ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
त्वचेसाठी बीटरुटचे फायदे

त्वचा आणि आरोग्यासाठी बीट खाण्याचे फायदे | Bit Khanyache Fayde In Marathi

लालचुटूक असे बीट खूप जणांच्या जेवणात अगदी हमखास असते. काहींना बीटाची चव आवडते तर काहींसाठी हे अगदीच नावडते असे असते. बीटाची भाजी, कोशिंबीर, बीटाचा रस आणि बीटाचा उपयोग करुन सँडवीज,पराठा असे वेगवेगळे प्रकार करता येतात. बीटाचा रंग हा गोड गुलाबी असतो. बीट जेवणात जरासा घातला तरी देखील त्याचा रंग बदलतो. बीट चे फायदे मराठी अनेक आहेत. त्वचा आणि आरोग्यासाठी बीट हे फारच फायद्याचे (Bit Khanyache Fayde In Marathi) असते. बीट खाण्याचे फायदे नेमके कशाप्रकारे असतात ते जाणून घेतले तर त्याचा आहारात समावेश करता येतो. बीटामध्ये अनेक प्रकारचे न्युट्रीएंट्स असतात. यामध्ये फोलेट (Folic Acid Rich Food In Marathi), मॅग्नीस, पोटॅशिअम, लोह आणि व्हिटॅमिन C असते. जे त्वचा आणि आरोग्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फायद्याचे ठरतात. चला जाणून घेऊया beetroot benefits in marathi

त्वचेसाठी बीट खाण्याचे फायदे | Beetroot Benefits For Skin In Marathi

Instagram

 त्वचेसाठी बीट हे फारच फायद्याचे असते.जर तुम्हाला सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही बीटाचे सेवन (Beetroot Benefits For Skin In Marathi) रोज करायला हवे. Bit Khanyache Fayde In Marathi जाणून घेत ते त्वचेवर कसा परिणाम करतात ते जाणून घेऊया.

 पिंपल्स (Acne And Pimples )

रक्तप्रवाह सुरळीत करुन त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सना घालवण्याचे काम बीट करते. बीटाचा रस किंवा बीटाचे काम नियमित खाल्ल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पिंपल्सचा खूप त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच बीटाचे नियमित सेवन करायला हवे. त्यामुळे तुम्हाला त्वचेमध्ये झालेला फरक जाणवेल. बीटामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेला अधिक चांगले करण्याचे काम करतात.पिंपल्सच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करण्याचे काम बीट करते.

चमकदार त्चचा (Glowing Skin)

त्वचेशी निगडीत असलेल्या समस्या दूर झाल्या की, त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. बीटामध्ये असलेले व्हिटॅमिन्स त्वचेच्या आत जाऊन काम करत असल्यामुळे त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. बीटामधील हे घटक त्वचेच्या खाली असलेले कोलॅजन एकत्र धरुन ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. जर तुमचे लग्न असेल अशावेळी नैसर्गिक पद्धतीने चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही बीटाचे सेवन करायला हवे. बीट खाण्याचे फायदे मधील हा सगळ्यात चांगला आणि हवा हवा असा फायदा आहे.

ADVERTISEMENT

त्वचेचा रंग सुधारते (Skin Fairness)

आजुबाजूचे प्रदूषण पाहता त्वचा काळवंडते. अशी काळवंडलेली त्वचा कोणालाच आवडत नाही. तुमचीही त्वचा खूप थकलेली आणि काळवंडलेली दिसत असेल तर तुम्ही त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि त्वचेवर असलेला तजेला परत मिळवण्यासाठी बीटाचे सेवन करायला हवे. बीटा चे फायदे लक्षात घेत बीटामुळे रक्त प्रवाह सुरळीत होण्यात मदत केल्यामुळे आणि त्यातील अँटीऑक्सिडंट घटकामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत मिळते.

त्वचा मॉश्चराईज करते (Moisturize Skin)

त्वचा चमकदार तेव्हाच दिसते ज्यावेळी ती मॉश्चराईज असते. बीटामध्ये अँटीऑक्सिडंट, लोह, पोटॅशिअम,लोह आणि सोडिअम असते ज्यामुळे त्वचेला मॉश्चराईज होण्यास मदत मिळते.  त्वचेला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन C मिळाले  तर त्याचा फायदा नक्कीच त्वचेला होत असतो. तुम्ही नियमित त्वचेवरील तजेला आणि मॉश्चराईजर टिकून राहण्यासाठी  बीटाचे सेवन करायला हवे. 

काळे डाग आणि काळी वर्तुळे करते कमी (Good For Dark Spot And Dark Circle)

त्वचेवर काळे डाग आणि काळी वर्तुळे असतील तर ती त्वचा अधिक डल दिसू लागते. त्वचेवरील काळे डाग आणि वर्तुळे कमी करण्यासाठी तुम्ही रोज याचे सेवन करायला हवे. शरीरात चांगल्या गोष्टी केल्या की त्याचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर होतो. पोटाचे आरोग्य सुधारले तरी देखील त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ लागतो. त्वचेवरील पिंपल्स खोल झाल्याचे डाग आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळते. साहजिकच त्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसते.

आरोग्यासाठी बीट खाण्याचे फायदे | Health Benefits Of Beetroot In Marathi

आरोग्यासाठी बीट खाणे हे फारच फायद्याचे आहे. निरोगी आयुष्यासाठी बीट कशाप्रकारे फायद्याचे ठरते. नेमके बीट चे फायदे मराठी  Health Benefits Of Beetroot कोणते आहेत ते जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवते (Keep Blood Pressure Normal)

उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी बीट हे फारच फायद्याचे आहे. बीटमध्ये नायट्रेड्स नावाचा एक घटक असतो. जो ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असे तर तुम्ही उकडलेल्या बीटाचा रस किंवा कच्या बीटाच्या रसाचे सेवन करावे त्याच्या काही तासानंतर तुम्हाला रक्तदाबाची पातळी नक्कीच सुधारलेली दिसेल.

ऑक्सिजन वाढवतो (Increase Oxygen)

शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असेत तर शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा साठा मिळवून देण्यासाठी बीट हे फारच फायद्याचे आहे. त्यामुळे बीटाचे सेवन करायला हवे.बीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स इतके गुण आढळतात. ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण या सगळ्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये नियमित बीटाचा वापर करणं आवश्यक आहे. 

 पचनाला करते मदत (Improves Digestive Health)

बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यांनी बीटाचे रोज सेवन करावे. बीटाची कोशिंबीर किंवा बीट उकडून सलाद करुन खाल्ले तरी त्यामुळे शरीराला फायबर मिळते.  ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. बीट खाण्याचे फायदे मधील हा एक महत्वाचा फायदा आहे.

 प्रतिकारशक्ती वाढवते (Improves Immunity)

तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी बीटाचा उपयोग करून घेता येतो. कारण यामध्ये असणारे फायबर्स हे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच बीटामधून नैसर्गिक साखर मिळते. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा नैसर्गिक प्रमाणात प्राप्त होते. तसंच बीटाचा आणि गाजराचा रस तुम्ही एकत्र करून प्यायलात तर तुम्हाला नैसर्गिक साखर तर मिळतेच शिवाय तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असल्यास, नियंत्रणात राहण्यास मदत  मिळते.

ADVERTISEMENT

 मेंदूचे कार्य करते सुरळीत (Support Brain Health)

मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळणे शरीरासाठी गरजेचे असते. याशिवाय मेंदूला उत्तम रक्तपुरवठा मिळणेही गरजेचे असते. बीटामध्ये असलेले नायट्रेडेट्स नावाचे घटक शरीरातील रक्ताचा पुरवठा सुरळीत करतात. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत सुरु राहते.  मेंदूशी निगडीत आजार डिमेंशिया या आजारापासून दूर राहायचे असेल तर बीटा चे फायदे लक्षात घेत त्याचे सेवन करायला हवे.

 तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. बीट रस प्यायल्यामुळे डिटॉक्स व्हायला मदत मिळते का ?

 हो, बीटाचा रस प्यायल्यामुळे शरीरातील अतिरिक्त मल:निस्सारण होण्यासाठी मदत मिळते.  त्यामुळे शरीरातून घाण बाहेर काढण्याचे काम बीट रस करते. खूप जणांना बीटाचा रस प्यायल्यानंतर थोडीशी चक्कर आल्यासारखे वाटते. पण ते तेवढ्या वेळेपुरते असते. त्यामुळे काही वेळापुरता हा त्रास तुम्हाला होऊ शकतो. 

2. बीटाचे सेवन कसे करावे ?

बीटाचे सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तुम्ही जर बीटरुट कच्चे खात असाल तर त्याची कोशिंबीर करता येते. याशिवाय खूप जण उकडूनही बीटाचे सेवन करतात.

3. जास्त बीट खाल्ल्यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात का ?

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. जर तुम्ही बीटाचे जास्त सेवन केले तर त्याचा परिणाम तुम्हाला जुलाब होणे किंवा तोंडाची चव जाणे किंवा बीट नकोसे होणे असा होऊ शकतो.

ADVERTISEMENT

अधिक वाचा:

हळदीपासून बनवा सोपे फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा (Haldi Face Pack In Marathi)

बायपोलर डिसऑर्डर – एक मानसिक विकार (Bipolar Disorder In Marathi)

शेपूची भाजी खाण्याचे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत | Shepuchi Bhaji Benefits In Marathi

ADVERTISEMENT
29 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT