ADVERTISEMENT
home / मनोरंजन
जागतिक हास्य दिन साजरा करा हे मराठी विनोदी चित्रपट पाहून (Marathi Comedy Movies List)

जागतिक हास्य दिन साजरा करा हे मराठी विनोदी चित्रपट पाहून (Marathi Comedy Movies List)

हसणं ही एक निसर्गाने माणसाला दिलेली देणगी आहे. मनापासून आणि खळखळून हसणं हा कोणतंही दुःख दूर करण्याचा एक रामबाण उपाय आहे. हसण्यासाठी खरं तर कोणत्याही दिवसाचं बंधन असू शकत नाही. ‘3 मे’ हा दिवस जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. जो कोणत्याही क्षणी अगदी पोटधरून हसू शकतो तो जीवनात सदैव सुखी आणि समाधानी असतो. स्वतः हसणं कितीही सोपं असलं तरी इतरांना हसवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. त्यासाठी माणसाकडे विनोदी शैली आणि संवेदनशीलता असावी लागते. जगभरात लोकांना असं खळखळून हसवणारे अनेक कलाकार आहेत. मात्र मराठी चित्रपटसृष्टीला दिग्गज विनोदी कलाकारांचे वरदानच लाभलेले आहेत. यासाठी  यंदाचा हास्यदिन साजरा करा हे मराठी विनोदी चित्रपट पाहून. मराठी कॉमेडी चित्रपट आणि त्यातील विनोद यांची बातच काही न्यारी आहे. मराठीत असे अनेक चित्रपट आहेत जे तुम्ही आजही कितीही वेळा पुन्हा पुन्हा पाहू शकता. यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही मराठी कॉमेडी चित्रपटांची यादी शेअर करत आहोत. 

अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi)

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तुम्ही अगदी कितीही वेळा पाहू शकता. हा चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात चार नायकांची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. ज्यामध्ये घरमालकाने घराबाहेर काढल्यानंतर या नायकांना घर भाड्याने मिळवण्यासाठी काय काय उपद्व्याप करावे लागतात हे दाखवण्यात आलेले आहेत.  या चित्रपटातील कलाकार, विनोदी घटना आणि त्यात गुंफलेली सुंदर गाणी अशी सुंदर मेजवानी तुम्हाला मिळू शकते. चित्रपटात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, निवेदिता जोशी, प्रिया अरूण, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर आणि सुधीर जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मराठी विनोदी चित्रपटांमधील हा चित्रपट एक अनमोल रत्न आहे.

वाचा – बेस्ट मराठी चित्रपट 

ADVERTISEMENT

अशी ही बनवाबनवी - Ashi Hi Banwa Banwi

Instagram

धडाकेबाज (Dhadakebaaz)

मराठी चित्रपटसृष्टीला महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने अनेक अफलातून चित्रपट दिलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे धडाकेबाज हा चित्रपट. या चित्रपटात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, दीपक शिर्के, प्राजक्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विनोदाचा भांडार असलेला हा चित्रपट आजही अनेकांना विसरणं मुळीच शक्य ना

ADVERTISEMENT

झपाटलेला (Zapatlela)

विनोदी चित्रपटांच्या यादीत झपाटलेला चित्रपट नसणार  असं कधीच होणार नाही. कारण नव्वदीच्या काळापासून आजपर्यंत या चित्रपटाची चर्चा संपलेली नाही. त्या काळात या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं होतं. एकी कडे खलनायक तात्या विंचू आणि त्याच्या तावडीत सापडलेला लक्ष्या लोकांच्या आजही चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्ड, दिलीप प्रभावळकर, मधू कांबीकर, विजय चव्हाण, किशोरी आंबिये अशा अनेक कलाकारांनी प्रमूख भूमिका साकारल्या होत्या. मराठी विनोदी चित्रपट यादीत या  चित्रपटाने स्वतःचं वेगळं स्थान नक्कीच मिळवलेलं आहे. 

झपाटलेला - Zapatlela

Instagram

ADVERTISEMENT

श्रीमंत दामोदर पंत (Shreemant Damodar Pant)

मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेलं आणि एक हास्य कलाकार रत्न म्हणजे भरत जाधव. भरत जाधव यांची  प्रमुख भूमिका असलेला श्रीमंत दामोदर पंत हा चित्रपट हास्य दिनानिमित्त आवर्जून पाहावा असा आहे. या चित्रपटात भरत सोबत विजय चव्हाण, सुनिल बर्वे, अलका कुबल, पीयूष रानडे, चैत्राली गुप्ते, मृणाल दुसानिस यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे श्रीमंत दामोदर पंत या नाटकालाही प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता. 

श्रीमंत दामोदर पंत - Shreemant Damodar Pant

Instagram

ADVERTISEMENT

लयभारी (Lai Bhaari)

लयभारी चित्रपटाने 2014 साली बॉक्सऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातून प्रथमच अभिनेता रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती रितेशची पत्नी जेनेलियाने केली होती. शिवाय या चित्रपटात रितेश देशमुख, शरद केळकर, उदय टिकेकर, राधिका आपटे, तन्वी आझमी यांच्या प्रमुख भूमिकांसह बॉलीवूडचा भाईजान सलमान आणि जेनेलिया हे पाहुणे कलाकार होते.  चित्रपटाचा विषय जरी गंभीर असला तरी या चित्रपटात विनोदाची गुंफण अप्रतिम पद्धतीने करण्यात आलेली आहे. ज्यामुळे या चित्रपटाचे संवाद प्रेक्षकांच्या मनावर उत्तम रित्या कोरले गेले. ज्यामुळे आज मराठी कॉमेडी चित्रपट यादीत या चित्रपटाने स्वतःचं अग्रेसर स्थान निर्माण केलं आहे. 

वाचा – नवरा बायकोवर मीम्स आणि जोक्स (Husband Wife Jokes In Marathi)

ADVERTISEMENT

नवरी मिळे नवऱ्याला (Navri Mile Navryala)

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार विनोदी चित्रपट देण्यामध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांचा मोलाचा वाटा आहे. सचिन पिळगांवकर यांचे दिग्दर्शन असलेला नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटानेदेखील नव्वदीच्या काळात धमाल उडवून दिली होती. ज्यात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, निवेदिता जोशी, संजय जोग, दया  डोंगरे, जयराम कुलकर्णी, श्रीकांत मोघे, आशालता वाबगांवकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

बाळाचे बाप ब्रम्हचारी (Balache Baap Brahmachari)

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची मैत्री जगजाहीर आहे. या दोघांची केमिस्ट्री नव्वदीच्या काही चित्रपटांमधून प्रेक्षकांना सतत पाहण्यास मिळाली आहे. याच काळातील बाळाचे बाप ब्रम्हचारी हादेखील एक उत्तम विनोदी चित्रपट आहे. मराठी चित्रपट विनोदी चित्रपटांना विनोदासोबतच दर्जेदार कथानकाची जोड असते. ज्यामुळे हे चित्रपट अजरामर झाले आहेत. यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबतच अलका कुबल, सुधीर जोशी, किशोरी शहाणे, जयराम कुलकर्णी, सुशांत रे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मराठी विनोदी चित्रपट हा विषय जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा या चित्रपटांचे नाव डोळ्यासमोर येईल.

बाळाचे बाप ब्रम्हचारी - Balache Baap Brahmachari

ADVERTISEMENT

Instagram

आयत्या घरात घरोबा (Aayatya Gharat Gharoba)

सचिन पिळगांवकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला आयत्या घरात घरोबा हा चित्रपट देखील विनोदाची खाण आहे. या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि राजेश्वरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातून घर म्हणजे काय यांचं उत्तम प्रबोधन विनोदाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. 

ADVERTISEMENT

माझा छकुला (Maza Chakula)

महेश कोठारे दिग्दर्शित आणखी एक अजरामर चित्रपट म्हणजे माझा छकुला. या चित्रपटात छकुल्याची भूमिका महेश कोठारे यांचा मुलगा आणि अभिनेता आदीनाथ कोठारेने केली होती. या चित्रपटाती माझा छकुला माझा सोनुला हे गाणं त्या काळी फारच लोकप्रिय झालं होतं. मात्र विनोदी अंगाने या चित्रपटाला एक वेगळंच महत्व आहे. कारण या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेची प्रमुख भूमिका आहे. छकुला गुंडाच्या हाती सापडल्यानंतर त्यातून तो कसा सुटतो आणि त्यातून काय विनोद घडतात हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा.

गाढवाचं लग्न (Gadhvache Lagna)

गाढवाचं लग्न हे वास्तविक हरिभाऊ वडगावकरांनी लिहीलेलं एक वग नाट्य आहे. मात्र या नाटकाला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे यावर गाढवाचं लग्न हा चित्रपट देखील तयार करण्यात आला. या चित्रपटात मराठीतील अफलातून विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे याची प्रमुख भूमिका होती.  या चित्रपटातून नेमके काय काय विनोद होतात हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट आज नक्कीच पाहावा लागेल. शिवाय मराठी कॉमेडी चित्रपटाच्या यादीत हा चित्रपट नसेल असं कधीच होणार नाही. 

अगडबम (Agadbam)

अगडबम हा अभिनेत्री तृप्ती भोईरची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला चित्रपट आहे. यात तृप्ती भोईर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लठ्ठ नायिका आणि त्यातून निर्माण होणारे विनोद या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे तृप्ती भोईरने माझा अगडबंब हा या चित्रपटाचा सिक्वलगदेखील तयार केला होता. 

ADVERTISEMENT

अगडबम - Agadbam

Instagram

जत्रा (Jatra)

केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, विजय चव्हाण, प्रिया बेर्डे, संजय खापरे, उपेंद्र लिमये, कुशल बद्रिके यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील कोंबडी पळाली हे गाणं आजही लोकप्रिय आहे. जत्रा मराठी चित्रपटाने त्या काळात अक्षरशः धमाल केली होती. 

टाईम प्लीज (Time Please)

विनोदी कलाकारांमध्ये केवळ आपल्या प्रतिभेवर लोकप्रिय होणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. टाईमप्लीज चित्रपटात सिद्धार्थ जाधव, प्रिया बापट, उमेश कामत आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विवाहानंतर जोडीदार आणि बालपणीची मैत्री हे नातेसंबंध कसे जपावेत याचं हा चित्रपट एक चांगलं उदाहरण आहे. 

ADVERTISEMENT

मर्डरमेस्री (Murder Mestri)

थ्रिलर कॉमेडी असलेला मर्डर मेस्त्री नक्कीच पाहावा असा आहे. यात मराठीतील कॉमेडीचे किंग दिलीप प्रभावळकर यांच्या सोबतच ह्रषिकेश जाधव, क्रांती रेडकर, वंदना गुप्ते, संयज खापरे, विकास कदम, किशोर चौघुले, मानसी नाईक, शलाका पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. थरार, रहस्य यासोबतच उत्तम विनोद या चित्रपटात बांधलेले आहेत. ज्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. 

मर्डरमेस्री - Murder Mestri

Instagram

पोस्टर बॉयज (Poster Boys)

अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ति तळपदे यांची निर्मिती असलेला पोस्टर बॉयज  2014 साली लोकांना फारच आवडला होता. अनोखा विषय आणि त्यातून निर्माण होणारा सहज अभिनय यातून या चित्रपटाला एक वेगळंच वळण मिळालं होतं. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, नेहा जोशी, अश्विनी काळसेकर, उदय सबनीस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय श्रेयसदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. 

ADVERTISEMENT

नारबाची वाडी (Narbachi Wadi)

दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला नारबाची वाडी 2013 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं होतं. विशेष म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे मधून झळकलेली आजोबा आणि नातवाची जोडी या निमित्नाने पुन्हा प्रेक्षकांना पाहता आली. विकास कदमसह यात मनोज जोशी, अतुल परचुरे, निखिल रत्नपारखी, किशोरी शहाणे, भाऊ कदम, कमलाकर सातपुते आणि सुहास शिरसत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कोकणातील निसर्ग आणि कथानकातून निर्माण होणारे विनोद यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा असा आहे. मराठी कॉमेडी चित्रपट आठवताना हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच स्मरणात राहतो.  

नारबाची वाडी - Narbachi Wadi

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

#Dumbcharades खेळण्यासाठी बेस्ट आहेत हे ’60’ हिंदी-मराठी चित्रपट

तुम्हालाही नक्की तोंडपाठ असतील हे मराठीतील प्रसिद्ध डायलॉग्ज्स (Famous Marathi Dialogues)

रोजच्या वापरातील हे लोकप्रिय मराठी शब्द तुम्हाला माहीत आहेत का (Famous Marathi Words List)

ADVERTISEMENT

 

07 Apr 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT