ADVERTISEMENT
home / Recipes
चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

नाश्त्याला रोज काय करायचे हा आपला नेहमीच प्रश्न ठरलेला. पण त्यातही कांदेपोहे, बटाटापोहे आणि उपमा हे पदार्थ तर नेहमीचेच. पण तरीही बऱ्याचदा बऱ्याच जणींच्या उपम्यामध्ये कधी पाणी कमीच होते तर कधी पाणी जास्तच होते. त्यामुळे कधी उपमा फडफडीत होतो तर त्याला कधी नीट चवच लागत नाही. चविष्ट उपमा बनविण्यासाठी त्याचे प्रमाण योग्य असावे लागते. त्याचप्रमाणे आपण कोणता रवा घेतो हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. उपमा करताना आपण रवा कसा भाजतो, रवा कोणता घेतो या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.  तरच तुमचा उपमा मऊ आणि चविष्ट होईल. आम्ही या लेखातून तुम्हाला उपमा करण्याची रेसिपी तर देत आहोतच. पण त्याचबरोबर कोणत्या टिप्स (Tips) लक्षात ठेवायच्या हेदेखील सांगणार आहोत. 

रवा कोणता घ्यावा?

Shutterstock

ADVERTISEMENT
  • उपमा  करताना घरात जो असेल तो रवा सरसकट घेतला जातो.  पण तसे करू नका. उपमा करताना बारीक रवाच निवडा. जाड रव्याचादेखील उपमा करतात पण बारीक रवा जास्त चांगला. 
  • बारीक रवा हा पटकन भाजला जातो आणि उपमा चविष्ट आणि मऊसर बनतो. त्यामुळे उपमा करायचा असेल तेव्हा रव्याची निवड करताना बारीक रवा निवडावा. त्यातही गुठळ्या असलेला रवा घेऊ नये. बाजारात गेल्यानंतर रवा नीट तपासून घ्यावा. 
  • उपम्यासाठी रवा भाजत असताना मंद आचेवर भाजावा अन्यथा रवा पटकन जळतो. त्याशिवाय भाजतानाही त्यात गुठळ्या होऊ देऊ नये. 

ख्रिसमससाठी फज आणि कुकीज करायच्या असतील तर नक्की वाचा या खास रेसिपीज

पाण्याचे प्रमाण

Shutterstock

  • तुम्ही रवा किती वाटी घेत आहात यावर तुमच्या पाण्याचे प्रमाण अवलंबून आहे. तुम्ही जर एक वाटी रवा घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला दुप्पट अर्थात दोन वाटी पाणी लागते. हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवा. 
  • सर्वात महत्त्वाचं पाणी उपमामध्ये तुम्ही घालणार असाल त्याआधी  ते व्यवस्थित उकळून घ्यावे. पाणी गरम करून घेतल्यास, उपमा अधिक मऊ होतो आणि घशाला लागत नाही. अगदी उडप्याप्रमाणे तुम्हाला उपम्याची चव मिळेल. 
  • तसेच मीठ हे नेहमी पाणी उकळताना त्यात घालून ठेवावे.  असे केल्यास ते उपम्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि सगळ्या रव्याला व्यवस्थित लागते. अन्यथा एका बाजूला मिठाची चव लागली आहे आणि दुसऱ्या बाजूला नाही अशी स्थिती होते. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. 

उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होऊ शकतो आरोग्यावर उलट परिणाम

ADVERTISEMENT

फोडणीची कमाल

Shutterstock

फोडणी साधारण जिरे, राई (मोहरी) आणि हिंग असते हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला अप्रतिम आणि चविष्ट उपमा करायचा असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात तेल घ्या. तेलामध्ये राई, जिरे, हिंग, कढिपत्ता, काजू, लाल मिरच्या, उडीद डाळ हे सर्व घाला आणि फोडणी करा. याचा अप्रतिम स्वाद येतो. उपम्याची खरी चव ही फोडणीतूनच येत असते. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात हे सगळे पदार्थ घातले आणि फोडणी दिली की तुमचा चविष्ट उपमा तयार

तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे

ADVERTISEMENT

टिप – उपम्यामध्ये कधीही हळद घालू नये. हळद घातल्यास, तो तिखट शिरा होतो. तसेच तिखट शिरा हा थोडा फडफडीत करावा लागतो. उपमा हा पांढराच असतो हे नेहमी लक्षात ठेवा. 

देखील वाचा – 

रोज नाश्ता काय बनवायचा प्रश्न असल्यास, जाणून घ्या झटपट नाश्ता रेसिपी

उपमा बनविण्याची रेसिपी –

ADVERTISEMENT

Shutterstock

  • वर सांगितल्याप्रमाणे रवा घेऊन मंद आचेवर भाजा
  • पाणी मीठ घालून गरम करून घ्या
  • दुसऱ्या कढईत वर सांगितल्याप्रमाणे फोडणी करून घ्या. त्यानंतर तुम्हाला हव्या तर हिरव्या मिरच्यांचे काही तुकडे त्यात टाका. तसचे त्यात चिरलेला कांदा घाला. तो थोडा भाजून ब्राऊन होऊ द्या. त्यात वरून भाजलेला रवा घाला आणि पुन्हा एक दोन मिनिट्स परता. त्यातच तुम्हाला हवी असल्यास, कोथिंबीर चिरून घाला
  • छान वास सुटल्यावर वरून पाणी घाला आणि त्यावर पटकन झाकण ठेवा आणि शिजू द्या
  • तयार होत आल्यावर पुन्हा एकदा परता आणि झाकण लावून वाफ काढा
  • तयार उपम्यावर खवलेले ओले खोबरे घालून आणि हवे असल्यास, लिंंबाच्या फोडीसह गरमागरम खायला द्या

रव्याचे पौष्टिक तत्व (Nutrients In Semolina In Marathi)

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

22 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT