फॅटी लिव्हरचा त्रास, तुमच्या आयुष्याचा करेल घात

फॅटी लिव्हरचा त्रास, तुमच्या आयुष्याचा करेल घात

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर योग्य नियंत्रण नसल्यानं कित्येक आजारांना आयते निमंत्रण मिळते. याच गंभीर आजारांच्या यादीतील एक आजार म्हणजे फॅटी लिव्हर (Fatty Liver). वेळीअवेळी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. यकृत (Liver) खराब झाल्यास संपूर्ण शरीरातील प्रक्रियांवरही दुष्परिणाम होतो. तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या जाणवल्यास तातडीनं डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी आणि वैद्यकीय चाचण्यादेखील करून घ्याव्यात.  

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

यकृत अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करते आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतं. पण एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण झाल्यास या समस्येस फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं.

(वाचा : सायटिका आजाराकडे करताय दुर्लक्ष; कंबर, पायांवर होतील दुष्परिणाम)

फॅटी लिव्हर आजाराचे प्रकार

नॉन अ‍ॅल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिसिझ (NAFLD): अनियंत्रित आहारामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. योग्य वेळी योग्य आहाराचं सेवन न केल्यास नॉनक्लोरिक स्टीटोहेपेटायटिस (एनएएसएच), फायब्रोसिस, सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

अ‍ॅल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिसिझ (AFLD) :अतिरिक्त मद्यसेवन या समस्येचं प्रमुख कारण आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अ‍ॅल्कोहॉलिक फॅटी लिव्हर, अ‍ॅल्कोहॉलिक हेपेटायटिस आणि सिरोसिस सारखे आजार होऊ शकतात.  

(वाचा : चिंतामुक्त होण्यासाठी करा ही पाच योगासने)

फॅटी लिव्हर आजारादरम्यान काय खावे ?

1. कॉफी

फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांनी आहारात कॉफीचा समावेश करावा. कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अ‍ॅसिड, पॉलीफेनोल, मेथिलक्सॅन्थिन, कॅफीन, कार्बोहायड्रेट, लिपिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम यांसारखे घटक आहेत. कॉफीमध्ये असलेल्या  तत्त्वांमुळे मधुमेह आणि वाढते वजन यांसारख्या समस्या नियंत्रणात आणण्यास मदत होते. फॅटी लिव्हरचा त्रासदेखील कॉफी बऱ्याच प्रमाणात कमी करते. तरीही कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे आवश्यक आहे.  

2. फिश ऑईल 

फॅटी लिव्हरचा त्रास असणाऱ्यांनी आहारात फिश ऑईलचा समावेश करावा. यामुळे अतिशय आरोग्यदायी फायदे मिळतील. फिश ऑईलमध्ये एन-3 पॉलिअनसॅचुरेटेड फॅटी  अ‍ॅसिड आहे, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

3. ब्रोकली

ब्रोकलीमध्ये असलेले दुर्मिळ तत्त्व शरीरातील ट्रायग्लिसरायडचे प्रमाण कमी करण्याचे कार्य करतात. यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास असणाऱ्यांनी आहारात ब्रोकलीचा समावेश करावा. 

4. अक्रोड  

अक्रोडमध्ये  ओमेगा-3, ओमेगा-6 आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. महत्त्वाचे म्हणजे  यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार,फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

(वाचा : 'हे' आजार असणाऱ्यांनी संत्री खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम)

फॅटी लिव्हरची समस्या, काय खाऊ नये ?

1.मद्य 

मद्यसेवन फॅटी लिव्हर असणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. यामुळे यकृत खराब होऊन त्याच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. 

2.साखरयुक्त पदार्थ

ज्या पदार्थांमध्ये साखरेचा जास्त प्रमाणात वापर केला जातो, त्या सर्व गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्यात. यामुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण वाढून लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.  

3.तळलेले पदार्थ 

तळलेल्या पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन होत असल्यास यकृताच्या समस्या वाढण्याची भीती अधिक असते. तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असतात.  

4.मीठ 

मिठाचा वापर कमीत कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मिठामुळे उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. याचा थेट परिणाम यकृतावरही होतो. 

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.