ADVERTISEMENT
home / सौंदर्य
कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, घ्या टॉप 20 लिप बामची यादी (Lip Balm For Dry Lips)

कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, घ्या टॉप 20 लिप बामची यादी (Lip Balm For Dry Lips)

ओठ आपल्या शरीराचे एक नाजूक आणि महत्त्वाचा अंग आहे. मऊ-गुलाबी ओठांमुळे आपलं सौंदर्य अधिक खुलते. पण कोरड्या, शुष्क आणि फाटलेल्या ओठांमुळे कित्येक समस्या निर्माण होतात. कित्येकदा फाटलेल्या ओठांमधून रक्तस्राव होतो, यामुळे असह्य अशा वेदना देखील होतात. अशा वेळेस ओठांना नैसर्गिक ओलावा मिळणं अतिशय गरजेचं असते. जेणेकरून ओठांवरील मृत त्वचा निघून आपले ओठ मऊ आणि गुलाबी राहण्यास मदत होईल. योग्य वेळीच काळजी घेतली नाही तर ओठांचे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या ओठांवर लिप ग्लोस किंवा लिप बाम लावणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे.

ओठ फाटणे आणि कोरडे होण्यामागील कारणे (Causes Of Chapped And Dry Lips)

बहुतांश वेळा बदलत्या वातावरणामुळे ओठ कोरडे होतात, ओठांची जळजळ होते किंवा ते फाटतात. तसंच वारंवार तोंडातून येणारी लाळ, ओठांना जीभेनं चाटणे, दातांनी चावणे, अति प्रमाणात तिखट अन्नपदार्थ  खाणे, तीव्र उन्हाळा, कडाक्याची थंडी, सर्दी-खोकला, तापामुळे, पोषक जीवनसत्त्वांची कमतरता, ओठांचे आरोग्य बिघडते. काही औषधोपचारांमुळेही ओठ फाटण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

वाचा : गरम पाणी पिणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, तुमचं आरोग्य आहे धोक्यात

ADVERTISEMENT

कोरड्या आणि फाटलेल्या ओठांसाठी वापरा हे बेस्ट 20 लिप बाम (Lip Balm For Chapped And Dry Lips)

बहुतांश जण एखादं ब्युटी प्रोडक्ट घेताना 100 वेळा विचार करतात. एखादं कॉस्मेटिक प्रोडक्ट वापल्यानं माझ्या त्वचेवर दुष्परिणाम होणार नाहीत ना, असा विचार सतत त्यांच्या डोक्यात घिरट्या घालत असतो. ओठांसाठी लिपस्टिक किंवा लिप बाम खरेदी करतानाही हीच परिस्थित असते. लिप बामही खरेदी करताना तुम्हाला बरंच टेन्शन येत असेल तर साईड इफेक्ट्सचा विचार बाजूला ठेवा आणि आम्ही तुमच्यासाठी आणलेली बेस्ट 20 लिप बामची माहिती जाणून घ्या. गुळगुळीत ओठांसाठी चांगले लिप ग्लॉस वापरुन पहा.

1. Vaseline Original Petroleum Jelly

तुम्हाला सुगंधित लिप बाम आवडत नसतील तर व्हॅसलिनचं प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. या जेलीमध्ये तीन थर आहेत, सर्व प्रकारच्या अशुद्धीपासून तुमच्या ओठांचं संरक्षण होते. यामध्ये 100% शुद्ध पेट्रोलियम जेलीचा समावेश आहे. या लिप बामच्या वापरामुळे  कोरडे ओठ मऊ होतात. 
फायदे : 
1. खिशाला परवडणारे प्रोडक्ट
2. कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी फायदेशीर
3. डोळ्यांच्या आसपासच्या भागातही व्हॅसलिन वापरणे सुरक्षित
4. ओठांना ओलावा मिळतो
तोटे : 
1. व्हेसलिन लिप बामचा थर जाड असल्यानं मेकपूर्वी वापरणं कठीण 
2. संवेदनशील त्वचेच्या समस्या असल्यास वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
3. व्हेसलिन लिप बाम पूर्णतः त्वचा शोषून घेत नाही 
4. सनबर्न किंवा उन्हापासून संरक्षण करत नाही

वाचा : चेहर्‍यासाठी तांदळाच्या पिठाचे फायदे

2. Rosebud Perfume Co. Smith’s Minted Rose Lip Balm

हा लिप बाम वापरासाठी अतिशय सोपा असा आहे. ओठांची होणारी जळजळ, कोरडेपणा आणि फाटलेले ओठ दुरुस्त करण्याचं काम हा लिप बाम करतं. हे प्रोडक्ट तुम्ही रात्रभर ओठांवर तसंच कोपर-गुडघ्यांवरही लावू शकता. हे प्रोडक्ट अतिशय लोकप्रिय आहे.
फायदे
1. गोडसर सुगंध
2. फाटलेले, कोरडे आणि जळजळणाऱ्या ओठांची समस्यांपासून सुटका
3. बहुउद्देशीय बाम
4. संवेदनशील ओठांसाठी उत्तम
तोटे
टिन पॅकेजिंगमुळे उघडण्यास कठीण
उन्हात प्रोडक्ट वितळण्याची शक्यता

ADVERTISEMENT

वाचा : हेल्दी आणि हॉट दिसायचंय? त्वचा, केस,आरोग्यासाठी पेपरमिंट ऑईल आहे बहुगुणकारी

3. Burt’s Bees 100% Natural Medicated Moisturizing Lip Balm

तुमच्या बॅगमध्ये हा लिप बाम ठेवलाच पाहिजे. कारण कोरड्या आणि शुष्क ओठांसाठी Burt’s Bees लिप बाम सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रोडक्टमध्ये लोण्याचा समावेश आहे. यापासून ओठांना नैसर्गिक ओलावा मिळाल्यानं ओठ मऊ होण्यास मदत होते. त्वचेच्या देखभालीसाठी ऑरगॅनिक प्रोडक्ट वापरणं पसंत असल्यास तुम्हाला हा लिप बाम नक्कीच आवडेल.
फायदे
1.100 टक्के नैसर्गिक घटकांचा समावेश
2. पॅराबेन्स, फाथलेट्स आणि एसएलएस (SLS) मुक्त
3. कोको, कोकम आणि शिया बटरयुक्त मॉईश्चरायझर
4.थंडी-तापामुळे येणाऱ्या ओठांच्या भागात येणारे फोड आणि खाजेपासून सुटका करण्यास मदत होते
5. परवडणारे आणि सहज उपलब्ध
तोटे 
मेन्थॉल आणि निलगिरीचा अर्क असल्यानं अत्यंत संवेदनशील ओठांना त्रास होऊ शकतो

4. Neosporin Lip Health Overnight Renewal Therapy

ओठांची देखभाल करण्यासाठी तसंच त्यांच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी रात्रीची वेळ सर्वात योग्य आहे. मऊ ओठांसाठी हा लिप बाम रात्री झोपण्यापूर्वी लावावा. पण या प्रोडक्टच्या वापरामुळे ओठ पांढरे पडतात. पण सकाळी उठल्यानंतर ओठ कोमट पाण्यानं स्वच्छ धुतल्यानंतर मृत त्वचा निघते. वृद्धत्वाची लक्षणंही कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे प्रोडक्ट ओठांसाठी अतिशय सौम्य असे आहे.
फायदे
1.कोरड्या ओठांना हायड्रे आणि मऊ करतात
2.सुगंध विरहित (Fragrance-free)
3. व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडेंट्स
4. तीन रात्रींच्या वापरानंतर तुम्ही चांगला परिणाम अनुभवाल
5.परवडणारे आणि सहज उपलब्ध
तोटे
त्वचेवर एक शुभ्र डाग (Whitish Cast) दिसतो

वाचा – परफ्युमचे होणारे दुष्परिणाम

ADVERTISEMENT

5. Blistex Daily Conditioning Treatment

Blistex Daily Conditioning Treatment मधून तुम्हाला पोषक जीवनसत्त्वे, मॉईश्चरायझर, कडाक्याच्या थंडीपासून ओठांचे संरक्षण करणारे गुणधर्ण मिळतात, ज्यामुळे तुमचे ओठ निरोगी राहण्यास मदत होते. हा लिपबाम औषधी गुणधर्म, SPF 20 युक्त आणि PABA मुक्त  मिळते. कडाक्याचा हिवाळा किंवा उन्हाळ्यापासून ओठांचं संरक्षण करायचे असल्यास Blistex Daily Conditioning Treatment वापरून पाहा. हा लिप बाम तुम्ही रात्रभर देखील ओठांवर लावू ठेवू शकता.
फायदे
1.कोरड्या आणि फुटलेल्या ओठांपासून सुटका होण्यास मदत
2. सुगंध विरहित
3. लिप बाममध्ये कोणताही चमकदार पदार्थ नाही
4. SPF प्रोटेक्शन मिळते
5. खिशाला परवडणारे आणि सहज उपलब्ध
तोटे
अॅलर्जी किंवा अत्यंत संवेदनशील असलेल्या त्वचेसाठी योग्य नाही

6. Aquaphor Immediate Relief Lip Repair

फाटलेल्या आणि कोरड्या ओठांसाठी हा लिप बाप अतिशय प्रभावी असा आहे. नियमित लिप बाम लावल्यास कोरड्या ओठांपासून तुम्हाला लगेचच मुक्तता मिळते. याचा फरक तुम्ही स्वतः देखील अनुभवाल. बहुतांश जणांना लिप बामचा जाडसर थर पसंत नसतो.  हा लिप बाम जेल स्वरुपात आहे. ओठांव्यतिरिक्त कोरडी त्वचा, सनबर्न किंवा डायपरमुळे लाल होणाऱ्या त्वचेवरही तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकतात. एकूण हे प्रोडक्ट मल्टिपर्पज (बहुउद्देशीय) आहे.
फायदे
1.कोरड्या आणि फाटलेल्या ओठांचं आरोग्य सुधारते
2. शिया बटर आणि व्हिटॅमिन ईचे घटक आहेत
3. ओठांची जळजळ होत नाही
4. सुगंध विरहित आणि Paraben मुक्त
5. खिशाला परवडणारे
तोटे
प्रत्येक 3 ते 4 तासांनी ओठांवर लिप बाम लावण्याची आवश्यकता

7. Laneige Lip Sleeping Mask

कोरड्या ओठांपासून सुटका करून घ्यायची असल्यास Laneige Lip Sleeping Mask नक्की वापरू पाहा. रात्रभर हा मास्क ओठांवर लावून ठेवावा. या मास्कच्या वापरामुळे कोरडे ओठ आणि त्यावरील सूक्ष्म रेषा कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट, बी असलेल्या विविध फळांचं मिश्रण आणि हायलोरोनिक अॅसिडचे घटक यामध्ये आहेत. हा मास्क त्वचा लगेचच शोषून घेण्याचं काम करते आणि यापासून तुमचे ओठ मऊ तसंच निरोगी होतात. हे प्रोडक्ट पॅराबेनमुक्त आहे.
फायदे
1.ओठांना एक्सफॉलिएट करते
2. ओठ मऊ आणि निरोग होतात
3. चिकट स्वरुपात नाही
4. वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध
5. खिशाला परवडणारे
तोटे
लिप बामला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आहे. ओठांवर लावल्यानंतर त्याचा सुगंध कायम राहतो.

8. Palmer’s Cocoa Butter Formula Swivel Stick

तुम्हाला कोकोआ बटरचा सुगंध अतिशय आवडत असल्यास या लिप बामची आपल्या ओठांच्या सौंदर्यासाठी निवड करावी. केवळ सुगंधच नाही तर यापासून कोरड्या ओठांसह त्वचेलाही उत्तम मॉईश्चरायझर मिळते. कोकोआ बटर आणि व्हिटॅमिन ईचे घटक तुमच्या ओठांना दिवसभर हायड्रेटेड ठेवण्याचं काम करतात.
फायदे
1. ओठांना हायड्रेट आणि मॉईश्चराइझ करते
2. बहुउद्देशीय फायदे
3. त्वचा लगेचच शोषून घेते
4. लिप बामचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात  
5. खिशाला परवडणारी किंमत
तोटे
मिनरल्स ऑईल आणि सुगंधीयुक्ती

ADVERTISEMENT

9. Glossier Balm Dotcom Universal Skin Salve

अतिशय सुंदर ट्युब पॅकिंगमध्ये मिळणार हा लिप बाम बाजारात चार निरनिराळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. ओरिजिनल, चेरी, कोकोनट आणि रोझ असे चार फ्लेवर्स आहेत. हायपोअॅलर्जेनिक फॉर्म्युलायुक्त आणि पॅराबेन फ्री असं हे प्रोडक्ट आहे. ओठ, एखाद्या त्वचारोग, कोपर, आवश्यकता असेल तिथे तुम्ही हा बाम लावू शकता. पण वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याच्या वापरामुळे तुमचे ओठ योग्य पद्धतीनं मॉईश्चरायज होतात.
फायदे
1.बहुउद्देशीय आणि फायदेशीर लाभ
2. कोरड्या ओठांना मऊ करते
3. सौम्य सनबर्न आणि जखम बरी करते
4. सुगंध विरहित (Original)
तोटे
केवळ ऑनलाइन उपलब्ध 

10. EOS Smooth Sphere Lip Balm

EOS Smooth Sphere Lip Balm ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहे. अंड्याच्या आकाराच्या डिझाइनच्या पॅकिंगला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. हा बाम मध्यम जाडसर स्वरुपात आहे, पण ओठांवर लावल्यानंतर अजिबात चमकदार असा दिसत नाही. तुम्हाला गोडसर सुगंधाचा लिप बाम आवडत असल्यास हा पर्याय निवडावा. ओठांच्या देखभालीसाठी हे प्रोडक्ट अतिशय चांगले आहे.
फायदे
1. जाडसर आणि मॉईश्चरायझिंग टेक्स्चर आहे
2. लिपस्टिक लावण्यापूर्वी हा लिप बाम लावू शकता
3. सौम्य, फळांसारखा सुगंध
4. निरनिराळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध
तोटे
अतिशय फाटलेल्या ओठांवर वापरण्यासाठी अयोग्य

11. Fresh Sugar Lip Treatment Sunscreen SPF 15

लिप बाममध्ये साखर, कार्नाबा वॅक्स, जोजोबा सीड ऑईल आणि सूर्यफुलाच्या तेलाचे घटक आहेत. या लिप बाममुळे ओठ केवळ हायड्रेट होत नाहीत तर त्वचेच्या पेशींचीही चांगली वाढ होते. नैसर्गिक घटकांचा समावेश आल्यानं संवेदनशील ओठांना याचा त्रास होणार नाही. जर तुम्ही ऑरगॅनिक प्रोडक्ट्सचे चाहते आहात तर हा लिप बाम वापरून पाहावा. 
फायदे
1.ओठांना आर्द्रता देण्याचं काम करते
2. लिप बाम SPF 15 युक्त आहे
3. ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी हा लिप बाम बेस म्हणून लावू शकता
4. ओठांवरील बारीक रेषांची समस्या कमी होते
तोटे
खिशाला न परवडणारे प्रोडक्ट

12. Kiehl’s Lip Balm #1

Kiehl’s #1 lip balm मध्ये लॅनोलिन, व्हिट जर्म ऑईल आणि व्हिटॅमिन अ आणि ई चा समावेश आहे. हा लिप बाम ओठ लगेचच शोषून घेतात आणि ओठांना मऊ, नितळ, हायड्रेटेड करण्याचं कार्य करतात. लिपस्टिक लावण्यापूर्वी या लिप बामचा वापर तुम्ही करू शकता. या लिप बामला विशिष्ट असा रंग-सुगंध नसतो.
फायदे
1. ओठ अगदी सहजरित्या बाम शोषून घेतात
2. कोरडे, शुष्क आणि फाटलेले ओठे लवकर बरे करतात
3. निमयित वापरासाठी अतिशय सोपे
4. चमकदार घटक नाही
तोटे
पॅकिंगमुळे लिप बाम ओठांवर थेट वापरण्यास किंचितसे किचकट

ADVERTISEMENT

13.Nivea Smoothness Lip Care SPF 15

घराबाहेर असताना लिप बामचा वापर करावयाचा असल्यास हा एक उत्तम पर्याय आहे. लिपबाम चिकट, चमकदार स्वरुपात नाही. एखाद्या क्रिमप्रमाणे असलेला हा लिप बाम त्वचा अतिशय सहजपण शोषून घेते आणि ओठ मऊ-हायड्रेटेड करते. उन्हाळ्याच्या दिवसांसाठी तुम्ही खिशाला परवडणारे लिप बाम शोधत असाल तर Nivea ची निवड करायला हरकत नाही.
फायदे
1.कोरफड आणि शिया बटरयुक्त
2. दिवसभर ओठांना मोईश्चरायझज्ड ठेवते
3. नैसर्गिक स्वरुपात ओलावा मिळतो
4.ब्रॉड स्पेक्ट्रम एसपीएफ 15 मिळते
तोटे
ठराविक तासांनंतर पुन्हा वापरावं लागते

14. Korres Lip Butter

अतिशय फाटलेल्या ओठांसाठी हा लिप बाम वरदान ठरेल. भरपूर प्रमाणात बटर टेक्स्चर असलेल्या लिप बामुळे तुमच्या ओठांना अतिशय खोलवर मॉईश्चरायझर मिळते. पॅराबेन आणि सिंथेटिक्स मुक्त असे हे प्रोडक्ट आहे. विविध रंग आणि फ्लेवर्समध्ये हा लिप बाम उपलब्ध आहे.
फायदे
1.अतिशय सुंदर रंगांमध्ये उपलब्ध
2. सुंदर सुगंधामध्ये उपलब्ध
3. सर्वोत्तम मॉईश्चरायझिंगचा पर्याय
4.दीर्घ काळापर्यंत प्रभाव टिकतो
तोटे
निरुपयोगी टब पॅकिंग

15. Vaseline Creme Brulee Lip Therapy

तुम्हाला कॅरेमलयुक्त व्हॅनिलचा सुगंध पसंत असल्यास Vaseline Creme Brulee Lip Therapy तुम्हाला नक्कीच आवडेल. जाडसर असलेला हा लिप बाम रात्रभर ओठांना लावून ठेवावा. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कोरडे ओठ सौम्य झाल्याचा अनुभव येईल.  पण शक्यतो हे प्रोडक्ट घरामध्ये ठेवावे कारण उन्हामध्ये किंवा जास्त तापमान असलेल्या ठिकाणी लिप बाम वितळतो.
फायदे
1.ओठांना उत्तमरित्या मॉईश्चरायझ आणि हायड्रेटेड ठेवते
2. ओठांना मऊ ठेवण्याचं कार्य करते
3. खिशाला परवडणारे आणि सहज उपलब्ध
4. उत्तम पॅकिंग
तोटे
सुगंधीयुक्त

16. Bite Beauty Agave Lip Mask

मऊ आणि सुंदर ओठांसाठी हा लिप मास्क रात्रभर लावून ठेवावा. तुमच्या ओठांना ओलावा मिळेल. ग्लूटेन, पेट्रोकेमिकल्स, सल्फेट, पॅराबेनमुक्त असे हे प्रोडक्ट आहे. ओठांना अतिरिक्त संरक्षण आणि हायड्रेशनची आवश्यकता भासल्यास हा लिप मास्क तुमच्यासाठी वरदान ठरेल.
फायदे
1. अँटी-एजिंग ऑक्सिडेंन्ट्सचे गुणधर्म
2. मास्कचा थर पातळ स्वरुपात असला तरीही उत्तम मॉईश्चरायझ करते
3. दीर्घकाळ चांगला परिणाम मिळतो
तोटे
मास्क वापरण्यास थोडास किचकट वाटू शकते

ADVERTISEMENT

17. Sky Organics Lip Balm

ऑरगॅनिक असलेली हा लिप बाम स्ट्रॉबेरी, कोकनट, चेरी, व्हॅनिला आणि पेपरमिंट फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. या ब्रँडमध्ये नारळाचं तेल, व्हिटॅमिन ई, सूर्यफुलाचे तेल, रोझमेरी एक्सट्रॅक्ट, beeswax, calendula अशा सेंद्रिय घटकांचा समावेश आहे. ऑरगॅनिक प्रोडक्ट्स चाहत्यांनी याचा वापर नक्की करावा.
फायदे
1. ऑरगॅनिक आणि वीगन
2. ओठांना हायड्रेट आणि मॉईश्चरायझ करते
3.लहान मुलांना वापरण्यासाठी योग्य
तोटे
प्रोडक्टमध्ये एसपीएफ उपलब्ध नाही

18. Chapstick Total Hydration 3 In 1 Lip Care

अतिशय संवेदनशील ओठ असतील तर Chapstick Total Hydration 3 In 1 Lip Care हून चांगला पर्याय तुम्हाला शोधून सापडणार नाही. क्रिमी फॉर्म्युला असल्यानं तुमच्या कोरड्या ओठांची समस्या दूर होते आणि ओठ चांगल्या पद्धतीनं मॉईश्चरायझ होतात. स्वस्त आणि मस्त प्रोडक्टच्या शोधात असाल तर हा लिप केयर वापरू पाहायला हरकत नाही.
फायदे
1.ओठ मऊ आणि निरोगी होण्यास मदत
2. खिशाला परवडणारे आणि सहज उपलब्ध
3. ओठ हायड्रेटेड राहतात
3. सल्फेट आणि पॅराबेन मुक्त प्रोडक्ट
तोटे
प्रोडक्टमध्ये एसपीएफ उपलब्ध नाही

19. Jack Black Intense Therapy Lip Balm SPF 25

Jack Black Intense Therapy Lip Balm निरनिराळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये उपलब्ध आहे. पेपरमिंट, द्राक्ष, ब्लॅकबेरी आणि शीया बटरचा पर्याय तुम्ही तुमच्या ओठांच्या स्थितीवरून निवडू शकता. रक्तस्त्राव होणाऱ्या, फाटलेल्या आणि कोरड्या ओठांसाठी हा पर्याय योग्य आहे. कारण हा लिप बाम अत्यंत खोलवर ओठांना मॉईश्चरायझ करते. उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही ऋतूंमध्ये तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता.
फायदे
1. हायड्रेटिंग
2. SPF 25
3. पॅराबेन्स, सल्फेट्स आणि फिथलेट्सपासून मुक्त
तोटे
पेपरमिंटचे घटक संवेदनशील ओठांसाठी फायदेशीर ठरणार नाही

20. Maybelline Baby Lips Moisturizing Lip Balm

Maybelline Baby Lips Balm चीअतिशय सुंदर आणि आगळीवेगळी पॅकिंगच ग्राहकांना आकर्षित करते. पांढऱ्या रंगाचा असलेल्या लिप बामला लिंबासारखा सौम्य सुगंध आहे. तुमचे ओठ अतिशय कोरडे असतील तर या लिप बाम वापरामुळे तुमची समस्या कमी होईल. खूपच कोरडे, फाटलेले ओठांच्या समस्येसाठी यासारख्या औषधी उत्पादनासारखे पर्याय अधिक प्रभावी ठरतील.
फायदे
1.ओठांना पोषण आणि आर्द्रता मिळते
2. SPF 20
3. वजनानं हलक्या स्वरुपात आणि सहजरित्या शोषून घेते
4. खिशाला परवडणारे आणि सहज उपलब्ध
तोटे
ठराविक तासांनंतर ओठांवर पुन्हा लिप बाम लावावा लागतो

ADVERTISEMENT

लिप बाम वापरण्यासंदर्भातील प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. ओठांची त्वचा फाटल्यास काय करावे?

जिभेनं ओठ चाटू नये, चांगल्या दर्जाचा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य लिप बाम वापरावा. कापूर, निलगिरी आणि मेंथॉलचे घटक असलेला लिप बाम वापरणं टाळावं. ओठांना रगडू नये किंवा ब्रशदेखील करू नये. रात्री झोपताना लिप बाम लावल्यास चांगले परिणाम मिळतील.

2. कोणत्या पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे ओठ फाटतात?

व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे ओठ फाटण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे ओठ कोरडे होतात, ओठांच्या कोपऱ्यात बारीक पुरळदेखील येतात. झिंक आणि आर्यनच्या कमतरतेमुळेही हा त्रास होऊ शकतो.

3. कोरडे ओठ म्हणजे मधुमेहाची लक्षणं दर्शवतात का?

कोरड्या ओठांची समस्या कोणालाही होऊ शकते. पण साधारणतः ही लक्षणे टाईप 1 आणि टाईप 2 च्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आढळतात. रक्तातील साखरेची पातळी अधिक असलेल्या मधुमेह रुग्णांना तोंड-ओठ कोरडे होण्याची त्रास असू शकतो.

ADVERTISEMENT

4. पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही ओठ कोरडे का होतात?

जेव्हा तुमचं शरीर डीहायड्रेटेड असतं, तेव्हा ते शरीराच्या अन्य भागातून पाणी शोषून घेऊन पेशी हायड्रेट करण्याचं कार्य करते. याच कारणामुळे बद्धकोष्ठता, ओठ कोरडे होण्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे केवळ पाणी प्यायल्यानंच हा त्रास कमी होत नाही. अन्य पोषकघटकांचाही शरीराला पुरवठा होणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

13 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT