ऑनलाईन #quarantineantakshari लावले सगळ्या सेलिब्सला वेड, तुम्ही ट्राय केले का?

ऑनलाईन #quarantineantakshari लावले सगळ्या सेलिब्सला वेड, तुम्ही ट्राय केले का?

घरी राहून काय करायचं असा तुम्हाला प्रश्न पडला आहे ना? 31 मार्च कधी येतो आणि आपण घराबाहेर कधी पडतो,असे सगळ्यांना झाले आहे. पण आता आणखी  21 दिवस आपल्याला #homequarentine राहायचे आहे. तुमच्याप्रमाणे सेलिब्रिटीही आहेत ज्यांना घरी राहून कंटाळा आला असेल. पण तुम्हाला माहीत आहे का? सेलिब्रिटींनी न कंटाळता यावर मस्त तोडगा काढला आहे. तो म्हणजे ऑनलाईन #Quarentakshari चा. ही आहे एकप्रकारची अंताक्षरी पण सध्या याने धम्माल उडवून दिली आहे.

शनाया आणि राधिका एकत्र उभारणार विजयाची गुढी

हा आहे चँलेजचा गेम

आता या आधी तुम्ही सोशल मीडियावर चँलेज गेम खेळले असतीलच. हा सुद्धा असाच गेम आहे. यामध्ये तुम्हाला एक गाणं गाऊन मग पुढे हे चँलेंज पास ऑन करायचे असते. शाल्मली खोलगडे या गायिकेने एक गाणं गात पुढे आपल्या मराठी सेलिब्रिटींना यामध्ये टॅग केले आणि मग हे चँलेज पुढे पुढे सगळ्यांनी नेले. यामुळे झालं असं की, घरी बसलेल्या सगळ्या सेलिब्रिटींना गाण्याची संधी तर मिळाली. पण त्या निमित्ताने जुनी गाणी देखील ऐकता आली. मराठीच नाही तर हिंदीमध्ये ही हा अनोखा अंताक्षरीचा गेम रंगला. आता हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन राहण्याची गरज नाही. तर गरज आहे चांगले गाणे आठवण्याची. 

मग काय रंगली अंताक्षरी

आता सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाल्यानंतर तो काय लगेच थांबत नाही अनेकांनी ही अंताक्षरी खेळायला घेतली आहे. अनेकांनी गाणं गात आपल्या मित्रांना टॅग केले आहे. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तुटली असली तरी ही साखळी एकदम मस्त जमली आहे. घरी राहण्याचा सगळ्यांनाच सध्या कंटाळा आला आहे.पण ही अंताक्षरीची आयडिया एकदम खास आहे. मग तुम्ही सुद्धा अशी अंताक्षरी खेळायला काहीच हरकत नाही. तुमच्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्याने ही अंताक्षरी खेळली आहे. तुम्ही ट्राय केली नसेल तर करुन पाहा.

लॉकडाऊनमुळे लोकं झाली हुशार

आपल्या देशातील लोकं आहेतच हुशार. अगदी कोणतीही परिस्थिती आली तरी त्याला सामोरे कसे जायचे हे आपल्या देशातील लोकांना अजिबात सांगायला नको. सगळ्या गोष्टी धैर्याने करण्यात आपण आता एक्सपर्ट आहोत. त्यामुळे घरी राहून तुम्हला कंटाळा आला असेल तर अशी अंताक्षरी खेळा. घरात राहून तुमच्या दूर मित्रांसोबत हा गेम खेळा. आता या अंताक्षरीसाठी तुमचा आवाज चांगला असणे आवश्यक नाही. पण तुमचा वेळ चांगला जाणे गरजेचे आहे.

सध्या असा वेळ घालवत आहे दीपिका- रणवीर

घरी राहूनही करता येतेय मजा

सध्याचे दिवस फारच महत्वाचे आहेत. त्यामुळे घरात राहून तुम्हाला आणखी काही करता येत आहे का ते बघा. कारण तुम्ही आता जे नवे शोध लावाल तो ट्रेंड म्हणून प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. बघा तुम्हालाही काही सुचतं का ? 


सेलिब्रिटी सध्या मस्त घरातली काम करुन आणि असा मस्त खेळ खेळून दिवस घालवत आहेत. तुम्ही काय करताय,


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.