ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
विमानातून प्रवास करताना तुमच्या सामानात नसाव्यात ‘या’ गोष्टी

विमानातून प्रवास करताना तुमच्या सामानात नसाव्यात ‘या’ गोष्टी

विमानप्रवास करणं हा सर्वच प्रवाशांचा एक आवडता वाहतुकीचा पर्याय असतो. कारण या प्रवासात वेळ आणि त्रास कमी होतो. आजकाल विमान प्रवास जास्त सुखकर आणि स्वस्त झाल्याने तो सर्वसामान्यांच्या सोयीचा देखील झाला आहे. ज्यामुळे पर्यटन, ऑफिस मिटींग्जसाठी वारंवार विमानाने प्रवास करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकांना विमानातून प्रवास करताना सामानाबाबत काय काळजी घ्यावी हे माहीत असतं. मात्र जर तुम्ही पहिल्यांदाच विमानातून प्रवास करत असाल तर तुम्हाला याबाबत योग्य माहिती असणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या विमानातून प्रवास करताना कोणत्या गोष्टी तुमच्या सामानात मुळीच नसाव्यात.

प्रत्येक एअरलाईन्सचे नियम हे थोड्याफार फरकाने  वेगवेगळे असतात. विमानातून प्रवास करताना तुमच्या तिकीटावर याबाबत सूचना दिलेल्या असतात. विमानात तुमच्या  सामानाची दोन प्रकारामध्ये विभागणी केली जाते. ज्यामध्ये चेक इन लगेजमध्ये आणि कॅरी ऑन अथवा केबिन लगेजचा समावेश होतो. चेक इन लगेज जे तुम्हाला प्रवासापूर्वी एअरलाईन्सकडे सुपूर्द करावं लागतं आणि तुम्हाला तुमच्या प्रवासातील डेस्टिनेशनवर ते परत दिलं जातं. तर कॅरी ऑन अथवा हॅंड अथवा केबिन लगेज तुम्ही तुमच्यासोबत विमानात घेऊन जाऊ शकता. या दोन्ही सामानात तुम्ही किती किलो वजन न्यायला हवं याच्या सूचना तुमच्या एअर तिकीटावर दिलेल्या असतात. शिवाय कोणतं सामान तुमच्या चेक इन  आणि केबिन लगेजमध्ये असायला हवं याचेही काही विशिष्ठ नियम असतात. 

100 मिलीपेक्षा जास्त लिक्विड –

विमानातून जाताना तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या कॅरी ऑन लगेजमधून तुम्ही 100 मिलीपेक्षा जास्त लिक्विड घेऊन जाऊ शकत नाही. यासाठी  तुम्हाला हव्या असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या 100 मिलीपेक्षा कमी वजनाचे पॅकिंग एका झिपलॉक पाऊचमध्ये पॅक करा. जर या वजनापेक्षा जास्त वस्तू तुमच्या सामानात असतील तर विमानात चेक इन करताना सुरक्षेसाठी त्या तुमच्याकडून काढून घेतल्या जातात. याचं कारण काही विशिष्ठ लिक्विड एकत्र करून हानिकारक केमिकल्स तयार करण्याचा धोका असू शकतो.यासाठी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. 

ADVERTISEMENT

Shutterstock

धारदार वस्तू –

विमानातून प्रवास करताना तुम्हाला कोणतीही धारदार वस्तू सामानातून नेण्यास मनाई आहे. नेलकटर, चाकू, लोखंडी वस्तू, हत्यारे, रेझर, सुई अशी कोणतीही धारदार वस्तू तुम्ही विमानातून प्रवास करताना तुमच्यासोबत घेऊ शकत नाही. यामागचं कारण याचा वापर इतर प्रवाशांसाठी धोकादायक असू शकतो. यासाठी सुरक्षेसाठी विमान प्रवासात या गोष्टींना बंदी घालण्यात आली आहे. 

खेळाचे साहित्य –

तुम्ही खेळाडू असाल अथवा वेकेशनवर असताना तुम्हाला खेळण्याची आवड असेल तरी तुम्ही विमानातून प्रवास करताना खेळाचे साहित्य नेऊ शकत नाही. बेसबॉल बॅट, धनुष्यबाण, क्रिकेट बॅट, गोल्फ क्लब्स, बॉकी स्टिक्स, दोरी, स्पिअर गन्स अशी खेळाची कोणतीही साधनं तुम्हाला तुमच्यासोबत प्रवासात कॅरी करता येत नाहीत. यासाठीच विमानातून प्रवास करण्यापूर्वीच या गोष्टींची काळजी घ्या.

ADVERTISEMENT

Shutterstock

स्फोटक पदार्थ –

स्फोटक पदार्थ कोणत्याही प्रवासाच्या साधनांमधून नेण्यास बंदी आहे. मात्र विमानातून प्रवास करताना तुमच्यासोबत जर स्फोटक पदार्थ असतील तर तुमच्यावर कारवाईदेखील केली जाऊ शकते. काडेपेटी, लायटर, पेट्रोल, डिझेल अथवा इतर ज्वलंत पदार्थ तुम्ही विमानातून प्रवास करताना घेऊन नाही जाऊ शकत. 

Shutterstock

ADVERTISEMENT

काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स –

अॅपलच्या ‘मॅक बुक प्रो’ आणि ‘आयफोन’चे काही मॉडेल्स चेक इन आणि केबिन अशा दोन्ही सामानातून नेण्यासाठी बंदी घालण्यात आले आहेत. याबाबत तुम्हाला तुमच्या एअरलाईन्सच्या तिकीटावर माहिती नक्कीच मिळू शकते. यासोबत काही इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये चेन इन सामानातून पॉवर बॅंक नेण्यास देखील बंदी आहे. या वस्तूंच्या काही मॉडेल्समधील बॅटरी लवकर गरम होत असल्यामुळे विमानातून प्रवास करताना धोका टाळण्यासाठी या वस्तूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. तेव्हा सामान पॅक करण्यापूर्वी याबाबत जरूर जाणून घ्या.

मसाले आणि पाणी –

विमानातून प्रवास करण्यापूर्वी चेक इन करताना तुम्ही पाण्याची बाटली घेऊन जाऊ शकत नाही. मात्र तुम्ही रिकामी पाण्याची बाटली घेऊन जाऊ शकता. एअरपोर्टवर पाण्याची व्यवस्था असते. तिथे तुम्ही तुमच्या रिकाम्या बाटलीत पाणी भरून घेऊ शकता. शिवाय तुम्हाला विमानातदेखील पाण्याची व्यवस्था केली जाते. याचप्रमाणे विमानात तुम्ही तुमच्या कॅरी ऑन लगेजमधून मसाले अथवा मसाल्याचे पदार्थ घेऊन नाही जाऊ शकतं.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

प्रेगनन्सी विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

इंटरनॅशनल टूर स्वतःच प्लॅन करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

प्रवासासाठी बेस्ट आहेत हे नेक रेस्ट, नक्की ट्राय करा

ADVERTISEMENT
03 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT