ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
रोजच्या जीवनात कापूराचा असा वापर ठरेल फायदेशीर

रोजच्या जीवनात कापूराचा असा वापर ठरेल फायदेशीर

घरी पूजा असली की हमखास धूप आणि कापूर आणले जाते. या कापूराचा सुगंध अनेकांना आवडतो. या कापूराचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी नक्कीच करुन पाहिला असेल पण कापूराचा उपयोग तुम्हाला अन्य काही गोष्टींसाठीदेखील नक्की करता येईल. आज कापूराचे फायदे आणि धार्मिक महत्व जाणून घेऊया आणि कापूराचा वापर अन्य कसा करता येतील ते देखील पाहूया.

तुपाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Health Benefits Of Ghee In Marathi)

कापूराचे धार्मिक महत्व

Instagram

ADVERTISEMENT

घरी पूजा करताना नेहमी धूपासोबत कापूरही लावला जातो. कापराची डबी उघडल्यानंतर त्यातून येणारा सुंगध  कापूर जाळल्यानंतर त्यामधून येणारा मंद सुगंध हा घरात प्रसन्न वातावरण निर्माण करतो. त्यामुळे घरात जर सकारात्मक उर्जा हवी असेल तर देवासमोर नक्कीच कापूर लावा. याशिवाय कापराच्या मंद सुगंधाने वातावरण प्रसन्न झाल्यामुळे देवही प्रसन्न होतात असा समज आहे. 

 चेहऱ्याकरिता तुपाचे होणारे फायदे (Benefits Of Ghee For Face In Marathi)

पिंपल्स करते कमी

कापूर हे अँटीबायोटीक असल्यामुळे तुम्हाला त्याचा पिंपल्स कमी करण्यासाठीही करता येऊ शकतो. जर तुम्हाला पिंपल्स असतील आणि पिंपल्सचे डाग असतील तर ते कमी करण्यासाठी तुम्ही कापूराचा उपयोग करु शकता. बाजारात कापूराचे तेल मिळते. ते तुम्ही तुमच्या पिंपल्स आणि त्यांच्या डागांवर लावा. तुम्हाला तुमचे डाग कमी झालेले दिसेल. ( कोणत्याही त्वचेसाठी कापराचे तेल चालू शकते. पण तुमची त्वचा फारच नाजूक असेल तर त्याचा वापर करण्यापूर्वी सल्ला घ्या.)

जखम भरण्यास मदत

जखम भरण्यासाठीही कापूराचा उपयोग करु शकता. कापूराची गोळी चुरगळून तुम्हाला ती जखमेवर लावायची आहे. कापूरामुळे तुमच्या जखमेचे निर्जंतुकीकरण होते. तुमची जखम जलद गतीने सुकण्यास मदत होते. जखमेवर कापूर कुस्करुन लावा. तुम्हाला आराम मिळेल. त्यामुळे तुम्ही जखम सुकण्यासाठी कापूराचा उपयोग नक्की करा.

ADVERTISEMENT

 

केसांच्या वाढीसाठी कापूर चांगला

Instagram

केसांच्या वाढीसाठी कापूराचा उपयोग केला जातो. म्हणजे तुम्हाला उवा किंवा लिखांचा त्रास कमी करण्याचा उपयोग माहीत असेल तर त्यापलीकडे जाऊनही कापूराचा उपयोग केसांसाठी करु शकता. खोबरेल तेल गरम करुन त्यात कापराची गोळ्या टाका आणि हे तेल लावा. तुम्हाला केसांसंदर्भात असलेल्या तक्रारी कमी होतील. केसातील कोंडा कमी होऊन तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

सर्दीवर गुणकारी

अनेकांना सर्दी झाल्यानंतर नाक चोंदण्याचा त्रास असतो. नाक चोंदलेले असेल तर मग दिवस कसातरी जातो. अशावेळी तुम्हाला या त्रासापासून क्विक आराम हवा असेल तर तुम्ही गरम पाण्यात कापूर टाका आणि त्या पाण्याची वाफ घ्या तुमचे चोंदलेले नाक लगेच मोकळे होईल.

म्हणून घरात आवर्जून लावायला हवे धूप, जाणून घ्या फायदे

झोप लागते शांत

हल्ली मोबाईलच्या वेडापायी आपण झोपण्याची टाळाटाळ करतो. एकदा का झोपेची वेळ निघून गेली की, मग झोप येता येत नाही. अशावेळी कापूराचा छोटासा तुकडा घेऊन तो तुमच्या उशीजवळ चोळा. कापूराच्या मंद सुगंधाने तुम्हाला छान झोप लागते. 

आता पूजेव्यतिरिक्त कापूराचा असा वापर नक्की करुन पाहा. 

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

24 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT