फळाचे ज्युस सतत पिण्याची सवय पडू शकते महागात, वेळीच व्हा सावध

फळाचे ज्युस सतत पिण्याची सवय पडू शकते महागात, वेळीच व्हा सावध

आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फळं आणि त्यांचा रस अर्थात ज्युस चांगले असतात असं वारंवार ऐकिवात येत असतं आणि त्याप्रमाणे आपण आपल्या डाएटमध्ये ज्युसचा समावेशही करून घेतो. पण फळाचे ज्युस तुम्हाला सतत पिण्याची सवय लागली तर ते तुमच्यासाठी महाग ठरू शकतं याची तुम्हाला कल्पना आहे का? हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. फळांचे ज्युस सतत प्यायल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. हे खरं आहे. फळांच्या बाबतीत सांगायचं झालं तर फळांचा ज्युस करून पिण्यापेक्षा फळं कापून खाणं हे कधीही आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरतं. अधिक प्रमाणात तुम्ही फळांचा ज्युस प्यायल्याने तुमच्या शरीराला अधिक नुकसाच होतं.  नक्की काय तोटे आहेत ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही ही सवय कशी वाईट आहे हे जाणून घ्या. फळांमध्ये शरीराला आवश्यक प्रोटीन, विटामिन्स मिळतात. पण ज्युस केल्यास, ते विटामिन्स आणि प्रोटीन्स निघून जातात. त्यामुळे सहसा ज्युस करून पिण्यापेक्षा डायरेक्ट फळं कापून खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगलं आहे. आता नक्की वाईट परिणाम काय होतात ते आपण पाहूया - 

1. मूड स्विंग

Shutterstock

आता  तुम्ही म्हणाल मूड स्विंग आणि फळांच्या रसाचा नक्की काय संबंध? तर नक्कीच आहे. फळांचा रस सतत पित राहिल्यास,  तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात साखर जाते. ज्यामुळे तुम्हाला आळस येतो. आळशीपणामुळे मूड स्विंग होत राहतो. कारण कोणतंही काम करण्याची इच्छाच होत नाही. त्यामुळे सतत मूड स्विंग होत चिडचिडेपणा वाढू लागतो आणि इतर लोकांबरोबरही यामुळे भांडणं होत राहातात. त्यामुळे सहसा जेवणाच्या वेळी अथवा अगदी सकाळीदेखील किमान एक ग्लासापेक्षा अधिक फळांचा रस पिऊ नये. रोज प्यायचा झाल्यास, त्याचं एक अर्ध्या ग्लासाचं प्रमाण ठरवून घ्यावं. पण शक्यतो रोज फळांचा रस पिणं टाळावं.  हे आपल्या आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरतं. 

हे नॅचरल ड्रिंक्स पिऊन तुमच्या चेहऱ्यावर येईल महिन्याभरात ‘ग्लो’

2. जाडेपणा

Shutterstock

फळांमध्ये मुळातच गोडपणा आणि साखरेचा अर्क नैसर्गिकरित्या असतो. तसंच फळांचा रस करत असताना अधिक प्रमाणात अर्थात अतिरिक्त साखर त्यामध्ये घातली जाते. त्यामुळे नियमित जर फळांचा रस पित राहिलात तर तुमचं वजन वाढून तुमचा जाडेपणा अधिक वाढीला लागतो. एकदा जाडेपणा वाढायला लागला की, नियंत्रित करण्यासाठी खूपच त्रासदायक ठरतं. फळांमध्ये मुळातच साखर असल्याने हा जाडेपणा कधी वाढतो त्याचा अंदाजही येत नाही. त्यामुळे फळांचा रस नियमित पित असाल तर तुम्ही वेळीच काळजी घ्या. कोणत्या फळांचा रस पित आहात आणि त्यामधून साखर किती प्रमाणात तुमच्या शरीरात जात आहे याचा वेळीच अंदाज घेणं गरजेचं आहे. ज्युस पिण्यापेक्षा स्मूदी पिणं हे नेहमीच सोपं ठरतं. कारण त्यामध्ये नैसर्गिक फळांचा समावेश असून  साखरेचा अर्क घातला जात नाही. तरीही ही सवय जास्त लावून घेऊ नका. 

चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस

3. डोकेदुखी

Shutterstock

शरीरात साखर जास्त प्रमाणात जाऊ लागली की साहजिक त्याचा परिणाम डोक्यावर सर्वात पहिल्यांदा होतो. त्यामुळे सतत ज्युस प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. त्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. अंगात फळांच्या ज्युसमुळे साखर जास्त होऊन  अंग आणि डोकं जड होतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम डोकेदुखीमध्ये होतो. त्यामुळे शक्यतो ही सवय लावून घेऊ नका. आठवड्यातून एक अथवा दोन दिवस तुम्ही कोणत्याही फळांचा ज्युस प्यायल्यास, तुम्हाला हा त्रास जाणवणार नाही. तसंच फळांचा रस पिताना नक्की कोणत्या फळांचा रस तुम्ही पित आहात याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्रासदायक ठरणाऱ्या फळांंचा रस पिणं टाळणंच योग्य आहे. 

दररोज केळं खाण्यामुळे होतील हे फायदे

4. रक्तातील साखरेची वाढ

Shutterstock

सर्वात महत्त्वाचा आणि योग्य मुद्दा. सतत ज्युस पिण्याच्या सवयीने  तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळे अनेक आजारही बळवतात.  डोकेदुखी, मधुमेह, अंग जड होणं, सतत डोळ्यांना दिसायला त्रास होणं यासारखे असंख्य आजार याबरोबर बळावतात. त्यामुळे सहसा नियमित फळांचा ज्युस पिण्याची सवय स्वतःला लावून घेऊ नका. त्याने तुमच्या आरोग्याचं अधिक नुकसान आहे हे लक्षात घ्या. फळांचा आपल्या आहारात समावेश करणं योग्य आहे. पण तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही फळांचं आणि फळांच्या ज्युसचं सेवन करणं योग्य आहे. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.