थंडीचे दिवस आता हळूहळू सुरू झाले आहेत आणि त्याचा परिणाम होतो तो त्वचेवर. थंडीमुळे त्वचा कोरडी होऊ लागते. थंडीमध्ये तर त्वचेची खूपच त्रासदायक स्थिती होते. यादरम्यान कोरडी त्वचा झाल्यास ती फुटते आणि त्याचा अधिक त्रास होतो. तर ज्यांची त्वचा पहिल्यापासून कोरडी असते त्यांना थंडीमध्ये अधिक त्रास होतो आणि अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. काही जण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि आपली त्वचा थंडीमध्ये मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी घरातील वस्तूंचा वापर करतात. प्रत्येकाने थंडीत आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य उत्पादन आणि योग्य गोष्टींचा वापर करायला हवा. बऱ्याचदा कोणत्याही मॉईस्चराईजर अथवा लोशन्सचा वापर करण्यात येतो. पण तुम्हाला आपल्या कोरड्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर नक्कीच त्वचेची अधिक काळजी घ्यायला हवी. त्वचा कोरडी होत असेल तर काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. तुम्ही नक्की त्याचा वापर करून तुमची त्वचा मऊ आणि मुलायम ठेऊ शकता.
मॉईस्चराईजर लावण्याची सवय लावा
Shutterstock
खरं तर मॉईस्चराईजरचा उपयोग हा बारा महिने करायला हवा. पण थंडीत याचा उपयोग करायलाच हवा. थंडीत त्वचा कोरडी पडण्याचं कारण म्हणजे त्वचेतील मॉईस्चर कमी होत असतं. त्यामुळे त्वचा मऊ ठेवण्यासाठी शिया बटर अथवा बी वॅक्सयुक्त मॉईस्चराईजरचा वापर करण्याची सवय तुम्ही लावून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना तुमची त्वचा मॉईस्चराईज करायला विसरू नका. कारण रात्री हवेत जास्त प्रमाणात गारवा असतो. त्याचा तुमच्या त्वचेवर जास्त परिणाम होत असतो.
मॉईस्चराईजर निवडताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी
व्हॅसलिन सर्वात जवळचा मित्र
Shutterstock
कोरडी त्वचा, हाताचा कोपरा अथवा गुडघे यासाठी तुम्हाला जर थंडीमध्ये कोणतंही क्रिम वापरायचं असेल तर त्यासाठी व्हॅसलिन हा योग्य उपाय आहे. लिप बामपासून ते फूट क्रिम आणि मेकअप रिमूव्हर म्हणून तुम्ही कुठेही व्हॅसलीनचा वापर करू शकता. तसंच यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होती. त्यामुळे थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होत असेल तर तुम्ही व्हॅसलीनचा वापर करा.
अति गरम पाण्याने आंघोळ करू नका
Shuttestock
थंडीमध्ये गरम गरम पाण्याने आंघोळ करणं कोणाला नाही आवडत. उलट थंडीमध्ये गरम पाण्यात जास्त वेळ आंघोळ केली जाते. पण अति गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमची त्वचा अधिक कोरडी होते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला थंडीत कितीही गरम पाण्यात बसावं वाटत असेल तरी तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेऊन नियमित वापरण्यात येणाऱ्या गरम पाण्यानेच आंघोळ करा. गरम पाणी हे त्वचेतील नैसर्गिक तेल शोषून घेतं, त्यामुळे त्वचा कोरडी होते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे अति गरम पाण्याने आंघोळ करू नका.
गुलाबी ओठांसाठी करा टूथब्रशचा वापर
Shutterstock
थंडीमध्ये ओठही कोरडे होतात आणि फुटतात. त्यामुळे रात्री झोपताना तुम्ही ओठांना क्रिम अथवा लोशन लावून झोपा. त्यानंतर सकाळी उठून तुम्ही ओठांवर टूथब्रशने हलकं हलकं घासून घ्या. असं केल्याने तुमचे कोरडे ओठ हे मऊ आणि मुलायम राहतात.
हात नेहमी मऊ ठेवायचे असतील तर वापरा 10 टिप्स
नारळाच्या तेलाचा उपयोग
Shutterstock
त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही थंडीत नारळाच्या तेलाचा उपयोग करून घेऊ शकता. नारळाचं तेल केवळ केसांसाठीच नाही तर तुमच्या शरीराला थंडीत उपयोगी ठरतं. रोज आंघोळीच्या आधी एक तास तुम्ही नारळ तेलाने शरीर आणि चेहऱ्याला मसाज केलात आणि मग आंघोळ केली तर तुमची त्वचा कधीही कोरडी होणार नाही.
साबणाचा वापर करू नका
Shutterstock
थंडीमध्ये त्वचा कोरडी होत असेल तर साबणाचा वापर करू नका. त्याचप्रमाणे स्क्रबचाही वापर करू नका. यामुळे तुमच्या त्वचेमधील मॉईस्चराईजर निघून जातं आणि तुमचे चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होतात. त्यामुळे याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. त्याचप्रमाणे साबणाने तुमची त्वचा अधिक कोरडी होते. साबणाऐवजी आपण अँटीबैक्टीरियल शॉवर जेल वापरुन पाहू शकता.
त्वचेवर लावा या गोष्टी
Shutterstock
थंडीमध्ये चेहरा आणि शरीरावर तुम्ही त्वचा कोरडी न पडण्यासाठी ग्लिसरीन, लिंबू आणि 3-4 थेंब गुलाबपाणी करून याचं मिश्रण करून लावण्याची गरज आहे. हे मिश्रण तयार करून तुम्ही ठेऊन द्या आणि त्याचा रोज वापर करा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राखण्यास मदत होते.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.