त्वचेच्या समस्या आजकाल कोणत्याही वयात निर्माण होतात. यासाठी सर्वच वयातील महिलांनी त्वचेची योग्य काळजी घ्यायलाच हवी. किशोरवयातच जर तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली तर वयानुसार येणाऱ्या त्वचासमस्यांचा त्रास भविष्यात कमी होऊ शकतो. त्वचेचं आरोग्य आणि आहार यांचा जवळचा संबंध आहे. तुम्ही जो आहार घेता त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम दिसू लागतो. किशोरवयात काहीही खाल्लं तरी पचतं या विचारसरणीमुळे यावयात आहाराबाबत विशेष काळजी घेतली जात नाही. मात्र याचे परिणाम पुढे भविष्यात आरोग्यावर आणि पर्यायाने त्वचेवर दिसू लागतात. यासाठीच किशोरवयीन मुलींच्या आहारात ही फळं असायलाच हवी. ज्यामुळे तुमची त्वचा आयुष्यभर चमकदार आणि निरोगी दिसेल.
किशोरवयीन मुलींनी आहारात या फळांचा करावा समावेश –
या फळांमुळे तुम्हाला पुरेसे अॅंटि ऑक्सिडंट मिळेल. ज्याचा योग्य परिणाम कायमस्वरूपी तुमच्या त्वचेवर दिसून येईल. यासाठी योग्य वयापासून या फळांचा आहार घेण्यास सुरूवात करा.
पपई –
पपई खाण्याची योग्य वेळ ही सकाळचा अथवा संध्याकाळचा नाश्ता असू शकते. कारण या दोन्ही वेळी तुमच्या शरीराला योग्य पोषणाची गरज असते. पिकलेल्या पपईमधून तुम्हाला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मिळते. या सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्सचा तुमच्या त्वचेशी नक्कीच संबध असतो. यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो शिवाय तुमच्या त्वचेचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होतं. वयानुसार त्वचेवर डाग आणि डार्क सर्कल्स दिसून नयेत यासाठी पपई खाण्याची सवय तरूणपणीच स्वतःला लावा.
Shutterstock
सिझनल बेरीज –
जेव्हा जेव्हा तुम्हााल गोड खाण्याची ईच्छा होईल तेव्हा तुम्ही बेरीज नक्कीच खाऊ शकता. स्टॉबेरीज, ब्लूबेरीज, मलबेरीज, ब्लॅकबेरीज अशा विविध प्रकारच्या सिझनल बेरीज त्या त्या हंगामानुसार बाजारात उपलब्ध असतात. किशोरवयात चुकीचा आहार घेऊन त्वचेच्या समस्या निर्माण करण्यापेक्षा या रसदार फळांचा आहारात समावेश करा. कारण या छोट्या छोट्या बेरीजमधून तुम्हाला पुरेसं व्हिटॅमिन सी मिळतं जे तुमच्या त्वचेसाठी अतिशय गरजेचं आहे. ज्यांच्या आहारात बेरीज असतात त्या महिलांची त्वचा कायमस्वरूपी तरूण दिसू शकते.
Shutterstock
अॅव्होकॅडो –
एखाद्या आईस्क्रिमसारखं टेक्चर असणारं हे फळ तुमच्या आहारासाठी नक्कीच उपयुक्त आहे. अॅव्होकॅडोचा वापर तुम्ही ज्युस अथवा स्मूदीमधून करू शकता. सलाडमधूनही अॅव्होकॅडो खाण्याची पद्धत आहे. यायमधून तुम्हाला पुरेसं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मिळेल. तुम्ही खाण्यासोबत त्वचेवर याचा फेसपॅक स्वरूपातही वापर करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा नक्कीच तुकतुकीत आणि फ्रेश दिसेल.
Shutterstock
डाळींब –
डाळिंबाच्या दाण्यांकडे पाहून ते कुणाला खावेसे वाटणार नाहीत. वाटीभर डाळिंबाचे दाणे येता जाता टाईमपास म्हणून खाण्यात एक वेगळीच मौज आहे. किशोरवयात तुम्हाला सतत भुक लागत असते अशा वेळी तुम्ही डाळिंबाचे दाणे नक्कीच खाऊ शकता. कारण यामुळे तुमच्या त्वचेला चांगला फायदा होऊ शकतो. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ईयुक्त हे फळ तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी फायदेशीर आहे.
Shutterstock
कलिंगड –
कलिंगड हे रसदार आणि सर्वांच्याच आवडीचं फळ आहे. कलिंगडामुळे तुमच्या शरीराला पुरेसं पोषण तर मिळतंच शिवाय यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. कारण कलिंगडामध्ये 92 टक्के पाणी आणि फक्त 6 टक्केच साखर असते. शिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. म्हणूनच त्वचा तजेलदार राहण्यासाठी किशोरवयापासूनच आहारात कलिंगड असायला हवं.
दररोज आहारात या फळांचा समावेश करा आणि नियमित व्यायाम करा ज्यामुळे अगदी छोट्या स्कीन केअर रूटीननेही तुमची त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसेल.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
नैसर्गिकरित्या मिळवा सुरकुत्यांपासून सुटका, सोपे घरगुती उपाय
टीनएज मुलींसाठी स्कीन केअर टिप्स, त्वचा राहील कायम चिरतरूण
ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या किशोरवयीन मुलांना अशी करा मदत