ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
पैसै वाचवा, घरच्या घरी काढता अॅक्रेलिक नखं (How To Remove Acrylic Nails At Home)

पैसै वाचवा, घरच्या घरी काढता अॅक्रेलिक नखं (How To Remove Acrylic Nails At Home)

नखं सुंदर दिसावीत म्हणून आपण मेनिक्युअर, पेडिक्युअर, नेल स्पा असे बरेच काही करतो. पण सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला खूप पैसाही मोजावा लागतो. आता प्रत्येक महिन्यात आपल्याला इतका खर्च करता येणेही शक्य नसते. आपण बऱ्याच गोष्टी घरात राहूनच करायचा प्रयत्न करतो. जर तुम्हालाही अॅक्रेलिक नखं लावायला आवडत असतील. पण ते काढण्यासाठी लागणारे पैसे तुम्हाला मोजायचे नसतील तर तुम्ही घरच्या घरी थोडीशी विशेष काळजी घेऊन तुम्ही तुमची अॅक्रेलिक नखं घरच्या घरी अगदी व्यवस्थितपणे काढू शकता. जाणून घेऊया नक्की कशी काढायची ही अॅक्रेलिक नखं तीही घरच्या घरी

अॅक्रेलिक नखं म्हणजे काय? (What Are Acrylic Nails)

अशी दिसतात अॅक्रेलिक नखं

Instagram

ADVERTISEMENT

तुम्ही नेल स्पा कधीही केला असेल तर तुम्हाला अॅक्रेलिक नखं काय हे माहीत असेल. आता अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर अॅक्रेलिक नखं म्हणजे खोटी नखं. ही नखं प्लास्टिकची असतात. एका विशेष पद्धतीने ती तुमच्या नखांवर लावली जातात. अॅक्रेलिक नखांमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. पण ते काढून टाकण्याची पद्धत ही साधारणपणे एकसारखीच आहे. कचाकड्यासारखी नखं म्हणून याला अॅक्रेलिक नखं असे म्हणतात. (आता ती आपल्या खऱ्या नखांच्या तुलनेत फारच कडक असतात. त्यामुळे ती अशी सहज तुटत नाही. म्हणूनच अनेक जण या नखांना पसंती दर्शवतात)

आता जेल पॉलिश काढण्यासाठी सलोनला जाण्याची नाही गरज

अॅक्रेलिक नखं काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (How To Remove Acrylic Nails At Home)

यापद्धतीचा करा अवलंब

ADVERTISEMENT

Instagram

नखं काढण्याच्या आणखीही काही पद्धतीही आहेत. यांचा उपयोग करुनही तुम्ही अॅक्रेलिक नखं काढू शकता.त्या कोणत्या आहेत त्या देखील जाणून घेऊया

अल्युमिनिम फॉईलचा उपयोग करून काढा acry ( Using Acetone & Aluminum Foil)

अॅल्युमनिअम फॉईलचा करा उपयोग

Instagram

ADVERTISEMENT

साहित्य:  नेल फायलर, नेल पुशर, कापूस, अॅसिटोन, अॅल्युमिनिअम फॉईल

अशा पद्धतीने काढा तुम्ही नखं :

  1. सगळ्यात आधी तुमची नख कापायची असतील तर नेल कटरने तुमची नखं कापून घ्या. 
  2. आता नेल फायलर घेऊन तुम्ही नखं फाईल करा. तुमची नेलपेंट निघेपर्यंत तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. 
  3. आता तुम्हाला कापसामध्ये अॅसिटोन घेऊन तो कापूस नखाला लावून त्याला कव्हर करण्यासाठी अॅल्युमिनिअम फॉईल लावा. 
  4. साधारण 10 ते 20 मिनिटं ठेवून मग तुम्ही पुशरच्या मदतीने उरलेला गोंद आणि नखांवरील नेलपेंट काढून घ्या. 
  5. नेल फाईलरने पुन्हा एकदा नखांना स्वच्छ करुन घ्या. 
  6. स्वच्छ पुसून नखं काही वेळ गरम पाण्यात ठेवली तरी चालतील.

इलेक्ट्रिक नेल फायलरचा करुन काढा अॅक्रेलिक नखं (Using An Electric File/Nail Bit)

साहित्य: इलेक्ट्रिक नेल फायलर, कापूस, स्वच्छ फडका

तुम्हाला खूप विशेष मेहनत घ्यायची नसेल तर तुम्ही इलेक्ट्रिक नेल फायलरचा उपयोगही करु शकता. या नेल फायलरचा उपयोग करुन तुम्हाला तुमच्या नखांना लावलेली नेलपेंट अगदी पटकन काढता येते.

ADVERTISEMENT
  1.  सगळ्यात आधी  तुम्ही नखं व्यवस्थित पुसून घ्या. 
  2. जी मशीन तुम्ही निवडली आहे. त्या मशीनची फ्रिक्वेन्सी सेट करा. जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यावरील सूचनांचे नीट पालन करा. 
  3. आता नखांच्या पुढच्या भागापासून नखांवरील नेलपेंट काढायला सुरुवात करा. अगदी हलक्या हाताने मशीनचा वापर करा. खूप जोरात नखांवर ते फिरवू नका. 
  4. नखांवरील नेलपेंट पूर्ण निघून गेल्यानंतर मग तुम्ही त्यावर अॅसिटोन लावून नखं स्वच्छ करुन घ्या.

नेल फायलरच्या मदतीने काढा अॅक्रेलिक नखं (Using Nail Filers)

साहित्य: चांगल्या प्रतीचे नेल फायलर, कापूस, स्वच्छ कपडा

नेल फायलरच्या मदतीनेही तुम्हाला अॅक्रेलिक नखं काढता येतात. ते तुम्हाला कसे काढता येतील ते पाहुया. 

  1. यासाठी तुम्हाला नेल फायलर अगदी चांगल्या क्वालिटीचे हवे. तुम्हाला नखं घासताना दुखापत होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे.
  2. नेल फायलरने हळुहळू तुम्हाला तुमच्या नखांवरील सगळी नेलपेंट काढायची आहे. तुमची स्वत:ची नखं दिसेपर्यंत तुम्हाला नेल फाईल करायचे आहे. 
  3. आता तुम्हाला अगदी स्वच्छ पद्धतीने नखं काढायची असतील तर तुम्ही कापसावर अॅसिटोन घेऊन नखांना लावा त्यावर अॅल्युमिनिअम फॉईल गुंडाळा. थोडावेळ लावा आणि मग पुशरचा उपयोग करुन नखांवरील नेलपेंट आणि गोंद काढून टाका.

नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)

गरम पाण्याचा उपयोग करुन काढा अॅक्रेलिक नखं (With Hot Water)

अशा पद्धतीनेही तुम्ही नख गरम पाण्यात भिजवू शकता

ADVERTISEMENT

Instagram

गरम पाण्याचा उपयोग करुनही तुम्हाला तुमची अॅक्रेलिक नखं काढता येतात

साहित्य : गरम पाण्याने भरलेले भांडे किंवा अॅक्रेलिक नखं काढण्यासाठीचे खास सोकर

  1. पाणी गरम करुन तुम्हाला तुमची नखं त्यामध्ये बुडवून ठेवायची आहेत. पण तुम्ही ही नखा साधारण 10 ते 15 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी भिजून ठेवणे अपेक्षित असते.
  2. गरम पाण्यामुळे तुमच्या नखांवरील गोंद निघण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही अगदी काहीही न करता गरम पाण्यात तुमची नखं बुडवून ठेवू शकता. तुम्हाला यामुळे फार दुखापत होणार नाही.
  3. हल्ली तर तुम्हाला अशा पद्धतीचे नेल सोकरही मिळतात.तुम्ही त्याचा वापरही करु शकता. कारण त्यासाठी तुम्हाला तुमची नखं जास्तवेळ पाण्यात ठेवून तसेच बसावे लागणार नाही. 

डेंटल फ्लोसच्या मदतीने काढा अॅक्रेलिक नखं (Using Dental Floss)

डेंटल फ्लॉसच्या मदतीनेही तुम्हाला तुमची अॅक्रेलिक नखं काढता येतात.

ADVERTISEMENT

साहित्य: डेंटल फ्लॉस, कापूस, स्वच्छ कपडा

  1. नखांच्या वाढलेल्या भागाकडे तुम्हाला डेंटल फ्लॉस ठेवून नखं ओढायचे आहे. असे करताना तुम्हाला नखांच्या खालच्या बाजूला फ्लॉस जाता येईल याची काळजी घ्यायची आहे.
  2. दाताला वापरले जाणारे फ्लॉस अगदी बारीक बारीक जागेतही जाते म्हणून नखांच्या खाली जाऊन तुमच्या नखांपासून अॅक्रेलिक नखांना वेगळे करते.
  3. डेंटल फ्लॉस हे चांगल्या क्वालिटीचे असायला हवे. 

सुंदर लांब, नखं आवडतात.. मग नक्की करुन पाहा nail extensions

अॅक्रेलिक नखं काढताना नेमकी कोणती काळजी घ्यावी (Precautions To Be Taken While Removing Acrylic Nails)

ही घ्या काळजी

ADVERTISEMENT

Instagra

अॅक्रेलिक नखं काढताना तुम्ही थोडी काळजी घेणेही आवश्यक असते. ती काळजी कोणती ते देखील जाणून घेऊया. 

  • नखांना विशिष्ट गोंद लावून ही अॅक्रेलिक नखं चिकटवली जातात. हा गोंद तुमच्या त्वचेला लागला नसला तरी तो काढताना विशिष्ट काळजी घ्या.जर तुम्ही नख खेचून काढली तर ती  दुखण्याची शक्यता असते. 
  • नखं गरम पाण्यात घालण्यापूर्वी तुम्ही चांगल्या नेल फायलरचा उपयोग करुन तुमची नखं अगदी व्यवस्थित फाईल करुन घ्या. मगच ती पाण्यात टाका. 
  • तुमची अॅक्रेलिक नखं मोठी असतील तर ती आधी कापून घ्या मगच तुमच्या नखांवरील अॅक्रेलिक नखं काढताना दुखत नाहीत. 

अॅक्रेलिक नखं काढल्यानंतर नखांची काळजी कशी घ्यावी (How to Heal Nails After Acrylics)

ही काळजी घेणे आहे महत्वाचे

ADVERTISEMENT

Instagram

अॅक्रेलिक नख काढल्यानंतर नखं थोडीशी नाजूक होतात. नखं काढल्यानंतर ती दुखू लागतात. जर तुम्ही नखं ओरबाडून काढली असतील तर हा त्रास तुम्हाला अगदी हमखास होतो. 

  • नखं पूर्ववत करायची असतील तर नखं पुन्हा मजबूत होणे गरजेचे आहे. तुम्ही त्यानंतर नखांना छान लिंबू चोळा. लिंबामुळे नखं टणक होतात. 
  • नखं जर खूप दुखत असतील तर तुम्ही तुमच्या नखांना बदामाचे तेल किंवा कोणतेही तेल लावून नखाला छान मसाज करा. 
  • नखांना थोडा आणखी आराम हवा असेल तर गरम पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये नखं थोडावेळ ठेवा. म्हणजे तुमच्या नखांना आराम मिळेल.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

तुम्हालाही हवी ही माहिती

ADVERTISEMENT

Instagram

1. घरी अॅक्रेलिक नखं काढताना ती खराब होऊ शकतात का?
जर तुम्ही योग्य पद्धतीने नखं काढली तर ती अजिबात खराब होणार नाहीत. ही नखं काढताना अजिबात घाई करु नका. अत्यंत सावकाशीने आणि सगळ्या स्टेप्स फॉलो करुन नखं काढा. अन्यथा नखं तुटण्याची शक्यता असते. 

2. कोणत्या अॅसिटोनचा उपयोग नखं काढताना करायला हवा?अॅक्रेलिक नखं काढायची म्हणजे सोपी गोष्ट नाही.  त्याच्या प्रत्येक कृती अत्यंत योग्य पद्धतीने करायला हव्यात. तुमच्या नखांना लावलेली नेलपेंट ही विशिष्ट पद्धतीने वाळवली जाते त्यामुळे अॅसिटोनही चांगल्या दर्जाचे हवे. तरच नेलपेंटचा थर निघायला मदत होईल. 

3. अॅक्रेलिक नखं काढण्याची आणखी कोणती पद्धत आहे का?
नखं काढण्याची एक वेगळी पद्धत म्हणजे तुम्हाला अॅक्रेलिक नख काढण्यासाठी एक खास मशीन मिळते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नखांवरील थर काढू शकता. पण ही मशीन वापरणे सगळ्यांनाच जमत नाही. कारण त्यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते. जर तुम्ही ती मशीन योग्य पद्धतीने वापरायला शिकलात तर तुमचे काम अगदी पटकन होऊन जाईल. 

ADVERTISEMENT

आता घरीच कमी पैशात काढा तुमची अॅक्रेलिक नखं 

19 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT