कोरोना व्हायरसमुळे सगळ्या देशवासियांना घरात कोंडू न ठेवण्यात आले आहे. घरी राहण्याचा आनंद खूप जणांना आहे. पण प्रेमापासून दुरावलेल्यांचे काय? कारण आता पुढचे 21 दिवस आणि कदाचित हा व्हायरस हद्दपार होईपर्यंत कोणालाच घरातून बाहेर पडता येणार नाही. तुमच्यापासून तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड जवळ राहात असेल तर ठिक पण ज्यांचे प्रेम त्यांच्या जवळ राहात नाही त्यांच्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. कारण हीच वेळ आहे तुम्हाला तुमच्या प्रेमाची किंमत कळण्याची. कधीकधी काही गोष्टी जवळ असल्यावर त्याची किंमत आपल्याला करता येत नाही. पण जर ही व्यक्ती दूर गेली की तिची आठवण सतत येत राहते. तुमच्यासोबतही असेच झाले आहे का? तुम्हीही या काळात तुमच्या जोडीदाराला भेटू शकला नाहीत. तर आजचा विषय खास तुमच्यासाठी
नातं समजून घ्यायला वर्ष लागतात आणि तोडायला फक्त दोन मिनिटं
भांडू नका परिस्थिती समजून घ्या
shutterstock
काही जण आजच्या परिस्थितीतही जोडीदाराला भेटण्याचा हट्ट करत असतील. तुम्ही जर असे करत असाल तर ही फारच चुकीची गोष्ट आहे. उलट तुम्ही आता त्यांना समजून घेतले तर तुमच्याकडे असणारा हा गुण तुमच्या जोडीदाराला नक्की भावेल. अनेक जोडपी एकमेंकापासून जवळ राहतात म्हणून भेटण्याचा तगादा लावतात. अशा जोडप्यांनीही समजून घ्यायाला हवे. तुम्ही काही काळ भेटला नाही तर तुमचे नाते टिकणार नाही असे मुळीच होणार नाही. उलट समजूतीने घ्याल तर तुमचे प्रेम हे हमखास वाढणार आहे. त्यामुळे भांडू नका. उलट परिस्थिती नियंत्रणात आणा. उगाचच भांडण करुन आजचा दिवस वाया घालवू नका.
ब्रेकअपशी संबंधित असतो आजार, ब्रोकन हार्ट सिंंड्रोम
टेक्नॉलॉजीचा करा वापर
shutterstock
आता दिवसातून आपल्याला जोडीदारासाठी वेळ काढणे या परिस्थितीत अशक्य नाही. सध्या इंटरनेट सेवा अगदी सुरळीत सुरु आहे. तुम्ही छान व्हिडिओ कॉल करा. या आधी तुम्ही फेस टू फेस भेटत असाल पण आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भेटा. तासनतास बोला. पूर्वी जे विषय तुमच्याकडून बोलायचे राहून गेले असतील तर त्याबद्दल बोला. भविष्याविषयी बोला. तुम्हाला पुढे काय करायचे आहे ते बोला. तुमच्या प्रेमाला अधिक दृढ करा. जर तुम्हाला शक्य असेल तर मस्त व्हिडिओ कॉलवर लंच डेट किंवा डीनर डेट करा. एखादी छान रेसिपी करा त्याचे फोटो जोडीदाराला पाठवा.
संशयाला नका देऊ जागा
आता आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा असे जरी म्हटले तरी काही ठिकाणी कदाचित इंटरनेटची इतकी चांगली सुविधा नसेल पण तुम्हाला फोनवर नक्कीच बोलता येईल. जोडीदाराचा नुसता आवाज ऐकून तुम्हाला समाधान मिळत असेल तर हे झालं तुमचं खरं प्रेम. जर तुम्ही नको त्या बाबतीत नको तो भेटण्याचा हट्ट जोडीदारासोबत अजूनही करत असाल तर तुम्ही ही गोष्ट आताच थांबवा कारण तुमची ही सवय तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून दूर करु शकते. तुमच्या मनात उगाचच वाढणाऱ्या संशयाला आवरा. ही चुकी करत असाल तर आताच थांबवा. कारण संशय हा तुमचे नाते दुबळे करु शकतो. त्यामुळे या काळातही संशय निर्माण होईल असे करु नका.
एकमेकांना द्या मोकळा वेळ
shutterstock
आता तुम्हाला जोडीदाराची सतत आठवण येत असेल याचा अर्थ त्यालाही तुमची सतत आठवण यावी असे होणार नाही. कारण कित्येक जण घरातून काम करत आहेत. त्यांचा वेळ कामाचे नियोजन करण्यात जातो आणि तुमचा जोडीदार कोणतेही काम करत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचे आहे. घरात राहून दोघांनाही खूप काम असतात. आणि नसली तरी प्रत्येकाला या मोकळ्या वेळेत स्वत: मध्ये राहायचे असते. जो फावला वेळ आधी मिळाला नाही तो आता मिळाल्यामुळे प्रत्येकाला स्वत:ला समजून घेण्याची वेळ मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना त्यांचा वेळ द्या. कारण आयुष्यात me time मिळण्याची संधी फारच कमी मिळते.
आताच्या या दिवसात तुम्हाला मानसिक ताण येणे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी तुम्ही जोडीदारावहर नाहक ताण देऊ नका. एकमेकांना समजून घ्या.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.