ADVERTISEMENT
home / आरोग्य
Loose Motion Home Remedy In Marathi

जुलाब वर घरगुती उपाय (Julab Gharguti Upay In Marathi)

जुलाब अथवा अतिसार म्हणजे पोटात कळ येऊन वारंवार संडासला होणे. अतिसार अथवा जुलाब (Loose Motion In Marathi) हे पाण्यासारखे पातळ असल्यामुळे या आरोग्य समस्येमध्ये पोटातील पाणी अचानक कमी होऊन अशक्तपणा येतो. दूषित पाणी, अन्नातून विषारी पदार्थ पोटात गेल्यामुळे, जंतूसंसर्ग झाल्यामुळे जुलाबाचा त्रास होऊ लागतो. पोटातील इनफेक्शन वाढल्यास पोटात गोळा येणे, पोट दुखणे, चक्कर येणे, मळमळ, तीव्र वेदना, अशक्तपणाचा त्रास जाणवू लागतो. मात्र असं असलं तरी जुलाब होणं हा काही गंभीर आजार नक्कीच नाही. घरात असलेल्या साधनसामुग्री वापरून यावर घरच्या घरी उपचार करता येतात. यासाठी जाणून घ्या जुलाब वर घरगुती उपाय (Julab Gharguti Upay).

पोटाचे विकार आणि पोट फुगणे उपाय जाणून घ्या (Bowel Disorders In Marathi)

दही (Yoghurt)

अतीसार अथवा जुलाब वर घरगुती उपचार (Loose Motion Home Remedy In Marathi) करण्यासाठी तुम्ही दही खाऊ शकता. कारण दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात ज्याचा तुमच्या पोटातील आतड्यांवर चांगला परिणाम होतो. पोटात झालेलं इनफेक्शन कमी व्हावं यासाठी दही खाणं फायदेशीर ठरतात. दह्यामुळे पोटातील जंतू नष्ट होतात आणि तुमच्या पोटाला आराम मिळतो. अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होण्यासाठी दररोज दही खाणं उत्तम ठरू शकतं. 

कसा कराल उपाय 

ADVERTISEMENT

एक वाटी अधमुरं दही घ्या आणि त्यात थोडं मीठ, सैधव अथवा काळीमिरी पावडर टाकून ते खा. दिवसभरात दोन ते तीन वेळा दही खाण्यामुळे पोटातील आव बांधली जाते आणि जुलाबाचा त्रास कमी होतो. 

आल्याचा चहा (Ginger tea)

Loose Motion Home Remedy In Marathi

जुलाब लगेच थांबण्यासाठी आल्याचा रस अथवा चहा घेतल्यास चांगला फायदा होतो. कारण आल्यामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे जुलाबासाठी कारणीभूत असलेले जीवजंतू नष्ट होतात. पोटातील आतड्यांना आराम मिळण्यासाठी आल्याचा रस उपयुक्त ठरतो.

कसा कराल उपाय 

आलं किसून त्याचा रस काढा आणि तो मधासोबत घ्या.

ADVERTISEMENT

चहामध्ये आले किसून टाका आणि थोडं मध टाका. दूध न टाकता अशी ब्लॅक टी घेण्यामुळे पोटाला आराम मिळतो. 

गरोदरपणात बद्धकोष्ठता साठी घरगुती उपाय (Pregnancy Madhe Pot Saf Honyasathi Upay)

नारळाचे पाणी (Coconut Water) 

एखाद्याला जुलाब होत असतील तर त्याच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सर्वात आधी त्याला नारळाचे पाणी प्यायला द्यावे. नारळपाणी आरोग्यासाठी उत्तम असतंच पण त्यामुळे जुलाबाचा त्रास तातडीने थांबतो. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलेट्स असतात. त्यातील पोटॅशिअम, सोडिअममुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलेट्सचा संतुलित कायम राहतो. नारळ पाण्यामुळे तुमच्या शरीरातील झालेली पाण्याची झीज भरून निघते. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी यामुळे मदत होते आणि रूग्णाला लगेच ताजेतवाने वाटू लागते. यातील अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांमुळे अशक्तपणा कमी होतो. 

कसा कराल उपाय 

ADVERTISEMENT

जुलाब होत असतील दिवसभरातून एक ते दोन ग्लास नारळाचे पाणी प्यावे.

केळी (Banana)

Loose Motion Home Remedy In Marathi

जुलाब होत असल्यास पिकलेले अथवा कच्चे केळ खावे. केळं खाणं हा जुलाब वर उत्तम उपाय (Julab Var Gharguti Upay) आहे. शिवाय यामुळे तुम्हाला लवकर बरंदेखील वाटू लागतं. केळ्यामध्ये पोटातील आतड्यांमधील पाणी शोषून आव बांधण्यास मदत होते. ज्यामुळे जुलाब थांबतात आणि शौचाला साफ होते. शिवाय केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते. ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. 

कसा कराल उपाय 

जुलाब थांबण्यासाठी पिकलेलं केळ खा पिकलेल्या केळाचे शिकरण, कच्च्या केळ्याचे काप अथवा स्मुदी पिण्यामुळे लवकर फायदा होतो. 

ADVERTISEMENT

जिऱ्याचे पाणी (Cumin Water)

जिऱ्यामध्ये अॅंटि सेप्टिक आणि अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जुलाब वर घरगुती उपाय (Loose Motion In Marathi) करण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठकते. ज्यामुळे तुमचे डिहायड्रेट झालेले शरीर लवकर रिकव्हर होतेच शिवाय तुमच्या शरीरातील तापमान संतुलित राहण्यास मदत होते. यातील पोटॅशियममुळे शरीरात संतुलित राहते. 

कसा कराल उपाय

-एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भाजून टाका. 

-ते पाणी उकळून थंड झाल्यावर गाळून घ्या.

ADVERTISEMENT

-थोडे थोडे दिवसभर जिऱ्याचे पाणी पिण्यामुळे शरीराचा थकवा कमी होतो आणि जुलाबही थांबतात. 

लिंबाचा रस (Lemon Juice)

Julab Var Gharguti Upay

लिंबाचा रस जुलाबावर अतिशय प्रभावी घरगुती उपाय (Julab Var Gharguti Upay) आहे. कारण लिंबामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅसिडिक गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पीएच बॅलन्स संतुलित राहतो. यातील मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअममुळे शरीराला पुरेसे पोषण मिळते आणि जुलाबाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

कसा कराल उपाय –

दिवसभरात दोन ते तीन वेळा लिंबाचा रस पिणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल. 

ADVERTISEMENT

ताक (Buttermilk)

पोटाच्या आरोग्यासाठी नियमित ताक पिणे अतिशय फायदेशीर आहे. ताकामध्ये तरल भरपूर प्रोबायोटिक्स असतात. यासाठीच जुलाब झाल्यास ताक पिण्यामुळे शरीराला लवकर आराम मिळतो. शरीराचा दाह कमी करण्यासाठी पचन सुरळीत सुरू होण्यासाठी ताकाचा चांगला फायदा होतो.

कसा कराल उपाय –

-जुलाब वर घरगुती उपाय म्हणून एक ग्लास थंड ताक प्या

-ताकामध्ये सैधव आणि काळीमिरी पावडर टाकण्यामुळे जुलाब लवकर थांबतात. 

ADVERTISEMENT

मेथीचे दाणे (Fenugreek Seeds)

Loose Motion Home Remedy In Marathi

जुलाब झाल्यास आव बांधण्यासाठी आणि जुलाबाचा त्रास थांबण्यासाठी (Loose Motion In Marathi ) मेथीचा उपाय तुम्ही करू शकता. कारण मेथीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅंटि फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटातील इनफेक्शनवर लवकर मात करता येते. 

कसा कराल उपाय

-मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा

-भिजवलेले दाणे वाटून त्याची पेस्ट तयार करा मेथीचे दाणे कोरडेच वाटून त्याची पावडर करा.

ADVERTISEMENT

-मेथीची पावडर अथवा मेथीची पेस्ट पाण्यात टाकून ते पाणी प्या.

पुदिना आणि मध (Mint and Honey)

पुदिना आणि मध एकत्र करून तुम्ही जुलाब वर घरगुती उपाय (Julab Gharguti Upay)  करू शकता. कारण पुदिना आणि मधमध्ये पोटाला थंडावा देणारा घटक असतो. जुलाब करून पोटात जळजळ होत असेल तर पुदिन्यामुळे पोटाला चांगला आराम मिळतो. शिवाय यामुळे पचनशक्ती पूर्ववत होण्यास मदत होते. 

कसा कराल उपाय 

-जुलाब वर घरगुती उपाय म्हणून एक चमचा पुदिनाच्या रस, एक चमचा मध आणि थोडं लिंबाचा रस एकत्र करा.

ADVERTISEMENT

-सर्व मिश्रण कोमट पाण्यात मिसळून दिवसभरात एक ते दोन वेळा प्या. 

शेवग्याची पाने (Drumstick Leaves)

शेवग्याच्या पानांची भाजी शरीराला फार उपयुक्त ठरते. पण एवढंच नाही या भाजीमुळे तुमचे जुलाबदेखील थांबू शकतात. कारण शेवग्याच्या पानांमुळे तुमच्या शरीराला पोषण मिळतेच शिवाय त्यात अॅंटि मायक्रोबायल आणि अॅंटि ऑक्सिडंट घटक असतात. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत होते. जुलाबामुळे मळमळ, उलटी अथवा पोटदुखी जाणवत असेल तर पुदिन्याचा पानांचा वापर जरूर करा.

कसा कराल उपाय –

-शेवग्याच्या पानांची भाजी नियमित खा.

ADVERTISEMENT

-शेवग्याच्या पानांचा रस मधात मिसळून घेतल्यास जुलाब लगेच थांबतात. 

जाणून घ्या पानफुटी वनस्पतीचे फायदे आणि उपयोग (Panfuti Plant Uses In Marathi)

जुलाब वर घरगुती उपाय आणि प्रश्न (FAQ’s)

1. जुलाब होणं आरोग्यासाठी हानिकारक असते का ?

पोटात बिघाड झाल्यास जुलाबाचा त्रास होतो पण हा गंभीर आजार नसून सामान्य असून तो काही दिवसांमध्ये लगेच बरा होतो. 

2. जुलाबचा त्रास किती दिवस होऊ शकतो ?

जुलाब सुरू झाल्यास त्याचा त्रास दोन दिवसांपासून दोन आठवड्यापर्यंत कितीही दिवस होऊ शकतो. मात्र या त्रासामुळे तुमच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे डिहाड्रेशनचा त्रास वाढू शकतो. यासाठी जुलाबावर योग्य उपचार तातडीने करावे. 

ADVERTISEMENT

3. जास्त पाणी पिण्यामुळे जुलाबचा त्रास वाढतो का ?

पाणी पिण्यामुळे जुलाबाचा त्रास वाढत नाही उलट जुलाब झाल्यास जास्त पाणी प्यावे कारण जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज असते. 

जुलाब होत असतील तर काय खाणे टाळावे ?

जुलाब होत असल्यावर दूध, चीझ असे दुधाचे पदार्थ खाल्ल्यास जुलाब जास्त वाढण्याची शक्यता असते. शिवाय या काळात तिखट भाज्या, मासे, मटण, प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नये. कारण यामुळे तुमची पचनक्रिया आणखी बिघडू शकते. 

14 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT