शाहरूख खानसोबत झळकणार आमिर खानची ही हिरोईन

शाहरूख खानसोबत झळकणार आमिर खानची ही हिरोईन

बॉलीवूड किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) ने 2018 साली आलेल्या जीरो (Zero) चित्रपटानंतर आत्तापर्यंत एकही प्रोजेक्ट सुरू केल्याची बातमी नव्हती. कारण हा चित्रपट आपटल्यावर शाहरूख आपल्या पुढच्या प्रोजेक्टबाबत खूपच सतर्कता दाखवत असल्याची बॉलीवूडच्या सर्कलमध्ये चर्चा होती. त्यामुळेच तो पुढच्या कोणत्याही चित्रपटाची घोषणा किंवा साईन करण्याबाबत खूप विचार करत होता. पण तरीही त्याच्या आगामी चित्रपटाबाबत अनेक बातम्या येतच होत्या. नंतर बातमी आली ती किंग खान लवकरच दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एटलीसोबत काम करणार आहे. तर दुसरीकडे चर्चा होती की, अखेर शाहरूख निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या चित्रपटात काम करणार आहे. त्यामुळे आता शाहरूखच्या फॅन्समध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.

अखेर शिक्कामोर्तब ?

शाहरूखच्या या आगामी चित्रपटाबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरी नवीन बातमी समोर येत आहे. सूत्रानुसार शाहरूखने अंतराळवीर राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांच्यावरील बायोपिक सॅल्यूट (Salute) करण्याला होकार दिला आहे. एवढंच नाहीतर शाहरूखसोबत झळकणार असणाऱ्या हिरोईनचं नावही ठरलं आहे. सूत्रानुसार आमिर खान (Aamir Khan) च्या दंगल (Dangal) फेम चित्रपटातील अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) शाहरूखसोबत झळकणार आहे.

शाहरूखचं अंतराळ कनेक्शन

किंग खान आणि अंतराळ चित्रपटाचं अनोखं कनेक्शन आहे. कारण स्वदेस आणि जीरोनंतर शाहरूखचा सॅल्यूट हा तिसरा चित्रपट असेल ज्यात तो अंतराळाशी निगडीत भूमिका करणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या स्वदेस या चित्रपटात शाहरूखने नासातील वैज्ञानिकाची भूमिका केली होती. त्यानंतर जीरोमध्ये किंग खानने अंतराळात जाण्यासाठी निवड झालेल्या नासाच्या अंतराळवीराची भूमिका केली होती. आता आगामी सॅल्यूटमध्येही भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा ज्यांनी चंद्र मोहिमेत भाग घेतला होता. शाहरूखच्या या तिसऱ्या अंतराळ कनेक्शन चित्रपटाचा त्याला फायदा होतो की, नाही ते पाहावं लागेल. कारण आधीच्या दोन्ही चित्रपटांपैकी स्वदेसमधील शाहरूखच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं तर जीरो मात्र बॉक्स ऑफिसवर साफ आपटला होता.

आमिरने सुचवलं होतं शाहरूखचं नाव

Instagram

हा तोच चित्रपट आहे ज्यासाठी खुद्द परफेक्शनिस्ट आमिरने शाहरूख खानचं नाव सुचवलं होतं. शाहरुख खानने या चित्रपटासाठी होकार दिल्याचं तर कळलं होतं, पण फक्त घोषणा झाली नव्हती. त्यानंतर ऐनवेळी जीरोच्या वाईट प्रदर्शनानंतर शाहरूख पुन्हा संभ्रमात होता. त्यामुळे हा सिनेमा अडकला होता. पण आता मात्र शाहरूख या चित्रपटासाठी तयार असल्याचं कळतंय. फक्त आता याची ऑफिशियल घोषणा होणं बाकी आहे

खरंतर किंग खानचा चित्रपट येतो आहे म्हटल्यावर तो कोणताही का असेना त्याचे फॅन्स पाहायला जाणारच. त्यामुळे सध्या शाहरूखचे फॅन्स त्याचा चित्रपट लवकरात लवकर यावा, अशीच प्रार्थना करत असतील. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.