ADVERTISEMENT
home / Recipes
#Fishlover जाणून घ्या फिश फ्राय करण्याची योग्य पद्धत

#Fishlover जाणून घ्या फिश फ्राय करण्याची योग्य पद्धत

तुम्ही  #Fishlover असाल तर हा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. कारण तुम्ही ज्यावेळी कोणाकडे परफेक्ट तळलेले मासे खाता त्यावेळी तुम्हाला त्यांनी नेमकी काय ट्रिक वापरुन मासे शिजवले असा प्रश्न पडतो.तुम्हालाही परफेक्ट मासे शिजवायचे असतील. तर आज आम्ही तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची fish dish एकदम परफेक्ट होईल आणि मासे खाल्ल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.

उरलेल्या चहाच्या चोथ्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकीत

मासे आणल्यानंतर पहिल्यांदा हे करा

Instagram

ADVERTISEMENT
  1. कोणतेही मासे बाजारातून आणल्यानंतर ते आधी स्वच्छ करा. 
  2. पापलेट, सुरमई, हलवा, कोळंबी, बांगडा, बोंबील, रावस, जिताडा, टुना, मांदेली यासारखे मासे फ्राय केले जातात. 
  3. हे मासे साफ करण्याची एक पद्धत असते. तसे मासे साफ करुन घ्या.
  4. मासे साफ केल्यानंतर ते पाण्यातून एकदाच काढा. काही जणांना मासे स्वच्छ करताना ते सतत पाण्यातून काढायची सवय असते ही चूक अजिबात करु नका. 
  5. मासे स्वच्छ केल्यानंतर त्यात सगळयात आधी मीठ घाला. 
  6. आलं-लसूण पेस्ट,हळदं, तिखट आणि तुम्हाला आवडणारे मसाले घालून ते नीट मॅरिनेट करुन घ्या. 
  7. माशांमध्ये आंबटपणा महत्वाचा असतो. त्यामुळे माशामध्ये कोकमाचे आगळ किंवा चिंच घालायला विसरु नका. 
  8. जर तुम्हाला लिंबाचा आबंटपणा पुरेसा वाटत असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता. 
  9. मासे किमान 10 मिनिटं तरी मेरिनेशनसाठी ठेवून द्या.
  10. तुम्हाला जर सगळेच मासे एकदम तळायचे नसतील. तर एकदम सगळे मासे मॅरिनेट करु नका. कारण ते फार चिवट होतात. 

या कारणासाठी लागला होता ‘कॉर्नफ्लेक्स’ चा शोध

मासे तळताना या गोष्टी ठेवा लक्षात

Instagram

  1.  मासे तळण्यासाठी तुम्ही ते मासे कशात घोळवळून तळणार आहात ते ठरवा. कारण वेगवेगळ्या ठिकाणी तळण्यासाठी रवा किंवा तांदुळाचे पीठ वापरले जाते. जसं कोळंबी रेसिपी करताना. 
  2. जर तुम्ही रवा वापरत असाल तर तुम्ही माशांना कोट करण्यासाठी बारीक रवा वापरा. 
  3. जर तुम्ही रवा आणि तांदुळाचे पीठ वापरणार असाल तर तांदुळाचे पीठ जास्त घ्या आणि रवा थोडा कमी घ्या. 
  4. मॅरिनेट केलेले मासे तांदुळाचे पीठ/ रव्यामध्ये घोळवा. मासे घोळवताना त्यावर खूप पीठ लावू नका. कारण त्यामुळे मासे कच्चे राहण्याची शक्यता असते. शिवाय तुम्ही वापरत असलेले तेलही त्यामुळे लवकर खराब होते. 
  5. मासे तळण्यासाठी नेहमी नॉनस्टिक पॅनचा वापर करा. कमीत कमी तेलाचा वापर करणार असाल तर तुम्ही तेल तव्यावर चांगले पसरवून घ्या. 
  6. तेल तापल्यानंतर गॅस मंदर करुन त्यावर माशाची एक-एक तुकडी  सोडा. 
  7. मासा एका बाजूने संपूर्ण शिजल्यानंतर मगच तो पलटा. 
  8. मासा एका बाजूने शिजला आहे हे कळत नसेल तर तुम्हाला माशाचा वरील भाग (पीठाचा पांढरा रंग) बदलल्यानंतर मासा हा साधारण शिजतो. 
  9. जर तुम्हाला त्यावेळी तेल आवश्यक वाटत असेल तर तेल घालण्यास काहीच हरकत नाही. 
  10. मासा परतून दुसऱ्या बाजूनेही तुम्हाला खरपूस भाजून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने साधारण सोनेरी रंग आल्यानंतर  #Fishfry तयार ( सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही मासे खूप जास्त पण तळू नका. कारण त्यामुळे मासे अधिक चिवट होतात.)

आरोग्यासाठी फायदेशीर आहेत मासे खाणे

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

11 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT