मासे खाण्याचे फायदे जाणून घ्या (Benefits Of Eating Fish In Marathi)

मासे खाण्याचे फायदे

मासे खायला अनेकांना आवडतात. काहींच्या आहारात माशांचा समावेश असतो. विशेषत: कोकणपट्ट्याकडे राहणारे लोक समुद्रातील मासे अगदी आवर्जून खातात. आहारात माशांचा समावेश असणे फारच फायद्याचे असते. उत्तम त्वचा, केस आणि आरोग्यासाठी मासे वरदान असून तुम्ही मासे खात नसाल तर तुमच्या आहारात तुम्ही त्याचा समावेश करायला हवा. आज जाणून घेऊया मासे खाण्याचे फायदे. यासोबतच आपण जाणून घेणार आहोत माशांचे प्रकार. आता माशांचे प्रकार आणि त्यांचे फायदे वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या आहारात माशांचा समावेश कराल.

Table of Contents

  माशांमध्ये असतात ही पोषकत्तवे (Nutrients In Fish)

  shutterstock

  आता माशांच्या सेवनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात हे कळल्यानंतर तुम्हाला माशांमध्ये नक्की असतं तरी काय असा प्रश्न पडला असेल तर माशांमध्ये असलेल्या पोषक घटकांविषयी माहिती असणेही आवश्यक आहे. माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स  D आणि B2 असते. या शिवाय माशांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि झिंक (zinc),आर्यन (Iron), आयोडीन (Iodine), मॅग्नेशिअम (Magnesium) आणि पोटॅशिअम (Potassium) यांचे योग्य प्रमाण असते.

  त्वचेसाठी मासे आहेत वरदान (Skin Benefits Of Eating Fish)

  shutterstock

  जर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर मात्र तुम्ही मासे खायलाच हवे. कारण मासे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. तुम्ही माशांचे सेवन केल्यानंतर तुमच्या त्वचेला नेमके काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

  1. व्हिटॅमिन C चे स्रोत (Source Of Vitamin C)

  त्वचा चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन C आवश्यक असते. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हे कळेल की माशांमध्ये याचे प्रमाण फार जास्त नसते. पण माशांच्या अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C असते असे काही मासे आहेत. ज्यांची अंडी आवडीने खाल्ली जातात. त्यांच्या सेवनामुळे तुम्हाला आवश्यक पुरवठा होऊ शकतो. आणि तुमची त्वचा चांगली होण्यास मदत मिळू शकते.

  2. चांगल्या अँटीऑक्सिडंटचा समावेश (Good Antioxidant)

  तुमच्या त्वचेसाठी काही अँटीऑक्सिडंट चांगली असतात त्यापैकीच अमिनो अॅसिड, अॅस्कॉर्बिक अॅसिड आणि काही फोनिक कपाऊंडस असतात त्यामुळे तुमची त्वचा कायम चांगली राहण्यास मदत होते.

  3. त्वचा ठेवते तजेलदार (Keeps Skin Moisture)

  माशांमध्ये असलेले फिश ऑईल तुमच्या त्वचेसाठी चांगले असते. फिश ऑईलमध्ये व्हिटॅमिन E असते. शिवाय माशांमध्ये असलेले फॅटी अॅसिड तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला तजेला देण्यास मदत करते. जर तुम्ही मासे खाणाऱ्यांची त्वचा पाहिली तर तुम्हाला त्यांच्या त्वचेवर एक वेगळीच चमक दिसेल. जी तुम्हालाही हवीहवीशी वाटेल.

  4. त्वचेचा पोत सुधारते (Improves Skin Texture)

  जर तुम्हाला त्वचेसंदर्भात अनेक तक्रारी असतील. तुम्हाला पिंपल्स येत असतील किंवा तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर तुम्हाला फिश सप्लिमेंटच्या गोळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फिश ऑईल चांगले असते. तर मग तुम्ही चांगल्या त्वचेसाठी माशांचे सेवन करणे नेहमीच योग्य असते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी माशाचे सेवन करा.

  5. अतिनील किरणांपासून ठेवते सुरक्षित (Protects From UV Rays)

  माशांमध्ये असलेलं तेल हे एक प्रकारे सनस्क्रिन आहे. तुमच्या त्वचेवर ते एक सुरक्षित आवरण तयार करत असते. माशांच्या खाण्यामुळे तुमच्या त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार होते. असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करायचे असेल तर तुम्ही अगदी आवर्जून मासे खा. 

  मासे देतील सुंदर केस (Hair Quality Improves)

  shutterstock

  चांगले केस हवे असतील तर तुम्हाला मासे खाणे फारच गरजेचे आहे. कारण माशांच्या सेवनामुळे तुम्हाला अपेक्षित असलेले केस मिळतात. जाणून घेऊया मासे खाण्याचे केसांवर होणारे परिणाम

  1. केस होतात दाट (Increases Hair Density)

  केस लांब असण्यापेक्षा ते दाट असणे फारच गरजेचे असते. तुमचे केसही पातळ असतील तर तुम्ही माशांचे सेवन अगदी हमखास करायला हवे. माशांमध्ये मध्ये असलेले ओमेगा -3 आणि 6 हे केसांना दाट करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही माशांचे सेवन सुरु केल्यानंतर महिन्याभरात तुम्हाला हा बदल दिसू लागतो.

  2. केसगळती होते कमी (Reduces Hair Fall)

  केसगळतीचा त्रासही अनेक महिलांना असतो. ज्यापद्धतीने केसांना दाट करण्याचे काम माशांमध्ये असलेले ओमेगा करते. अगदी त्याच पद्धतीने केसांची मूळ घट्ट करण्याचे काम मासे करत असतात. केसांची मूळ घट्ट झाली की केसगळती आपोआप थांबते.

  3. केसांच्या वाढीला देते चालना (Promotes Hair Growth)

  काही जणांचे केस फारच छान असतात पण म्हणावे तसे ते पटपट वाढत नाही. तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल तर तुमच्या आहारात काही महत्वाच्या गोष्टी नाहीत असे समजावे. तुमच्या आहारात जर मासे असतील तर त्यामधील पोषक घटक तुमच्या केसांच्या वाढीला अगदी हमखास चालना देतात. फॅटी अॅसिड आणि ओमेगा हे वाढीला चालना देतात.

  4. केसांचा रंग टिकवते.(Protects Hair Color)

  अकाली केस गळतीचा त्रास तुम्हाला असेल तर तुमच्यासाठी मासे वरदान आहे. माशांमधील आवश्यक तेल आणि प्रोटीन तुमच्या केसांचा काळा रंग टिकवण्यास मदत करते. तुमचे केस अधिक चांगले आणि सुंदर दिसू लागतात. काळेभोर केस दिसायलाही आकर्षक दिसतात.

  5. केसांना देते चमक (Shiny Hair)

  केस नुसते वाढून चालत नाही. तर तुमचे केस चमकदारही असावे लागतात. तुमच्या केसांना अशी चमक हवी असेल तर मासे खा. कारण माशांमध्ये असलेले तेल, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तुमच्या केसांची चमक वाढवतात.

  आरोग्यासाठी फायदेशीर आहेत मासे खाणे (Health Benefits Of Eating Fish)

  shutterstock

  तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी मासे किती फायदेशीर आहे हे तुम्हाला आता कळलंच असेल पण तुमच्या आरोग्यासाठी मासे हे कसे फायदेशीर आहेत ते कसे हे जाणून घेऊया

  1. पोषकतत्वांचा भंडार (Rich Source Of Nutrients)

  माशांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक असतात. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. तुमचे वजन नियंत्रित राहण्यापासून ते तुम्हाला निरोगी ठेवण्यापर्यंत तुम्हाला ते मदत करु शकते. त्यामुळे जर तुम्हाला आवश्यक असलेले पोषक घटक हवे असतील तर तुम्ही मासे खायला हवे.

  2. मेंदूला देते चालना (Boosts Brain)

  माशांमध्ये असलेले तेल जर तुमच्या त्वचा आणि केसांसाठी चांगले आहे. तर ते तुमच्या बुद्धीला चालना देते. तुमच्या बुद्धीला तल्लख करण्याचे काम मासे करु शकतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरी तुम्ही मासे खायला हवे. 

  3. डिप्रेशनमधून ठेवते दूर (Treats Depression)

  एका अभ्यासातून असे समोर आले आहे की जी माणसं मासे खातात ते कमी तणावाखाली असतात. या शिवाय सतत बदलणारे मूडही नियंत्रणात ठेवण्यास मासे मदत करतात. त्यामुळे तुम्ही आहारात माशांचा समावेश करायला हवा.

  4. अस्थमाचा त्रास होतो कमी (Prevents Asthma)

  माशांमुळे तुमचा अस्थमा कमी होतो हे तुम्ही ऐकले असेलच. एका ठराविक माशाच्या गिळण्यामुळे अस्थमा बरा होतो असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्हाला जर अस्थमा असेल तर तुम्ही मासा खायला हवा.

  फायबरयुक्त पदार्थ आणि फळं खाल्ल्यामुळे होणार फायदे (List of Fiber Rich Foods In Marathi)

  5. झोप सुधारते (Improves Sleep Quality)

  जर निद्रानाशाचा त्रास असेल तर मग तुम्ही मासे खायलाच हवे. माशांच्या सेवनामुळे तुमची झोप सुधारते. माशांमध्ये असलेले ओमेगा तुमची झोप सुधारण्यास मदत करते. एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की, जे आठवड्यातून तीन वेळा मासे खातात. त्यांची झोप चांगली असते. 

  मासे खाण्याचा विचार करत असाल तर ही घ्या हेल्दी माशांची यादी (Fish Is Good For Your Health)

  shutterstock

  आता तुम्ही मासे खाणारे असाल तर तुम्हाला आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या माशांची नावं सुद्धा माहीत हवीत. तुम्ही जर नव्याने मासे खाणार असाल तर तुम्ही पापलेट आणि कोळंबी या माशाने सुरुवात करा. हे मासे खाण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागत नाही. हे मासे चवीला छान असतात. या शिवाय मोठ्या माशांचा विचार करता तुम्हाला सुरमई, हलवा, बांगडा, जिताडा,रोहू, कटला, कर्ली असे काही मासेसुद्धा अगदी आरामात खाता येतील. लहान माशांमध्ये येणारे मांदेली, मोदकं, माकलं,ओला जवळा, बोंबील हे मासे चवीला फारच छान असतात आणि आरोग्यालाही. या व्यतिरिक्त टणक कवच असलेले मासे म्हणजे तिसऱ्या (शिंपल्या) आणि खेकडे हे देखील आरोग्यासाठी चांगले असून अनेकदा ते खाण्याचा सल्ला दिला जातो. 

  तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ's)

  shutterstock

  1. कोणत्या माशांमध्ये अधिक पोषकतत्व असतात?

  तुम्हाला जर मासे खायचे असतील तर बांगडा, सुरमई, कोळंबी, हलवा, पापलेट, टुना हे मासे खा. प्रत्यके माशामध्ये पोषक घटक असतात. पण कुठलाही मासा तुम्ही प्रमाणात खाणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात मासे खाल्ले तर तुम्हाला त्याचे फायदेच मिळतील. त्यामुळे कोणताही मासा खा. पण प्रमाणात

  2. मासे रोज खाल्ले तर चालतील का?

  आपल्याकडे माशाची कढी किंवा मासे फ्राय केले जातात. एका अभ्यासानुसार हे निदर्शनास आले आहे की, मासे आठवड्यातून दोन ते तीन दिवस खाणे योग्य आहे. जर तुम्ही रोज मासे खाल्ले तर तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते आणि तुमच्या शरीरातील फॅटही वाढू शकते. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळाच मासे खा.

  3. उत्तम आरोग्यासाठी चिकनपेक्षा मासे जास्त चांगले आहेत का?

  चिकन आणि मासे हे दोन्ही पौष्टिक असतात. चिकन आणि माशांमधून तुम्हाला चांगले प्रोटीन मिळते. चिकनच्या अतिसेवनामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. शिवाय ते पचायला थोडे जड असते. पण मासे हे आरोग्यासाठी चांगले असतात. उत्तम त्वचा आणि केसांसाठी ते चांगले असून ते पचण्यासही फार सोपे असते.

  #POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/