तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा नवा विक्रम

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा नवा विक्रम

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका जवळजवळ बारा वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. 7 जानेवारी 2019 रोजी या मालिकेला एकूण 2900 एपिसोड पूर्ण होत आहेत. टेलिव्हिजन माध्यमात एखाद्या कॉमेडी शोने एवढे वर्ष सातत्याने लोकांचं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्यामुळे या मालिकेने या माध्यमातून एक नवा विक्रम टेलिव्हिजन माध्यमात नोंदवला आहे. विशेष म्हणजे घराघरात ही मालिका  आजही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने पाहिली जाते. या नव्या विक्रमामुळे प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता तर या मालिकेतील टप्पू सेना मोठी झाली आहे. टप्पू सेना अगदी लहान असल्यापासून ही मालिका प्रेक्षक पाहत आहेत. सतत बारा वर्ष सातत्याने एखादी मालिका पाहण्यासाठी त्या मालिकेत काही तरी खास असावं लागतं. या मालिकेचं वेगळेपण या विक्रमातून दिसून येत आहे. 

काय आहे या मालिकेचं वेगळेपण

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी आहे. इतक्या वर्षांनंतरही या मालिकेच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. आजही या मालिकेतील विविध पात्रांवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीला मिनी इंडीया म्हणून ओळखलं जातं. कारण या सोसायटीत राहणारे लोक भारतातील विविध प्रांत  आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. विविध प्रकारची संस्कृती असूनही या मालिकेत एकत्वाचा संदेश दिला जातो. या मालिकेतील सर्वच पात्रांना एक विशिष्ठ स्थान देण्यात आलेलं आहे. ज्यामुळे प्रत्येक पात्राकडे त्याच नजरेतून प्रेश्रक पाहत असतात. सहज हलक्या फुलक्या विनोदातून निखळ मनोरंजन आणि नकळत प्रबोधन केलं जातं. या मालिकेतून सतत समाजात घडणाऱ्या गोष्टी प्रकाशात आणल्या जातात. आतापर्यंत स्वच्छता अभियान, महिला सशक्तिकरण, शिक्षणाचे महत्त्व, पाणी वाचवा अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. ज्याचा मुलांना चांगला फायदा होऊ शकतो.

कलाकारांची याबाबत प्रतिक्रिया

या मालिकेचे निर्माते असीत कुमार मोदी यांना  या नव्या विक्रमामुळे नक्कीच आनंदी झाला आहे. त्यांनी याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे की, "आम्हाला प्रचंड आनंद होत आहे कारण आमच्या मालिकेचे 2900 एपिसोड पूर्ण झाले आहेत. या मालिकेत आम्ही नवनवीन संकल्पना आणि गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न  करतो. आमच्या संपूर्ण टीमने केलेल्या मेहनत, अभ्यास आणि प्रयत्नांचं हे यश आहे. हे यशआमच्या टीम आणि प्रॉडक्शन हाऊससाठी फार महत्त्वाचं आहे. या मालिकेच्या यशाबाबत जेठालाल या प्रमुख पात्रानेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी याने या सेटवरील टीमच्या उत्साह आम्हाला लोकांशी जोडून ठेवण्यात यशस्वी ठरवतो असं सांगितलं आहे. मालिकेतील सर्वच पात्र या यशामुळे आनंदी झाले आहेत. प्रेक्षकांना या मालिकेचं यश ही नव्या वर्षातील एक छान खुशखबर नक्कीच आहे. 

 

 

फोटोसौजन्य - इन्साग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

अभिनेत्री श्वेता शिंदेचा कमबॅक, या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल मीडियावर सारा अली खानच्या बिकिनी फोटोवर होतेय चर्चा

शाहरूख खानसोबत झळकणार आमिर खानची ही हिरोईन