ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
मुंबईत हँगआऊटसाठी बेस्ट कॅफे, तुमचाही वेळ जाईल मस्त (Best Cafes In Mumbai In Marathi)

मुंबईत हँगआऊटसाठी बेस्ट कॅफे, तुमचाही वेळ जाईल मस्त (Best Cafes In Mumbai In Marathi)

मुंबईत भेटण्यासाठी जागा नाही अशी कधीतरी ओरड ऐकायला येते. पण मुंबईत भेटण्यासाठी Cafe सारखा दुसरा पर्यायही नाही. मुंबईत बरेच कॅफे आहेत. तुम्ही इथे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कितीतरी तास बसून मस्त गप्पा मारू शकता आणि या कॅफेमध्ये तुमचा वेळही मस्त जातो. इथे तुम्हाला उगीच हटकणारं कोणी नसतं. तसंच तुम्हाला त्रास द्यायलाही कोणी येत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून कोणालाही बोलावत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील Cafe चा हा ट्रेंड वाढत चालला आहे. कॅफे म्हटलं की डोळ्यासमोर येते ती मस्त वाफळलेली अथवा थंड कॉफी आणि त्यासह मिळणारे विविध चटकदार पदार्थ. त्यासोबत मस्त फक्कड गप्पा. असा वेळ कोणाला नाही आवडत? मुंबईमध्ये प्रचंड कॅफे आहेत. त्यापैकी उत्कृष्ट अर्थात Best Cafe नक्की कोणते आहोत ते आपण जाणून घेऊया. तुम्हाला मुंबईतील या कॅफेची इत्यंभूत माहिती आम्ही देत आहोत. 

मुंबईतील उत्कृष्ट 15 कॅफे (Best Cafes In Mumbai In Marathi)

मुंबई म्हटलं की कॅफेशिवाय पूर्ण होतच नाही. इतर ठिकाणांपेक्षा कॅफेमध्ये बसून तुम्हाला निवांत बोलताही येतं आणि तुमचा वेळही चांगला जातो. मुंबईत अनेक कॅफे आहेत जे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे तुम्ही या कॅफेमध्ये गेला नसाल तर तुम्ही नक्कीच त्याचा अनुभव एकदा तरी घेतलाच पाहिजे. 

1. पृथ्वी कॅफे, जुहू (Prithvi Cafe, Juhu)

मुंबईतील पृथ्वी थिएटर कोणाला माहीत नाही? याच पृथ्वी थिएटरला जोडून असलेलं पृथ्वी कॅफेदेखील तितकंच प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा हे कॅफे सेलिब्रिटीजने भरलेलं असतं. पण त्याचा अर्थ असा नाही की इथे सामान्य लोक जाऊ शकत नाहीत. याची खासियत हीच आहे की, इथे पदार्थ जास्त महाग मिळत नाहीत. शिवाय इथे मिळणारे सर्व पदार्थ हे  उत्कृष्ट चवीचे आणि जिभेवर रेंगाळत राहणारे असतात. हा ओपन – एअर कॅफे असून इथे मिळणारा स्टफ्ड पराठा आणि कटिंग चहा हे उत्कृष्ट मिश्रण आहे. दिवसा सुरू होणारा हा कॅफे कायम भरलेला असतो. सकाळ असो वा संध्याकाळी अथवा रात्र तुम्हाला पृथ्वी कॅफे कधीही रिकामा दिसणार नाही. पण तुम्हाला या कॅफेला भेट द्यायचीच असेल तर तुम्ही याचा अनुभव रात्रीच्या वेळी घेणं जास्त चांगलं आहे. इथली गर्दी आणि इथले लाईट्स हे तुम्हाला कायम लक्षात राहतील आणि शिवाय कॅफेमधील पदार्थांची चवही. 

ADVERTISEMENT
  • स्थळ – पृथ्वी थिएटर, जानकी कुटीर, जुहू चर्च रोड, जुहू, मुंबई
  • कसे जावे – सांताक्रुझ पश्चिमवरून तुम्ही स्टेशनजवळून रिक्षा अथवा बसने इथे जाऊ शकता
  • वेळ – सकाळी 10.00 ते रात्री 10.30 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 700/- 

वाचा – पावभाजीची रेसिपी मराठीमध्ये

2. मिरची अँड माईम, पवई (Mirchi and Mime, Powai)

Instagram

इतर कॅफेपेक्षा अतिशय वेगळा आणि अभूतपूर्व अनुभव तुम्हाला या ठिकाणी येईल. त्याचं कारणही तसंच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कॅफेमध्ये काम करणारा कर्मचारीवर्ग हा मुका आणि बहिरा आहे. पण इथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत अगदी हसत आणि उत्तमरित्या हे पार पाडतात. इतकंच नाही तर इथल्या ऑर्डर्सदेखील माईम पद्धतीने घेतल्या जातात. तुम्हाला इशारे करून इथल्या पदार्थांची ऑर्डर द्यावी लागते. इथे मिळणारे प्रॉन्स आणि कबाब इतके लज्जतदार आहेत की,  तुम्ही नक्की इथे पुन्हा जाल. इतर खाण्याच्या पदार्थांसह तुम्हाला इथे अप्रतिम ड्रिंक्सदेखील मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कॅफे तुमच्या खिशाला परवड्यासारखं आहे. पण इथे जाण्यापूर्वी तुम्हाला एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे रिझर्व्हेशन. कारण इथे सहसा जागा पटकन मिळत नाही. मिरची आणि माईमला चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी आता मदेरिया अँड माईम असंही हॉटेल त्याच इमारतीमध्ये सुरू केलं आहे. 

ADVERTISEMENT
  • स्थळ – ट्रान्सओशियन हाऊस, लेक बोलवर्ड, हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई, मुंबई
  • कसे जावे – बस अथवा टॅक्सी, कार
  • वेळ – दुपारी 12.30 ते 3.30 आणि संध्याकाळी 6.30 ते रात्री 11.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1500/- 

वाचा – मुंबईतील नाईट लाईफ अनुभवायचं आहे, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या

3. 145, काळा घोडा (145, Kala Ghoda)

Instagram

या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सगळंच खूप सुंदर दिसतं. तुम्ही या ठिकाणी कितीही वेळा गेलात तरी तुम्हाला हे ठिकाण तितकंच आवडेल. इथलं वातावरण इतकं छान आहे की तुम्ही कितीही वेळ इथे बसू शकता. इथे पाच प्रकारचे कुझन्स मिळतात आणि प्रत्येक डिश अप्रतिम मिळते. इथली थाय करी तरी अप्रतिम आहे. तसंच इथलं जेवण हे वेगवेगळ्या ड्रिंक्सबरोबर अप्रतिम मॅच करण्यात आलं आहे. यामधील सॉल्डेट कॅरामल मिल्कशेक तर तुम्ही ट्राय करायलाच हवं. 

ADVERTISEMENT
  • स्थळ – 145, काळा घोडा, फोर्ट, मुंबई
  • कसे जावे – सीएसटीवरून टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सोमवार ते शुक्रवार – दुपारी 12.30 ते रात्री 1.30 
  • शनिवार आणि रविवार – सकाळी 10 ते रात्री 1.30
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1500/- 

4. लिओपर्ड कॅफे, कुलाबा (Leopard Cafe, Colaba)

Instagram

लिओपर्ड कॅफेमध्ये जाणं म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉलेज कँटीनमध्ये आल्याची नक्कीच आठवण होईल. ही जागा कायम भरलेली असते. याठिकाणी तुम्हाला बरेच विदेशी लोकही दिसतील. मुंबईतील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट कुलाबाच्या सुरूवातीलाच कॉर्नरवर तुम्हाला हे ठिकाण दिसते. लिओपर्डपणे खाण्यापिण्याची अक्षरशः रेलचेल तुम्हाला दिसून येते. स्नॅक्स आणि मेन कोर्स तसंच विविध डिझर्सट्स तुम्हाला इथे मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण तुमच्या खिशाला परवडण्यासारखं आहे. तसंच इथलं म्युझिक तुम्हाला मनाला आनंद नक्कीच देतं. 

  • स्थळ – एस. बी. सिंह रोड, कुलाबा कॉझवे, कुलाबा, मुंबई
  • कसे जावे – सीएसटीवरून टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी 7.30 ते रात्री 12.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1600/- 

5. ग्रँडममाज कॅफे, घाटकोपर, जुहू, चेंबूर, दादर (Grandmama’s Cafe)

ADVERTISEMENT

Instagram

ग्रँडममाज कॅफे हे नाव नक्कीच नवं नाही. याच्या अनेक शाखा आहेत. प्रत्येक घरातील आजीला स्मरून हे कॅफे बनवण्यात आलं आहे. जगभरात याच्या शाखा आहेत. याठिकाणी मिळणारा राजमा चावल आणि स्टिफर्ड पाय हे पदार्थ अप्रतिम मिळतात. ग्रँडममाजचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या पांढऱ्या  भिंती आणि अप्रतिम डेकॉर जे तुमचा मूड चांगला करण्यास फायदेशीर ठरतात. आजींनी बनवलेल्या स्पेशल डिश इथे सर्व्ह केल्या जातात. तसंच विविध चायनीज, स्पगेटी, बर्गर्स आणि नाचोज अप्रतिम मिळतात. 

  • स्थळ – हॉटेल रॉयल गार्डन, जुहू तारा रोड, शिवाजी नगर, जुहू, मुंबई
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी  9.00 ते रात्री 12.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1100/- 

वाचा – घाटकोपरच्या खाऊ गल्लीत काय आहे चविष्ट पदार्थ, टाकूया एक नजर

6. लिपिंग विंडोज, अंधेरी (Leaping Windows, Andheri)

ADVERTISEMENT

Instagram

पुस्तकं आणि खाणंपिणं याचा अनोखा मेळ तुम्हाला लिपिंग विंडोजमध्ये मिळतो. या कोझी कॅझेचे दोन माळे आहेत आणि शिवाय बेसमेंटदेखील आहे. दोन्ही वरच्या फ्लोअरवर थोडं क्वर्की कॅफे असून बेसमेंटमध्ये अप्रतिम असं कॉमिक पुस्तकांचं कलेक्शन आहे. वाचन करणाऱ्या माणसांना हे कॅफे नक्कीच आवडतं. तसंच तुम्ही जर मार्व्हल, डीस युनिव्हर्स आणि टिंकलचे चाहते असाल तर तुम्हाला इथे याचंदेखील खूपच जास्त कलेक्शन आहे. तुम्हाला जर स्वतःबरोबर छान वेळ घालवयाचा असेल तर तुम्ही या कॅफेची निवड नक्कीच करू शकता. तुमच्या आवडत्या माणसांसह वेळ घालवण्यासाठी हे अप्रतिम कॅफे आहे. 

  • स्थळ – 2 आणि 3, कॉर्नर व्ह्यू, डॉ. अशोक चोप्रा मार्ग, बियांका टॉवर्सच्या समोर, अमित नगर, वर्सोवा, अंधेरी पश्चिम 
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी  10.00 ते रात्री 12.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1200/- 

7. कँडीज, बांद्रा (Candies, Bandra)

Instagram

ADVERTISEMENT

मुंबईत कितीही कॅफेज असल्या तरीही मुंबईकरांसाठी कँडीज हा पर्याय कायम आवडता राहातो. कधीही तुम्ही गेलात तर या ठिकाणी तुम्हाला गर्दीच मिळणार आहे. कोणीही बेस्ट कॅफे विचारलं मुंबईमध्ये तर उत्तर कँडीज असं असेल. इथे मिळणारं चिकन सँडविच आणि क्लासिक कोल्ड कॉफी याची अफलातून आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्हाला कोणतं गिफ्ट द्यायचं असेल त्यासाठीदेखील तुम्हाला पर्याय उपलब्ध  आहेत. इथे ‘मॅरी मी’ नावाचं एक कलेक्शन स्टोअर आहे. इथे तुम्हाला स्टेशनरीज, होम डेकॉर, अॅक्सेसरीज आणि इतरही गोष्टी मिळतात. 

  • स्थळ – मॅक रोनेल्स, लर्नर्स अकॅडमी स्कूलच्या पुढे, पाली हिल, वांद्रा पश्चिम, मुंबई 
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी   8.30 ते रात्री 10.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 700/- 

8. स्टारबक्स (Starbucks – मुंबईमध्ये सर्व ठिकाणी )

Instagram

स्टारबक्स हे कॉफी शॉप संपूर्ण मुंबईभर तुम्हाला दिसतं. तुम्ही तुमची एक सीट मिळवून कितीही वेळ इथे बसून आपला वेळ मस्त घालवू शकता. तुम्हाला तुमच्या मनाला शांतता मिळवून द्यायची असेल तर तुम्हाला स्टारबक्स हा पर्याय चांगला आहे. तुमच्या कामाची मीटिंग असो अथवा मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा असेल तरीही स्टारबक्स कॅफे हा अप्रतिम पर्याय आहे.  याशिवाय तुम्ही तुमची आवडती कॉफी तुमच्या मनाप्रमाणे सांगून करून घेऊ शकता. तुम्ही जर कॉफीवेडे असाल तर तुम्ही डबल टॉल कॅरामल मोका, लेमन लोफ केक, कॅरामल मोका नक्की ऑर्डर करा. तसंच इथलं डबल ब्लेंडेड जावा चीप फ्रेपेचीनोदेखील अफलातून आहे. तुम्ही घेतलेली कॉफी तिथल्या सँडविच आणि केक तुम्ही ऑर्डर करू शकता.  

ADVERTISEMENT
  • स्थळ – मुंबईत सर्व ठिकाणी. सर्वात मोठं स्टारबक्स हाय स्ट्रीट फिनिक्स लोअर परेल, कुलाबामधील ताज महाल पॅलेस
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी   8.30 ते रात्री 1.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 650/- 

वाचा – मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ

9. ले 15, कुलाबा (Le 15, Colaba)

आकर्षक आर्ट डेकोरेशन, खुर्च्या आणि साधेपणातही उठून दिसाणारं सौंदर्य हे Le 15 चं वैशिष्ट्य आहे. मूळ संकल्पना पॅरीसची असल्याने तुम्हाला इथे वेगळा अनुभव मिळतो. मुंबईमधील हे जरा वेगळं कॅफे आहे. नेहमीच्या कॅफेमध्ये जाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच इथे भेट द्यायला हवी. तुमच्या आवडीचे मॅकरोनी अथवा वेफल तुम्ही इथे निवडून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तसंच कोल्ड अमेरिकॅनो आणि हॉट चॉकलेट हे एक वेगळं कॉम्बिनेशन तुमचं मन नक्कीच जिंकून घेईल. तुम्हाला कशाचाही कंटाळा आला असेल अथवा मूड नसेल तर तुमचा मूड फ्रेश करण्याचं हे अप्रतिम ठिकाण आहे. 

  • स्थळ – शॉप 18, लान्सडाऊन हाऊस बिल्डिंग, एमबी मार्ग, रिगल सिनेमाजवळ, अपोलो बंदर, कुलाबा, मुंबई
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी  9.00 ते रात्री 11.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1200/- 

10. टी विला कॅफे, मुंबईत सर्वत्र (Tea Villa Cafe)

Instagram

ADVERTISEMENT

नावावरून इथे फक्त चहाचे प्रकार मिळतात का असा प्रश्नही नक्कीच मनात येतो. पण असं काहीही नाही. इथे विविद प्रकारचे ड्रिंक्स आणि खाण्याच्या पदार्थांचा चांगल्या वातावरणात तुम्ही आस्वाद घेऊ शकता. इथे मिळणारी कॉफी आणि नाश्ता अप्रतिम असतो. त्याशिवाय इथलं इंटिरिअरदेखील तुमचं मन प्रसन्न नक्कीच करतं. तुम्ही इथले पॅनकेक्स नक्कीच एकदा ट्राय करून बघायला हवेत. हे कॅफे तुम्हाला तुमच्या माणसांबरोबर हँगआऊट करण्यासाठी अप्रतिम आहे. तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींसह तुम्ही मस्त प्लॅन करून इथल्या वेफलवर ताव मारू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या ऑफर्सदेखील मिळत असतात. 

  • स्थळ – मुंबईत सर्व ठिकाणी
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी   8.00 ते रात्री 1.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1000/- 

11. द बॉम्बे कँटीन, लोअर परेल (The Bombay Canteen, Lower Parel)

Instagram

द बॉम्बे कँटीन हे खरंतर कॅफे आहे पण आता त्याचं रूपांतर थोड्याफार प्रमाणात डिनर डेट आणि कॅज्युअल पार्टी स्पॉटमध्ये झालं आहे. जुन्या जमान्याच्या वेगवेगळ्या डिश आणि नव्या जमान्यातील डिश असं कॉम्बिनेशन इथे करण्यात आलं आहे. भारतीय फ्लेवर्सचे वेगवेगळे स्वाद तुम्हाला इथे मिळतात. पुल्ड पोर्क ठेपला ही इथली सर्वात प्रसिद्ध डिश आहे. पावभाजी रोल्स, एग केजरीवाल हेदेखील तुम्हाला इथे खाता येतं. तुम्ही शाकाहारी असाल तरीही तुम्हाला विविध पर्याय इथे मिळतील. इथे मिळणाऱ्या विविध पदार्थांवर तुम्हाला विविध प्रकारचे कॉकटेल्सदेखील मिळतात. 

ADVERTISEMENT
  • स्थळ – प्रोसेस हाऊस, तळमडला, कमला मिल्स, रेडिओ मिरची ऑफिसजवळ, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – दुपारी 12.00 ते रात्री 1.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 2000/- 

वाचा – मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स

12. हाऊस ऑफ मँडारिन, वांद्रा (House of Mandarin, Bandra)

Instagram

वांद्राला हिल रोडवरील प्रसिद्ध सॅसी स्पून कॅफे आठवतंय का तुम्हाला? त्याचठिकाणी आता मँडारिन कॅफे सुरू करण्यात आले. याचं इंटिरिअर, भिंती, लाकडी पार्टिशन्स हे सगळं तुमच्या मनाला समाधान देतं. पूर्वजांनी जपून ठेवलेल्या गोष्टी इथे इंटिरिअरमध्ये वापरण्यात आलेल्या आहेत. मँड्रियन कुझिन, रोस्टेड पोर्क, बार्बेक्यू रिब्स, क्रिस्पी अरोमॅटिक डक या इथल्या स्पेशालिटी आहेत. तसंच तुम्हाला खिशाला परवडणारे अप्रतिम कॉकटेल्स इथे मिळतात. तुमचं जेवण आणि परफेक्ट ड्रिंकचा आस्वाद घेत तुम्ही इथल्या वातावरणात नक्कीच रमून जाता. मँडारिन मोका आणि झेनझेन हे इथले बेस्ट काम्बिनेशन ड्रिंक्स आहेत. 

ADVERTISEMENT
  • स्थळ – क्लासिक कॉर्नर बिल्डिंग, होली फॅमिली हॉस्पिटलच्या पुढे, हिल रोड, वांद्रा पश्चिम, मुंबई
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – दुपारी 12.00 ते 4.00 आणि संध्याकाळी 7.00 ते रात्री 12.00 
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 2100/- 

13. द पँट्री, काळाघोडा (The Pantry, Kala Ghoda)

पूर्ण दिवस हेल्दी आणि पोषक सलाड मिळणारं एकमेव कॅफे. लॅटिन स्वरूपाचं असलेलं हे कॅफे थोडं वेगळं आहे. तुमच्या आरोग्याचा विचार करून इथे पदार्थ तयार करण्यात आले आहेत. तसंच तुम्हाला इथे मिळणारे पदार्थ हे जास्त प्रमाणात असतात. इथलं न्यूट्रिशन बूस्ट सलाड हे प्रसिद्ध आहे.यामध्ये ताज्या भाज्या, कडधान्य, कॉटेज जीच आणि संत्र यांचा मेळ असतो.  तसंच तुम्हाला यामध्ये चिकन, प्रोटीन हेदेखील अधिक अॅड करता येऊ शकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बनवून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सलाडसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या या ताज्या असतात. तसंच तुम्हाला इथे त्रास देणारंही कुणीही नसतं. तुम्हाला हेल्दी खाणं खायचं असेल तर हे कॅफे बेस्ट आहे. 

  • स्थळ – 14, तळमजला, यशवंत चेंबर्स, मिलिट्री स्क्वेअर लेन, त्रिष्णा जवळ, काळा घोडा, फोर्ट, मुंबई
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी  8.30 ते रात्री 11.30  
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1400/- 

14. पाली व्हिलेज कॅफे, पाली हिल (Pali Village Cafe, Pali Hill)

Instagram

पाली हिल व्हिलेज कॅफे हे गेल्या कित्येक वर्षापासून नावाजलेलं कॅफे आहे. तुम्हाला जर वाईनचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की इथे यायला हवं. फ्रेंच रोमँटिक फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे हे कॅफे आहे. रस्टिक फर्निशिंग, अगदी मंद प्रकाश अशा स्वरूपाचे हे कॅफे कपल्ससाठी खूपच फायदेशीर आहे. इथे आल्यानंतर तुम्ही फ्रेंच टोस्ट नक्कीच ट्राय करायला हवा. तसंच चिकन स्लाईडर्स, क्विओना सलाडदेखील नक्की ट्राय करा. तसंच तुम्हाला याबरोबर वेगवेगळ्या ऑफर्सही इथे मिळतात. शिवाय इथले पदार्थ जास्त महाग नसल्यामुळे तुम्हाला पैशाची जास्त काळजी करायची गरज भासत नाही. इथे बऱ्याचदा अनेक स्टार्सदेखील तुम्हाला बघायला मिळतात. 

ADVERTISEMENT
  • स्थळ – 602, आंबेडकर रोड, पाली नाका, पाली हिल, वांद्रा पश्चिम, मुंबई
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी  9.00 ते रात्री 12.00  
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 2700/- 

15. द नटक्रॅकर, फोर्ट (The Nutcracker, Fort)

Instagram

नटक्रॅकर ही अशी कॅफेची जागा आहे जी तुम्ही तुमचं पुस्तक हातात घेऊन मस्तपैकी तुमच्या नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकतात. इथे मिळणाऱ्या टर्किश एग्ज, एग्ज अकुरी, डार्क चॉकलेट, वेफल्स, पॅनकेक्स आणि एग्ज केजरीवाल या पदार्थांचा आस्वाद घेऊनच पाहायला हवा. मिंट कूलर अथवा चहाबरोबर तुम्ही मागवणारे पदार्थ कम्बाईन करा. तुम्हाला नक्कीच या कॅफेमध्ये मजा येईल. हे कॉम्बिनेशन करून तुम्हाला एखाद्या जेवणापेक्षा कमी वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही जर या बाजूला जाणार असाल तर नक्की हे कॅफे ट्राय करा. 

  • स्थळ – डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, फोर्ट, मॉडर्न हाऊस, मुंबई
  • कसे जावे – टॅक्सी अथवा बस, गाडी
  • वेळ – सकाळी  9.30 ते रात्री 11.00  
  • साधारण खर्च – दोन व्यक्तींसाठी साधारण रू. 1200/- 

ADVERTISEMENT

कॅफेसंबंधित प्रश्नोत्तरे (FAQs)

दक्षिण मुंबईतील उत्कृष्ट कॅफे कोणता आहे?

खरं तर दक्षिण मुंबईत बरेच कॅफे आहेत. पण कुलाबामधील कॅफे माँडेगर हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. म्हणजे इथलं वातावरण आणि इथल्या पदार्थांचा स्वाद बऱ्याच जणांना आवडतो.

मुंबईच्या कोणत्या भागात जास्त कॅफे आहेत?

दक्षिण मुंबई, वांद्रा आणि अंधेरी या भागामध्ये तुम्हाला जास्त कॅफे दिसून येतील. इथली लोकवस्ती आणि त्याशिवाय इथे येणारे लोक जास्त प्रमाणात कॅफेमध्ये जातात. त्यामुळे कॅफेची रेलचेल तुम्हाला या भागांमध्ये जास्त दिसून येईल. 

कॅफे हे महागच असतात?

सगळेच कॅफे महाग नसतात. दोन व्यक्तींसाठी साधारण 600 पासून खिशाला परवडण्यासारखे कॅफे मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्की काय परवडतं हे बघून तुम्ही कॅफे निवडा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

ADVERTISEMENT

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

You Might Like This:

मुंबईतील बेस्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंट

फूडीजसाठी दक्षिण मुंबईतली 10 बेस्ट रेस्टॉरंट्स

05 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT