्ही ते या खेळासाठी वापरू शकता.
हरिश्चंद्राची फॅक्टरी चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भारतातील चित्रपट निर्मितीमागचा इतिहास दाखवण्यात आला होता. भारतात पहिल्या चित्रपटाची निर्मिती करणारे दादासाहेब फाळके यांचा जीवनपट अगदी हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीने यात दाखवण्यात आला होता. कठीण नाव असल्यामुळे तुम्हाला या खेळासाठी हे नाव वापरता येईल.
स्वामी पब्लिक लि. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. गजेंद्र अहिर दिग्दर्शित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, विक्रम गोखले यांची प्रमुख भुमिका होती. चित्रपटाचा विषय गहन असला तरी नाव हटके असल्यामुळे तुम्ही या चित्रपटाची निवड या खेळासाठी करू शकता.
तीन बायका फजिती ऐका या चित्रपटाच्या नावातच विनोद भरलेला आहे. या चित्रपटात मराठी विनोदाचे बादशहा मकरंद अनासपुरे, क्रांती रेडकर, निशा परूळेकर यांच्या भूमिका होत्या. मनोरंजन आणि विनोदी वातावरणासाठी तुम्ही या नावाने हा खेळ खेळू शकता.
येड्यांची जत्रा हा आणखी एक विनोदी चित्रपट आहे. अभिनेता भरत जाधव, मोहन जोशी, विनय आपटे अशा दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात विनोद आणि मनोरंजनाचे रंभ भरले होते. तुम्हाला खेळताना या विनोदी नावामुळे नक्कीच धमाल येईल.
मराठीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे सचिन पिळगांवकर यांचं. माझा पती करोडपती या चित्रपटात सचिन आणि सुप्रिया यांची जोडी होती. विषयानुसार चित्रपटही मजेशीर आणि भरपूर मनोरंजन करणारा होता. तुम्ही या खेळासाठी या चित्रपटाचे नाव नक्कीच वापरू शकतो.
सर्व लाईन व्यस्त आहेत या चित्रपटाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केलं. या चित्रपटात सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, संस्कृती बालगुडे, राणी अग्रवाल, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी असे अनेक कलाकार होते.चित्रपटाचं नाव तुमच्या गेमसाठी नक्कीच मजेशीर आहे.
मराठीप्रमाणेच असे अनेक बॉलीवूड चित्रपट आहेत ज्यांची नावे अतिशय मजेशीर आहेत. मजेशीर आणि हटके नावांमुळे तुमच्या खेळातील मौज आणखीन वाढेल.
कुछ कुछ लोचा है या चित्रपटाचं दिग्दर्शन देवांग ढोलकियाने केलं होतं. राम कपूर, इवेलिन शर्मा, सनी लिओन यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचं नाव Dumb Charades मधून ओळखणं नक्कीच कठीण आहे.
व्हि शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली 1971 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संध्या आणि अभिजित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचं नाव अगदी हटके असल्यामुळे ते ओळखणं फार कठीण आहे.
अर्बट पिंटो को गुस्सा क्यू आता है हा चित्रपट 1980 साली सईद अक्तर मिर्झा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात नसरूद्दीन शाह, शबाना आझमी, स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अनेकांना फार आवडला होता. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात एक हटके लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहता आली. चित्रपटाचं नावही अजब असल्यामुळे ते कोणाला पटकन समजणार नाही.
सईद अख्तर मिर्झा यांच्या दिग्दर्शनाखाली अरविंद देसाई की अजीब दास्तां चित्रपट 1987 मध्ये लोकांचा एक लोकप्रिय चित्रपट होता. ज्यामध्ये ओम पुरी, दिलीप धवन, श्रीराम लागू, रोहिणी हट्टगंडी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्ही, वरून शर्मा, बादशाह, अन्नु कपूर यांचा खानदानी शफाखाना हा चित्रपट ऑगस्ट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सेक्स लाईफ आणि त्यावरील आयुर्वेदिक युनानी औषधोपचार यांच्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. नावातील मजेशीरपणामुळे तुम्ही या खेळासाठी हे नाव निवडू शकता.
घर मे राम गली में श्याम हा चित्रपट 1998 साली प्रदर्शित झाला होता. सुभाष सौनिक दिग्दर्शित या चित्रपटात गोविंदा, निलम, अनुपम खेर, जॉनी लिव्हर, सतीश शाह यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
सांड की आंख हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भुमी पेडणेकर, तापसी पन्नु यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. नाव हटके असल्यामुळे तुम्ही ते या गेमसाठी वापरू शकता.
मुझे मेरी बीवीसे बचाओ या चित्रपटात हर्षद वारसी, रेखा, नसरूद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचं दिग्दर्शन हॅरी बावेजा याने केलं होतं. नावावरूनच विनोद निर्माण करण्यासाठी तुम्ही या खेळात त्याचा समावेश करू शकता.
सस्ती दुल्हन मेंहगा दुल्हा हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचे दिग्दर्शन केलं होतं बप्पी सोनी यांनी तर या चित्रपटात मुकेश आनंद, अरूण, बीना बॅनर्जी, सुधीर दळवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
जुही चावलाची प्रमुख भूमिका असलेला मेंहदी बन गई खून हा चित्रपटदेखील तुम्ही या गेमसाठी घेऊ शकता. कारण हे नाव समजावणं नक्कीच कठीण आहे.
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या लग्नानंतर तिने प्रथमच बॉलीवूडमध्ये केलेल दी स्काय इज पिंक चित्रपटाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. फरान अख्तर आणि प्रियंकाचा रोमान्स या चित्रपटात चाहत्यांना पाहता येईल. पण त्या व्यतिरिक्त नावातील वेगळेपणामुळे तुम्ही Dumb Charades खेळताना हे नाव वापरू शकता.
भुपेश्वर त्यागी दिग्दर्शित तू बालब्रम्हचारी मेंदू कन्या कुंवारी या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, श्वेता मेनन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हे नाव थोडं वेगळं आणि हटके असल्यामुळे तुम्ही ते Dumb Charades साठी नक्कीच निवडू शकता.
Dumb Charades खेळण्यासाठी नेहमी हटके नावांचे चित्रपट हवे असतात. अल्लाह मेहरबान तो गधा पहलवान हा हिंदीतील अशाच नावाचा एक चित्रपट आहे. हा चित्रपट कॉमेडी आहे. तुम्ही खेळताना हे नाव समजणं नक्कीच कठीण असतं.
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक हटके आणि मजेशीर नावाचे चित्रपट येत असतात. 2018 साली लव रंजन दिग्दर्शित या कॉमेडी चित्रपटाचं नाव तुमच्या खेळाची मजा आणखीच वाढवेल. या चित्रपटात कार्तिक आर्यन, नुशरत भरूचा आणि सनी सिंह यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अविनाश दास दिग्दर्शित अनारकली ऑफ आराह मध्ये स्वरा भास्करने एका बिहारी डान्सरची भूमिका केली होती. या चित्रपटाचे नाव तुम्ही जर खेळताना समोरच्या टीमला दिल. तर ते सांगणं त्या टीमला नक्कीच कठीण जाईल.
शुभ मंगल सावधान या चित्रपटात आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातून प्रेक्षकांचं छान मनोरंजन झालं होतं. डमशराज खेळताना कठीण कठीण चित्रपटाची नावं सांगितल्यावर समोरच्या टीमला थोडं रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही हा चित्रपट निवडू शकतो.
गॅंग्स ऑफ वासेपूर हे नाव डमशराज खेळताना समोरच्या टीमला अभिनयातून दाखवणं कठीण जाईल. कारण त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून सांगाव्या लागतील. ज्यामुळे तुमच्या खेळाला अतिशय छान रंगत येऊ शकते. हा चित्रपट अनुराग कश्यप दिग्दर्शित आहे.
बोमन इराणी आणि फराह खानच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पाहताना चाहत्यांना नक्कीच मजा आली असेल. या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच त्याचं नावही मजेशीर आहे ज्यामुळे तुम्ही तो डमशराजसाठी घेऊ शकता.
संजय छैल दिग्दर्शित पटेल की पंजाबी शादी हा एक कॉनेडी चित्रपट आला होता. यामध्ये परेश रावल, वीर दास, ऋषी कपूर, पायल घोष यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नावातील वेगळेपणासाठी तुम्ही डमशराज खेळताना याची निवड करू शकता.
लाली की शादी मे लड्डू दिवाना है नाव डमशराज खेळताना ओळखणं नक्कीच कठीण आणि मजेशीर आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष हरिशंकर यांनी केलं होतं. तर या चित्रपटात अक्षरा हसन, विवान शाह, गुरमीत चौधरी, संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
कुकू माथुर की झंड हो गयी या नावाचा एक चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सिद्धार्थ गुप्ता, सिमरन मुंडी, आशिश जुनेजा हे कलाकार होते. एकता कपूर निर्मित या चित्रपटाच्या नावातील मजेशीरपणामुळे तुम्ही तो खेळात नक्कीच निवडू शकता.
या चित्रपटातील शब्द समोरच्या टीमला समजावणं सोपं आणि कठीण दोन्ही आहे. ज्यामुळे तुमच्या खेळातील रस आणखीनच वाढेल. सांस बहु और सेन्सेक्स या चित्रपटात तनुश्री दत्ता, किरण खेर, फारूख शेख यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
आजकालची वाढती महागाई यावर आधरित चित्रपटातून वास्तवचित्र आणि विनोद अशा दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना पाहता आल्या होत्या. या चित्रपटात संजय मिश्रा, प्रगती पांडे, रंजन कब्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नावात असलेल्या मजेशीरपणामुळे तुमच्या डमशराजमध्ये मस्त फन येऊ शकतं.
आयुषमान खुराना, कृती सेनॉन, राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला बरेली की बर्फी चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता. या चित्रपटाचे नावही तुमच्या खेळासाठी नक्कीच वेगळं आहे.
मान गये मुघल ए आझम या कॉमेडी चित्रपटात मल्लिका शेरावत, राहुल बोस, परेश रावल, के के मेनन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे नाव नेहमीपेक्षा थोडं वेगळं असल्याने समजण्यास नक्कीच कठीण आहे.
बचके रहना रे बाबा हा चित्रपट 2005 साली दिग्दर्शित झाला गोता. ज्यामध्ये रेखा, मल्लिका शेरावत, परेश रावल, सतीश शाह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नावात थोडं वेगळेपण असल्यामुळे ते समजण्यास सोपं आणि कठीण असं दोन्ही असू शकतं. सहाजिकच तुम्ही हे नाव तुमच्या डमशराज खेळासाठी घेऊ शकता.
अभिनेता गोंविदाच्या नावावर अनेक कॉमेडी चित्रपट आहेत. त्याच्या हिट चित्रपटांपैकी एक म्हणजे आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या हा चित्रपट आहे. तुम्ही डमशराज खेळताना या चित्रपटाचं नाव सांगितलं तर तुमच्या खेळातील मजा नक्कीच वाढेल.
संजय दत्तच्या मुन्नाभाई एम.बी.बी.एस या चित्रपटाने एके काळी अनेक तरूणांना वेड लावलं होतं. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटाचं नाव ओळखण्यासाठी समोरच्या टीमला संजय दत्त जसा चालतो तसा चालण्याचा अभिनय करावा लागेल. ज्यामुळे तुमच्या खेळातील मजा नक्कीच वाढेल.
शाहिद कपूर, श्रद्धा कपूर, यामी गौतमी, दिव्येन्दु शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन झालं होतं. या चित्रपटाच्या नावातच विनोद असल्यामुळे तुमचा खेळ अधिक रंगतदार होईल.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
देशभक्ती पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी पाहा हे चित्रपट
ही Remix गाणी एकेकाळी होती फारच प्रसिद्ध, तुम्हाला ही गाणी आठवतात का