डोळे हा चेहऱ्याचा आरसा असतो असं म्हणतात. डोळ्यांतून माणसाच्या मनातील भावना समजत असतात. डोळ्यांतून जग जसं आपल्याला ओळखतं तसंच याच डोळ्यातून आपणही जगाचा शोध घेत असतो. डोळे हा शरीरातील अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे. तरिदेखील डोळ्यांची हवी तशी काळजी आपण नक्कीच घेत नाही. आता उन्हाळा सुरू आहे ज्यामुळे या काळात डिहायड्रेशनमुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय लॉकडाऊनमुळे अनेकजण घरातून ऑफिसचे काम करत आहेत. वर्क फ्रॉम होम करताना सतत लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर केल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. यासाठी जाणून घ्या डोळ्यांची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स
डोळे चोळू नका –
आपण हाताने अनेक कामं करतो, सतत हातांना अनेक गोष्टींचा संपर्क होत असतो. ऑफिसचे काम करताना वारंवार मोबाईल आणि लॅपटॉप हाताळले जातात. ज्यामुळे हातांवर जीवजंतू चिकटण्याची दाट शक्यता असते. हाताने डोळे चोळण्याची सवय तर अनेकांना हमखास असते. मात्र जर तुम्ही सतत लॅपटॉप अथवा मोबाईलवर काम करत असाल तर ही सवय वेळीच बदला. कारण डोळे चोळण्यामुळे हे जीवजंतू तुमच्या डोळ्यांमध्ये जाऊन तुम्हाला इनफेक्शन होऊ शकतं. काम करताना हात धुवून मगच तुमच्या चेहरा आणि डोळ्यांना हात लावा.
सतत हात धुण्याची सवय स्वतःला लावा –
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून आपल्याला सतत हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे कोरोनापासून आपलं संरक्षण होणार आहे मात्र एवढंच नाही जर तुमचे हात स्वच्छ असतील तर यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्यदेखील उत्तम राहू शकते. यासाठी ठराविक वेळेनंतर कमीत कमी पंधरा मिनीटे हात साबणाने अथवी हॅंडवॉशने धुवा.
घराबाहेर जाताना सनग्लासेस वापरा –
डोळ्यांच्या सुरक्षेसाठी सुर्यप्रकाशात जाताना सनग्लासेस वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे सुर्याच्या अतीनील किरणांपासून संरक्षण होऊ शकते. शिवाय यामुळे वातावरणातील धुळ आणि मातीचा डोळ्यांसोबत येणारा संपर्कही टाळता येऊ शकतो. आजकाल यासाठी खास प्रकारचे सनग्लासेस तयार केले जातात ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावाही मिळू शकतो.
सतत पाणी प्या –
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते. ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. ज्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतो. डिहाड्रेशनमुळे डोळे कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. यासाठीच उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील.
shutterstock
धुम्रपान अथवा मद्यपान करणे टाळा –
धुम्रपान आणि मद्यपानाचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर दिसू लागतो. जर तुम्हाला डोळे आणि दृष्टी यांची निगा राखायची असेल तर या व्यसनांपासून दूर राहा.
संतुलित आहार घ्या –
डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात बीटा केरोटिन, ल्युटेन, ओमेगा 3 अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि सी या पोषक मुल्यांची गरज असते. म्हणूनच उन्हाळ्यात पोषक आणि संतुलित आहार घ्या. ज्याचा परिणाम तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर होईल.
पुरेशी झोप घ्या –
जर तुमची झोप पू्र्ण झाली नाही तर तुमचे डोळे दिवसभर जड होतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी आणि शांत झोप घेणं फार गरजेचं आहे.
लॅपटॉप आणि मोबाईल डोळ्यांपासून ठराविक अंतरावर ठेवा –
अगदी जवळून मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एकटक पाहण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच डोळ्यांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट अथवा कंप्युटर स्क्रीनमध्ये योग्य अंतर ठेवा. दर अर्धा तासाने स्क्रीनपासून नजर हटवून इतर गोष्टींकडे पाहा. शिवाय दर वीस मिनीटांनी डोळ्यांची सतत उघडझाप करा. दर एक तासाने स्क्रीनपासून थोडं लांब जा. काम करताना दर एक तासाने पाच मिनीटांचा छोटा ब्रेक घ्या आणि लॅपटॉपपासून जरा दूर जा. हे छोटे छोटे उपाय तुमच्या डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतील.
डोळ्यांवरील मेकअप झोपण्यापूर्वी स्वच्छ करा-
मेकअप ही गोष्ट आजकाल नित्याचीच झाली आहे. शिवाय दररोज काजळ अथवा आयलायनर लावण्याची अनेकींना सवयच असते. मात्र लक्षात ठेवा झोपण्यापूर्वी तुमच्या डोळ्यांचा मेकअप नीट काढा आणि चेहरा, डोळे, पापण्या स्वच्छ करून मगच झोपा.
डोळ्यांचे व्यायाम करा –
नियमित व्यायाम करताना डोळ्यांचे काही व्यायाम जरूर करा. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
अधिक वाचा –
काम आणि वैयक्तिक आयुष्यात असा साधा समतोल