ADVERTISEMENT
home / Weight Loss
पोट सुटले असेल तर हे 3 व्यायामप्रकार आठवड्याभरात करतील चमत्कार

पोट सुटले असेल तर हे 3 व्यायामप्रकार आठवड्याभरात करतील चमत्कार

तुमचेही पोट सुटले? पण जीमला जाऊन वर्कआऊट करण्यासाठी तुम्हाला फारसा वेळ नाही? पण सुटलेल्या पोटाचे काहीतरी करावे लागेल असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही अगदी सोपे 3 व्यायामप्रकार करुन तुमच्या पोटावरील चरबी कमी करु शकता. हे व्यायाम तुम्ही मनापासून केले तर तुम्हाला हवे असलेले अॅब्जही या व्यायामाने मिळू शकतील. मग आता आपण पाहुया हे 3 चमत्कार करणारे व्यायामप्रकार. करुया सुरुवात

वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं योग्य की अयोग्य

क्रंचेस ( Crunches)

Giphy

ADVERTISEMENT

आता पहिला व्यायामप्रकार तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे क्रंचेस (Crunches). हा व्यायाम प्रकार तुम्हाला अगदी सहज कुठेही करता येतो. यासाठी तुम्हाला आवश्यकता आहे ती मॅटची. पाठीवर झोपून तुम्हाला गुडघ्यात पाय दुमडून घ्यायचे आहेत. हात मानेखाली किंवा 90 अंशावर घेऊन तुम्हाला कोणताही आधार न घेता उठायचे आहे. जर तुम्ही अगदीच व्यायाम करणारे नसाल तर तुम्हाला पहिल्यावेळी थोडा त्रास होईल. पण कालांतराने तुम्हाला याची अगदी सवय होईल. 

*पहिल्यांदा तुम्ही 10 क्रंचेसपासून व्यायामाला सुरुवात करा. पुढे हा आकडा वाढवा. हा व्यायाम प्रकार करताना तुम्हाला तुमच्या पोटाच्या वरील भागावर ताण आलेला जाणवेल.यामुळे तुमचे पोटाचे स्नायू ताणले जातात. पोटाच्या भागात साचलेली चरबी कमी करण्यास हा व्यायाम प्रकार मदत करतो. 

*जर तुम्हाला यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही तुमच्या पायांखाली मेडिसिन बॉल घेऊ शकता. त्यामुळेही तुमच्या पोटावर चांगला ताण येतो.

 

ADVERTISEMENT

हाफ क्रंचेस ( Half crunches)

Giphy

वर जो प्रकार पाहिला तो फुल क्रंचेसमधील होता. असे करताना तुम्ही तुमचे अंग पूर्ण उचलत होता. पण आता तुम्हाला या व्यायामप्रकारात फक्त तुमचे खांदे वर येतील एवढचं शरीर उचलायचे आहे. असे करताना तुमच्या ओटी पोटात तुम्हाला थोडी कळ आलेली जाणवेल. तुमच्या ओटीपोटावरील फॅट कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार मदत करतो. क्रंचेसप्रमाणेच तुम्हाला यामध्ये रिपिटेशन वाढवायचे असतात. म्हणजे सुरुवातीला 10 आणि मग नंतर तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार हा व्यायाम करु शकता. असे करताना तुमची मान दुखत असेल तर तुम्ही काहीतरी चुकीचं करत आहात.तुम्हाला हा ताण तुमच्या पोटावर येऊ द्यायाचा आहे मानेवर नाही. तुम्ही जर हा व्यायाम प्रकार 15 दिवस  करुन पाहिलात तरी तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल जाणवेल. 

संध्याकाळी कधीही खाऊ नका हे पदार्थ नाहीतर वाढेल वजन

ADVERTISEMENT

लेग रेस ( Leg raises)

Giphy

हा व्यायामप्रकार दिसायला आणि करायला सोपा वाटत असला तरी तुम्हाला हा व्यायामप्रकार फारच फायदेशीर आहे.  मॅटवर पाठीवर झोपून तुम्हाला तुमचे दोन्ही पाय 90 अंशावर उचलायचे आहेत. पाय खाली आणताना तुम्हाला हळू आणायचा आहे.  कारण असे केल्यानंतरच तुम्हाला ओटीपोटात ताण आलेला अगदी सहजपणे जाणवेल. आता या व्यायामाची सुरुवात तुम्हाला 10 पासून करायची आहे. त्यानंतर तुम्ही ते वाढवू शकता.

ज्यांना व्यायामाला अगदीच वेळ काढता येत नसेल तर अशांनी किमान हे 3 व्यायामप्रकार करायला काहीच हरकत नाही. तुम्ही जर तुमचा डाएट आणि व्यायामाचे सातत्य कायम ठेवले तर तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर नक्कीच कमी झालेला दिसेल.

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

30 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT