सध्याच्या मेकअप ट्रेंडमधील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘आयब्रोज’. जर तुमचे आयब्रोज ठळक आणि उठावदार असतील तर तुमचा मेकअप, तुमचा चेहरा चांगला उठून दिसतो. तुमचे आयब्रोज पातळ असतील किंवा तुमच्या आयब्रोजमध्ये गॅप असेल तर तुम्ही अगदी झटपट तुमचे आयब्रोज फिल करु शकता. आयब्रोज भरण्यासाठी जर तुम्ही काजळ पेन्सिल किंवा काजळचा उपयोग करत असाल तर तुम्ही तुमच्या आयब्रोजसाठी आयब्रो फिलरचा वापर सुरु करा. तुमच्यासाठी आम्ही काही खास आयब्रो फिलर निवडले आहेत.जे तुम्हाला अपेक्षित असलेल्या आयब्रोजचा आकार मिळवून देईल.
आयब्रो फिलरचा वापर करा असा सल्ला देताना त्यांचा उपयोग काय आहे ते देखील जाणून घेऊया.
त्यामुळे तुमच्यासाठी आयब्रो फिलर का बेस्ट आहे ते तुम्हाला कळले असेलच.
पिंपल्सवर कमाल काम करतात या काही क्रिम्स, तुम्हीही नक्की ट्राय करा
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आयब्रो फिलर पॅलेट उपलब्ध आहेत त्यापैकी काही निवडक पॅलेट आम्ही तुमच्यासाठी निवडले आहेत.
जर तुम्हाला पॅलेट कॅरी करायचं नसेल आणि ते पॅलेट तुमच्याकडून तुटण्याची भीती असेल तर हा प्रकार तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण आयलायनर स्वरुपात मिळणारे हे आयब्रो फिलर लावायला अत्यंत सोपे आहे. शिवाय तुम्हाला यामध्ये तुमच्या स्किनटोन प्रमाणे शेडही निवडता येते.
जर तुम्हाला थोडासा बजेटमधील पर्याय हवा असेल तर तुम्ही nykaa चा आयब्रो फिलरदेखील घेऊ शकता. पावडर आणि स्टिक असल्यामुळे तुम्हाला हे फिलर पटकन वापरता येते. पण तुम्हाला थोडे जपून हे लावावे लागते. तुमचा संपूर्ण मेकअप झाल्यानंतर याचा वापर करणे शक्यतो टाळा कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर या फिलरचे पिग्मेंट राहण्याची शक्यता दाट असते.
तुम्हाला मेकअप उत्तम जमत असेल आणि तुम्ही एखादी नवी गोष्ट झटपट शिकून चांगला मेकअप करु शकता असा तुम्हाला विश्वास असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने पॅलेट वापरण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामध्ये तुम्हाला शेडचा पर्याय मिळतो. त्यामुळे तुम्ही थोडा प्रयोगही करु शकता.
आता तुमचे आयब्रोज सुंदर दिसण्यासाठी याचा वापर नक्की करा.
पिंपल्सना करा bye bye या सोप्या उपायांनी (Tips To Avoid Pimples In Marathi)