लग्न आणि नातं म्हटलं की त्याबरोबर सेक्स करणं हा त्यातील अविभाज्य भाग आहे. प्रेम आहे तर सेक्स हा त्यातील महत्त्वाचा भाग. पण बऱ्याचदा काही जोडप्यांमध्ये हवं तितक्या प्रमाणात सेक्स होत नाही. काही वर्ष उलटून गेली की, सेक्स करण्याची इच्छा पुरूष अथवा स्त्री मध्ये कमी होते. पण असं नक्की का होतं? असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. खरं तर शरीरातील लोह अर्थात आयरनचं प्रमाण हे तुमचं सेक्स लाईफ प्रभावित करत असतं. पण जर हे प्रमाण कमी झालं तर महिला आणि पुरूष या दोघांमध्येही सेक्स करण्याचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळतं. तुम्हालाही अशा प्रकारची समस्या असेल तर तुमचं नातं नीट करण्यासाठी अथवा तुमच्यातील प्रेम आणि सेक्स लाईफ चांगली राखण्यासाठी तुम्ही एकदा आपल्या शरीरातील लोह प्रमाण किती आहे ते तपासून घ्या. सेक्स करण्याची इच्छा का होत नाही याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी हे कारण मुख्य असून आपण इतर कारणंही जाणून घेऊया.
ज्या महिलांच्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी आढळतं त्यांना आपल्या सेक्स लाईफमध्ये अजिबातच रस नसतो. आपल्या सेक्स लाईफची अजिबातच या महिला आनंदाने मजा घेऊ शकत नाहीत. याबरोबरच काही महिलांना मासिक पाळीच्या दिवसात जास्त रक्तस्राव किंंवा कमी रक्तस्राव अर्थात ब्लिडिंगचा त्रास असतो. सेक्समध्ये रूची नसल्याने त्यावरदेखील अधिक जास्त प्रमाणात परिणाम होताना दिसून येतो. याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे जर हे कारण असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याचा वेळेवर उपचार करून घ्यायला हवा.
तुमचा 'सेक्स मूड' तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!
ज्या पुरूषांच्या शरीरात लोहप्रमाण कमी असतं त्यांच्या सेक्स लाईफमध्ये खूपच परिणाम आणि त्रास होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोहप्रमाण कमी असल्याने सेक्स ड्राईव्हवर सर्वात जास्त वाईट परिणाम होतो. ज्यामुळे सेक्सची इच्छा कमी होते आणि त्यामुळे जर त्याच्या जोडीदाराला सेक्स हवं असेल तर त्याचा परिणाम नात्यावर जास्त नकारात्मक होतो. तसंच पुरूषांना इलेक्टाईल डिसफंक्शनच्या समस्येलादेखील यामुळे सामोरं जावं लागतं. ही दोन्ही लक्षणं एकाच वेळी तुम्हाला जाणवतील असंही नाही. बऱ्याचदा यापैकी एखादं लक्षण पटकन जाणवू शकतं.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवायचा आहे आणि त्याच्याबरोबर सेक्सचा आनंद घ्यायचा असतो. पण तुमचं शरीर थकलेलं असतं त्यामुळे सेक्स करण्याची इच्छा कमी होते. तुमचं शरीर आणि मन साथ देत नसेल तर सेक्स करण्याची इच्छा आपोआप कमी होते. हे लक्षण तुम्हाला सतत जाणवायला लागलं तर तुमच्यामध्ये लोहप्रमाण कमी आहे हे जाणून घ्या. तसंच हे लोह मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा मिळवून देण्याची गरज असते. तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तितक्याच ऊर्जेने आणि आनंदाने सेक्स करू शकता.
‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स
महिला अथवा पुरूष या दोघांनाही जर बेडवर गेल्यावर जर पायांमध्ये बेचैनी जाणवत असेल अथवा सतत जळजळ वा खाज पायांमध्ये येत असेल तर हे लोह शरीरात कमी असण्याचं लक्षण आहे. आराम करताना याची जाणीव होते. त्यामुळे बेडवर ही समस्या निर्माण होत असेल तर सेक्स करण्याची इच्छा कमी करण्याचं थकवा आणि अशा प्रकारे शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होणं हेदेखील आहे.
तुम्ही दिवसभर काम करत असाल अथवा तुमचा कोणत्याही गोष्टीतील मूड नसेल तर सेक्स करण्याची इच्छाशक्ती कमी होते. तुम्हाला जर अगदी डोक्यातही जास्त प्रमाणात दुखत असेल तर त्यामुळेदेखील असं होऊ शकतं. हे अतिशय कॉमन कारण आहे. या डोकेदुखीमुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा अजिबातच राहात नाही. त्यामुळे तुम्हाला यातून स्वतःलाच मार्ग काढायला हवा. योग्य वेळी औषधोपचार करून तुम्ही यातून मार्ग काढायला हवा. कारण तसं न केल्यास, अशा व्यक्तींना अधिक निराशा आणि नैराश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे सेक्स करण्याची इच्छा कमी झाली असल्यास, तुम्ही त्यावर तोडगा काढणंही गरेजचं आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.