सकाळी उठल्यावर तुम्हालाही तुमची मान दुखत असल्याचे जाणवले आहे का? दिवसभर काम करुन जर संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला मान दुखीने अस्वस्थ झालेले जाणवले आहे का? हे विचारण्यामागे कारण इतकंच आहे की, तुम्हाला मान दुखीचा त्रास आहे की नाही ते माहीत करुन घेणे. मानदुखीचा त्रास साधारणपणे सगळ्यांना असतो. पण ही मान दुखी कधी जीवघेणी होते सांगता येत नाही. मान दुखी कारणे अनेक आहेत. शिवाय मानदुखीवर घरगुती उपाय सुद्धा आहेत. त्यामुळेच आज आपण मानदुखी या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत. यामध्ये मानदुखी उपाय,मानदुखी घरगुती उपाय, मान दुखी व्यायाम, मानेचे आजार आयुर्वेदिक उपचार या बद्दल जाणून घेणार आहोत. मग करुया सुरुवात
मान दुखीची ही आहेत कारणं – Causes of Neck Pain In Marathi
तसं पाहायला गेलं तर मान दुखीची कारणे अनेक आहेत. पण सर्वसामान्यपणे मान दुखीचा त्रास हा कशामुळे होऊ शकतो त्यामागील कारणे जाणून घेणे फारच गरजेचे आहे. म्हणूनच मान दुखीची कारणे सगळ्यात आधी जाणून घेऊया.
झोपण्याची चुकीची पद्धत
खूप जणांना कसेही झोपण्याची सवय असते. या झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही तुम्हाला मान दुखीचा त्रास होऊ शकतो. उदा. काही जण बसल्या जागी खुर्चीवर बसल्या जागी झोपतात. अशावेळी तुमच्या मानेला आधार मिळत नाही. त्यामुळे होत असं की, तुमच्या मानेला ताण पडून तुमची मान दुखू लागते. कधी कधी झोपताना आपण इतके विचित्र झोपतो की, त्यावेळी आपल्याला त्याची जाणीव होत नाही. पण मानेखाली हात घेऊन झोपणे, कडक उशीवर झोपणे,मेट्रेसवर न झोपता जमिनीवर झोपणे या काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला मान दुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे झोपण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायला हवी. झोपण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घेतले तर तुम्हाला याचा त्रास होणार नाही.
स्नायूंमध्ये तणाव
shutterstock
हल्ली अनेक जण फिजिकल अॅक्टीव्हीटील प्राधान्य देतात. जीम किंवा व्यायाम करताना अनेकदा मानेवर ताण येतो. अशावेळी स्नायू ताणले गेले की, तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. मान दुखीचा त्रास अनेकांना चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळे होतो. त्यामुळे मान दुखीसाठी हे एक कारण ही असते. जर तुम्ही कोणालाही न विचारता किंवा योग्य सल्ला न घेता जर अशापद्धतीने व्यायाम करत असाल तर तुम्हाला मान दुखीसोबत अन्य काही आजारही होण्याची शक्यता आहे.
एकाच जागी बसून राहणे
हल्ली प्रत्येकाचे काम लॅपटॉपवर असते. एकाच जागी बसून आपण काम करत असतो. या कामांच्यामध्ये उठणे ही शक्य नसते. आता कामांच्या ठिकाणी असलेल्या खुर्च्या तुम्हाला आराम देतातच असे नाही. अनेकदा तुमची मान आधांतरीत राहते त्यामुळे तुमच्या मानेवर ताण येतो. जर तुम्ही एकाच जागी बसून व्यायाम न करता काम करत राहिलात तर तुम्हाला मान दुखीचा त्रास होऊ शकतो.
पिरेड्सच्या तारखा नेहमी चुकतात,जाणून घ्या कारणं आणि इलाज
जास्त वजन उचलणे
काही जणांना क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहण्याची सवय असते. जास्त वजन उचलल्यामुळे तुम्हाला जसा कंबर दुखीचा किंवा पाठ दुखीचा त्रास होतो. त्यापेक्षाही जास्त त्रास तुम्हाला मान दुखीचा होतो. तुम्हाला मान दुखी पटकन जाणवत नाही. पण तुम्ही ज्यावेळी वजन खाली ठेवता त्यावेळी तुम्हाला तुमचे खांदे, मान,पाठीचा कणा दुखू लागत. त्यामुळे तुम्ही जर जास्त वजन उचलत असाल तर तुम्हाला हा त्रास झालेला नक्की जाणवेल.
दुखापत
Shutterstock
मान दुखीला तुमची शारीरिक दुखापतही कारणीभूत असते.जर तुम्हाला काही इजा झाली असेल तर तुम्हाला मान दुखीचा त्रास होऊ शकतो. जसे आम्ही आधी सांगितले की, अनेकदा जीममध्ये व्यायाम करताना किंवा प्रवासात तुम्हाला अशाप्रकारची दुखापत होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तुम्हाला अशाप्रकारची दुखापत होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
मानदुखीवरील घरगुती उपाय – Home Remedies For Neck Pain In Marathi
मान दुखीचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही काही घरगुती उपायही करुन पाहायला हवेत. म्हणून आम्ही तुम्हाला मानदुखी घरगुती उपायांविषयी सांगणार आहोत.मानेचे आजार आणि आयुर्वेदिक उपचारदेखील आहे. पण आज आपण जाणून घेऊया मानदुखीवर उपाय
बर्फ
Shutterstock
तुम्हाला मानेचा त्रास होत असेल आणि त्वरीत आरामाची गरज असेल तर तुम्ही बर्फाचा उपयोग करु शकता. पोटावर झोपून तुम्हाला तुमच्या मानेवर दोन बर्फाचे खडे ठेवायचे आहेत. बर्फ जरी थंड वाटत असला तरी तो उष्ण असतो हे तुम्हाला माहीत असेल. मानेवर अशा प्रकारे बर्फ ठेवल्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळू शकतो. मानेवर बर्फ ठेवणे ही चायनीज थेरपीमधील एक थेरपी असून याचे भरपूर फायदे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितलेल्या थेरपीनुसार बर्फाच्या वापरामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळतो. तुमच्यावर असलेला अतिरिक्त ता देखील कमी होतो. त्यामुळे तुम्ही हा पर्याय नक्की ट्राय करुन पाहू शकता.
हिटींग पॅड
हिटींग पॅड ही असी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. जर तुम्हाला मानदुखी होत असेल तर तुम्ही हिटींग पॅडचा उपयोगदेखील करु शकता. तुम्हाला हिटींग पॅड घेऊन तुमच्या मानेखाली ठेवू शकता. जर तुमच्या मानेचे स्नायू ताणले गेले असतील तर तुम्ही गरम पाण्याची पिशवी घेऊन तुमच्या मानेखाली ठेवा. यामुळे तुमच्या अडकलेल्या नसा मोकळ्या होतात आणि तुमची मानदुखी कमी होते.
मानेचे व्यायामप्रकार
मान दुखल्यानंतर तुम्ही अगदी आरामात करु शकता तो मानेचा व्यायाम. अगदी कुठेही बसून तुम्ही मानेचा व्यायाम करु शकता. तुम्हाला मानेचा व्यायाम करण्यासाठी एका जागी ताठ बसायचे आहे. मान वर-खाली असे तुम्हाला किमान 10 वेळा करायचे आहे. त्यानंतर मान दोन्ही बाजूला झुकावयची आहे. तुम्हाला मान दुखीचा त्रास असेल तर तुम्ही मान गोलाकार फिरवू नका. अर्ध गोल फिरवून हा क्रम सरळ आणि उलट दिशेने करां. म्हणजे तुम्हाला आराम मिळेल.
झोपण्याची सवय
Shutterstock
मान दुखीसाठी झोपण्याची योग्य पद्धतही तुम्हाला माहीत हवी. जर तुम्ही नीट झोपलात तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. जर तुम्ही पाठीवर झोपणार असाल आणि तुम्हाला उशीची सवय असेल तर तुम्ही जाड आणि कडक उशा निवडू नका. तुम्ही पाठीवर आणि पोटावर आलटून पालटून झोपत राहा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. नेक रेस्ट नसलेल्या खूर्च्यांवर झोपू नका. सोफा किंवा अशा ठिकाणी झोपताना तुम्हाला थोडी काळजी घेणे आवश्यक असते.
मानेचा मसाज
मसाज हा आपल्या सगळ्यांना आवडतो. जर तुम्हाला मानेचा मसाज योग्य पद्धतीने करणे जमत असेल तर तुम्ही मानेचा मसाज करा. जर तुम्हाला मसाज विषयी आणि नसांना आराम देण्यासंदर्भात काहीही माहीत नसेल तर तुम्ही थेरपिस्टची मदत घ्या. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला व्यायाम तुम्हाला आराम दे शकतो. अनेक जण महिन्यातून एकदा तरी मसाज करुन घेतात . जर तुम्हाला अशा प्रकारे मसाज करता आला तर तुम्हाला मान दुखीचा त्रास होणार नाही.
मानेसाठी खास उशी
Shutterstock
हल्ली प्रवासासाठीही खास उशा मिळतात. या उशांचा वापरामुळे तुम्हाला आराम मिळतो. गोलाकार आकाराच्या या उशा तुम्हाला इतरवेळीही वापरता येतात. हल्ली बाजारात नेक रेस्ट नावाच्या या उशा फारच प्रसिद्ध आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आकाराच्या या उशा फारच आरामदायी आहेत.
अनावश्यक काम करा कमी
काहींना कामाचा ताण घ्यायची सवय असते. त्यामुळेही तुमचे स्नायू घट्ट होतात. त्यांची यंत्रणा बिघडल्यामुळेही तुम्हाला मान दुखीचा त्रास होऊ शकतो. लॅपटॉपचा वापर फोनचा वापर या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्या थोड्या कमी करायला हव्यात असे केले तर तुम्हाला त्रास होणार नाही. शिवाय जर तुम्ही वजन उचलण्यासारखे मेहनतीचे काम करत असाल तर तुम्ही असे करु नका.
झोप करा पूर्ण
जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तरी देखील तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. मान दुखीच्या कारणांमध्ये आम्ही तुम्हाला ताण तणाव जबाबदार असल्याचे सांगितले होते तुमचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही तुमची झोप पूर्ण करणे फारच गरजेचे असते. कितीही नाही म्हटले तरी प्रत्येकाला 8 ते 9 तासांच्या झोपेची गरज असते त्यामुळे तुम्ही किमान 8 तास तरी तुमची झोप पूर्ण करा.
काम करण्याची सवय
Shutterstock
जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमची काम करताना बसण्याची सवय बदलता आली तर फार उत्तम. जरी तुमचे काम फार काळ बसून करण्याचे असेल तरी मध्येमध्ये उठत जा. थोडेसे स्ट्रेचिंग करुन तुम्ही पुन्हा एकदा कामाला लाग. मानेचे थोडे व्यायाम करा. त्यामुळे तुमच्या मानेचा ताण कमी होईल. कामाच्यामध्ये थोडासा ब्रेक घेणे तुमच्या शरीरासाठी फारच आवश्यक असते.
मानेला द्या आराम
Shutterstock
तुमच्या संपूर्ण शरीरासोबतच तुम्हाला तुमच्या मानेला विशेष आराम देण्याची गरज असते. तुम्ही तुमच्या मानेला आराम देण्याचा विचार करत असाल तर खूर्चीवर कधीकधी मान रेलून झोपा. तुम्हाला थोडा आराम मिळेल. तुम्ही आराम करताना तुमच्या झोपण्याची पोझीशन बदलली तर फार उत्तम.
तुम्हाला पडलेत का प्रश्न – FAQs
मानेचे दुखणे गंभीर आजाराचे लक्षण आहे का?
मानेशी निगडीत अनेक गंभीर आजार आहेत. मान दुखी ही जरी सर्वसामान्य असली तरी त्याकडे दुर्लक्ष करुन अजिबात चालत नाही. मानेशी निगडीत तुम्हाला स्लीप डिस्कसारखे मनक्याचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही.तुम्हाला 15 दिवसांहून अधिक काळ मानदुखी असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण मानेचे दुखणे गंभीर आजारांचे लक्षण असते.
मानेच्या दुखण्याकडे कधी अधिक लक्ष द्यायला हवे ?
शरीराशी निगडीत कोणताही त्रास असला तरी त्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. जर तुमच्या मानेचे दुखणे वाढले असेल तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु करा. काहींना त्यांच्या मानेचे दुखणे हे चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे किंवा बसण्यामुळे होते असे वाटते. पण मानदुखीची अनेक कारणे आहेत आणि त्याचे होणारे परिणामही गंभीर आहेत. त्यामुळे तुम्ही मानेच्या दुखण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.
ताण-तणावामुळे मानेचे दुखणे होऊ शकते?
मानेच्या दुखण्याचे एक कारण म्हणजे ताण-तणाव असू शकते. तुमच्यावरील ताणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. ताणाचा तुमच्या मेंदूवर परिणाम होत असतो. ज्यावेळी तुम्ही टेन्शनमध्ये असता अशावेळी तुमच्या मानेच्या नसा या ताणल्या जातात. त्यामुळे तुम्हाला थकवा येतो आणि मान दुखी होते. त्यामुळे तुम्हाला ताण- तणावामुळे मानदुखीचा त्रास होऊ शकतो.
आता तुम्हाला जर मानदुखी असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.