ADVERTISEMENT
home / मनोरंजन
कोरोनावर मात करण्यासाठी कपिल शर्माची गोरगरिबांना लाखोंची मदत

कोरोनावर मात करण्यासाठी कपिल शर्माची गोरगरिबांना लाखोंची मदत

कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगभरात हाहाःकार माजवत आहे. ज्यामुळे सध्या भारतात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. सर्वसामान्य जनतेपासून ते अगदी सेलिब्रेटीजपर्यंत सर्वजण सुरक्षेसाठी घरातच आहेत. अगदी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडावं लागू नये यासाठी सर्वजण खबरदारी घेत आहेत. जीवनावश्यक सेवा वगळता सर्वजण आपापली कामे घरातूनच करत आहेत. शूटिंग बंद असल्यामुळे चित्रपटसृष्टीदेखील सध्या ठप्प झाली आहे. मात्र या सर्वांमध्ये तळहातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अशा लोकांना समाजातील अनेक स्तरांवरून मदत करण्यात येत आहे. सिनेसृष्टीदेखील अशा लोकांच्या मदतीसाठी धावून आली आहे. कॉमेडियन कपिल शर्माने तर या गोरगरिबांसाठी लाखोची मदत केली आहे.

सामाजिक बांधिलकी जपत कपिलने केली लाखोंची मदत

सध्या सर्वच रोजगार बंद असल्यामुळे दररोज कमवून पोट भरणाऱ्या लोकांचे उत्पन्न पूर्ण बंद झाले आहे. अशा लोकांचे उत्पन्न हे त्यांच्या दररोजच्या कामावर अवलंबून असते. मात्र आता कोरोनाचे संकट टाळण्यासाठी आणखी काही दिवस देशात लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा दररोज कमवून पोट भरणाऱ्या लोकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांसाठी बॉलीवूड इंटस्ट्रीमधील अनेक लोक मदतीसाठी धावून आले आहे. दर्यादिल कपिल शर्मादेखील यात मुळीच मागे नाही. कपिलने प्रधानमंत्री मदत निधीसाठी 50 लाखांची मदत केली आहे. कपिलने त्याच्या इंन्स्टाग्राम पोस्टवर याबाबत चाहत्यांसाठी एक पोस्टदेखील शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहीलं केलं आहे की, ‘ही वेळ आहे अशा लोकांसोबत उभं राहण्याची ज्यांना आज तुमची खरंच गरज आहे. यासाठीच कोरोना व्हायरसच्या विरूद्ध युद्ध लढण्यासाठी मी प्रधानमंत्री मदत निधीसाठी 50 लाखांची देणगी देत आहे. त्यासोबत तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही आपापल्या घरात सुरक्षित राहा’. या कृतीमुळे सर्वांना हसवून लोटपोट करणाऱ्या या कॉमेडीकिंगचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. सामाजिक बांधिलकी जपत कपिलने उचलेले हे पाऊल त्याच्या चाहत्यांसाठी फारच महत्त्वाचे ठरत आहे. 

समाजाचे ऋण फेडण्याची हीच आहे वेळ

काही दिवसांपासून कोरोनामुळे अनेक सेलिब्रेटीज घरात अडकून पडले आहेत. मात्र घरात राहूनही सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. या सेलिब्रेटीजना मोठं करण्यामध्ये समाजाचा फार मोठा हात असतो. त्यांना मिळालेली लोकप्रियता ही या समाजामुळे आहे याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. म्हणूनच या सामाजिक संकटाला सामोरं जाण्यासाठी अनेकांनी आपले मदतीचे हात पुढे केले आहेत. दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने तर यासाठी 1 करोडची देणगी दिली आहे. ज्यांचे पोट त्यांच्या तळहातावर आहे अशा लोकांसाठी या प्रकारची मदत फायदेशीर ठरणार आहे.अशा प्रकारे सर्वांनी मदत केल्यास या संकट काळातदेखील सर्वांना धीराने सामोरं जाण्याचं बळ नक्कीच मिळेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

कोरोनामध्येही उर्वशी रौटेलाचा हॉट व्हिडिओ होतोय व्हायरल

ADVERTISEMENT

Lockdown असूनही घराबाहेर पडला कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि …

ऑनलाईन #quarantineantakshari लावले सगळ्या सेलिब्सला वेड, तुम्ही ट्राय केले का?

 

26 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT