ADVERTISEMENT
home / Fitness
रोज पोळी खात असाल तर जाणून घ्या किती आहे फायदेशीर

रोज पोळी खात असाल तर जाणून घ्या किती आहे फायदेशीर

तुम्हाला रोज जेवणात पोळी खायला हवीच असते का? खरं तर पोळी हा आपल्या जेवणातील अविभाज्य भाग आहे. कोणतीही भाजी वा आमटी, कढीसह आपण सहज पोळी खाऊ शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण जी पोळी रोज जेवणात खातो त्याचा आपल्या शरीराला किती फायदा होतो. खरं तर पोळी ही आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पण लहानपणापासून आपण हा विचारच कधी करत नाही की आपल्याला इतकी पोळी खातो त्याचा नक्की काय फायदा होतो. पोळीमध्ये अनेक तत्व असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक ठरतात. त्यामुळे रोज पोळी खात असाल तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो. या लेखातून आपण पाहूया की नक्की कशी ठरते आपल्या शरीरासाठी पोळी फायदेशीर. 

पोळी हा डाएटचा महत्त्वाचा भाग

Shtterstock

पोळी हा आपल्या भारतीय डाएटचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. विटामिन (B1, B2, B3, B6 आणि B9), लोह, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम या सगळ्या घटकांचा पोळीध्ये समावेश असतो. नुसत्या पोळीमध्ये सॉल्युबल फायबर्स असतात जे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी घटवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच तुम्हाला बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासूनही दूर ठेवण्यास मदत करतात.  तुमची पचनक्रिया चांगली राखण्यासाठी पोळीचा उपयोग होतो. यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात जे तुम्हाला एनर्जी द्यायचं काम करतात. पोळी तेल न लावता रोज खाल्ली तर तुमच्या शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. 

ADVERTISEMENT

पदार्थांचे असे ‘कॉम्बिनेशन’ आरोग्यासाठी ठरु शकते घातक

त्वचा चांगली राखण्यासही पोळीची होते मदत

Shutterstock

पोळीमध्ये झिंक आणि मिनरल्सचं प्रमाण असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा पोळी रोज खाता तेव्हा या घटकांमुळे तुमची त्वचा अधिक चांगली राखण्यासाठी मदत होते. तुम्हाला कदाचित हे वाचल्यानंतर खरं वाटणार नाही. पण ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जरी पोळी आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात पोळीचा समावेश नक्कीच करून घ्यायला हवा. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळेल. 

ADVERTISEMENT

दुपारच्या जेवणात या पदार्थांचा समावेश असेल… तर तुम्ही राहाल निरोगी

पचनक्रिया होते सुरळीत

Shutterstock

तुम्हाला जर तुमची पचनक्रिया सुरळीत सुरू राहायला हवी असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात पोळी खायलाच हवी. खरं तर बरेच जण पोळीपेक्षा भात जास्त आवडीने खातात. पण भातापेक्षाही पोळी पचायला हलकी असून यामध्ये असणारे सॉल्युबल फायबर्स हे पोळी पचवण्यासाठी अत्यंत चांगले असतात. त्यामुळे तुम्ही जर फक्त भात खात असाल तर असं करू नका. तुमच्या शरीरातील पचनक्रिया चांगली करण्यासाठी तुम्ही किमान एक पोळी तरी रोजच्या जेवणात खा. तुम्ही पोळी खातच असाल तर तुम्हाला नक्कीच पचनक्रियेच्या समस्या येत नसतील. 

ADVERTISEMENT

शिळी पोळी खाल्ल्याने होतात फायदे, जाणून व्हाल हैराण

रोज पोळी खाणं योग्य की अयोग्य?

Shutterstock

असा प्रश्न बरेचदा सर्वांना असतो. खरं तर पोळीचे पोषक तत्व इतकं जास्त आहे की, रोज पोळी खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचं तुमच्या शरीराला नुकसान होत नाही तर तुमच्या शरीराला फायदाच होतो. रोज गव्हाचीच पोळी नको असेल तर तुम्ही मल्टीग्रेन, बेसनाची पोळी, बाजरीची पोळी असेही प्रकार रोजच्या जेवणामध्ये ट्राय करू शकता. रोज पोळी खाल्ल्याने पोट पटकन भरतं. इतर सगळ्या वस्तू खात बसण्याची गरज भासत नाही आणि तुमचं वजन नियंत्रणात राखण्यासही तुम्हाला मदत मिळते. पोळीमुळे तुमच्या शरीराला अधिक प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज पोळी खाणं योग्यच आहे. 

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

01 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT