तुम्ही किचनचा प्लॅटफॉर्म अथवा सिंकची स्वच्छता करत असाल आणि त्यासाठी महागडी उत्पादनं वापरत असाल तर ही खास माहिती तुमच्यासाठी आहे. या क्लिनिंग उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा तुम्ही त्याहीपेक्षा उत्तम आणि घरगुती उपाय करून आपलं घर आणि किचन अर्थात स्वयंपाकघर अधिक चांगल्या प्रकारे चमकवू शकता. त्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील बेकिंग सोड्याचा उपयोग करू शकता. बेकिंग सोडा अर्थात सोडियम कार्बोहायड्रेट्स. सहसा आपण याचा उपयोग बेकिंग पदार्थ करण्यासाठी करतो. पण तुम्ही किचन आणि घराची सफाई करण्यासाठीही याचा सफाईने उपयोग करू शकता. तुमच्या स्वयंपाकघरात बेकिंग सोडा असेल तर तुमची अर्धी चिंता मिटली असं समजा. याचा उपयोग तुम्ही अगदी नैसर्गिक तऱ्हेने करू शकता. तुम्ही स्वयंपाकघरातील सिंक, बाथरूम, लादी इत्यादी गोष्टीची सफाई करू शकता. त्यामुळे आता उगीचच नाहक खर्च करत महागडी उत्पादनं वापरण्यापेक्षा घरातील बेकिंग सोडा वापरून घराची सफाई तुम्ही ठेवू शकता. तुम्ही कुठे आणि कसा याचा वापर करू शकता हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
फ्रिजमधून येणारी दुर्गंधी थांबवण्यासाठी
Shutterstock
तुमच्या फ्रिजमधून जर दुर्गंधी येत असेल आणि त्यावर नक्की काय उपाय करायचा हे कळत नसेल. फ्रिज स्वच्छ करूनही तुम्हाला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा उपयोग करून यातून सुटका मिळवू शकता. तुम्ही एखाद्या लहान वाटीमध्ये बेकिंंग सोडा घ्या आणि फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल. काही दिवस झाल्यावर हा सोडा टाकून द्या आणि पुन्हा दुसऱ्या वाटीत नवा बेकिंग सोडा तुम्ही ठेवल्यास, फ्रिजला दुर्गंधी येणार नाही.
किचन सिंंक्स आणि बेसीन
Shutterstock
बऱ्याचदा नियमित साफसफाई न केल्या, किचन सिंक्स अथवा बेसीनची नळी चोकअप होते. ती तुम्हाला साफ करायची असेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा 2 कप व्हिनेगरमध्ये घालून मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही या चोकअप झालेल्या नळीमध्ये टाका. काही वेळासाठी सिंक अथवा बाथरूमचा वापर करू नका. किमान अर्धा तास तरी हे असंच राहू द्या. या मिश्रणाने नळीतील सर्व घाण निघून जाईल आणि किचन सिंक्स अथवा बेसीन तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखं वापरता येईल.
पिवळ्या दातांनी हैराण असलात तर करा 8 घरगुती उपाय
स्वयंपाकघराची स्लॅब
Shutterstock
सतत जेवण बनवल्याचे गॅस चालू राहतो आणि स्वयंपाकघराची स्लॅब एकदम काळी होते आणि त्यावर चिकटपणाही येतो. बऱ्याचदा घरातील महिला हे साफ करण्यासाठी चाकू अथवा वायपरचा उपयोग करतात. पण त्याचा काहीही फायदा होत नाही. तुम्हाला हा काळेपणा आणि चिकटपणा काढून टाकण्यासाठी स्वयंपाकघराच्या स्लॅबवर पहिले थोडं गरम पाणी लावून घ्यायला हवं. त्यानंतर त्यावर बेकिंग सोडा घाला आणि दहा मिनिट्ससाठी तसंच राहू द्या. त्यानंतर हे तुम्ही स्क्रबरने साफ करा. तुम्हाला तुमची स्लॅब नक्कीच चमकदार दिसून येईल. हा सोपा आणि परफेक्ट उपाय आहे.
घरातील सोफा कसा स्वच्छ करायचा असा पडलाय प्रश्न, जाणून घ्या सोप्या पद्धती
कार्पेटची स्वच्छता
Shutterstock
कार्पेटवर जमा झालेला कचरा साफ करण्यासाठी तुम्हाला थोड्याशा बेकिंग सोड्याचीच गरज आहे. तुम्ही बेकिंग सोडा थोडासा त्यावर स्प्रिंकल करा. त्यानंतर अर्धा तास जाऊ द्या. नंतर व्हॅक्युम क्लिनरच्या मदतीने तुम्ही पूर्ण कार्पेट स्वच्छ करा. बेकिंग सोड्यामुळे यातील सर्व दुर्गंध निघून जाण्यास मदत मिळते.
बेकिंग सोड्याचे हे ‘25’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का
स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या टाईल्स
Shutterstock
टाईल्सवर लागलेले डाग सहज निघत नाहीत. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट घेऊ शकता. ही पेस्ट त्यावर लावा आणि 10 – 15 मिनिट्स टाईल्सवर लावून ठेवा आणि त्यानंतर ओल्या कपड्याने हे स्वच्छ करा. इतकं करूनही डाग स्वच्छ झाले नाहीत तर त्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा. डाग नक्की साफ होतील.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.