ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
तुम्हीही जिमला जाताना करता का मेकअप, मग हे वाचा

तुम्हीही जिमला जाताना करता का मेकअप, मग हे वाचा

आजकाल युवा पिढीमध्ये जीम जाण्याचा फिटनेस ट्रेंड आहे. पण जिममध्ये जातानाही स्टाईलिश दिसण्यासाठी युवापिढी अनेक गोष्टी करताना दिसते. मग ते स्टाईलिश जिम आऊटफिट असो वा मग एक्सेसरीज. जिममध्ये फिटनेससाठी घाम गाळण्यापेक्षा जास्त स्टाईलिश दिसण्यावर त्यांचा जास्त भर असतो. मग त्यासाठी मेकअपही केला जातो. पण तुम्हाला हे माहीत नाही की, जिममध्ये जाणं आणि व्यायाम करण्याआधी मेकअप करणं आणि इतरही काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल खालील लेखात –

  • मेकअप 

जिमला जाताना जर तुमच्या चेहऱ्यावर मेकअप असेल तर तो लगेच रिमूव्ह करा. ही सवय तुमच्या त्वचेसाठी घातक ठरू शकते. मेकअप तसाच ठेवून एक्ससरसाईज केल्यास यादरम्यान निघणाऱ्या सीबम आणि घाम तुमच्या त्वचेच्या छिद्रातून योग्य पद्धतीने बाहेर पडत नाही. ज्यामुळे नंतर पिंपल्स येऊ शकतात किंवा त्वचेसंबंधी समस्याही जाणवू शकते. 

  • डि‍ओड्रंट 

जिमला जाताना तुम्ही अँटीपर्सपिरेंट रोल ऑन किंवा डिओड्रंट लावून जातात. पण हे तुमच्यासाठी नंतर त्रासदायक ठरू शकतं. हे तुमच्या त्वचेच्या छिद्रांना बंद करतं. ज्यामुळे तुम्हाला खाज किंवा दुर्गंधीचा सामना करावा लागू शकतो. 

ADVERTISEMENT
  • केस मोकळं सोडणे 

एक्सरसाइजदरम्यान केसांमध्ये खूप घाम येतो. जे साहजिक आहे. त्यामुळे या दरम्यान जिममध्ये वर्कआऊठ करताना निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियाशी थेट संपर्क होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही केस मोकळे सोडले तर प्रयत्न करा की, तुमचे केस चेहऱ्यावर येऊ नये. यामुळे तुमची त्वचा बॅक्टेरियाच्या थेट संपर्कात येण्यापासून वाचेल.  

  • चेहऱ्याला वारंवार हात लावणे 

जिममध्ये आपण अनेक प्रकारची मशीन्स आपण वापरतो. पण ही मशीन्स अनेकजण वापरतात. त्यामुळे जिममध्ये शक्य असल्यास चेहऱ्याला कमीत कमी वेळा हात लावा किंवा स्पर्श करा. कारण हे सर्व तुमच्या त्वचेसाठी खूपच घातक आहे. कारण ज्या हातांनी तुम्ही एक्सससाईज मशीन्सना हात लावता तेव्हा त्यावर खूप बॅक्टेरिया असतात. त्यामुळे स्कीन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

  • स्किन इन्फेक्शन 

जिममध्ये मेकअप करून गेल्यास अजून एक होणारा दुष्परिणाम म्हणजे मेकअप हलका असो वा जास्त तुमची त्वचा थेट बॅक्टेरियाच्या संपर्कात येते. त्यामुळे त्वचेच्या स्कीनवर त्याचे दुष्परिणाम दिसणं साहजिक आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

स्वतःचा मेकओव्हर स्वतः करा, ‘ह्या’ खास मेकअप टीप्सने

ADVERTISEMENT

ओठांवरील लिपस्टिक काढण्याच्या या आहेत योग्य पद्धती

05 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT