फिश ऑईलमध्ये दडलंय तुमच्या सौंदर्याचं रहस्य, जाणून घ्या गु (Fish Oil Benefits In Marathi)

फिश ऑईलमध्ये दडलंय तुमच्या सौंदर्याचं रहस्य, जाणून घ्या गु (Fish Oil Benefits In Marathi)

आहारात मासे असल्यास त्याचे होणारे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत असतीलच. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फिश ऑईलसुद्धा तुमच्या शरीरासाठी वरदान ठरू शकतं. हो..फिश ऑईलमध्येही औषधीय गुण असतात. या तेलात असलेली पोषक तत्त्वं तुमचं अनेक आजारांपासून बचाव तर करतीलच पण त्यासोबतच त्वचाही निरोगी ठेवतील. पण या लेखात आम्ही तुम्हाला फिश ऑईलच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत.

Table of Contents

  फिश ऑइल म्हणजे काय (What is Fish Oil)

  फिश ऑईल हे माशांच्या ऊतींपासून म्हणजेच टिश्यूपासून हे तेल बनवलं जातं. या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड, इकोसॅपेंटेनॉइक एसिड (EPA) आणि डोकोसाहेक्सॅनॉइक एसिड (DHA) असतं. ओमेगा-3 ने भरपूर असल्यामुळे फिश ऑइलाला ओमेगा-3 ऑइल असंही म्हटलं जातं. बाजारात तुम्हाला फिश ऑइल हे बाटलीत किंवा कॅप्सूल फॉर्ममध्येही मिळतं.

  वाचा - त्वचेसाठी पेपरमिंट तेल

  फिश ऑइलमधील पोषक तत्त्वं (Nutritional Value of Fish Oil)

  फिश ऑइलमधील पोषक तत्त्वांमध्ये फॅटी एसिडचं प्रमाण सर्वाधिक असतं. फिश ऑइलमधील प्रमुख तत्त्वांमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असतं. ज्याला डीएचए आणि ईपीए (DHA and EPA) असंही म्हटंल जातं.

  फिश ऑइलमधील पोषक तत्त्वं 1 चमचा ( 4 ग्रॅम ) प्रमाणानुसार :

  कॅलरी – 6
  चरबी – 5 ग्रॅम
  सोडीयम – 0 मिली ग्रॅम
  फायबर – 0 ग्रॅम
  साखर – 0 ग्रॅम
  प्रोटीन – 0 ग्रॅम
  व्हिटॅमीन डी – 9 डीवी
  ओमेगा-3 फॅटी एसिड – 1084 मिली ग्रॅम
  ओमेगा-6 फॅटी एसिड – 6 मिली ग्रॅम

  पोषकतत्त्वांचं प्रमाण हे माश्याच्या प्रजातीनुसार बदलू शकतं.

  फिश ऑइलचे फायदे (Health Benefits of Fish Oil)

  शरीरासाठी फिश ऑइलचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया फिश ऑइलचे आरोग्यदायी फायदे विस्तृतपणे.

  Shutterstock

  हृदयासाठी फिश ऑइल (Fish Oil for Heart)

  फिश ऑइल हृदयासंबंधींचे आजार रोखण्यात मदत करतं. तसंच हृदय प्रणाली (कार्डियोवास्कुलर सिस्टम) चं कार्य हे व्यवस्थित होईल, याची सुनिश्चिती करतं. खरंतर, फिश ऑइल ट्राईग्लिसरॉईड (लिपिड फॅट) चा स्तर कमी करतं. ज्यामुळे हृदय संबंधी आजारांचा धोका कमी होतो. यातील ओमेगा-3 फॅटी एसिड रक्ताचा स्तर कमी करून हृदय रोखण्यात आणि बरं करण्यात मदत करतो. याच्या सेवनाने ब्लॉकेजेस, प्लाक आणि एथेरॉस्क्लेरॉसिस (Atherosclerosis) वाढणं कमी होऊ शकतं. तसंच हे हृदयविकाराच्या झटक्याचा धोकाही कमी करतं.

  प्रोस्टेट कॅन्सरसाठी फिश ऑइल (For Prostate Cancer)

  कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून बचावासाठी फिश ऑइलचं सेवन फायदेशीर ठरतं. ओमेगा-3 फॅटी एसिडयुक्त असल्याने हे आपल्या शरीरातील सामान्य आणि निरोगी कोशिकांच्या विकासास चालना देतं. याचं सेवन ब्रेस्ट, कोलन आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्याचं काम करतं. 

  चांगल्या मानसिक आरोग्यासाठी (For Mental Health)

  शारीरिक आरोग्य कायम राहण्यासाठी आपण हरप्रकारे काळजी घेतो पण तेवढं महत्त्व आपण आपल्या मानसिक आरोग्याला देत नाही. पण तुम्ही फिश ऑइलचं सेवन करून तुमचं मानसिक आरोग्य कायम ठेवू शकता. वर सांगितल्याप्रमाणे फिश ऑइलमधील ओमेगा-3 फॅटी एसिड हे डिप्रेशन आणि तणाव कमी करू शकतं. तसंच हे अन्य मानसिक विकारही बरं करण्यात साहाय्य करतं. फिश ऑइल तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतं. या शिवाय तुमची स्मरशक्ती वाढवण्याचे उपाय ही आहेत. योगाच्या मदतीने तुमच्या स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो.

  फिश ऑइल फर्टिलिटीसाठी (To Improves Fertility)

  फिश ऑइलच्या सेवनाने तुमच्या फर्टिलिटी क्षमतेत सुधारणा होते. खरंतर ओमेगा-3 पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी एसिड शुक्राणु कोशिकांच्या (स्पर्म सेल्स) वाढीला चालना देतं. ज्यामुळे पुरुष प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. महिलांची प्रजनन शक्ती वाढण्यासही फिश ऑइल सहाय्यक मानलं जातं.

  गर्भारपणात फिश ऑइल (For Pregnancy)

  गर्भवती महिलांना फिश ऑइल सेवनाचे फायदे जास्त आहेत. कारण यामधील ओमेगा-3 फॅटी एसिडमुळे  महिला आणि बाळाच्या विकासाला चालना देण्यास सहाय्यक ठरतं. फिश ऑइलमधील डीएचए (DHA) बाळाच्या डोळं आणि मेंदूच्या विकासाला मदत करतं. गर्भवती महिलांसाठी हे फायदेशीर आहे, कारण पहिल्या बाळाच्या वेळी प्रीमॅच्युअर बर्थ (premature births), कमी जन्‍म वजन (low birth weight) आणि गर्भापात होण्याचा धोका टाळण्यास मदत होते. पण याचं सेवन करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

  डायबेटीससाठी फिश ऑइल (To Control Diabetes)

  Shutterstock

  वैज्ञानिक संशोधनानुसार, फिश ऑइल सप्लीमेंट इंन्शुलिन सेंसिटिव्हीटी वाढवून टाईप-2 डायबिटीसने पीडीत रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं. सध्या यावर संशोधन सुरू आहे.

  अल्झायमरवर फिश ऑइल (To Treat Alzheimer’s)

  एका युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार अल्‍जायमर आजारावरील उपचारासाठी फॅटी एसिड उपयोगी ठरतं. जसं की तुम्हाला माहीत असेल फिश ऑइलमध्ये ईपीए आणि डीएचएसोबतच आवश्‍यक फॅटी एसिड चांगल्या प्रमाणात असतात. जे अल्‍जायमरच्या उपचारात मदत करतात. अन्‍य संशोधनानुसारही अल्जायमरवर फिश ऑइल फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे.

  आर्थरायटीसवर गुणकारी फिश ऑइल (Fish Oil Benefits For Arthritis)

  सांधेदुखीमुळे होणारा त्रास आणि वेदना कमी करण्यात फिश ऑइलची मदत होते. एका स्टडीनुसार फिश ऑइलमधील अँटीइंफ्लेमेटरी गुण व ओमेगा-3 ईपीए हे सांधेदुखी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सांधेदुखीवर याचा वापर अँटीइंफ्लेमेटरी ड्रगच्याऐवजी केला जातो. फिश ऑइल शरीरातील इंटरल्यूकीन-1 म्हणजे IL-1 (साईटाकिन्स म्हणजेच प्रोटीनचा समूह) ही कमी करतं. ज्यामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो.

  वाचा - त्वचेसाठी मासे आहेत वरदान

  हाडांसाठी फिश ऑइल (For Bones)

  फिश ऑइलने तुमची हाडंही बळकट होतात. हे हाडासंबंधित रोग ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) आणि ठिसूळ हाडं बरी करण्यात मदत करतं. याचं सेवन तुमच्या हाडांतील घनत्व म्हणजे डेंसिटीला चालना देतं आणि हाडांच्या कमी होणाऱ्या घनत्वाला रोखण्यास मदत करतं. ओमेगा-3 फॅटी एसिड फिश ऑइलमध्ये असतं हे आपल्याला माहीत आहेच. हे फॅटी एसिड हाडं आणि त्यांच्या आसपासच्या टिश्यूजमधील खनिजांचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतं. ज्यामुळे हाडं मजबूत होतात.

  प्रतिकारशक्ती वाढवतं फिश ऑइल (Improves Immunity)

  आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यास फिश ऑइल मदत करतं. हे शरीरातील ऑटोइम्यून डिसऑर्डरला कमी करतं. याशिवाय हे चयापचय प्रकियेला चालना देतं. जे तुमच्या शरीराला निरोगी तर ठेवतंच पण त्यासोबतच चरबीही वेगाने नष्ट करण्यात मदत करतं.

  दम्यावरही उपयोगी फिश ऑइल (For Asthma)

  एलर्जीपासून होणारा अपाय कमी करण्यात फिश ऑइल गुणकारी ठरतं. अस्‍थमा हा एक फुफ्फुस्सांचा विकार आहे जो फुफ्फुसांत सूज आणि श्वसनाची समस्या निर्माण करतं. अनेक संशोधनानुसार, दम्याच्या सुरूवातीच्या काळात जर फिश ऑइल घेतलं तर हे जास्त गुणकारी ठरतं आणि दमा बरा होतो. याशिवाय गर्भवती महिलांमध्ये आहारात फिश ऑइलचा समावेश केल्यास गर्भातील अर्भकाला असलेला अलर्जीचा धोका कमी होतो.

  नैराश्य आणि चिंता (Fish Oil For Depression & Anxiety)

  Giphy

  नैराश्य आणि चिंतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही फिश ऑइलचं सेवन करू शकता. यातील ओमेगा-3 फॅटी एसिड मूड चांगला ठेवण्यात मदत करतं. ज्यामुळे तुमचा तणाव आणि नैराश्य कमी होतं.

  सूज असल्यास फिश ऑइल (Fish Oil for Swelling)

  सूज ही शरीराला होणाऱ्या इंफेक्शन आणि जखमेला रोखण्याची एक प्रतिकार प्रणाली आहे. कधी कधी बऱ्याच काळानंतर सूज कमी होते. याला जुनी सूज असं म्हणतात. ही सूज लठ्ठपणा, मधुमेह, आणि हृदय रोग यासारख्या जुन्या आजारांना वाढवू शकते. ही सूज कमी करण्यासाठी तुमच्या आजारात फिश ऑइल सामील केल्यास मदत होऊ शकते.

  फिश ऑइल एड्सवर (For AIDS)

  संशोधनानुसार हे आढळलं आहे की, हे एड्सवरही गुणकारी आहे. पण यावर अजूनही संशोधन सुरू असल्याने डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

  भ्रूण विकासासाठी फिश ऑइल (For Fetal Development)

  ओमेगा-3 फॅटी एसिडचं सेवन केल्याने गर्भातील भ्रूणाच्या विकासास चालना मिळते. त्यामुळे गर्भावस्थेतील काळात मातेने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिश ऑइलचं सेवन करावं.

  वजन कमी करण्यासाठी फिश ऑइल (Fish Oil for Weight Loss)

  Shutterstock

  फिश ऑइल हे वजन कमी करण्यातही मदत करतं. यामधील डीएचए आणि ईपीए नामक तत्वं महिलांना परफेक्ट बॉडी शेप कायम ठेवण्यास आणि पुरुषांचं वाढतं वजन नियंत्रित करण्यात मदत करतं. संशोधनानुसार, 6 ग्रॅम दररोज फिश ऑइल घेतल्यास शरीरातील जास्तीचं फॅट कमी करण्यात मदत होते.

  वाचा - कमी वेळात चमकदार त्वचेसाठी बदामाचं तेल

  सौंदर्यासाठी फिश ऑइल (Fish Oil Benefits for Skin)

  फिश ऑइल जसं आरोग्यासाठी उपयोगी आहे तसंच ते सौंदर्यदायीसुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या सौंदर्याला अजून खुलवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही फिश ऑइलचा वापर करू शकता.

  Shutterstock

  ज्वलनशामक फिश ऑइल (Anti Inflammatory)

  फिश ऑइलमध्ये एंटी-इन्‍फ्लमेट्री गुण असतात जे जुनी सूज आणि यासंबंधित इतर आजार बरं करण्यात मदत करते. तणावग्रस्त व्यक्तींमध्ये फिश ऑइल सायटॉकिन्‍स (Cytokines) नावाच्या सूज आणणाऱ्या अणूंच्या निर्मितीला रोखते.

  पिंपल्सवर वापर फिश ऑइल (For Pimples)

  त्वचेवरील पिंपल्स, सुरकुत्या आणि कोरडेपणा दूर करण्यात फिश ऑइलचा वापर होतो. त्यामुळे त्वचा सुंदर होते. यामधील डीएचए आणि ईपीए एसिड असतं. जे आपल्या त्वचेसाठी आवश्यक असतं.

  डोळ्यांसाठी वरदान आहे फिश ऑइल (For Eyes)

  फिश ऑइल हे नेत्र विकारापासूनही बचाव करते. याच्या सेवनाने वाढत्या वयातील डोळ्यांच्या समस्यांना कमी करण्यात मदत होते. यासाठी प्रामुख्याने फिश ऑइलमधील ओमेगा-3 फॅटी एसिडचा उपयोग होतो.

  सूर्य किरणांपासून बचावासाठी (Protect From UV Rays)

  सूर्याच्या अति-तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठीही तुम्ही फिश ऑइलचा वापर करू शकता. या तेलातील व्हिटॅमीन डी तुमच्या त्वचेचं प्रदूषणापासूनही रक्षण करतं.

  वाचा - वजन कमी करण्यासोबतच मूडही चांगला ठेवतं तिळाचं तेल

  केसांसाठी फायदेशीर फिश ऑइल (Fish Oil Benefits for Hair)

  केसांच्या अनेक समस्यांवरही फिश ऑइल गुणकारी आहे. पाहूया केसांसाठी कसं फायदेशीर ठरतं फिश ऑइल.

  Shutterstock

  केसगळती होईल कमी (Help To Get Rid Of Hair Fall Problem)

  केस गळतीच्या समस्येने तुम्ही हैराण असाल तर फिश ऑइलमधील अँटी-इंफ्लमेट्री तत्त्वं असतात. जी तुमच्या केसांची गळती कमी करतात. केस गळण्याच्या समस्या हा केसांच्या मुळांमुळे वाढते. अशावेळी फिश ऑइल तुमच्या केसांच्या मुळांना पूर्ण पोषण देतं आणि केसांचं गळणंही कमी करतं.

  केसांवरील उपचारांसाठी (Provides Healthy Hair)

  कॅस्टर ऑइल, टी ट्री ऑइल, लवेंडर आणि नारळाचं तेल आणि त्वचा बाह्य रूपाने मॉईश्चराईज करण्यासाठी आपण वापरतो. पण फिश ऑइल वेगळं आहे. ते केसांना अंतर्गतरित्या पोषण देतं. फिश ऑइल केसांना मॉईश्चराईज करून स्कॅल्पची सुरक्षाही करतं. पण याच्या दुर्गंधीमुळे हे केसांना लावणं थोडं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे केसांना थेट फिश ऑइल लावण्याऐवजी बरेच जण कॅप्सूल रूपात फिश ऑइलचं सेवन करतात.

  केसांच्या वाढीला चालना (Encourage Hair Growth)

  जर तुमचे केस वाढत नसतील तर यामागील कारण त्यांना योग्य पोषण न मिळणं हे असतं. फिश ऑइलमध्ये ती सर्व पोषक तत्त्वं असतात जी केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे फिश ऑइलचा आहारात समावेश असणाऱ्या लोकांंना केसांच्या समस्या जाणवत नाहीत. फिश ऑइलने केसांच्या मुळांना योग्य पोषण आणि प्रोटीन मिळतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केसगळतीची समस्या कमी होऊन केसांना चमक मिळते.

  फिश ऑइलने मसाज (For Massage)

  Canava

  वर सांगितल्याप्रमाणे केसाच्या समस्या या मुख्यतः केसांच्या मुळांशी निगडीत असतात. त्यामुळे जर तुम्ही कॅप्सूल स्वरूपात फिश ऑइल घेणार नसाल तर त्याने केसांना मसाज करू शकता. फिश ऑइलची दुर्गंधी टाळण्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑइल, टी ट्री ऑइल, लवेंडर किंवा नारळाच्या तेलात हे तेल मिक्स करून मग मसाज करू शकता.

  वाचा - बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे

  कसं वापरावं फिश ऑइल (How To Use Fish Oil)

  फिश ऑइलचे फायदे जाणून घेतल्यानंतर आता ते आहारात कसं सामील करावं तेही जाणून घ्या. फिश ऑइलची चव आणि वास यामुळे ते बहुतेकदा कॅप्सूल रूपातचं घेतलं जातं. जर तुम्हाला सलाडसाठी फिश ऑइलचा वापर करायचा असल्यास तुम्ही पुदीना आणि आंबट गोष्टींसोबत मिक्स करू शकता. तसंच तुम्ही फिश ऑइल संत्री, सफरचंद किंवा टोमॅटो ज्यूससोबतही घेऊ शकता.

  फिश ऑइल सेवनाचं योग्य प्रमाण (Fish Oil Dosage)

  Canava

  फिश ऑइलमध्ये डीएचए आणि ईपीए व ओमेगा-3 फॅटी एसिड्स असतात. त्यामुळे प्रती दिन शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या डीएचए आणि ईपीएच्या मात्रेबाबत आम्ही सांगत आहोत. साधारणतः EPA आणि DHA मिळून 3 ग्रॅमपेक्षा जास्तचं सेवन प्रतीदिन न करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा डॉक्टर्स ट्राईग्लिसरॉइड्स (लिपिड) कमी करण्यासाठी ओमेगा-3 अधिक प्रमाणात घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे याचं सेवन करावं.

  फिश ऑइल कधी घ्यावं (When To Take Fish Oil)

  चांगल्या आरोग्यासाठी पूरक म्हणून फिश ऑइलचं सेवन करणं कधीही चांगलंच असतं. पण फिश ऑइल घेण्याची योग्य अशी वेळ ठरवता येत नाही. फक्त ही गोष्ट लक्षात घ्या की, रोज नियमितपणे एकाच वेळेला फिश ऑइलचं सेवन करा. पोषक तत्त्वं आणि व्हिटॅमीन्स कधीही ठराविक वेळी घेतल्यास त्याचा फायदा अधिक होतो. मग ते नाश्त्यानंतर असो दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्री झोपण्याआधी. तुम्ही कोणतीही एक वेळ निवडून त्या वेळेवर नियमितपणे फिश ऑइल किंवा कॅप्सूलचं सेवन करा. फक्त फिश ऑइल कधीही जास्त कॅलरीजयुक्त आहारासोबत घ्यावं जसं मासे आणि अंडी.

  फिश ऑइल घेणं कधी टाळावं (When to Avoid Fish Oil)

  जर तुम्ही फिश ऑइलचं सेवन करत असाल तर त्या दरम्यान इतर खाद्यपदार्थ्यांच्या सेवनावर नियंत्रण ठेवा. यासाठी कारण जास्त प्रमाणात चरबी आणि कॉलेस्ट्रॉल असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यास फिश ऑइल तुमच्या ट्राईग्लिसराईड्सवर प्रभावी ठरणार नाही. तसंच फिश ऑइल घेत असताना मद्यपान किंवा इतर मादक पदार्थाचं सेवनही टाळावं. 

  फिश ऑइलचे साईड ईफेक्टस (Side Effects of Fish Oil)

  Shutterstock

  फिश ऑइलचे जसे आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे आहेत तसंच फिश ऑइलने आरोग्याला नुकसानही होऊ शकतं. फिश ऑइलने कोणंत नुकसान होऊ शकतं हेही जाणून घ्या. जसं तोंडाची चव बिघडणं, दुर्गंधीयुक्त घाम येणं, डोकेदुखी, मळमळणं, छातीत जळजळणं, जुलाब होणं इ. दुष्परिणामही जाणवू शकतात.

  फिश ऑइलशी निगडीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरं (FAQs)

  Canava

  वरील लेख वाचून तुमच्या फिश ऑइलबाबतच्या बऱ्याचश्या शंका दूर झाल्याच असतील. पण तरीही तुमच्या मनात काही खालील प्रश्न असल्यास त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील.

  फिश ऑइलची सेक्शुअली मदत होते का?

  ओमेगा-3 (Omega-3) फॅटी एसिड हे माश्यात आढळतं. ज्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि त्यासोबतच डोपामाईन या हार्मोन्सची निर्मिती जास्त होते. परिणामी डिप्रेशन कमी होतं आणि लिबीडो वाढतो. त्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर सकारात्मक परिणाम होतो. 

  दिवसभरात कधी घ्यावं फिश ऑइल?

  साधारणतः फिश ऑइल सप्लीमेंट हे दिवसा घ्यावं. पण हे सप्लीमेंट कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. त्यामुळे जेवण झाल्यावर तुम्ही फिश ऑइल सप्लीमेंट घेऊ शकता. कारण रिकाम्या पोटी घेतल्यास तुम्हाला मळमळू शकतं.

  फिश ऑइलपासून बनवलेल्या गोळ्यांचा दुर्गंधी येऊ लागल्यास काय करावे?

  जर फिश ऑइलच्या गोळ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यास त्या त्वरित फेकून द्याव्या. लिक्वीड ओमेगा -3 सप्लीमेंट्स जास्त काळ ठेवल्या गेल्या तर ऑक्सीजनच्या संपर्काने खराब होतात. त्यामुळे लिक्वीड फिश ऑइल किंवा कॉड लिव्हर ऑइलची दुर्गंधी येऊ लागल्यास त्या टाकून द्या आणि नवीन आणा.

  लहान मुलांना किती प्रमाणात फिश ऑइल द्यावं?

  जर तुमचं मूलं लहान म्हणजेच चार ते आठ वर्षांच्या दरम्यान असल्यास त्याला 1,000-1,500 मिलीग्रॅम्स इपीए आणि डिएचए एवढं फिश ऑइल द्यावं. तरीही आपल्या मुलाला फिश ऑइलचा डोस देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

  You Might Like This:

  कडूलिंबाच्या तेलाचा आरोग्यासाठी करा असा वापर (Health Benefits Of Neem Oil)

  Fish Oil benefits in Hindi