ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
2020 मध्ये नक्की ट्राय करा हे कॉटन ब्लाऊज.. आाणि दिसा एकदम क्लासी

2020 मध्ये नक्की ट्राय करा हे कॉटन ब्लाऊज.. आाणि दिसा एकदम क्लासी

2020ची तुमची सुरुवात एकदम मस्त झाली असेल. यावर्षी तुम्ही फॅशनेबल राहण्याचा विचार करत असाल तर ‘शुभश्य शीघ्रम!’. कारण नुसता विचार करुन वेळ घालवू नका तर यंदाच्या वर्षी तुम्ही टापटीप आणि एकदम छान राहा. त्यातल्या त्यात तुम्ही साडीप्रेमी असाल तर मग तुम्हाला काही गोष्टी या नव्या वर्षात नक्कीच ट्राय करायला हव्यात. कारण साडीमध्ये असलेला Grace इतर कोणत्याही आऊटफिटमध्ये तुम्हाला मिळणार नाही. आता नव्या वर्षात तुम्ही नव्या साड्या घ्याव्यात असे आम्ही सांगणार नाही तर या नव्या वर्षात तुम्ही साड्या नवीन घेण्यापेक्षा थोडी ब्लाऊजमध्ये व्हरायटी आणा. याच ब्लाऊजविषयी सांगण्याचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत. बाजारात तुम्हाला कॉटन मटेरिअलमधील ब्लाऊज दिसत असतील तर तुम्ही त्यांचा उपयोग करु शकता.

असा ब्लाऊज शिवल्यास जाड हातही दिसतील बारीक

कलमकारी ब्लाऊज (Kalamkari blouse)

Instagram

ADVERTISEMENT

कॉटन मटेरिअलमधील कलमकारी हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. हल्ली रेडिमेड मटेरिअलमध्येही अशाप्रकारचे ब्लाऊज मिळतात. यांच्यावरील डिझाईन्स या abstract,animal print, historic print अशा स्वरुपात मिळतात. कलमकारी डिझाईन्स या जरा जुन्या वाटत असल्या तरी हे ब्लाऊज घातल्यानंतर छान दिसतात.एकदम फॉर्मल आणि क्लासी असे हे ब्लाऊज दिसतात. आता जर तुम्ही प्रिटेंट ब्लाऊज घेणार असाल तर तुम्हाला त्यावर प्लेन शिफॉन किंवा सील्कच्या साड्या नेसता येतील. तुम्हाला तुमच्या साईजप्रमाणे हे ब्लाऊज मिळतात. जर तुम्ही शिवून घेणार असाल तर उत्तम पण हल्ली तुम्हाला असे ब्लाऊज रेडिमेडही मिळतात. 

खादी – कायम टिकणारी फॅशन, नेहमीचा ट्रेंड

इक्कत ब्लाऊज (Ikat blouse)

Instagram

ADVERTISEMENT

ट्रेडिशनल प्रकारातील आणखी एक डिझाईन म्हणजे इक्कत ब्लाऊज. इक्कत डिझाईनही चांगल्या दिसतात. त्याहीपेक्षा ते क्लासी वाटतात. स्लिवलेस, हॉल्टर नेक, थ्री फोर्थ हँड अशा प्रकारात तुम्ही इक्कत ब्लाऊज घेऊ शकतात. चेक्स किंवा बुट्टी प्रकारामध्ये तुम्हाला हे ब्लाऊज मिळू शकतात. तुम्ही जर बॉर्डरच्या साड्या नेसत असाल तर तुम्ही मिक्स मॅच करुनही हे ब्लाऊज वापरु शकता. हे ब्लाऊज साधारण 700 रुपयांपर्यंत तुम्हाला मिळतात.

गरोदरपणात म्हणून वापरायला हवेत ‘प्रेग्नंसी गाऊन’

खादी ब्लाऊज (Khadi blouse)

Instagram

ADVERTISEMENT

अनेकांना खादीहा प्रकारही खूप आवडतो. जर तुम्हाला खादी आवडत असेल तर तुम्ही खादीचे ब्लाऊज वापरु शकता. ऑफ व्हाईट रंगामध्ये मिळणारे खादी ब्लाऊज ट्रेडिशनल तरी फॅन्सी वाटतात. यामध्ये तुम्हाला फ्रिल हँडस, स्लिव्हलेस विथ स्टँड कॉलर किंवा असे  प्रकार मिळू शकतात. आता तुम्हाला कोणत्या पॅटर्न चांगला वाटतो त्यानुसार तुम्ही त्याची निवड करु शकता. कॉटन साडीवरही हे खादी ब्लाऊज चांगले दिसतात. खादी ब्लाऊजच्या किमतीही तशा जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही जर साडी खरंच नेसणारे असाल तरच तुम्ही याची निवड करा.

मग यंदा साडी नेसणार असाल तर मग तुम्ही हे कॉटन ब्लाऊज नक्की ट्राय करुन पाहा.

 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

ADVERTISEMENT
02 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT