ADVERTISEMENT
home / Diet
वजन घटवण्याचा सर्वात सोपा उपाय, या ज्युसमुळे कमी होणार पोटावरील चरबी

वजन घटवण्याचा सर्वात सोपा उपाय, या ज्युसमुळे कमी होणार पोटावरील चरबी

आपल्या शरीराला दररोज किती कॅलरीची आवश्यकता असते. शरीरातील कॅलरी कमी झाल्यास आरोग्यास नुकसान पोहोचतात का? कोणत्या पदार्थांचं सेवन केल्यास भरपूर प्रमाणात शरीराला कॅलरी मिळतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधत आहात का. जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरे. शरीराला पर्याप्त प्रमाणात कॅलरीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मनुष्य प्राण्याच्या शरीरात ऊर्जेची एक मात्रा असते, ज्यामुळे शारीरिक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्या जातात. कित्येक प्रकारच्या आहाराद्वारे पुरेशा प्रमाणात कॅलरी शरीरात घेतल्या जाऊ शकतात. अधिक प्रमाणात कॅलरीचं सेवन केल्यास तुमचं वजन वाढण्याचीही शक्यता असते. शरीरात कॅलरी जमा होतात, यामुळे हळूहळू वजन देखील वाढू लागते. पण योग्य प्रमाणात कॅलरीचं सेवन केल्यास कित्येक फायदे होतात. वाढलेले वजन आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेत असाल तर सुरुवातीला तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागेल. आपल्या आहाराकडे देखील नीट लक्ष देणे गरजेचं आहे. तुम्ही काय खात आहात, कोणत्या वेळेमध्ये  खात आहात आणि आहारातून किती प्रमाणात कॅलरी तुमच्या पोटात जात आहे. जर तुम्हाला नियमित ज्युस पिण्याची सवय असेल तर त्याद्वारेही तुम्ही किती कॅलरीचे सेवन करता यावरही लक्ष दिलं पाहिजे. काही फळांच्या ज्युसचं तुम्ही सेवन केल्यास तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

(वाचा : घरातील ‘या’ गोष्टींमुळे पोटात असणाऱ्या बाळावर होऊ शकतात दुष्परिणाम)

1. काकडीचा ज्युस – काकडीमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये फायबरचं प्रमाण देखील कमी असते. शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी काकडीचा रसाचे सेवन करण हे सर्वात उत्तम पर्याय आहे. काकडीच्या रसामुळे आरोग्यदायी फायदे देखील होतात.

2. गाजराचा ज्युस – गाजराच्या ज्युसमुळेही तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. गाजराच्या ज्युसमध्ये फायबर आणि जीवनसत्त्व अ भरपूर प्रमाणात असते. यामध्ये कमी प्रमाणात कॅलरी असल्यानं तुमच्या वजनाचे समतोल योग्य पद्धतीनं राखले जाते.

ADVERTISEMENT

(वाचा : तुम्हाला माहिती आहे का, हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात कितीदा खाल्लं पाहिजे)

3. कारल्याचा ज्युस – कारल्याच्या ज्युसमध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरी असल्यानं वजन नियंत्रणात राहतंच. शिवाय कारल्याच्या रसामुळे कित्येक आरोग्यदायी फायदे ही मिळतात.

4. डाळिंबाचा ज्युस – डाळिंबाच्या ज्युसमुळे केवळ वजनच कमी होत नाही तर आपल्या त्वचेचा पोत सुधारण्यासही मदत होते. आपली त्वचा सुंदर दिसू लागते.

(वाचा : हिवाळ्यात तुम्ही तास-न्-तास उन्हामध्ये बसता? मग वेळीच व्हा सावध)

ADVERTISEMENT

5. आवळ्या ज्युस – आवळ्याच्या रसामुळे चयापचयाची प्रक्रिया सुधारते. चयापचयाची क्षमता देखील वाढण्यास मदत होते. आवळ्याच्या रसामुळे वजन कमी होतेच. पण कित्येक शारीरिक लाभ देखील आपल्याला मिळतात.

(वाचा : सावधान ! तुमच्यात आढळली आहेत का ब्रेस्ट कॅन्सरची ‘ही’ लक्षणं)

हे देखील वाचा : 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

ADVERTISEMENT
13 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT