ADVERTISEMENT
home / सौंदर्य
घनदाट केसांसाठी वापरा तांदूळाचे पाणी (Benefits Of Rice Water For Hair In Marathi)

घनदाट केसांसाठी वापरा तांदूळाचे पाणी (Benefits Of Rice Water For Hair In Marathi)

 

 

तुम्ही कधी वापरलं आहे का हे केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय ते म्हणजे तांदूळाचं पाणी. लांबसडक आणि मजबूत केसांसाठी तांदूळाच्या पाण्याचा वापर हा घरगुती उपाय वर्षानुवर्ष केला जात आहे. तांदूळाचं पाणी जसं आरोग्यासाठी चांगल आहे तसंच ते केसांच्या वाढीसाठीही उत्तम आहे. तांदूळाच्या पाण्यात व्हिटॅमीन आणि मिनरल्स असल्यामुळे केसांच्या सौंदर्यात ते भर टाकण्यात मदत करतं. हा असा घरगुती उपाय आहे जो तुम्ही अगदी सहज करू शकता. कारण आपल्या सगळ्यांकडे तांदूळ हे असतातच. केसांसाठी तांदूळाच्या पाण्याचा वापर हा फक्त भारतातच नाहीतर जपानमध्येही केला जायचा. जपानच्या प्राचीन हियान काळात जेव्हा दरबारातील महिलांचे सुंदर लांबसडक केस जमिनीपर्यंत असायचे. त्यामागील रहस्य होतं ते तांदूळाचं पाणी. संशोधनात आढळलं आहे की, तांदूळाच्या पाण्यात आढळणारं इनोसिटॉल हे तत्त्वं केसांना मजबूत करतं आणि त्यांचं अंतर्गतरित्याही पोषण करतं. तसंच भविष्यातील नुकसानापासूनही केसांचं रक्षण करतं. मग जाणून घ्या या सोप्या घरगुती उपायाचे फायदे आणि कसं वाढवता येईल तुम्हाला केसांचं सौंदर्य.

 

 

ADVERTISEMENT

केसांसाठी तांदूळाच्या पाण्याचे विविध फायदे (Benefits Of Rice Water For Hair In Marathi)

तांदूळाच्या पाण्याचे विविध फायदे - Hair Benefits Of Rice Water In Marathi

Shutterstock

तांदूळाच्या पाण्याचे केसांसाठी अनेक फायदे आहेत. हा एक असा घरगुती उपाय आहे जो तुम्हाला करण्यासाठी अगदी सोपा आहे. कारण यासाठी लागेल फक्त तांदूळ आणि पाणी. जाणून घेऊया तांदूळ पाण्याचे केसांसाठी असलेले विविध फायदे.

बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे आहेत भरपूर फायदे

ADVERTISEMENT

कोरड्या केसांसाठी तांदूळाचं पाणी (Rice Water For Dry Hair)

तांदूळाच्या पाण्याचा उपयोग केल्यास तुमच्या रूक्ष आणि कोरड्या केसांची समस्या दूर होऊ शकते. या पाण्याचा वापर केल्याने केसांचं टेक्श्चर चांगलं होतं. या पाण्यातील इनोसिटोल तत्त्वांमुळे केसांचा फ्रिजीनेस निघून जातो आणि केस चमकदार व मजबूत होतात.

उत्तम क्लींजर तांदूळाचं पाणी (Cleanser Rice Water)

तांदूळाच्या पाण्याने तुमचे केस मऊ आणि मुलायम होण्यास फायदा होतो. हे तुमच्या केसांवर केमिकल फ्री क्लींजर म्हणून काम करते. केसांना धुण्यासाठी तुम्ही शँपूऐवजी याचा वापरही करू शकता. कारण तांदूळाच्या पाण्याने केस धुतल्यावर ते सिल्की होतील.

केसांच्या वाढीसाठी तांदूळ पाणी (Rice Water For Hair Growth)

केसांची गळती कमी करणं असो वा केसांची वाढ जलद करायची असो तांदूळ पाणी उत्तम पर्याय आहे. तांदूळाच्या पाण्यात व्हिटॅमीन बी, सी आणि ई हे मोठ्या प्रमाणावर असतात. जे केसांच्या वाढीसाठी जवाबदार असतात. यातील अमिनो एसिड नव्या केसांच्या वाढीला चालना देतं. ज्यामुळे केस जलद वाढतात. शँपूऐवजी आठवड्यातून दोनदा तुम्ही तांदूळाचं पाणी वापरल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.

रात्री भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो का, जाणून घ्या काय आहे सत्य

ADVERTISEMENT

स्प्लीट एंड्स होतील कमी (Less Split Ends)

केसांच्या वाढीला रोखतात ते स्प्लीट एंड्स. केसांवर वारंवार वेगवेगळ्या शँपू आणि कंडीशनरचा वापर केल्यास केस कोरडे आणि रूक्ष होतात. यामुळेच केस दुभंगतात आणि स्प्लीट एंड्सची समस्या निर्माण होते. ज्यामुळे केसांचा आकर्षकपणा जातो. स्प्लीट एंड्स कमी करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते, जे तांदूळाच्या पाण्यात भरपूर आढळतं. केसांचं स्प्लीट एंड्सपासून रक्षण करण्यासाठी तांदूळ पाण्यात किमान 15-20 मिनिटं भिजवून ठेवा आणि त्या पाण्याने केस धुवा. हा उपाय काही दिवस केल्यास स्प्लीट एंड्सची समस्या दूर होईल.

केसांना मुलायम बनवण्यासाठी तांदूळ पाणी (Rice Water To Soften The Hair)

फक्त चमकदार केस असून उपयोग नाही. ते मऊ आणि मजबूत असणंही आवश्यक आहे. केसांच्या मुलायमपणा आणि मजबूतीसाठी तांदूळाच्या पाण्यातील अमिनो एसिडचा उपयोग होतो. एवढंच नाहीतर आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तांदूळाच्या पाण्याचा वापर केल्यास केसांची मूळही मजबूत होतात.

कोंड्यापासून मुक्ततेसाठी तांदूळाचं पाणी (Rice Water To Avoid Dandruff)

केसांतील कोंड्याची म्हणजे डँड्रफची समस्या आजकाल सगळ्यांनाच त्रासदायक ठरते. प्रदूषणामुळे बहुतेक सगळ्यांनाच ही समस्या सतावते. यामुळे फक्त केस खराबच होतात असं नाहीतर खाज आणि जळजळही होते. जर कोंड्याची समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी सोपा तांदूळ पाण्याचा उपाय करून पाहा.

उवांवरही गुणकारी तांदूळाचं पाणी (Rice Water For Removing Lice)

केसांमध्ये उवा-लिखा झाल्या असतील तर तांदूळ पाणी हा उत्तम उपाय आहे. कधी कधी पावसाच्या पाण्याने किंवा इतर कारणामुळं केसात उवा होतात. अशावेळी बाजारातील शँपूऐवजी हा तांदूळाच्या पाण्याचा उपाय तुम्ही केल्यास उवांचा त्रास कमी होईल.

ADVERTISEMENT

तांदूळाचं पाणी आहे उत्तम कंडीशनर (Rice Water Is Natural Conditioner)

केस धुतल्यावर आता हमखास कंडीशनर लावलं जातं. अनेकदा शँपूसोबत महागडं कंडीशनर घेणं खर्चिक असतं. त्यामुळे स्वस्त आणि घरगुती असं तांदूळ पाण्याचं कंडीशनरचा पर्याय तुम्ही वापरू शकता. तांदूळाच्या पाण्यात थोडं लव्हेंडर ऑईल मिक्स करून ते केसांना लावा. हे केसांना चांगलं 15 ते 20 मिनिटं लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना पोषण मिळेत आणि ते मजबूत होतील.

घनदाट केसांसाठी तांदूळाचं पाणी (Rice Water For Thick Hair)

केसांची चांगली वाढ न झाल्यास डोक्यावर केस कमी असल्याचं दिसून येतं. यामागील कारण अनुवंशिकही असू शकतं. जर तुम्हाला केसांचा घनदाटपणा किंवा व्हॉल्यूम वाढवायचा असल्यास तांदूळाच्या पाण्याचा वापर करा. चांगला परिणाम लगेच दिसून येईल. केस घनदाट आणि मुलायम दिसतील.

चेहर्‍यासाठी तांदळाच्या पिठाचे फायदे

कसं बनवावं तांदूळ पाणी (How To Make Rice Water In Marathi)

कसं बनवावं तांदूळ पाणी - How To Make Rice Water In Marathi

ADVERTISEMENT

Shutterstock

चला जाणून घेऊया कसं बनवता येईल तांदूळाचं पाणी. तांदूळाचं पाणी तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता. एक म्हणजे तांदूळ उकळलेलं पाणी आणि दुसरं म्हणजे आंबलेलं तांदूळाचं पाणी.

उकळलेलं तांदूळाचं पाणी (Boiled Rice Water)

उकळलेलं तांदूळाचं पाणी बनवण्यासाठी एका भांड्यात तांदूळ घेऊन ते धुवून घ्या. आता दुसऱ्या भांड्यात तांदूळापेक्षा जास्त पाणी घ्या आणि त्यात तांदूळ उकळायला ठेवा. जेव्हा या पाण्याचा रंग दुधासारखा होईल तेव्हा चाळणीने ते पाणी चाळून घ्या आणि ते पाणी थंड होऊ द्या. आता हे पाणी बाटलीत किंवा तांब्यात भरून ठेवा आणि फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा वापरायचं असेल तेव्हा फ्रिजमधून काढून वापरा. तुम्ही हवं असल्यास रोजच्या रोज ताजी पाणीही करून घेऊ शकता.

आंबवलेलं तांदूळाचं पाणी (Fermented Rice Water)

तांदूळाचं पाणी आंबवल्याने त्यातील गुण अजून वाढतात. तांदूळाचं पाणी आंबवण्यासाठी एका छोट्या वाडग्यात कच्चे तांदूळ घ्या आणि ते पाण्यात किमान 15-20 मिनिटं भिजत ठेवा. आता हे पाणी गाळून घ्या. नंतर हे पाणी आंबवण्यासाठी एका बाटलीत भरून ठेवा. एक ते दोन दिवस घरात सामान्य तापमानात ठेवा. दोन दिवसानंतर यातून आंबट वास येऊ लागेल. म्हणजे समजून जा हे पाणी आंबलंय. आता हे पाणी फ्रीजमध्ये ठेवा आणि गरज लागेल तेव्हा थोड्या पाण्यात मिक्स करून केसांसाठी वापरा. पण लक्षात घ्या जेव्हा वापराल तेव्हा यात पाणी मिक्स करूनच वापरा. थेट आंबवलेलं पाणी केसांवर वापरू नका. नाहीतर केस खराब होतील.

ADVERTISEMENT

तांदूळाच्या पाण्याने केस धुण्याची योग्य पद्धत (Washing Hair With Rice Water In Marathi)

तांदूळाचे पाणी केसांना लावण्याची योग्य पद्धत - Rice Water In Marathi

Shutterstock

केसांसाठी सोपा उपाय असलेलं तांदूळाचं पाणी बनवणंही सोपं आहे. पण कठीण आहे ते योग्य प्रकारे ते केसांवर लावणं. कारण हे योग्य प्रकारे केसांवर लावल्यासच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. चला जाणून घेऊया तांदूळाच्या पाण्याने केस कसे धुवावे आणि त्याचा योग्य प्रकारे वापर कसा करावा. 

  • तांदूळाचं पाणी लावण्यासाठी ते एका छोट्या वाटीत किंवा मगमध्ये घ्या. 
  • नंतर त्यात लव्हेंडर, रोजमेरी किंवा नारळाच्या तेलाचे काही थेंब घाला.
  • आता केसांना शँपू लावा आणि मग वरून तांदूळाचं पाणी घाला. ते तसंच केसांवर काही मिनिटं राहू द्या. 
  • या दरम्यान केसांना आणि स्कॅल्पला हळूवार मसाज करा. म्हणजे केसात हे पाणी शोषलं जाईल.  
  • काही मिनिटांनी केस धुवून टाका. 
  • चांगल्या परिणामांसाठी हा उपाय आठवड्यातून एक ते दोन वेळा करा. 

आंबवलेल्या तांदूळाच्या पाण्याचा उपयोग तुम्ही हेअर मास्कप्रमाणे केलेला कधीही उत्तम ठरेल. 

ADVERTISEMENT
  • तांदूळाचा हेअर मास्क बनवण्यासाठी त्यात मोहरीची पावडर मिक्स करून पेस्ट बनवा. 
  • नंतर त्यात ऑलिव्ह ऑईल गाला. आता हा मास्क स्कॅल्पला लावा आणि हळूहळू मसाज करा. 
  • लक्षात घ्या हा मास्क केसांना लागता कामा नये. 
  • 10-15 मिनिटानंतर शँपूने केस धुवून टाका. 

दहीभात खाण्याचे फायदे आणि झटपट रेसिपी

तांदूळाच्या पाण्याशी निगडीत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं (FAQs)

तांदूळाचे पाणी केसांवर वापरा तेलाप्रमाणे

Shutterstock

  • तांदूळाचं पाणी केसांना तेलाप्रमाणे लावून ठेवू शकतो का?

केस धुतल्यानंतर कंडीशन करणं गरजेचं आहे आणि ते धुणंही. त्याचप्रमाणे केस धुतल्यानंतर तांदूळाचं पाणी केसांव स्प्रे करा आणि 35-40 मिनिटांनी केस धुवून टाकणं आवश्यक आहे. कारण तांदूळाचं जास्त वेळ केसांवर राहिल्यास प्रोटीनचा ओव्हरडोस होऊन दुष्परिणाम होतील. 

ADVERTISEMENT
  • तांदूळाचं पाणी केसांसाठी रोज वापरू शकतो का?

हो. तुम्ही केसांना रोज तांदूळाचं पाणी लावू शकता. फक्त लक्षात घ्या की, सर्व प्रकारच्या केसांवर तांदूळाच्या पाण्याचा चांगला परिणाम दिसून येईलच असं नाही. कारण प्रत्येक केसांचा पोत आणि प्रत्येक भागातील पाणी यांचाही परिणाम होत असतो. 

  • तांदूळाच्या पाण्याला दुर्गंधी येते का?

जर तांदूळाचं पाणी 24 तासापेक्षा जास्त आंबवल्यास त्याला दुर्गंधी येऊ शकते. 

  • तांदूळाचं पाणी कंडीशनरच्या आधी का नंतर वापरावं?

जर तुमचे केस कोरडे असतील तर कंडीशनरऐवजी तांदूळाच्या पाण्याचाच वापर करणं चांगला पर्याय आहे. कारण याने तुमच्या केसांना चांगलं पोषण मिळेल.

#FoodFact : डाळ-भात खा आणि निरोगी राहा

ADVERTISEMENT
19 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT