home / लाईफस्टाईल
काम आणि वैयक्तिक आयुष्यात असा साधा समतोल

काम आणि वैयक्तिक आयुष्यात असा साधा समतोल

आजकाल काम आणि कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र यशस्वी जीवनशैलीसाठी तुम्हाला तुमच्या काम, वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक जीवन यांच्यात समतोल राखणं फार गरजेचं आहे. मात्र हा समतोल नेमका कसा साधावा, वर्क लाईफ बॅलेन्स म्हणजे नेमकं काय, वर्क लाईफ बॅलेन्स का महत्त्वाचा आहे या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं आवश्यक आहे. 

वर्क लाईफ बॅलेन्स म्हणजे काय

वर्क लाईफ बॅलेन्स म्हणजे तुमच्या प्रोफेशनल लाईफ आणि वैयक्तिक लाईफमध्ये समतोल असणं. याचा अर्थ तुम्ही जे काम करता आहात ते प्रामाणिकपणे, कौशल्याने करणे आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात स्वतःला आणि कुटुंबाला योग्य वेळ देणं. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हा वर्क लाईफ बॅलेन्स साधणं फारच कठीण झालं आहे. कारण काम करून घरी गेल्यावरही बऱ्याचदा माणसं काम आणि कामाचा ताण घरी घेऊन जातात. शिवाय आजकालच्या आधुनिक जगात झालेल्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मेल्स, फोन कॉल्सवरून काम करावं लागतं. 

Shutterstock

जीवनात वर्क लाईफ बॅलेन्स का आहे महत्त्वाचा

वर्क लाईफ बॅलेन्स मुळे तुम्हाला तुमच्या कामाचा खरा आनंद मिळू शकतो. यामुळे तुम्हाला कामाचा ताण  येत नाही. शिवाय यामुळे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील ताणतणावाला कसं हाताळावं हे ही समजतं. ज्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्यात चिंता, काळजी, डिप्रेशन या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यांनी हा समतोल साधण्याची कला अवगत करणं गरजेचं आहे. 

वर्क लाईफ बॅलन्स कसा साधावा –

जर तुम्हाला स्वतःच तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात समतोल साधता येत असेल तर तुम्ही खरंच ग्रेट आहात. पण तुम्हाला तुमच्या काम आणि वैयक्तिक आयुष्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. अथवा या धावपळीमुळे तुम्ही ताणात आहात तर मग या टिप्स तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत.

तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधा –

कोणताही नवा जॉब अथवा प्रमोशन स्वीकारण्यापूर्वी तुमच्या वरिष्ठांशी तुमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांविषयी चर्चा करा. कारण त्यांना तुमच्याबद्दल जर काही जास्तीच्या अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेळीच तयार असणं गरजेचं आहे. शिवाय यामुळे तुम्हाला भविष्यात कोणती नवीन कामे करायची आहेत याबद्दल माहिती मिळते. ज्यासाठी तुम्ही आधीच तयार असता. 

दिवसाचं योग्य प्लॅनिंग करण्यासाठी सकाळी थोडासा वेळ द्या –

काही लोकांना ऑफिसमध्ये आल्याबरोबर लगेच कामाला लागण्याची सवय असते. मात्र अशामुळे त्यांना कामाचा अती ताण येण्याची शक्यता असते. यासाठी वेळेवर ऑफिसमध्ये जा. कामाला सुरूवात करण्यापूर्वी दिवसभराच्या कामाचे नियोजन करण्यासाठी काही मिनीटे द्या आणि त्यानुसार कामाला लागा. तुमच्या मिटींग्ज, टाक्स, टार्गेट याचं योग्य नियोजन केलं तर तुम्हाला कामाचा ताण नक्कीच येणार नाही.

कामात पूर्ण लक्ष द्या –

कामात टाळाटाळ केल्यामुळे अथवा कामाच्या वेळी इतर गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळे तुमचे काम वेळीच पूर्ण होत नाही. म्हणूनच जर तुम्हाला काम परफेक्ट करायचं असेल तर तुम्ही जे काम जेव्हा करत आहात त्यात पूर्ण लक्ष द्या. ज्यामुळे तुमच्या कामात चुका होणार नाहीत आणि तुम्हाला एकच काम वारंवार करावं लागणार नाही. काम पुन्हा पुन्हा  न करावं लागल्यामुळे तुम्हाला कामाचा अती ताण नक्कीच येणार नाही. 

नेहमीच्या कामात कौशल्य आणण्याचा प्रयत्न करा –

जेव्हा तुम्ही एखादे काम करायचे म्हणून अथवा जबाबदारी न घेता करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते चांगले होत नाही. यासाठी काम कोणतेही असू दे त्यासाठी तुमचे पूर्ण कौशल्य लावा. ज्यामुळे त्या कामाचा परिणाम नक्कीच बेस्ट मिळेल. 

तुमच्या डेस्कवर कधीच नास्ता अथवा लंच करू नका –

बऱ्याच लोकांना काम करता करता नास्ता अथवा लंच करण्याची सवय असते. यामुळे तुम्ही तुमच्या आहाराकडे नीट लक्ष देत नाही. शिवाय भुक लागलेली असेल तर तुमचे कामही नीट होत नाही. म्हणून नास्ता आणि जेवणाच्या वेळा नीट पाळा आणि काम  करताना खाणं टाळा. योग्य वेळी ब्रेक घेऊन तुमचा नास्ता अथवा जेवण घ्या. ज्यामुळे तुम्ही फ्रेश राहाल आणि कामाचा उत्साह वाटेल. 

मेडिटेशन करा –

काम आणि वेैयक्तिक आयुष्यात समतोल साधण्यासाठी नियमित ध्यानधारणा अथवा मेडिटेशन करणं गरजेचं आहे. ध्यान आणि मेडिटेशनमुळे तुमचे मन शांत आणि निवांत होतं. तुम्ही जे काम करता त्यात यामुळे तुमचे मन रमू शकतं. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या कामावर होतो.

घरी गेल्यावर ऑफिसचे काम आणि ऑफिसमध्ये घरचे काम करू नका –

अनेकांना घरी गेल्यावर ऑफिसच्या कामाचा विचार, चिंता करत बसण्याची सवय असते. शिवाय काही माणसे ऑफिसमध्ये घरातील समस्या, चिंता यांचा विचार करत बसतात. ज्यामुळे दोन्ही ठिकाणी तुमच्या कामावर परिणाम होतो. यासाठी तुम्ही जे काम जेव्हा करत आहात त्यामध्ये तुमचे पूर्ण लक्ष असेल याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये मनापासून, प्रामाणिकपणे काम करा आणि घरी गेल्यावर तुमच्या प्रियजनांसोबत तुमचा पूर्ण वेळ घालवा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा-

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

आनंदी जीवन जगण्यासाठी या ’10’ गोष्टी अवश्य करा

जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे ‘50′ आध्यात्मिक सुविचार

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित करा ‘ही’ योगासने

 

23 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this